मतदारांचा मतदानाविषयी निरुत्साह
गणपा म्हणत हुता समद्या म्हारश्ट्रात फकस्त ४६% मतदान झालयं. टिवी , पेपर समद्या खेड्यापाड्यात , वाडीवस्त्यांवर पसरलेलं असताना ही यडी जन्ता यवढी मुर्दाड कशी ? मतदानासारक नेक काम करायचं सोडुन आमची म्हराटी जन्ता लोकं नुस्तेच बोंबलत हिंडत्यात . अशा लोकास्नी कसं लायनीवर आणायचं ? असं काय करावं लागलं म्ह्ण्जी ह्या मुर्दाडांना मतदान कराया भाग पाडता येईल ? असा एकादा कायदा करता ईल का ? जसं शिगरेटी बिडी सार्वजनीक ठिकाणी फुकल्यावर पाच का इस हजार दंड करणार हायेत तसं काय करता यनार न्हाय का ?
काय म्हण्तुस गणपा तुझा काय इचार हाये ?
मायबोलीकर तुम्हास्नी काय वाटतयं ?