Submitted by पुरंदरे शशांक on 31 December, 2013 - 06:10
माकडगाणे ........
माकड होते झाडावर
उड्या मारी भराभर
इकडून तिकडून फांदीवर
कधी खाली कधी वर
शेपूट राही वरचेवर
कधी सोडी सैलसर
गिरकी घेते हातावर
थांबत नाही क्षणभर
खाऊ दिसता जमिनीवर
खाली येते सरसरसर
खाऊ घेऊन मूठभर
भरभर जाते झाडावर
जाऊन बसते फांदीवर
दात विचकते वरचेवर
केस किती ते अंगभर
खाजवते खरखरखर
सरसर सरसर झाडावर
माकड फिरते भरभरभर ......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी!! आवडली.
भारी!! आवडली.
मस्तच! आमच्या माकडाला नक्की
मस्तच! आमच्या माकडाला नक्की आवडणार हे माकड.
व्वा ! ठेका अगदी छान
व्वा ! ठेका अगदी छान सांभाळलाय.
मस्तच
मस्तच
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्तय
मस्तय
मस्त आहे!
मस्त आहे!
छानेय!
छानेय!
सर्व रसिकांचे मनापासून आभार्स
सर्व रसिकांचे मनापासून आभार्स .......