वेडा
वेडा (लघुकथा)
वेडा
भाजीला फोडणी देऊन झाली होती . तिने आता कणीक मळायला घेतली आणि कुकर ही लावून टाकला. नुकतंच लग्न झालं होतं . तिचा लाडका नवरा काही वेळातच कामावरून घरी येणार होता . संदेश त्याचं नाव . दोघांचा किती प्रेम होतं अगदी कॉलेज पासून . ते दोघे एकमेकांसाठीच बनले होते . त्यांच्या घरातून सुरुवातीला प्रेमविवाहसाठी विरोध झाला पण शेवटी त्यांचं लग्न झालं
धाडस ___ शतशब्दकथा
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..
इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!
थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
![Subscribe to RSS - वेडा](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)