'मायबोली गणेशोत्सव २०१६ पाककृती स्पर्धा

मायबोली मास्टरशेफ - मंजूडी - हवाईयन मॉकटेल

Submitted by मंजूडी on 14 September, 2016 - 00:29

पॅनकेक सँडविच, शाही रोल्स, याम ब्रेड आणि कटलेट, एम्पेनाडा, पम्पकिन रोल, मटकीचे वडे, बदामाचा ब्रेड वगैरे चाखून झाल्यावर येडा बनके बटाटा खाता खाता आपण गारेगार मॉकटेल पिऊया.

20160913_213439-600x800_1473822189491-480x667.jpg

४ ग्लास (मॉकटेलचे नव्हेत, घरातले नेहमीचे सरबताचे) मॉकटेलसाठी:

मोसंबी - ६, सोलून आणि गर काढून
लवंगा - ३, कोरड्या भाजून पूड करून
बटरस्कॉच सिरप - ४ चमचे आणि शिवाय टॉपिंगसाठी
पिस्ता आईसक्रिम - ७-८ स्कूप

मायबोली मास्टरशेफ - रायगड - मटार-मका, याम, बटाटा यांचे लसूणी कटलेट

Submitted by रायगड on 9 September, 2016 - 19:05

याम ब्रेड करण्याकरीता याम आणायला गेले. ते अर्थातच जास्त आणले. मग याम ब्रेड करताना फ्रीज उघडून काही-काही काढताना मटार-मक्याचं फ्रोजन पाकीट नजरेस पडलं. डोक्यात म, य, ब,ल चा बुभूत्कार चालू असल्याने सर्वत्र त्या अक्षरांचे पदार्थ शोधणं वा आपसूक दिसणं होत होतं. मग म्हटलं जास्तीच्या यामचे मटार-मका घालून कटलेट्स बनवूया. अजून एक रेसिपी झाली पाकृ स्पर्धेत पोस्टायला आणि गोड याम ब्रेडच्या पुढून-मागून खायला काहीतरी तिखट-चमचमीत नको?

विषय: 

मायबोली मास्टरशेफ - रायगड - याम ब्रेड

Submitted by रायगड on 9 September, 2016 - 01:41

तर मायबोली गणेशोत्सव २०१६ च्या मास्टरशेफ स्पर्धेकरीता सादर करत आहे - याम ब्रेड.

पाकृ करीता लागणारे मुख्य घटक म, य, ब, ल वरून हवे आहेत हे वाचल्यापासून डोक्यात याम घोळत होता. मग विचार करताना याम ब्रेड बनवावा का असं डोक्यात आलं. बनाना ब्रेड नेहेमी करते तर आता ट्वीस्ट म्हणून याम ब्रेड करून बघायचा ठरवलं. माझ्या पाकृ कौशल्याच्या मानाने बरा बनला. Happy

तर मुख्य पदार्थ :

मैदा
याम - १ कंद
लोणी अथवा टर - ०.५ कप
दाम पावडर - १/४ कप

इतर पदार्थ :

बेकिंग पावडर - २ टी स्पून्स

विषय: 

मायबोली मास्टरशेफ - घोषणा

Submitted by संयोजक on 2 September, 2016 - 04:19

masterchef.jpg

आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!

विषय: 
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  २०१६ पाककृती स्पर्धा