खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. पण तेव्हा प्रसूती ही नैसर्गिक होत असे.फार तर एखादी सुईण अडलेले बाळंतपण सुकर करण्याचा प्रयत्न करीत असे.पण सिझेरियन हा वैद्यकीय हस्तक्षेप नव्हता. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता ज्योतिषांनी मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत.
मी वाचलेले पुस्तक : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे
प्रकाशन - अश्वमेध
वर्ष - १९८३.
डॉक्टर म्हणून काम करत असताना , मला अनेकदा धन्वंतरी सोबत संजयाचा सुद्धा रोल पार पाडवा लागतो . . मला जे पाहतात त्यांना मी डॉक्टर आहे हे सांगून पटत नाही , त्यांना मी स्वतःला धन्वंतरी द ग्रेट आणि संजय द ग्रेट यांची उपमा लाऊन घेत आहे समजल्यावर भोवळच आली असेल . . चिंता नको . . या माझ्याकडे मोफत इलाज करून देतो . . असो तर सांगायचा मुद्दा असा की होऊ घातलेल्या कवीला चंद्राच्या चांदण्यात आकाशी रंगाची साडी घातलेली गव्हाळ रंगाच्या मुलीचे लाल चुटूक ओठ किती सुंदर दिसतील यावर कल्पनाशक्ती खरवढून काढून हाती पडलेली खरपुड कागदावर उतरवावी लागते , तसेच काहीसे माझ्या बाबतीत होते . . .