Submitted by बाजिंदा on 15 October, 2014 - 08:02
गणपा म्हणत हुता समद्या म्हारश्ट्रात फकस्त ४६% मतदान झालयं. टिवी , पेपर समद्या खेड्यापाड्यात , वाडीवस्त्यांवर पसरलेलं असताना ही यडी जन्ता यवढी मुर्दाड कशी ? मतदानासारक नेक काम करायचं सोडुन आमची म्हराटी जन्ता लोकं नुस्तेच बोंबलत हिंडत्यात . अशा लोकास्नी कसं लायनीवर आणायचं ? असं काय करावं लागलं म्ह्ण्जी ह्या मुर्दाडांना मतदान कराया भाग पाडता येईल ? असा एकादा कायदा करता ईल का ? जसं शिगरेटी बिडी सार्वजनीक ठिकाणी फुकल्यावर पाच का इस हजार दंड करणार हायेत तसं काय करता यनार न्हाय का ?
काय म्हण्तुस गणपा तुझा काय इचार हाये ?
मायबोलीकर तुम्हास्नी काय वाटतयं ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन दोन घटस्फोट झाल्यामुळे
दोन दोन घटस्फोट झाल्यामुळे कोणाची बाजू घेऊ याचं कन्फ्यूजन झालं असेल.
निरुत्साह! अनुत्साह नाही.
निरुत्साह! अनुत्साह नाही.
उरलेले ५४ टक्के मायबोलीवर भांडतायत सकाळपासून!
धन्यवाद बेफी , बदल केलाय. काय
धन्यवाद बेफी , बदल केलाय.
काय करणार सगळीकडे UN लावायची सवय लागलीयं
५४% वाल्यांनी भांडायला हरकत नाही पण मतदान करा.
बीजेपीला याचा फटका बसणार,
बीजेपीला याचा फटका बसणार, काँग्रेसला फायदा होणार.मोदीला लोक कंटाळेत असाच याचा अर्थ आहे.
म्हैस पाण्यात अन् लोणी
म्हैस पाण्यात अन् लोणी केवढ्याला
म्हैस पाण्यात अन् लोणी
म्हैस पाण्यात अन् लोणी केवढ्याला >>>
म्हैस पाण्यात जाण्याआधी तरी पिळायची होती .
निरुत्साह का नसेल? अनेक
निरुत्साह का नसेल?
अनेक वेळेला कागदपत्रांची पुर्तता करूनही यादित नाव येत नाही. नोकरिच्या ठिकाणाहून कन्सेशन मिळत नाही. शिवाय मतदान करूनही तिच महागाई आणि तेच प्रोब्लेम. हा येवो किंवा तो येवो. गरिब जनता जैसे थेच.
फक्त ४६ %.. आता घरोघर
फक्त ४६ %.. आता घरोघर मतपेट्या घेऊन फिरायची वेळ आलीय !
मतदार यादीत नाव असुनही मतदान
मतदार यादीत नाव असुनही मतदान न करणार्यांना किमान ५ ते १० हजार रुपये दंड करायला हवा.
दक्षिणा जर तुम्हाला एकही उमेदवार निवडुन द्यायचा नसेल तर नोटा वापरा पण मतदान करा , नोटा परिणामकारक रित्या वापरला तरच राजकिय पक्षांना त्याचा धाक बसेल.
अहो बाजिंदा मला ढिग मतदान
अहो बाजिंदा मला ढिग मतदान करायचं आहे. पण यादीत नावच नाही.
सुट्टी पण आधी सांगितली होती
सुट्टी पण आधी सांगितली होती व ऐन वेळेस रद्द केली.
ऑनलाइन किंवा पोस्टाने मतदान
ऑनलाइन किंवा पोस्टाने मतदान करण्यासाठी सुविधा हवी.
माझ्यामते ज्याला मतदान करायची
माझ्यामते ज्याला मतदान करायची इच्छा नाही त्याला मतदान करायला भाग पाडणे हा मुर्खपणा आहे.
लॉजिकली विचार करता अश्या निरुत्साही लोकांचे कोणाला मत द्यायचे हे ठरलेले नसते, ना त्यांनी आपले काही मत बनवले असते. ते मतदान करायला आळस करतात याचा अर्थ कोणीही येवो त्यांना काही फरक नसतो.
