माकडगाणे ........
Submitted by पुरंदरे शशांक on 31 December, 2013 - 06:10
माकडगाणे ........
माकड होते झाडावर
उड्या मारी भराभर
इकडून तिकडून फांदीवर
कधी खाली कधी वर
शेपूट राही वरचेवर
कधी सोडी सैलसर
गिरकी घेते हातावर
थांबत नाही क्षणभर
खाऊ दिसता जमिनीवर
खाली येते सरसरसर
खाऊ घेऊन मूठभर
भरभर जाते झाडावर
जाऊन बसते फांदीवर
दात विचकते वरचेवर
केस किती ते अंगभर
खाजवते खरखरखर
सरसर सरसर झाडावर
माकड फिरते भरभरभर ......
विषय:
शब्दखुणा: