भाग पहिला, इथे पहा - http://www.maayboli.com/node/52047
पहिली ट्रीप यशस्वी झाल्यानंतर, मला आणि माझ्यापेक्षाही जास्त हुरुप मार्थाला आल्याने, लगेच पुढच्या वीकेंडला मार्थाने नवीन प्लॅन बनवुन दिला - इंटर-लाकेनला जायचा! मार्था महाचाप्टर बाई. एकाच दिवसात भरपुर पाहता यावे म्हणुन जायचा आणि यायचा मार्ग वेगळा दिला तिने!
स्वित्झर्लंडला तळ्यांचा देश म्हणतात. त्यातलीच दोन तळी इंटरलाकेन मध्ये, किंबहुना, दोन तळ्यांच्या मध्ये वसलेला प्रदेश म्ह्णुन इंटरलाकेन असं नामकरण झालय.
हवामान विभागाने दिवसभर वातावरण "सन्नी" राहिल असं सांगितल्याने तेच "मन्नी" धरुन बाहेर पडलो तर बाहेर नजारा काही वेगळाच!
१. इथे तो सुर्य आहे बरं. सकाळी १० ला टिपलेला हा नजारा!
हवामान विभागाला मनातल्या मनात शिव्या दिल्या. जास्तवेळ नाही पण, कारण कानात किशोरीताईंचा ललत सुरु होता. "रटन लागी रैन" च्या सोबतीने प्रवास सुरु होता!
२. पण थोड्यावेळात भास्करराव उगवले. कानात किशोरीताईंचाच शुद्ध सारंग! बाहेर स्वीस कंट्रीसाईड!
३. हे लालबुंद सफरचंदानी लगडलेले झाड! ट्रेन एवढ्या जवळुन गेली की फळं तोडता आली असती.
४.
५.
ट्रेन थुन या गावी पोहोचली. इथुनच इंटरलाकेन ची बोट-ट्रीप सुरु होते.पण त्याला अजुन तासभार अवकाश होता त्यामुळे जरा गावात फेर-फटका मारला. मार्थाचा बॉय-फ्रेंड या गावचा. त्याने आवर्जुन इथे फिरायला सांगितल होतं.
६. हा तिथला बस स्टॉप. त्या पिवळ्या बसेस ना पोस्ट-ऑटो म्हणतात. त्या ईतका स्वस्त आणि आरामशीर प्रवास नाही. आपली यष्टी जशी अगदी बारक्या बारक्या गावात जाते तशीच ही बया पण आल्प्स च्या अगदी आडवळणाच्या छोट्या छोट्या गावात पण जाते.
७.शिशिराची चाहुल देणारं हे तिथलं झाड
८. तिथलं हे सुंदर फुल.
९.तिथेच आरे नावाची नदी थुनच्या तलावाला (थुनरसी = थुन + सी(तलाव)) मिळते.
१०. त्या नदीवरचा लाकडी पुल. ( विशेष सुचना : पुणेकरांनी क्लेम करायला येऊ नये. )
बाहेरुन
आतुन
११. हे अजुन एक फुल
१२. आता बोट ट्रीप सुरु झाली. थुन वरुन इंटरलाकेन नावाच्या छोट्यागावी जाणारी ही ट्रीप दोन तासात या अजस्र तळ्याच्या एका टोकावरुन दुसर्या टोकाला नेते आणि आजुबाजुचा निसर्ग पाहुन आपण थक्क, थक्कर, थक्केस्ट होऊन जातो.
हा थुनच्या पाटलाचा वाडा!
आणि हे पाटीलवाडी बुद्रुक!
बोटीच्या समोर दिसणारा हा मिस्टर आल्प्स!
आणि या छोट्या टेकड्या,दोन मिसेस आल्प्स! त्यात हिरवळ असलेली आवडती आणि बोडकी असलेली नावडती!
हे मधे असलेलं बेटं!
त्या मगाच्या दोघी खरंतर अशा एकमेकांकडे तोंड करुन असतात....भांडत!
त्या दगडातुन खोदुन काढलेला रस्ता ....!
सुखी माणसाचा सदरा हवा असल्यास या घरात जाणे!
