नुकताच लता मंगेशकर यांचा वाढदिवस साजरा झाला(२८ सप्टेंबर) आणि वर्तमानपत्रात त्यांच्या बद्दल रकाने भरभरून माहिती छापून आली. त्यांच्या फक्त दोन दिवस अगोदर म्हणजे २६ सप्टेंबर रोजी सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा वाढदिवस होता परंतु देवची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. लता यांच्या स्वराला तोड नाहीच. जागतिक पातळीवर नावाजलेल्या गायिका आहेत त्या. परंतु देवने पण अभिनय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे यात शंका नसावी.
होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात.
मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याला 'तिसरी इनिंग' म्हणणं धाडसाचं होईल पण तरी म्हणतोच.
माझी पहिली इनिंग झाली बोटीवर. त्याबद्दल तुम्ही सविस्तर वाचलं आहेच. दुसरी चालू आहे ती प्रोफेसरीची, ज्याबद्दल थोडंफार वाचलं आहेत. त्यातून एखादेवेळेस तिसरी निर्माण होण्याची शक्यता आहे. ती होईल किंवा नाही, मात्र आत्ताच त्यात मला मजेदार अनुभव आले ते शेअर करणं जरूर आहे.
एक कलाकार
जवळजवळ चौदा तासांची शिफ्ट करून तो फ्लॅटवर पोचला तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. थकलेल्या शरीराने आणि सुन्न मनाने तो सोफ्यावर बसून राहिला. त्याचा रूम पार्टनर केव्हाच दिवा मालवून झोपला होता. इतके थकल्यावरही त्याला अंथरुणावर आडवे व्हावेसे वाटेना. तो स्वयंपाकघरात गेला खायला काही आहे का ते बघायला. आदल्या दिवशीचा ब्रेड आणि दूध तेवढेच फक्त दिसत होते. तेच त्याने पोटात ढकलले आणि परत सोफ्यावर येऊन बसला. ‘कसले वैफल्य आहे हे आणि का?’ तो स्वत:वरच चिडला. ‘आता का रागावतोय आपण आणि कोणावर? सोशल मेडियावरच्या प्रतिक्रियेला एवढे महत्व का देतोय आपण?’
चित्रपट शक्ती. अभिनयातील एक शहनशाह आणि एक बादशाह आमनेसामने. कोणी म्हणते अमिताभने दिलीपकुमार खाऊन टाकला, तर कोणी म्हणत दिलीपसाबनी बच्चनला खाऊन टाकला. एक ट्रॅजेडी किंग तर एक अॅंग्री यंग मॅन. दोघांना साजेसा रोल. कोणी कोणाला खाऊन टाकला हे ठरवणे थोडे अवघडच. पण इथेच खरी तुलनेची मजा असते.
..
अॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..
त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अॅक्टींग तोडली !
पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अॅक्टींग तोडली !