सिझेरियन जन्मकुंडली
Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 April, 2021 - 00:26
खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. पण तेव्हा प्रसूती ही नैसर्गिक होत असे.फार तर एखादी सुईण अडलेले बाळंतपण सुकर करण्याचा प्रयत्न करीत असे.पण सिझेरियन हा वैद्यकीय हस्तक्षेप नव्हता. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता ज्योतिषांनी मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत.
विषय:
शब्दखुणा: