चित्रपट शक्ती. अभिनयातील एक शहनशाह आणि एक बादशाह आमनेसामने. कोणी म्हणते अमिताभने दिलीपकुमार खाऊन टाकला, तर कोणी म्हणत दिलीपसाबनी बच्चनला खाऊन टाकला. एक ट्रॅजेडी किंग तर एक अॅंग्री यंग मॅन. दोघांना साजेसा रोल. कोणी कोणाला खाऊन टाकला हे ठरवणे थोडे अवघडच. पण इथेच खरी तुलनेची मजा असते.
हल्लीच्या काळातील एक चित्रपट.. मोहोब्बते! इथे पुन्हा तोच अॅंग्री यंग मॅन, जो बिग बी म्हणून ओळखू जाऊ लागलाय. तर आता त्याच्या समोर आहे किंग ऑफ रोमान्स शाहरूख खान. दोन सुपर्रस्टार आमनेसामने. ईतरही कित्येक चित्रपटांत या दोघांनी एकत्र काम केले आहे. पण जुगलबंदी म्हणावी अशी या एकाच चित्रपटात. शाहरूख त्याच्या होमपीच वर बॅटींग करतोय, तर अमिताभ समोरून डायलॉग डिलीव्हरी. दोघांचेही चाहते पुन्हा कोणी कोणाला खाऊन टाकला या चर्चेत.
नायकप्रधान चित्रपटांच्या संस्कृतीत दोन नायिका आमने सामने क्वचितच येतात. पण येतात तेव्हा चर्चा होतेच. त्यातही नृत्य असेल तर हमखास होते.
चित्रपट दिल तो पागल है. माधुरी दिक्षित आणि करिष्मा कपूर.
चित्रपट देवदास - पुन्हा एकदा माधुरी दिक्षित आणि ऐश्वर्या राय.
या दोन्ही चित्रपटांत माधुरी दिक्षितला अनुक्रमे करिष्मा आणि ऐश्वर्या राय यांनी मात दिली अश्या वावड्या उठलेल्या. माझा या दोन्हींवर विश्वास नाही.
नुकत्याच आलेल्या पिंगा गाण्यात दिपिका-प्रियांका चर्चेऐवजी वेगळाच वाद रंगला ती गोष्ट वेगळी. पण हाती आलेल्या परीक्षणांनुसार दिसण्यात दिपिका प्रियांकापेक्षा तर अभिनयात प्रियांका दिपिकापेक्षा सरस ठरलीय. खरे खोटे चित्रपट बघूनच ठरवावे लागेल.
कधीकधी असे अभिनयाचे सामने जुगलबंदी न राहता सरळसरळ खाऊन टाकला प्रकारात मोडतात. एक चटकन आठवणारे उदाहरण दामिनी.
खरे तर हा स्त्रीप्रधान चित्रपट. ऋषी कपूरचा रोल असाही चिरकूटच होता. दामिनी झालेली मीनाक्षी क्षेषाद्री डोळे झाकून त्याला सरस ठरत होती. पण अचानक मध्यंतरानंतर सनी देओल कुठून उगवला आणि त्याने दामिनीसकट चित्रपट खाऊन टाकला.
पण या पापाची फळे त्याला डर चित्रपटात भोगावी लागली. ज्यात तो हिरो होता. हे आता म्हणायलाही कसेतरीच वाटतेय. पण खरेच तो हिरो होता. आणि तेव्हा नवोदितच असलेल्या शाहरूखने निगेटीव्ह भुमिका अशी काही साकारली की सनी देओल, जुही चावला आणि ईतर छोट्या मोठ्या कलाकारांसह तो अखंड पिक्चरच खाऊन टाकला.
सलमान खान आणि अभिनय हे एका वाक्यात लिहायचे दोन शब्द नाहीत. अगदी `हम आपके है कौन' मध्ये तो कितीही गोड गोजिरवाणा वाटला असला तरी माधुरीने तो चित्रपट सहजपणे आपल्या पदरात घेतला होता. पण अश्याच काही अपेक्षा ठेवून मी `प्यार किया तो डरना क्या?' बघायला गेलेलो तर तिथे उलटेच झाले. काजोलने आपल्यातर्फे काहीही कसर ठेवली नव्हती, आणि तिची भुमिकाही तोडीस तोड होती. तरी तो चित्रपट मला सलमानचाच `वन मॅन शो' वाटला होता. पण त्यानंतर त्यातला तो तसा सलमान फार क्वचितच दिसला.
शाहरूख खान आणि आमीर खान या दोघांची जुगलबंदी बघायची फार्रफार इच्छा आहे. एक आतली खबर लागली आहे की २०१७ ला ती पुर्ण होण्याची शक्यता आहे. अभिनय तसेच स्टारडमच्या जुगलबंदीबरोबर काही बॉक्स ऑफिस रेकॉर्डही तुटलेले बघायला मिळतील.. पण भविष्याचे बाजूला राहू द्या, तुर्तास भूत-वर्तमानातच राहूया..
धागा सुरू करायला ईतके पुरेसे आहे, नंतर भर टाकतो ...
जुन्या चित्रपटांमध्येही अभिनयाची जुगलबंदी वगैरे रंगत असतील तर येऊ द्या ..
मी जुन्यातील काही आठवायला गेलो तर सौदागर मधील जय वीरू, आणि तिरंग्यातील नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या आधीचे काही आठवत नाही.
संघर्ष मधे दिलीपकुमार -
संघर्ष मधे दिलीपकुमार - संजीवकुमार. त्यात कमी सीन्स असून संजीवकुमारच भाव खाऊन गेला होता.
पैगाम मधे दिलीपकुमार - राजकुमार. त्यात राजकुमारच छाप पाडून गेला होता. नंतर पुढे अत्यंत आचरट भूमिका करणार्या राजकुमारने या चित्रपटात अतिशय सुरेख नैसर्गिक अभिनय केला होता
दाग मधे शर्मिला टागोर - राखी. राखी जास्त प्रभावी ठरली होती.
माबोवर धागा काढण्याची
माबोवर धागा काढण्याची जुगलबन्दी लावली तर तू आणी राकु. तसेच तू आणी तो. तसेच राकु आणी तो. आता यातला तो कोण ते तूच शोध.:खोखो:
अर्थ- स्मिता आणी शबाना. यात
अर्थ- स्मिता आणी शबाना. यात शबाना भाव खाऊन गेली.
लाल पत्थर - हेमा आणी राखी. यात हेमाने छान काम केले पण राखी भाव खाऊन गेली म्हणे. मी पाहीलेला नाही.
बसेरा- रेखा आणी राखी. अगेन राखी भाव खाऊन गेली.
Dilip Kumar n big b yanchyat
Dilip Kumar n big b yanchyat tulna nai hou shakat ..doghancha kaal vegla hota ... n both are perfect at their respective times .I respect both of them equally
सौदागर मधील जय वीरू>>>> की
सौदागर मधील जय वीरू>>>> की शोले? राजू आणि वीरू होते बहुतेक.
सौदागर मधील जय वीरू >> ??>
सौदागर मधील जय वीरू >> ??> सौदागर मध्ये राजू आणि वीरू.. शोले मध्ये जय वीरू
रश्मी
हो धन्यवाद शोले आणि
हो धन्यवाद
शोले आणि सौदागरमध्ये मी नेहमी कन्फ्यूज होतो.
त्रिशुल हरीभाई म्हणजेच संजीव
त्रिशुल
हरीभाई म्हणजेच संजीव कुमार आणि अमिताभ...
especially एका सीन मध्ये अमिताभ चा रक्ताळलेला हात शेकहँड करताना संजीव कुमार हातात घेतो, आणि मग जी काय डायलॉग आणि अभिनयाची फटकेबाजी आहे..ती माशाल्लाह !!
उदा: एक मि. के लीये मुझे लगा की मेरा ही खून है.. इ.इ. रादर तो अक्खा मुव्ही च अशी अभिनयाची बेहतरीन जुगलबंदी होती
सागर - कमल हसन आणि ऋषी कपुर
सागर - कमल हसन आणि ऋषी कपुर
दिवार कि कालापथ्थर ?
दिवार कि कालापथ्थर ?
जयंत.१, दिवार पण नाय अन का.प
जयंत.१,
दिवार पण नाय अन का.प पण नाय्...तो त्रिशुल होता...बदल केलाय प्रतिसादात
सगळे एकसारखेच होते
सगळे एकसारखेच होते
राखी आणि अभिनय ? किती दगडी
राखी आणि अभिनय ? किती दगडी निर्विकार डोळे आहेत तिचे. आणि चेहराही. कोणत्याही भावना डोळ्यापर्यंत पोचतच नाहीत, त्यामुळे काही मुवीज मधे तिने केलेला अंध व्यक्तीचा रोल एकदम सुट झाला होता.
तरीही राखी अभिनयात रेखा आणि हेमामालिनी पेक्षा कधी तरी सरस वाटली? हे वाचुन एवढं आश्चर्य वाटलं कि ते व्यक्त करण्यासाठी ही पोस्ट लिहावीशीच वाटली.
शर्मिला टागोर मला अजिबातच आवडत नाही, पण तरी राखीपेक्षा बरीच. चेहर्यावर काही चित्रविचित्र भाव आणता येतात. मख्ख चेहरा नसतो.
शोले आणि सौदागरमध्ये मी नेहमी
शोले आणि सौदागरमध्ये मी नेहमी कन्फ्यूज होतो. >>>> !!! सचिन व सुजीत सोमसुंदर मधे मी नेहमी कन्फ्युझ होतो म्हणण्यासारखे आहे हे ऋन्मेष :). किंवा शाखा आणि दीपक पराशर.
राखीच्या भुवया नेहमी
राखीच्या भुवया नेहमी कोरलेल्या असतात. मग ती बायकोच्या रुपात असो , वहिनिच्या रुपात असो या "मेरे करण अर्जुन" आयेंगे म्हणत म्हातारी असो.
शतरंज के खिलाडी इतकी भारी
शतरंज के खिलाडी
इतकी भारी भारी नावे आहेत... दोन कुणी वेगळे काढणे शक्य नाही.
सामना - डॉ. लागू आणि निळू फुले
सचिन व सुजीत सोमसुंदर मधे मी
सचिन व सुजीत सोमसुंदर मधे मी नेहमी कन्फ्युझ होतो म्हणण्यासारखे आहे हे ऋन्मेष <<
फा चा सिक्सर..
जयंता, त्या सगळ्याच बुढ्या /
जयंता, त्या सगळ्याच बुढ्या / जवान हिरॉइन्सच्या असतात. तुझी निरिक्षण शक्ती फार ग्रेट आहे असं कौतुक करणार नाहीए. कळलं?
या दोन्ही चित्रपटांत माधुरी
या दोन्ही चित्रपटांत माधुरी दिक्षितला अनुक्रमे करिष्मा आणि ऐश्वर्या राय यांनी मात दिली अश्या वावड्या उठलेल्या. माझा या दोन्हींवर विश्वास नाही.>>>> स्वतःचे डोळे/के नव्हते की सोबत?
राखी अतिप्राचीन काळी सुंदर
राखी अतिप्राचीन काळी सुंदर दिसत असे. उदा: जीवन मृत्यू
https://www.youtube.com/watch?v=uex2GnRrqFU&t=0m50s
मात्र अभिनय फ्रॉम शर्मिला टागोर स्कूल ऑफ मुंडी हिलाविंग.
तरीही राखी अभिनयात रेखा आणि हेमामालिनी पेक्षा कधी तरी सरस वाटली? >>> रेखा, हेमा (जया आणि सुषमा, सबकी पसंद निरमा) एवढेच नव्हे तर नर्गिस, मीनाकुमारी, शबाना ई सर्वांना तिने एकाच सीन मधे केवळ हेअर स्टाईल व डान्स स्टेप मधे खाल्ले आहे. हेअर स्टाईल मधे प्रिन्सेस लिया ला सुद्धा.
https://www.youtube.com/watch?v=8T-JFccgRPg&t=3m40s
ही क्लिप म्यूट करून बघा. जास्त इफेक्ट येइल.
