Submitted by prajo76 on 25 July, 2016 - 08:14
वास्तुशास्त्रा बद्द्ल माहिति ह्वी आहे. कोणी कोर्स केला अस्ल्यास मार्गदर्शन करावे. करिअर म्हणुन काय संधी आहेत ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसल्या कोर्सची माहिती हवीय?
कसल्या कोर्सची माहिती हवीय? वास्तुशास्त्र जे फेंगशुईवर आधारीत असते ते की शास्त्रशुद्ध आर्किटेक्चर?
फेंगशुई किंवा तत्सम वास्तुशास्त्राचा कोर्स करायचा असेल तर सध्या पेपरामध्ये खुप जाहिराती येताहेत. कुठलाही पेपर घेतलात तरी अर्धे पान जाहिरात सापडेल. बाजारात पेपर विकत मिळत नसेल तर सकाळची ई-आव्रुत्ती पाहा. मी हल्लीचे एक दोन दिवसांपुर्वी जाहिरात पाहिलेली. माझ्या एका वहिनीने इंटेरिअर डिझाईनम्ध्ये ग्रॅज्युएशन केलेले, नंतर तिने हाच जाहिराती येणारा कोर्स केला. ती अधुनमधुन फ्रि लान्सिन्ग काम करते. नोकरीची तितकीशी गरज नसल्याने असे फ्री लान्सिंग तिला चालते. कोर्स करुन नोकरी पाहिजे असल्यास कितपत संधी आहेत वगैरे माहित नाही.
वास्तुशास्त्र जे फेंगशुईवर
वास्तुशास्त्र जे फेंगशुईवर आधारीत असते ते की शास्त्रशुद्ध आर्किटेक्चर? >>> वास्तुशास्त्र जे फेंगशुईवर आधारीत असते ते. दिशा वैगैरे.. सध्या पेपरामध्ये खुप जाहिराती पाहिल्या, पण नक्कि कोणता कोर्स उपयोगि पडेल कळत नाहिये. मलाहि फ्री लान्सिंग हवय. मी आय टी मधे नोक री करतो पण पुढे मागे स्व्ताचे काहीतरी करावे असे वा ट्त आहे.
वास्तुशास्त्र ,फेंगशुई हे
वास्तुशास्त्र ,फेंगशुई हे थोतांड आहे.लोक मुर्ख बनतात म्हणुन तुम्ही त्यांना मुर्ख बनवण्याचा धंदा करणार आहात का? स्वतःच असं काहि करायचं असल्यास चांगले प्रोफेशन निवडा.
वास्तुशास्त्राला सध्या फार
वास्तुशास्त्राला सध्या फार चांगले दिवस येतील असे दिसते आहे.
कालच टीव्हीवर इस्रोच्या संशोधकांनी पंचांगाच्या शास्त्रीयतेबद्दल केलेले संशोधन व 'दिले शास्त्रज्ञांसमोर प्रेझेंटेशन' अशी बातमी पाहिली. तेव्हा अच्छे दिन येणार हे नक्की. तुमचा या विषयात करियर करण्याचा इरादा आहे हेच खरे तुम्ही होराभूषण असल्याचे प्रूफ!
तुम्हाला इतके भविष्य अॅलरेडी कळत असल्याने कोर्सबिर्स करण्याची काहीही गरज नाही. उलट स्वतःचे कोर्सेस सुरू करा.
स्वतःचे ऑफिस टाका, बस स्टँडवर किंवा फूटपाथवर मिळतात ती ४ पुस्तके वाचलीत की काम भागते. स्वतःचे घर असलेली जवळच्या ओळखीतली माणसे असतीलच. त्यांना जनसामान्यांना असतात तशा काही अडचणी चिंता इ. असतीलच. त्यांना लाफिंग बुद्धा, वॉल हँगिम्ग इ. प्रेझेंट द्या. कालांतराने प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतीलच, मग ते बुद्धामुळे कसे सॉल्व्ह झाले, हे त्यांना पटवून द्या.
त्या मुलाखतींचे फोटो हँडबिलात छापून वाटा.
मुलाखतीत तुम्हाला शिव्या दिल्या असतील तरी त्यांत तुमची स्तुतीच कशी दिसेल या बेताने कशा ट्विस्ट कराव्या, यासाठी आमच्या कट्ट्यावरील प्रसाद. वा जाधवखा यांचेशी संपर्क साधा. फॅक्ट ट्विस्टिंगमधे त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.
४-२ लोकांना इकडचा संडास तिकडे, तिकडचा दरवाजा इकडे असं करायला भाग पाडता येतं का पहा.
दुकान चांगलेच चालू लागेल,
अन हो. एकदा दुकान चालू लागलं, की फुकट सल्ले देऊ नका.
माझ्या सल्ल्याची फी कुठे पाठवायची ते संपर्कातून विचारा. मग अधिक डिटेल सल्ला देईण.
दरम्यान, हे वाचा
दरम्यान,
हे वाचा :
http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%...
त्यांना समाजसेवा करायची नाही,
त्यांना समाजसेवा करायची नाही, व्यवसाय करायचा आहे.
वास्तुशास्त्रात सध्या दोन
वास्तुशास्त्रात सध्या दोन प्रवाह पामुख्याने आहेत, एक हिंदुस्थानी अन दुसरे चायनीज.
)
चायनिज मधिल काही नियम अर्थातच हिंदुस्थानी पद्धतीच्या विरुद्ध जातात.
त्यामुळे मी हिंदुस्थानी पद्धतच वापरतो. (हां उद्या चायनामधिल घर्/वास्तु तपासायची तर तेथिल प्रदेशानुसार, तिकडिल नियम वापरीनही...
पण माझा सल्ला असा राहिल की चांगले आयटीमधे वगैरे आहात, पुरेसा/भरपुर पगार वगैरे असेल, तर उगाच "उपजिविकेकरता" या मार्गाला लागु नका. जिथे आयटीमधे आहात तिथेच बरे आहात.
हां, एक क्युरॅसिटी/अॅकॅडेमिकल इंटरेस्ट म्हणून वगैरे अभ्यास करायचा , तर जरुर करा.
अभ्यासामध्ये निव्वळ पुस्तकेवाचुन परिक्षादेऊन सर्टिफिकीटॅ मिळवणे इतके उपयोगी नाहि, तर आजपासुन नव्हे तर आत्तापासुनच, जिथे जिथे आपण जातो, जी जी वास्तू परिसर आपण बघतो, त्याचे निरीक्षण करायला सुरुवात करा, त्यातिल डाव्या/उजव्या गोष्टी /अन मग त्यांचे झालेले/होऊ घातलेले परिणाम यांचाही मागोवा घ्यायला सुरुवात करा..... निरनिराळ्या अपरिचित जागांना भेट द्या, तिथे गेल्या गेल्या "स्वतःच्याच मनावर" होणारा परिणाम आकलण्याइतके "सेन्सेटीव्ह" बना, व ते ते परिणाम नोंदवुन ठेवा, त्यामागिल वास्तुच्या संदर्भानेचि कारणे शोधा. हे सगळे दोनचार वर्षे नेटाने करीत राहिलात, तर पुस्तकात दिलेले नियम व परिणाम यांचा अनुभव/अनुभुती येऊन प्रगल्भता येईल.
सगळ्यात शेवटी, हे सगळे शिकुन, "निव्वळ पैसा मिळवणे" हा उद्देश असेल, तर माझ्या माहिती प्रमाणे, एकवेळ असलेल्या नशिबाप्रमाणे "पैकाही भरपुर" मिळेल, पण "या शास्त्रात यश" येईलच असे नाही. सबब, हे शास्त्र, लोकांच्या अडीअडचणी निवारण्याकरताच शिकायचे व वापरायचे असे धोरण असेल, तर मात्र सहसा वास्तुबाबत नि:ष्कर्षाच्या दृष्टीने अपयश येत नाही.
जर निव्वळ पैका कमवायला या क्षेत्रात उतरणार असाल, तर तसे उतरु नका असा माझा (फुकटचा) सल्ला राहील.
वास्तूशास्त्र जमेल तितकेच
वास्तूशास्त्र जमेल तितकेच फॉलो करावे.
यात काही गोष्टी सेन्सिबल वाटतात
स्मशानासमोर/गिरणीसमोर घर नको(स्मशान=सारखे दु:खाचे दर्शन/प्रेत जाळल्याचा वास, गिरणी=प्रचंड आवाज.)
पिंपळे निलख ची सर्वात सुंदर्/जुनी प्रेस्टिजियस स्किम कासकेड पिंपळे निलख स्मशान भूमीसमोर आहे.अर्थात मध्ये रस्ता असल्याने परीणाम निल होत असावेत.
टी जंक्शन च्या समोर घर नको(याचे कारण माहित नाही पण गाडीचा कंट्रोल हुकल्यास थेट घरावर जाऊन आदळेल असे काही असावे.)
घराला गोल/त्रिकोणी दरवाजा नको(प्रचंड कठीण साफसफाईला+चौकोनी कपाट बिपाट मोठे आणले पुढेमागे तर आत कसे नेणार?)
बाकी वास्तूशास्त्र म्हणून बाथरुम्/संडास बदलायला लावणारे आवडत नाहीत.
तसेच बेडरुम मध्ये आरसा नको हे अजिबात पटलेले नाही.
जिथे आयटीमधे आहात तिथेच बरे
जिथे आयटीमधे आहात तिथेच बरे आहात. >>>> ह्म्म्म्म्म
वास्तूशास्त्र जमेल तितकेच फॉलो करावे.
यात काही गोष्टीच सेन्सिबल वाटतात >>>>> हे पट्लं
Yeddie Burphy >>> लिंक्स बद्द्ल धन्य्वाद.
वास्तुशास्त्र ,फेंगशुई हे थोतांड आहे.लोक मुर्ख बनतात म्हणुन तुम्ही त्यांना मुर्ख बनवण्याचा धंदा करणार आहात का? >>>> नाहि. हेतु शुद्ध आहे.
क्रुपया मार्गदर्शन करावे हि विनंति. उगिच विरोध नको.
