शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
जपान मध्ये एक छोटसं बेट आहे त्याचं नाव आहे, ओकिनावा. या बेटाचे वैशिष्ट्य असे आहे की येथील सर्व माणसे शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात. संपूर्ण जपान मध्ये शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या दर एक लाखांमध्ये 65 आहे अनेक प्रगतीशील देशांमध्ये ही संख्या 30 पर्यंत आहे तर आपल्या देशामध्ये ही संख्या फक्त तीनच आहे. दीर्घायुषी होणे म्हणजे एका अडचणींची शर्यतच आहे जणू!
११ ऑक्टोबर हा जागतिक स्थूलता अथवा लठ्ठपणा प्रबोधन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने स्थूलता अर्थात लठ्ठपणा याविषयी थोडीशी माहिती करून घेणे सयुक्तिक ठरेल.
“मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहीत नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे…….
.....
.....
आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे.
आजीला अचानक किडनी सूज आल्यामुळे ऍडमिट करावे लागले, डॉक्टर म्हणाले शुगर शूट झाल्यामुळे असा त्रास झाला आहे...
आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच बीपी आणि शुगर चेक करण्याचा प्लॅन आहे...
चांगले मशीन सुचवू शकता का... वापरण्यास सोपे असावे आणि ऍक्युरेट...
स्त्रियांचे आरोग्य हवामानाशी निगडीत आहे ही बाब हल्ली प्रकर्षाने जाणवत आहे कारण पर्यावरणाचा समतोल ढासळला तशा स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हवामान बदलांचा परिणाम पुरुषांच्या आणि बालकांच्या आरोग्यावरही होतोच; पण त्याबद्दल चर्चा नंतर कधी करू.
भूक लागली असताना खाणं ही आणि प्रकृती आणि संस्कृतीही.
दुसर्याला जरूर द्या मग त्याकरिता मुद्दामून जास्त बनवा.
भूक लागली असताना ती चहा/कॅाफी/ तत्सम पेयांनी मारणं ही विकृती.
भूक लागली नसताना खाणं ही ही विकृतीच.
किती खावे- पोट म्हणेल तितके.
कधी खावे-भूक लागली असताना.
काय खावे-ताजे
कसे खावे-शांतपणे बसून.
ह्या, आयुष्य इतके सोपे असते तर काय हवे होते….