मतदारांचा मतदानाविषयी निरुत्साह

Submitted by बाजिंदा on 15 October, 2014 - 08:02

गणपा म्हणत हुता समद्या म्हारश्ट्रात फकस्त ४६% मतदान झालयं. टिवी , पेपर समद्या खेड्यापाड्यात , वाडीवस्त्यांवर पसरलेलं असताना ही यडी जन्ता यवढी मुर्दाड कशी ? मतदानासारक नेक काम करायचं सोडुन आमची म्हराटी जन्ता लोकं नुस्तेच बोंबलत हिंडत्यात . अशा लोकास्नी कसं लायनीवर आणायचं ? असं काय करावं लागलं म्ह्ण्जी ह्या मुर्दाडांना मतदान कराया भाग पाडता येईल ? असा एकादा कायदा करता ईल का ? जसं शिगरेटी बिडी सार्वजनीक ठिकाणी फुकल्यावर पाच का इस हजार दंड करणार हायेत तसं काय करता यनार न्हाय का ?
काय म्हण्तुस गणपा तुझा काय इचार हाये ?
मायबोलीकर तुम्हास्नी काय वाटतयं ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किमान चार महिने झाले त्या इमेजला.
काहीतरी फरक पडला असेलच.
काटकसरीचे आणखी उपाय शोधायला लागले असतील Wink

हे एक व्हॉट्स अ‍ॅप वर फिरत होतं -

>>>नवरात्रिचे उपवास करणारा अफझल खान पाहिला आहे का?
जिथे जाईल तिथे गीता भेट देणारा?
निवडून आल्या आल्या गंगामातेची आरती करणारा?
नेपालमध्ये गेल्यावर पशुपतिनाथ मंदिरात पूजा करणारा
रायगडवर येवून शिवछत्रपतींच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसणारा..... अफझल खान?
वाईट वाटते मनाला जेव्हा राजकारणापोटी प्रामाणिक पंतप्रधानांवर नको नको ते आरोप केले जातात.
ज्या पंतप्रधानापायी आज आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय अश्या नेत्या बद्दल बोलताना काहीही तारतंम्य पाळलं जात नाही.
गोध्राच्या वेळेला मोदींच्या मागे फ़क्त आम्हीच उभे होतो असे दावे करणारे आज त्यांना अफजल खानाची सेना म्हणतायेत.
गुजरातचा दौरा करून आल्यावर जे गुजरातच्या विकासाचे कौतुक करत होते तेच आज मुंबईचा गळा दाबुन गुजरातचा विकास झाला आहे असा आरोप करतायेत.
आणि हे सगळं का.... तर पंतप्रधाना मूळे ह्यांच राजकीय भविष्य धोक्यात आले आहे म्हणून.
एक लक्षात ठेवा ह्या सगळ्याची उत्तरे १५ तारखेला देउन ही सगळी दुकाने कायमची बंद करायला भाग पाडावी लागतील.
- देशभक्त मतदार<<<

Pages