तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ४ : राहुल गांधी आणि राखी सावंत
मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.