हॉलिडे रीसॉर्ट!
१३. इंटर-लाकेन गावी पोहोचलो आपण!
सॉरी पण मला फुलं आवडतात, म्हणुन ही आणखी काही!
इतक्या सुंदर फुलांस घाणेरी हे नाव!
तिथेच उमलेली ही नाजुका!
हे एक
१४. आता वाट परतीची. कानात ताईंचाच पुरीया धनश्री!
हे तळे नं. २ , ब्रिएंझरसी (ब्रिएंझचे तळे)
१५. स्वीस हीली रीजन!
१६. आजच्या दिवसाच्या भैरवीची वेळ झाली .... पुन्हा किशोरीताई...बाबुल मोरा!
पुन्हा भेटु नेक्स्ट ट्रीप च्या वेळी!
भन्नाट फोटो __/\__
भन्नाट फोटो __/\__
वॉव... तु कुठल्या महिन्यात
वॉव... तु कुठल्या महिन्यात गेला होतास ? तो पूल दोन्ही बाजूंनी फुलांनी सजवलेला असतो नेहमी.
हा परीसरच खुप रम्य आहे. कितीही वेळ भटकलो तरी कमीच..
आणि हो रे फोटो मस्तच आहेत !
ग्रेट! अत्यंत सुंदर! आपण
ग्रेट! अत्यंत सुंदर! आपण सुद्धा आपली गावे आपली शहरे अशी राखली पाहिजेत. शक्य आहे!
अप्रतीम फोटो.
अप्रतीम फोटो.
खूपच मस्त फोटो
खूपच मस्त फोटो
मस्तच आलेत फोटो. डोळ्याच पारण
मस्तच आलेत फोटो. डोळ्याच पारण फिटलं
मस्त! मस्तर! मस्तेस्ट!!!!
मस्त! मस्तर! मस्तेस्ट!!!!
मस्तच ३ दिवस इन्टर-लाकेन ला
मस्तच
३ दिवस इन्टर-लाकेन ला राहिलो होतो. थुन ते इन्टर-लाकेन हा प्रवास दोन वेळा केला होता. एकदा बोट/ ट्रेन आणि एकदा बोट/ सायकल्. हे तीन दिवस माझ्या आयुष्यातले सर्वोतम दिवस होते.
तिकडे राहाण्यार्या लोकाचा मला हेवा वाटतो.
अप्रतिम!! सुखी माणसाचा सदरा
अप्रतिम!!
सुखी माणसाचा सदरा हवा असल्यास या घरात जाणे! >> +१
वॉव! ऑस्सम फोटोज!
वॉव! ऑस्सम फोटोज!
सुंदर!!
सुंदर!!
कुलु कसले रे सुंदर फोटो अन
कुलु कसले रे सुंदर फोटो अन वर्णन तुझं ! मघाशी स्वप्नभूमी म्हटलं होतं आता स्वर्गभूमी म्हणते !तुझा फोटो सेन्स जबराट आहे !
वा, अतिशय देखणे, नयनरम्य फोटो
वा, अतिशय देखणे, नयनरम्य फोटो आहेत. तुझी त्या फोटोंवरची खुसखुशीत टिप्पणी मजेत भर घलते आहे.
त्या तळ्याकाठच्या घरात खरोख्खर सुखी माणसाचा सदरा मिळेल!
मग नेक्स्ट भाग कधी आता?
कसले सुंदर फोटो आहेत! वा!!
कसले सुंदर फोटो आहेत! वा!! आणि कॉमेंट्स पण भारी.
कसले भारी भारी फोटो आहेत कुलु
कसले भारी भारी फोटो आहेत कुलु आणि लिहितोस पण कित्ती गोड.
काही फोटो मी माझ्या कॉम्पुटरवर wallpaperसाठी सेव करू का?
हे असे फोटो पाहिले की
हे असे फोटो पाहिले की स्विझर्लंडला पृथ्वीवरील स्वर्ग का म्हणतात हे कळते! सुरेख फोटो आणि captions!
