पॅनकेक सँडविच, शाही रोल्स, याम ब्रेड आणि कटलेट, एम्पेनाडा, पम्पकिन रोल, मटकीचे वडे, बदामाचा ब्रेड वगैरे चाखून झाल्यावर येडा बनके बटाटा खाता खाता आपण गारेगार मॉकटेल पिऊया.
४ ग्लास (मॉकटेलचे नव्हेत, घरातले नेहमीचे सरबताचे) मॉकटेलसाठी:
मोसंबी - ६, सोलून आणि गर काढून
लवंगा - ३, कोरड्या भाजून पूड करून
बटरस्कॉच सिरप - ४ चमचे आणि शिवाय टॉपिंगसाठी
पिस्ता आईसक्रिम - ७-८ स्कूप
मोसंब्यांच्या गरात लवंगेची पूड आणि ४ चमचे बटरस्कॉच सिरप घालून ब्लेंड करून घ्या आणि गाळून घ्या. त्यात पिस्ता आईसक्रिमचे स्कूप घालून स्लो स्पीडवर ३-४ मिनिटं ब्लेंड करा. ग्लासमध्ये ओतून बटरस्कॉच सिरपचं टॉपिंग करून मस्त गारेगार मॉकटेल चवीचवीने प्या.
पग्यासारखाच गणपतीसमोर ठेवलेल्या आणि आलेल्या फळांचं काय करायचं हा प्रश्न पडला होताच. तशी फळं येताजाता खाऊन संपतात पण मास्टरशेफ स्पर्धेसाठी काही पाककृती करावी हे डोक्यात होतं. ठाण्याला सत्कार रेसिडेन्सीमधे लिंबूरस, स्प्राईट, दालचिनी पावडर आणि व्हॅनिला आईसक्रिम या सगळ्याचं 'लेमन कूलर' असं मॉकटेल मिळतं, टॉपिंगला पुदिना असतो. त्या धर्तीवर घरातली मोसंबी सत्कारणी लावत हे मॉकटेल तयार केलं. बटरस्कॉच सिरप घरी होतंच, दालचिनीऐवजी लवंगेची पूड घालून पाहावीशी वाटली, कारण स्पर्धेच्या नियमांत बसत होती. व्हॅनिला आईसक्रिमने लवंग आणि बटरस्कॉचचा स्वाद लपला जाईल असं वाटून सौम्य स्वादाचे पिस्ता आईसक्रिम वापरले. आणि मोसंबी, लवंग, बटरस्कॉच, पिस्ता असे सगळे स्वाद एकमेकांबरोबर मस्त मिळून आले.
पिस्ता आईसक्रिमऐवजी टेन्डर कोकोनट आईसक्रिम वापरता येईल पण व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम नको. दोन तीन घोट घेऊन झाल्यावर लवंगेचा स्वाद जाणवायला सुरूवात होते. लवंगा जास्त झाल्या तर टाळूला त्याचा ऊग्रपणा जाणवतो त्यामुळे त्या जरा बेतानेच वापरा.
मस्त, पण फोटो कुठाय ???
मस्त, पण फोटो कुठाय ???
छान !!! फोटो कुठयं????
छान !!! फोटो कुठयं????
रीसाईज करत होते गं खूपच मोठे
रीसाईज करत होते गं
खूपच मोठे मोठे झाले होते.
मस्त दिसतय
मस्त दिसतय
आले आले फोटो आले.
आले आले फोटो आले.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
मस्त रेसिपी....
मस्त रेसिपी....
छान आहे मॉकटेल. नक्की करणार.
छान आहे मॉकटेल.
नक्की करणार. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त !
मस्त !
मस्त!
मस्त!
वाह. एकदम हटके आणि फ्रेश
वाह. एकदम हटके आणि फ्रेश पाकृ!
मस्त !
मस्त !
मस्त
मस्त
यम्मी मला हे माबो मास्टरशेफ
यम्मी
मला हे माबो मास्टरशेफ मधले पदार्थ कोणी आयते करुन खायला घालेल का
बघुनच कस गारेगार वाटलं.
बघुनच कस गारेगार वाटलं. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
तु_अनु + ६८७ भारी पा.क्रू.
तु_अनु + ६८७
भारी पा.क्रू.
मंजूडी ग्रेट आहेस _/\_
मस्त !
मस्त !
अहाहा! चला एवढं सगळं
अहाहा! चला एवढं सगळं खाल्ल्यावर एक ड्रिंकचा उतारा हवाच!
मस्त तोंपासू पाकृ
भन्नाट!
भन्नाट!
व्वा ! खुपच छान चव असणार
व्वा ! खुपच छान चव असणार ह्याची . नक्की करुन बघणार ...
फोटो पण मस्तच...
वा...सोप्पे आहे...भन्नाट!
वा...सोप्पे आहे...भन्नाट!
मस्तच आहे , नक्की करून बघणार.
मस्तच आहे , नक्की करून बघणार.
मस्तच लागत असणार हे. नक्की
मस्तच लागत असणार हे. नक्की करुन बघणार.
छान
छान
मस्त मॉकटेल !
मस्त मॉकटेल !
इनोव्हेटिव्ह आहे हे .
इनोव्हेटिव्ह आहे हे .
मस्त, मस्त ! ह्यावर्षीच्या
मस्त, मस्त !
ह्यावर्षीच्या गणेशोत्सवात खरंच इतक्या एकसे एक हटके पाककृती आलेल्या दिसत आहेत की मत कुणाला द्यायचं हा एक प्रश्नच आहे !!
वा !! मस्त दिसतेय
वा !! मस्त दिसतेय
मस्त आहे.. टेंडर कोकोनट
मस्त आहे.. टेंडर कोकोनट आईस्क्रिमबरोबर छान लागेल.
स्लर्प.... मी कधी येवु?
स्लर्प.... मी कधी येवु?
मस्त!
मस्त!
Pages