तर मायबोली गणेशोत्सव २०१६ च्या मास्टरशेफ स्पर्धेकरीता सादर करत आहे - याम ब्रेड.
पाकृ करीता लागणारे मुख्य घटक म, य, ब, ल वरून हवे आहेत हे वाचल्यापासून डोक्यात याम घोळत होता. मग विचार करताना याम ब्रेड बनवावा का असं डोक्यात आलं. बनाना ब्रेड नेहेमी करते तर आता ट्वीस्ट म्हणून याम ब्रेड करून बघायचा ठरवलं. माझ्या पाकृ कौशल्याच्या मानाने बरा बनला.
तर मुख्य पदार्थ :
मैदा
याम - १ कंद
लोणी अथवा बटर - ०.५ कप
बदाम पावडर - १/४ कप
इतर पदार्थ :
बेकिंग पावडर - २ टी स्पून्स
ब्राऊन साखर - १ कप
दही - १ कप
व्हॅनिला इसेन्स - - १/४ टी स्पून
कृती :
१. ओव्हन ३५० deg F ला तापायला लावा.
२. भांड्यात बटर व साखर घेऊन ते फेटावे. मी स्टँड मिक्सर वापरला.
३. एकीकडे मैदा, बदाम पावडर व बेकिंग पावडर चाळून घ्या.
४. याम थोडा उकडून (पूर्ण शिजवायची गरज नाही), किसून घ्या.
५. आता बटर व साखर मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व दही घाला. फेटा.
६. आता किसलेला याम घाला व मिसळा.
७. मैदा व बदाम पावडरचे मिश्रण घाला.
८. सर्व नीट मिसळून घ्या.
९. १३ * ९ च्या बेकिंग पॅनला आतून बटरचा हात लावा.
९. बेकिंग ट्रे मध्ये ओता व ओव्हन मध्ये बेक करायला ठेवा व ४० मिनीटे बेक करा.
मस्त खरपुस सुगंध पसरलेला, गरमा-गरम तय्यार झालेला याम ब्रेड हादडा.
टीप : यात मैदा हा मुख्य घटक घेतलाय. एरव्ही मी बनाना ब्रेड बनवताना कणिक वापरते. आणखीन खरपुस होतो.
न्युट्रीशन व्हॅल्यू वाढवायला मी बनाना ब्रेड मध्ये देखील बदाम पावडर टाकते. ती आयतीच इथे नियमात बसणारी निघाली.
अंडी घालून बनवता येईल. इथे शाकाहारी पाक्रु हवी असल्याने मी अंड्यांऐवजी दही वापरले.
छान पाकृ. फोटो भयंकर मोठे
छान पाकृ. फोटो भयंकर मोठे आहेत. तेवढी साइज कमी करा.
स्पर्धेसाठी शुभेच्छा.
इंटरेस्टिंग , फोटो लहान करून
इंटरेस्टिंग , फोटो लहान करून टाका. बघायला ४० इंची टीव्ही लागतोय.
मस्तं दिसतोय याम ब्रेड!
मस्तं दिसतोय याम ब्रेड!
पाककृती छान आहे. स्पर्धेसाठी
पाककृती छान आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा!
फोटो भयंकर मोठे आले आहेत. कृपया त्यांचे आकारमान कमी करा.
मस्त रंग आलाय.
मस्त रंग आलाय.
छान दिसतोय ब्रेड!
छान दिसतोय ब्रेड!
सुंदर दिसतोय ब्रेड !
सुंदर दिसतोय ब्रेड !
फोटो ठीक दिसतायत का आता? अजून
फोटो ठीक दिसतायत का आता? अजून १-२ टाकत्ये.
सुरेख
सुरेख
मस्त. हो, फोटो साईझ बरोबर
मस्त.
हो, फोटो साईझ बरोबर आहे आता.
हा आता फोटो दिसताहेत. मस्त
हा आता फोटो दिसताहेत. मस्त दिसतोय याम ब्रेड.
मस्त, एकदम यम्मी
मस्त, एकदम यम्मी दिसतोय.
रच्याकाने, याम म्हणजे काय?
मस्त. तयार ब्रेड यम्मी
मस्त. तयार ब्रेड यम्मी दिसतोय.
व्वा! यम्मी दिसतोय याम ब्रेड
व्वा! यम्मी दिसतोय याम ब्रेड
मस्त कल्पना..
नताशा, याम हे एक रताळ्यासारखे कंदमूळ आहे.
धन्यवाद लोकहो! नताशा, याम हे
धन्यवाद लोकहो!
नताशा, याम हे बटाटा, रताळं यांसारखं एक कंद आहे. आतून केशरी रंग असतो. नुसतं उकडून देखील छान लागतं.
मस्त सोनेरी रंगाचा झालाय
मस्त सोनेरी रंगाचा झालाय ब्रेड . खूप आवडला.
तयार ब्रेड मस्त दिसतोय.
तयार ब्रेड मस्त दिसतोय.
शेवटचा फोटो अप्रतीम..
शेवटचा फोटो अप्रतीम..
एक लास्ट का फायनल का आखरी
एक लास्ट का फायनल का आखरी तळटीप घातली हो, संयोजक!!
खूप छान ..फोटोही मस्त.! ब्रेड
खूप छान ..फोटोही मस्त.!
ब्रेड चा रंग एकदम सुंदर..!
भारी आहे ब्रेड !
भारी आहे ब्रेड !
मस्त दिसतोय. किचन वापरतेस तर
मस्त दिसतोय. किचन वापरतेस तर म्हणजे कधीकधी.
माझ्याकडुन पहीला नंबर रायगड
माझ्याकडुन पहीला नंबर रायगड ला, एक तर 'म य ब ल' हे चारही घटक वापरले आहेत आणि यीस्ट न वापरता ब्रेड आहे.
ब्रेड तोंपासु दिसतोय. ऑल द बेस्ट
त्या ब्रेडचा फायनल फोटो बघून
त्या ब्रेडचा फायनल फोटो बघून तो डायरेक्ट तसाच उचलून खावासा वाटतोय..
मस्तच.. मैदा १ कप घेतलाय का?
मस्तच..
मैदा १ कप घेतलाय का?
याम म्हणजे सुरण ना?
याम म्हणजे सुरण ना?
सही दिसतोय
सही दिसतोय
किचन वापरतेस तर म्हणजे
किचन वापरतेस तर म्हणजे कधीकधी.>>>:D
आशिका, रायगड दोघींच्या रेसिपी आल्या आता तुझीही एक रेसिपी येऊदे मामी
आशिका, रायगड दोघींच्या रेसिपी
आशिका, रायगड दोघींच्या रेसिपी आल्या आता तुझीही एक रेसिपी येऊदे मामी>>>>>>>>>> आशिका, रायगड आणि मामी भगिनी मंडळ का?
हो सस्मित
हो सस्मित
Pages