तरीही राखी अभिनयात रेखा आणि
तरीही राखी अभिनयात रेखा आणि हेमामालिनी पेक्षा कधी तरी सरस वाटली?>>>बसेरा बघीतला असल्यास परत एकदा नीट बघावा, आणी बघीतला नसल्यास तो बघावा.
ओहब्बते आणि के३़जी मध्ये
ओहब्बते आणि के३़जी मध्ये अभिनयाची नाही तर प्राणायामा चा जुगलबंदी होती. झालं दू:ख की दीर्घ श्वास घ्या, रोखा, डायलॉग सोडा, श्वास सोडा. ऑ आता तुमची पाळी. तोपयंत प्रेक्षकांनी कपालबडवती कराव.
प्राणायामा चा जुगलबंदी होती.
प्राणायामा चा जुगलबंदी होती. झालं दू:ख की दीर्घ श्वास घ्या >>>
ऑफिसच्या नेटवर ती जगप्रसिद्ध
ऑफिसच्या नेटवर ती जगप्रसिद्ध सगळ्यांना अभिनयात मात देणारी क्लीप पहाता येणार नाहीए. आणि मोबाइल फोनचं नेटवर्क मंद आहे. घरी जायची वाट पहावी लागणार. पण प्रिन्स लिया हेअरस्टाइल म्हटल्याबरोबर कोणता डान्स असेल ते कळालं मला लगेच. विनोद खन्नाबरोबरचा 'मु. का. सि.' मधला. हो ना? आणि विनोदी नाचाचा उल्लेख आहे, म्हणजे तोच तो. खात्रीच आहे माझी.
प्राणायामा चा जुगलबंदी होती.
प्राणायामा चा जुगलबंदी होती. झालं दू:ख की दीर्घ श्वास घ्या >>>
राजकुमार अभिनयासाठी नाही तर
राजकुमार अभिनयासाठी नाही तर सणकी पणासाठी प्रसिद्ध होता. त्याला डोळ्यासमोर ठेवून भूमिका लिहील्या जात म्हणून तो भाव खाउन जात असे. अभिनयात तो युसूफसाब, हरिभाऊंना मात देणे शक्य नाही. दिलीपराव काहीसे थेट्रीकल आणि बरेचसे स्टायलिश अभिनव करत. सहज सुंदर अभिनव म्हणजे हरिभाउ, नासीर.
विधाता मधे दोघेही मेलोड्रामाटिक वाटले. त्यात चक्क शम्मीकपूर नैसर्गिक वाटला.
बाकि, आमच्या काळातल्या कुठल्याही नायिकांना नावे ठेवायच काम नाय, सांगून ठेवतो. निळ्या डोळ्याची राखी पडद्यावर आले ना कि, अस्सं अस्सं व्हायचं अगदी काळजात.
परिंदा मध्ये नाना आणि जॅकी,
परिंदा मध्ये नाना आणि जॅकी, जॅकी आणि अनिल यांच्या मधले काही दृश्य खरंच छान आहेत.
त्रिशुल मध्ये ही संजीव कुमार आणि अमिताभ चे काही शॉट्स मस्तच.
'शक्ती' नाही आठवला का कुणाला?
'शक्ती' नाही आठवला का कुणाला?
मी तुम्हारे सामने बाप की
मी तुम्हारे सामने बाप की हैसियत से नही बल्की
बल्की अभिनय होता तोच शक्ती ना?
फारेण्ड हो ते शोले सौदागर मी
फारेण्ड
हो ते शोले सौदागर मी असेच काही पकाव लिहिलेले.. हे राजू चल बीरू ईमली का बूटा बेरी का पेर.. गाणे बोलून बघितले असते तर ती जय वीरूची चूक झाली नसती..
ललिता प्रिती
शक्ती चित्रपटाचे नाव लेखाचा पहिलाच शब्द आहे ना..
यार तुम्ही मी लिहिलेले न वाचता थेट प्रतिसादात उतरता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले
Pages