११ ऑक्टोबर हा जागतिक स्थूलता अथवा लठ्ठपणा प्रबोधन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने स्थूलता अर्थात लठ्ठपणा याविषयी थोडीशी माहिती करून घेणे सयुक्तिक ठरेल.
लठ्ठपणा ही ही सध्या जगभर भेडसावणारी समस्या आहे. त्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर सतत संशोधन होत असते. अलीकडे एक मजेदार संशोधन वाचले. काही स्थूल व्यक्तींना अति गोड खाण्याची सवय असते. त्याची काही कारणे आहेत त्यात अजून एकाची आता भर पडली आहे.