वा, अतिशय देखणे, नयनरम्य फोटो
वा, अतिशय देखणे, नयनरम्य फोटो आहेत. तुझी त्या फोटोंवरची खुसखुशीत टिप्पणी मजेत भर घलते आहे. >>+१००
सर्वांचे खुप आभार! दिनेश मी
सर्वांचे खुप आभार!

दिनेश मी सप्टेंबर मध्ये गेलो होतो!
भारतीताई खरंच स्वर्गभूमी आहे ती
सई पुढचा भाग आज!
अंजु, बिनधास्त सेव्ह कर!
कुलदीप.... तुझ्या लिखाणातील
कुलदीप....
तुझ्या लिखाणातील सौंदर्य मोहविणारे आहे की ही स्वीस नामक परीसारख्या देशाची छायाचित्रे जास्त मोहक अशा संभ्रम मला पडला आहे. देखणेपणाच्या सार्या व्याख्या या चित्रातून प्रकटल्या आहेत. कणभरदेखील नाव ठेवायला जागा नाही असेच म्हणावे लागेल. प्रत्येक फोटोला तुझ्याकडून मिळालेली ओळ त्या फोटोला जास्त सुंदर करीत आहे की ते फोटो तुझ्या ओळीला खुलवत आहेत हाही अभ्यासकाला प्रश्न पडेल.
काहीशा उशीराने प्रतिसाद देत आहे, याबद्दल क्षमस्व !
वाह!!!!!!!!! किती सुंदर,
वाह!!!!!!!!! किती सुंदर, केव्हढे निसर्ग सौंदर्य... डोळ्यात न मावणारे..
रच्याकने चीन मधे शेंझन गावी इंटरलाकेन ची प्रतिकृती केलेली आहे एका मोठ्या अजस्त्र आकाराच्या अम्यूजमेंट
पार्क मधे.. प्रतिकृती बर्यापैकी जमलीये ..पण जो बात तुझमे है, तेरी प्रतिकृती मे नही...
Thanx कुलु.
Thanx कुलु.
मामा थांकु तरी सगळे फोटो
मामा थांकु
तरी सगळे फोटो नाही केलेत अपलोड!

वर्षु धन्यवाद!
पण जो बात तुझमे है, तेरी प्रतिकृती मे नही>>>> निसर्गाची प्रतिकृती करायची म्हणजे सोप्पं आहे होय! . जो तो निसर्ग तिथे जाऊन डोळ्यांत साठवावाच!
वॉव! केवळ अप्रतिम त्याच बरोबर
वॉव! केवळ अप्रतिम त्याच बरोबर खुशखुशीत लेखन!
सुंदर फोटो. कॅप्शन्स पण
सुंदर फोटो. कॅप्शन्स पण आवडल्या.
मंजु, ललिता-प्रीति थांकु
मंजु, ललिता-प्रीति थांकु
मस्तय ..
मस्तय ..
सॉल्लिड फोटो, डोळे निवले.
सॉल्लिड फोटो, डोळे निवले.
ओहो, मस्त मस्तर
ओहो, मस्त मस्तर मस्तेस्ट!!!!!
अप्रतिम. धन्यवाद कुलु. हे
अप्रतिम. धन्यवाद कुलु. हे फोटो बघुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
प्र.चि. १४ - ब्रिएन्झरसी - मला वाटतं मी अगदी ह्याच ठिकाणी ट्रेन मधुन फोटो काढले होते. नंतर मग मुद्दाम प्लॅन करुन ब्रिएन्झरसी च्या काठी ३ दिवस मुक्काम केला - ब्रिएन्झ मधे. तेव्हा ह्या तळ्याची खूप वेगवेगळी रुपं बघायला मिळाली. पण हा धागा हायजॅक करायला नको म्हणून प्र.चि. टाकण्याचा मोह आवरते.
रोहित, नरेश, मामी
रोहित, नरेश, मामी धन्यवाद!
Bagz मोह आवरु नका. तुम्ही पण ब्रिएन्झ चे फोटो टाका. मी तिथे तासभर होतो आणि तुम्ही तीन दिवस. तुम्हाला त्या तळ्याचे जे विविधांगी दरशन झाले ते आम्हाला पण बघायला आवडेल
Pages