मग अश्या लोकांना जबरदस्ती खेचून मतदान करायला लावल्यास त्यातून चुकीच्या उमेदवाराला वा पक्षाला ते मतदान होण्याची शक्यता, म्हणजेच अयोग्य आणि अविश्वासार्ह मतदानाची टक्केवारी वाढणार नाही का?
उदाहरण द्यायचे झाल्यास "कौन बनेगा करोडपती"मधील ऑडियन्स पोल. त्यातही सरसकट सर्वच प्रेक्षकांनी आहे अधिकार म्हणून बटण दाबून पर्याय निवडण्यापेक्षा, ज्यांना अक्कल आणि जाण आहे त्यांनीच उत्तर दिले तर A B C D या चार पर्यायांपैकी बरोबर उत्तराचा टक्का आपसूक वाढणार ना... तसेच हे.
मतदानाची क्वांटीटी वाढण्यापेक्षा ते क्वालिटी मतदारांकडून होत असलेले केव्हाही चांगलेच. आणि मतदानाला उत्साहाने बाहेर पडणे हाच त्या क्वालिटीचा पहिला मूलभूत निकष.
Haryana 73% Maha 46%!!!!!!
Haryana 73% Maha 46%!!!!!!
ऋण्म्या लेका मतदान केंद्रावर
ऋण्म्या लेका मतदान केंद्रावर गेलास तर 'नोटा' नावाचा प्रकार अस्तिवात हाये ते तरी कळलं न्हवं. म्हंजी त्याचा वापर करत्यात हे सुदिक समजल.
बाजिंदा, माझा पॉईंट समजण्यात
बाजिंदा,
माझा पॉईंट समजण्यात आपली गल्लत होतेय. (पॉईंट चूक की बरोबर ते नंतर ठरवू)
नोटा वापरायला जाणारेही ते तसे एक मत बनवून गेलेले असतात. पण ज्यांनी स्वताचे ठाम मतच बनवले नाही अश्यांना फोर्स करून चुकीचे मत त्या पतपेटीत टाकायला लावण्यात काही अर्थ नाही.
अवांतर - माझ्या वरच्या पोस्टमधील पहिल्या वाक्यात वापरलेला मुर्खपणा हा शब्द धागाकर्ता किंवा कोणी वैयक्तिक घेऊ नका हा. "ते चुकीचे आहे" एवढ्याच अर्थाने तो शब्द वापरला आहे
निरुत्साह का नसेल? अनेक
निरुत्साह का नसेल?
अनेक वेळेला कागदपत्रांची पुर्तता करूनही यादित नाव येत नाही. नोकरिच्या ठिकाणाहून कन्सेशन मिळत नाही. शिवाय मतदान करूनही तिच महागाई आणि तेच प्रोब्लेम. हा येवो किंवा तो येवो. गरिब जनता जैसे थेच. >> +१
नोटा चा तरी कितीसा फायदा होतोय? किती % लोकांनी तो वापरलाय ते कळत नाहीच!
निरुत्साहाचा संबंध
निरुत्साहाचा संबंध निवडणूकपूर्व काळात प्रत्येक पक्षाने केलेल्या स्वस्त राजकारणाशीही असेल असे कोणालाच वाटत नाही आहे का?
१५ ते २० टक्के मते कदाचित
१५ ते २० टक्के मते कदाचित 'ह्यातला कुठलाच पक्ष नको' असे म्हणणारी असतील आणि त्यांना हे नक्की माहीत असेल की त्या त्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मते देऊन आपापला पक्ष स्पर्धेत उतरवणारच, मग जायचेच कशाला?
'किमान टक्केवारी' हा एक निकष असायला हवा ह्या विचारापासून आज आपण बरेच दूर आहोत असे आपले वाटते.
@ यावेळेस प्रचाराने खुपच
@ यावेळेस प्रचाराने खुपच खालची पातळी गाठली होती... असं नाही वाटत!
प्रचार शेवटच्या क्षणी नेहमीच
प्रचार शेवटच्या क्षणी नेहमीच खालची पातळी गाठतो. लोकांच्या मनात पक्षांची जी समीकरणे होती ती निव्वळ राजकीय फायद्यासाठी त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी बदलली हे काही टक्केवारीच्या पचनीच न पडणे हे महाराष्ट्रातील मतदान कमी होण्याचे एक कारण असू शकेल असे मला वाटते.
