काही मुक्तछंद

परवानगी (शृंगारिक)

Submitted by अजिंक्यराव पाटील on 21 October, 2024 - 11:24

आधी गुंततील डोळे
डोळ्यातून इशारा मिळालाच तर
मग तुझ्या काळ्याशार लांबच लांब केसात शिरत तो आकडा काढून तुझ्या बटा मोकळ्या करीन मी.. एकामागून एक.

डोळ्यांनी बोलता बोलता जर तू पुढे केलेस तर, तुझे मऊ गुलाबी सायी सारखे ओठ, त्यांची परवानगी घेईन मी उजवा अंगठा फिरवून..

विषय: 

आज नको ना लिहायला?

Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 July, 2019 - 00:35

माझ्याकडे नाही आज ,
एखादी गोष्ट ऐकवायला,
ना एखादा किस्सा आहे सांगायसारखा
बस काही चुरगळलेली पाने आहेत, डस्टबिन शेजारी पडलेली
त्यांना आता त्यांच्या अंगावर पेनाची खरखर नकोय
ना हवाय शाईने तयार झालेला ओलावा
ओल्या काँक्रीटच्या एकटेपणात, डायरीच्या पानातला गुलाब तेवढा दरवळतोय
पण पाने कोरीच आहेत, टाईप रायटरही धूळ खात पडलाय
त्याच्या किबोर्ड वरची अक्षरे अजूनही वाट पाहतायत
कुणीतरी त्यांना त्यांच्या क्रमाने लावायची
समोर पडलेल्या 'दा विन्सी कोड' ला पाहून
भिंतीवरची 'लिओ' ची मोनालीसा
मध्येच हसत आहेे, तर कधी मध्येच रुसते आहे

Subscribe to RSS - काही  मुक्तछंद