जर उल्लु बनाविंग टाईप शिकुन
जर उल्लु बनाविंग टाईप शिकुन व्यवसाय करायचा असेल तर हैद्राबाद, बंगलोरला शिफ्ट होण्याचा विचार करावा. इथे बिल्डरसोबत संगनमत करता येते. किंबहुना स्वत:च दोन गवंडी हाताशी ठेवुन सुद्धा खुप फायदा होण्यासारखं आहे. मनासारखं होत नसेल तर लोक छान हवेशीर आणि प्रकाशमय घराच्या भिंती पाडून इकडचे फेसिंग तिकडे, प्रशस्त हॉल मध्ये विचित्र आडवी भिंत, पाण्याची टाकी पाडून इकडची तिकडे, बेडरुमची दारं या बाजुची त्या बाजुला करायला जरा ही कचरत नाहीत.
तुम्ही ऑफिसेस मध्येही सेवा देउ शकता. टर्न ओव्हर मार खात असेल, एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असेल तर, अकांऊटंटचा टेबल कुठे हवा, पेटी कॅशची तिजोरी कुठे ठेवावी, इंजिनिअर्सने कुठल्या दिशेला तोंड करुन काम करावे,.. स्टोअर कडे बघुन "हे काय आहे? हे इथे कशाला? या जागी वजन ठेवायचे नसते, ते दक्षिण-पश्चिम कोपर्यात हलवा!", मॅनेजिंग डायरेक्टरच्या केबिन अटॅच्ड वॉशरुम मध्ये जाउन 'अरे देवा! कुण्या मूर्खाने हे कमोड इकडचे फेसिंग केलेय! ताबडतोब असे करा!' असे सल्ले देउन कमाई करु शकता.
जरा टेक्निकल टर्म्स शिकले की शॉप फ्लोअर जाउन धुमाकुळ घालण्यापासून तुम्हाला कोणी अडवणार नाही. अगदी इमर्जन्सी एक्झीट्स सुद्धा तुम्ही पूर्णपणे बंद करवु शकता.
बापरे मानव हहपुवा.म्हणून तर
बापरे मानव
हहपुवा.म्हणून तर लोकांना फेंग शुई वाली आवडतात ना? ते भिंती फोडायला न लावता स्वतःचे लोलक किंवा हिरेजडित बेडूक विकून ते जागोजागी टांगून सगळे प्रश्न सोडवतात ना
एकीचा मुलगा खूप रडायचा तर फेंङ शुई वाल्यांनी तिला घरात भूत असल्याने तो रडतो असे सांगून बरेच लोलक इकडे तिकडे लाववले होते.
टी जंक्शन च्या समोर घर नको
टी जंक्शन च्या समोर घर नको >>>
हॉर्नचा आवाज जास्त येतो. रात्री हेड लाईट्सचा प्रकाश पडत रहातो. तळमजल्यास पार्किंग असल्यास गोष्ट वेगळी.
'लोल' महितिये, हे 'लोलक' काय
'लोल' महितिये, हे 'लोलक' काय आहे?
<<आत्तापासुनच, जिथे जिथे आपण
<<आत्तापासुनच, जिथे जिथे आपण जातो, जी जी वास्तू परिसर आपण बघतो, त्याचे निरीक्षण करायला सुरुवात करा, त्यातिल डाव्या/उजव्या गोष्टी /अन मग त्यांचे झालेले/होऊ घातलेले परिणाम यांचाही मागोवा घ्यायला सुरुवात करा..... निरनिराळ्या अपरिचित जागांना भेट द्या, तिथे गेल्या गेल्या "स्वतःच्याच मनावर" होणारा परिणाम आकलण्याइतके "सेन्सेटीव्ह" बना, व ते ते परिणाम नोंदवुन ठेवा, त्यामागिल वास्तुच्या संदर्भानेचि कारणे शोधा. हे सगळे दोनचार वर्षे नेटाने करीत राहिलात, तर पुस्तकात दिलेले नियम व परिणाम यांचा अनुभव/अनुभुती येऊन प्रगल्भता येईल.<<
हे फारच छान सान्गितलेस लिम्बु!
१९९५-९७ दिल्लीत असतान्ना एका इन्टरनॅशनल बुक सेलर्सच्या ऑफीसमधे जॉब करत होते. त्या काळात फार क्रेझ होती वास्तुची. 'मयामतम' सारखे अनेक वास्तुविषयक ग्रन्थाना बाहेरच्या देशातुन मागणी होती.
नवर्याला मदत होईल म्हणुन मी ही तिथेच काही पुस्तके वाचली होती. ते करताना नातलग, परिचित मन्डळी...त्यान्च्या घराची रचना, त्यान्ना येणार्या अडचणी, सन्कटे, आणि सर्वान्चे स्वभाव हे सर्व अभ्यासत होते.
http://fengshui.about.com/od/
http://fengshui.about.com/od/popularfengshuisymbols/f/Feng-Shui-Crystals...
फेन्ग शुई लोलक.
क्रुपया अजून मार्गदर्शन करावे
क्रुपया अजून मार्गदर्शन करावे हि विनंति.