व्यक्तीपूजक भारतीय समाजाचे एक
व्यक्तीपूजक भारतीय समाजाचे एक नुकतेच घडलेले उदाहरणः
गोपीनाथ मुंडे निवर्तले म्हणून पंकजा मुंडेंना पुढे करण्यात येणे
गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात येण्याची गरज नव्हती असे मोदींनी म्हणणे
गोपीनाथ मुंडे नाहीत म्हंटल्यावर भाजपकडे महाराष्ट्रासाठी नेताच / चेहराच नाही हे बहुतेकांना वाटू लागणे!
ह्यात कोठेही पक्षाच्या आगामी (प्रपोझ्ड) कार्याचा संबंध नाही, कोणताही इश्यू नाही.
ही व्यक्तीपूजा बाराशे वर्षे तरी चालूच आहे.
मी लिव्ह टाकून मतदान करायला
मी लिव्ह टाकून मतदान करायला घरी आलोय.
एक (उदाहरणार्थ)
एक (उदाहरणार्थ) मतदारसंघः
जेथे वर्षानुवर्षे भाजपचा उमेदवार उभा केला जातो, कधी तो जिंकतो, कधी पडतो. पण त्याच्या प्रचारात शिवसैनिक पूर्ण उत्साहाने उतरतो. (असेच उलटेही, म्हणजे उमेदवार शिवसेनेचा आणि कार्यकर्ते भाजपचे)
(तसेच, हेच राष्ट्रवादी व काँग्रेसचेही)
आता सगळेच विभक्त झाल्यानंतर स्थानिक पातळीला किती अमाप गोंधळ उडेल?
तो गोंधळ पचनी पाडून मतदान करणे नकोसे वाटणारेही अनेक असतील ना?
बेफि...+१ आणि नुस्ता गोंधळ
बेफि...+१
आणि नुस्ता गोंधळ नाही तर धर्म युद्धाची स्थिती आहे...... कित्यक वर्ष युति म्हणुन एकत्रित काम करणार्याना आता वेगळे बुथ माडतांना प्रचंड मानसिक त्रास हा मा़झ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला होतो... कुठे नेउन टाकलाय कार्यकर्त्याला...
आमचीच ही स्थिति मग मतदार राजा चे काय घेउन बसलात भौ
http://www.loksatta.com/vidha
http://www.loksatta.com/vidhansabha/bjp-to-be-beneficial-of-raised-vote-...
इथे ६४% (विक्रमी) मतदान झाल्याचं म्हणत आहेत. काय खरं आहे?
भारताच्या घटनेनुसार मतदानाची
भारताच्या घटनेनुसार मतदानाची सक्ती करता येत नाही. मत न देण्याचेही स्वातंत्र्य आपल्याला आहे.
'नोटा' पर्यायाला सर्वात जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द होईल अशी सुधारणा करण्याचे दडपण नागरीकांनी आयोगावर आणावे. कधीतरी त्याचा विचार झाल्यास तो उपयुक्त 'नोटा' ठरेल.
...जाता जाता एक वाक्य लिहीतो :
If voting changed anything, they would make it illegal !!
जिज्ञासा , ४६% हा ३
जिज्ञासा , ४६% हा ३ वाजेपर्यंतचा आकडा होता, त्या मानाने बरचं मतदान झालं , तरी अजुन मोठ्या प्रमाणात व्हायला हवं होतं , हरियानात जवळपास ७१% झालयं.
मत न देण्याचेही स्वातंत्र्य आपल्याला आहे. >>> कुमार मान्य आहे , नोटा पण तुम्हाला तोच पर्याय देतोय आणि तो मतदानच न करण्यापेक्षा जास्त परिणामकारक होऊ शकतो. आणि जेवढा जास्त नोटा (योग्य ठिकाणी ) वापराल तेवढं निवडणुक आयोगावर जास्त प्रेशर येईल.
If voting changed anything,
If voting changed anything, they would make it illegal !!>>>अगदी
फेसबुकवर एक इमेज फिरते आहे ती
फेसबुकवर एक इमेज फिरते आहे ती पहा

Pages