तुकोबांची अभंग गाथा

तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे | नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||

Submitted by पुरंदरे शशांक on 22 October, 2014 - 07:11

तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे |
नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||

कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥
नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥

Subscribe to RSS - तुकोबांची अभंग गाथा