भाग पहिला, इथे पहा - http://www.maayboli.com/node/52047
पहिली ट्रीप यशस्वी झाल्यानंतर, मला आणि माझ्यापेक्षाही जास्त हुरुप मार्थाला आल्याने, लगेच पुढच्या वीकेंडला मार्थाने नवीन प्लॅन बनवुन दिला - इंटर-लाकेनला जायचा! मार्था महाचाप्टर बाई. एकाच दिवसात भरपुर पाहता यावे म्हणुन जायचा आणि यायचा मार्ग वेगळा दिला तिने!
स्वित्झर्लंडला तळ्यांचा देश म्हणतात. त्यातलीच दोन तळी इंटरलाकेन मध्ये, किंबहुना, दोन तळ्यांच्या मध्ये वसलेला प्रदेश म्ह्णुन इंटरलाकेन असं नामकरण झालय.
हवामान विभागाने दिवसभर वातावरण "सन्नी" राहिल असं सांगितल्याने तेच "मन्नी" धरुन बाहेर पडलो तर बाहेर नजारा काही वेगळाच!
उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला जाण्याचा योग आला. तिथे राहुन टुरिस्टांचा एक आणि स्विस लोकांचा एक, अशी स्वित्झर्लंड ची दोन्ही सुंदर रुपं पहायला मिळाली. मुळात दिनेशकडुन खुप ऐकलं होतं. त्यामुळे बघायची खुप उत्सुकता होतीच. पण मी बैठ्या प्रकृतीचा (आळशी म्हटलं तरी चालेल) असल्याने आयती संधी आल्याशिवाय कुठेही जाणं जमत नाही सुदैवाने माझी घरमालकीण मार्था ही भटक्या प्रवृत्तीची असल्याने तिने पुर्ण स्वित्झर्लंड पालथा घातला आहे.
तर आता एकेक स्थळाला सवडीने भेट देऊ या. स्विसला गेल्यावर आपले वास्तव्य जर झुरीक मधे असले तर
या सहलींना जाणे सोपे पडते. विमानतळावरुन रेल्वेने थेट झुरीक स्टेशनला जाता येते. ( विमानतळ म्हणजे फ्लुगाहफेन मग ओर्लिकॉन आणि मग झुरीक स्टेशन ) हॉटेल जर याच भागात असले तर उत्तम.
झुरीक स्टेशनसमोरचा एकच रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. पण आजूबाजूचे भाग दिवसाही निवांत असतात.
तर चला मंडळी माझ्याबरोबर स्विस टुअरला. हि केवळ एक झलक. ( जसजसा वेळ मिळेल तसतसा या प्रत्येक जागेचे भरपूर फोटो दाखवीनच. )
सुरवात करुया फुलांपासून. डोळे भरून फुले बघितली, भरपूर फोटो काढलेत.
हि आहे आर गॉर्ज. यावेळची ट्रिप खास करुन या जागेसाठी होती.
४० मिनिटे या अरुंद गॉर्जमधून या खळाळत्या नदीच्या सोबतीने आपण जाऊ.