मतभेद

मित्र दे रे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 May, 2019 - 12:12

मित्र दे रे (या निडणुकीत व्हाट्स अप् वर मित्र तुटतांना पाहीले अत्यंत टोकाची भूमिका घेवून भांडतांना पाहीले ,खूप वाईट वाटले . )
*****

संवाद साधून
घेई समजून
व्यर्थ व्यवधान
सुटे मग ॥

सुटे अभिमान
शंकेचे कारण
मैत्रीचे मरण
होई जेणे॥

देई रे हसून
घेई रे हसून
उघडी बोलून
कथा व्यथा ॥

होताच अवघे
मित्र जिवलग
आनंदाची बाग
जग होय ॥

दिल्याविना काही
मिळत ते नाही
कर्माची ही पाही
रित असे ॥

विक्रांत मैत्रीला
सदैव भुकेला
सांगतो दत्ताला
मित्र दे रे ॥

विषय: 

ज्ञानेश्वरांच्या चरित्रविषयक मतभेद

Submitted by मी मी on 29 November, 2014 - 12:20

संतसाहित्य वाचत आहे सध्या. आपल्याच संस्कृती बद्दल बऱ्याच गोष्टी नव्याने कळत आहेत विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांबद्दल वाचतांना विश्वास बसू नये अश्या काही बाबी वाचनात आल्यात. त्यांच्या ज्ञानेश्वरी बद्दलही अनेक वादंग आहेत त्यावर सांगोपांग चर्चा झाल्या आहेत आणि संशोधन सुद्धा सुरु आहे. काही शंका आणि तर्कांचे प्रमाण मिळालेत काहींचे नाही पण धूर उठलाय तर कुठेतरी काहीतरी आहे हे नक्की … त्यातले काही मुद्दे खाली मांडते … जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.

Subscribe to RSS - मतभेद