पाककला

उपयुक्त माहिती.

Submitted by supriya19 on 8 August, 2008 - 12:43

जुन्या हितगुजवर हा धागा होता. ईथे दिसला नाही आणि एक प्रश्न होता म्हणुन मी हा धागा सुरु केला.
admin, काही चुक झाली असेल तर तुम्ही हा विभाग हलवु शकता.

विषय: 

लोणचे कसे टिकवावे?

Submitted by प्रतिभा on 30 July, 2008 - 01:32

गेल्या तिन चार वर्षांपासुन घरी केलेले आंब्याचे तसेच लिंबाचे लोणचे टिकतच नाहि. म्हणजे दोन ते तिन महिन्यातच त्याला बुरशी येते.

विषय: 

बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

विषय: 

पाककृती आणि आहारशास्त्र

Submitted by webmaster on 6 July, 2008 - 13:34
पाककृती शोधताय?
आहाराप्रमाणे
(उदा. शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन )
प्रकारानुसार
(उदा. आमटी, कढी, पिठले , चटणी, कोशिंबीर, लोणचे , चिकनचे (कोंबडी) प्रकार)
प्रादेशिक
(उदा. खानदेशी, कोल्हापुरी, इटालियन)
शब्दखुणांप्रमाणे
विषय: 

कन्दाचा रोस्टी व मूग कढीलिम्बाचे रायते

Submitted by anjut on 23 September, 2007 - 14:02

३ मोठे बटाटे किसून अर्ध रताळ किसून,१०० ग्राम कन्द किसून ३ कच्ची केळी किसून १ पाकीट मश्रूम्स,२ टे स्पून कोथिम्बीर चिरलेली, ४ मिरच्या बारीक चिरून,२ टे स्पून तूप्,थोडेसे भाजलेले जिरे,वाटलेले आले लसूण १ टे स्पून, चीज पाऊण वाटी, मीठ चवीनुसार.

विषय: 
शब्दखुणा: 

तांदळाच्या उकडीचे थालिपीठ आणि corn चे सुप

Submitted by rakhee on 22 September, 2007 - 11:08

थालिपीठ :

तांदळाच्या उकडीमध्ये चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, वाटलेली हिरवी मिरची व जिरे पुड घालावी. थोडेसे पाणि घालून चांगले मळून गोळा बनवावा. हा मोठा गोळा लहान गोळ्यांमधे विभागावा. तव्यावर कुकिंग स्प्रे किंवा तेल लावावे. एक छोटा गोळा घेऊन त्याचे थालिपीठ थापावे. ह्या थालिपीठाला मधे एक आणि त्या भोकाच्या भोवती अजुन ४-५ भोके पाडावीत. ह्या भोकांमधे तेल सोडावे. झाकण ठेऊन खालची बाजु क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे. मग झाकण काढुन थालिपीठ उलटावे. दुसरी बाजु क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे.

सुप :

विषय: 
शब्दखुणा: 

मिक्स भाजी पराठा

Submitted by मनःस्विनी on 21 September, 2007 - 16:11

मिक्स भाजी पराठा,

हा एक पौष्टीक पदार्थ आहे. तसा वेळखाऊ असला तरी आधी तयारी असतेच कापून ठेवलेल्या भाज्यांची तेव्हा माझ्या मते पटकन होईल असा.

वेळः जसे म्हटले की आधी भाज्या तयार असतील नक्कीच अर्धा तास लागेल.
२ वाटी जाड कणीक(हो, जाड चांगली लागते. मी घरून जाड दळून आणली. जाड कणकीची चपाती ही चवीला नक्की वेगळी लागते, करून पहा. तेव्हा इथे जाडच कणीक वापरा(स्टोन ग्रांईड पिठ घ्या),
अर्धा वाटी बेसन,
मूठभर बाजरी पिठ,
मूठभर ज्वारी पिठ,
पराठा मसाला(हा आधी तयार करून ठेवा, धणा पुड,जीरा पुड, आमचूर पुड, किंचीत ओवा पुड(भाजुन), अनारदाणा पुड(आधी हलका भाजून बारीक वाटा),

विषय: 
शब्दखुणा: 

पालकाचा हिरवा पराठा आणि हिरवी करी

Submitted by प्रिंसेस on 21 September, 2007 - 08:38

पालक पराठा आणि हिरवी करी
पराठे बनवण्यासाठी लागणारा वेळ : साधारण अर्धातास.
पराठा साहित्य :
दोन जुडी पालक
१० पाकळ्या लसुण
अर्धा इंच आले किसुन
धण्या जिऱ्याची पुड १ छोटा चमचा
हळद, मीठ, तिखट चवीनुसार
गव्हाचे पीठ दीड वाटी,
बेसनाचे पीठ अर्धी वाटी
पाणी आणि तेल/ तुप

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पाककला