बाळ गर्भावस्थेत असल्यापासून ते 5 वर्षे वयाचे होईपर्यंत चा काळ त्याच्या मेंदूच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो . जिथून कुठून मिळेल, तिथून माहिती मिळवून , वाचून मी माझ्या गरोदरपणात या नोट्स काढल्या होत्या . जसजशी नवीन माहिती मिळेल, तशी ती update करत राहिले. त्यातील क्लिष्टता टाळून सोप्या शब्दांत महत्त्वाची माहिती थोडक्यात देण्याचा मी या लेखात प्रयत्न केला आहे.
--------------------------------------------------
(४) लहान
०९-१२-२०१४
--------------------------------------------------
जेव्हा होतो मी लहान
ऐकत असे गोष्टी महान ।
ना कळेना ना समजेना
आनंद गगनात मावेना ।।१।।
लहान पण देगा देवा
त्यात सर्वांना आनंद मीळावा ।
नसावी चिंता कशाची
असावी इच्छा मनमुराद जगण्याची ।।२।।
जगता जगता अनुभव आले
चुक बरोबर सांगुन गेले ।
मी माझ्या मर्जिने वागत गेलो
लहानाचा मोठा होत गेलो ।।३।।
जगण्याच्या प्रवासात खुप शिकावे
काहीतरी चांगले करून दाखवावे ।
इतरांना काही तरी चांगले द्यावे