आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
पहिल्यांदा जेव्हा भारतातुन स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा विमानात स्विस एअर ने एक माहितीपट दाखवला होता. प्रचंड आवडला होता तो मला. त्यात युरोपातलं सगळ्यात उंचावरचं आणि कायम लोकवस्ती असलेलं एक गाव दाखवलं होतं. तर ते माझ्या डोक्यात असं फिट्ट झालं होतं की, मी मार्थाच्या पाठीमागे सारखे टुमणे लावले होते की मला त्या गावी जायचंय. मी स्वतःहुन उत्साह दाखवल्याने तिने डबल उत्साहाने प्लॅन बनवुन दिला. जागा लांब होती. पहाटे ६ ला घरातुन बाहेर पडलो.............. "युफ" च्या दिशेने!
आधी झुरीक पर्यंत ट्रेन, मग पुन्हा कुर पर्यंत रीजनल ट्रेन, तिथुन अन्डीर पर्यंत पोस्ट ऑटो आणि तिथुन युफ पर्यंत अल्पाईन पोस्ट ऑटो असा साडेचार तासांचा प्रवास! पण प्रवासाचा शीण म्हणुन जाणवतच नाही स्वित्झर्लंड मध्ये. आजुबाजुचा निसर्ग तुम्हाला फ्रेशच ठेवतो नेहमी! आणि एकुन प्रवासातदेखील किशोरीताई, कुमार गंधर्व, निखिलदा अशी माणसे बरोबर असली म्हणजे तर बोलायलाच नको!
कुर पासुन पुढे जे आल्प्स च्या कुशीत शिरलो ते पुन्हा माघारी येतानाच कुस सोडली. आपल्या हिमालयाला लगटुन जशा छोट्या पर्वतरांगा आहेत तसंच आल्प्सच्याही!
अंडीर ला पोहोचलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. समोर दिसतंय ते अंडीर मधले एकमेव हॉटेल आणि त्याच्याच पार्कींग प्लेस मध्ये बसचा स्टॉप!
बसमध्ये आम्ही मोजुन १० जण! त्यात पण मी २५ च्या आतला एकटाच आणि उरलेले सर्व ६० च्यापुढचे (त्यांची वये पुढे बोलताना लक्ष्यात आली, मी लोकांना वये विचारीत फिरतो असा समज करुन घेऊ नये!) त्याना माझ्या येण्याचं फार कौतुक वाटत होतं. हल्ली तरुण मुलांना असं निसर्गसौंदर्य बघायला नको असतं, नुसतं दारु ढोसायला मित्रांबरोबर बार मध्ये जायला पहिजे वगैरे तक्रारी सुरु होत्या. पण ते जे बोलत होते त्यात अतिशयोक्ती खचितच नव्हती! तरुणांची गर्दी फार-फार तर स्कीईंगला वगैरे, पण बाकीच्या ठिकाणी सगळं म्हातार्यांचं पेव फुटलेलं असायचं!
युफला जायचा प्रवास भलताच रोमांचक ! अरुंद रस्ते, त्यात आमची महाकाय पोस्ट ऑटो! पण ड्रायव्हर्स भलतेच चतुर. खिंड वाटावी, जिथुन कार सुद्धा जाईल की नाही शंका यावी अशा ठिकाणाहुन हे ड्रायव्हर्स पोस्ट ऑटो मात्र अगदी अलगत नेत होते. अधी पण मी म्हटलंय आणि आता पण म्हणतो, की पोस्ट ऑटो सारखा सुखाचा प्रवास नाही!
ला पोहोचलो. २००० मीटर च्याही वर असलेल्या या गावाची लोकवस्ती अवघी २४. एखाद्या पाटलाच्या वाड्यावर देखील यापेक्षा जास्त माणसे असतात! पण त्या तेवढ्याशा गावासाठी रोज नियमित पब्लिक ट्रान्स्पोर्ट, त्यांचं वेगळं पोस्ट ऑफीस! त्या शेवटच्या स्टॉपला उतरणारे आम्ही चौघेच!
एवढ्या वर उंचीवर झाडं नव्हतीच. फक्त कुरण होतं!
हे तिथलं टिपिकल घर! घराला छप्पर म्हणुन आल्प्स मध्ये सापडणार्या चुन्याच्या फरशा! घर उबदार राहतात शिवाय बर्फाच्या ओझ्याने छप्पर कोसळण्याची भिती नाही!
हे फोटोत दिसतय तेव्हढंच ते युफ गाव!
त्या तेवढ्या गावाला पण स्वतःची युफगंगा होतीच!
आजुबाजुला पाहण्यासारखा निसर्ग विखुरलेला होता. खुप.
माझं एकंदर असं मत आहे की एखाद्या जागेशी, किंवा निसर्गशिल्पाशी रिलेटेड जेवढ्या लोककथा आपल्याकडे, विशेषतः अशिया मध्ये आहेत तेव्हढ्या त्या पश्चिमात्त्यांमध्ये नाहीत. एकदा मीना प्रभुंशी बोलताना पण त्यांचे देखिल हेच मत पडल्याचे याद आहे! आता हे समोरचे तीन डोंगर बघा, त्याना काही तरी कोरडी नावे आहेत , आपल्याकडे याच्याशी रीलेटेड काहीतरी झालंच असतो, शंकराने शाप देऊन शिळा झालेले तीन राक्षस, किंवा राजकुमारची वाट पाहत असलेल्या तीन सख्या, ब्रम्हदेवाची तीन तोंडे वगैरे!
या सगळ्यातुन मध्येच एकच पायवाट दिसली, मी लगेच त्या वाटेला माझे पाय लावले!
माझ्यानंतर चार अजुन पाय त्या वाटेला लागले!
कुठेही जा हे तिघे काही पाठ सोडत नव्हते.
\
आकाशात एखादा ढगाचा पुंजका वेड लावत होता!
हा बकरे-निवास........बकर्यांसाठी!
आणि ज्याप्रमाणे काही खडुस म्हातार्या सकाळी मॉर्निंग वॉकला जातो असे म्हणुन बाहेर पडतात आणि आणि स्वतःच्या अंगणतली फुले सोडुन दुसर्यांच्या झाडांची फुले ओरबाडतात, त्याप्रमाणे बकरे-निवासाच्या मालकीच्या कुरणावर चरणारी ही गाय!
युफगंगेला समांतर अशी पायवाट होती!
धोपट मार्गा सोडुन मी जरा वर आलो
वाटेत दिसलेले हे पफ फंगस. हे म्हणजे काय हे पहायचे असल्यास डेव्हिड्भाऊ अटेंबरो यांची सिक्रेट लाईफ ऑफ प्लॅन्ट्स पाहणे!
शांताबाईंची आठवण करुन देणारे हे गवतफुल!
हा संगमरवरासारखा दिसणारा क्षार स्फटिकाचा खडक!
मॉस आणि धोंडफुल
जोराची भुक लागली होती. युफगंगेच्या काठावर आलो. तिथेच एक मोठा खडक बघुन जेवायला बसलो!
फोटोत जिथे माझी बॅग दिसतेय तिथे!
हा युफगंगेचा पुल!
हा तिथे उंदरासारखा दिसणारा खडक मिळाला! जो मी तिथेच ठेऊन आलो!
युफगंगेने सगळ्या दगडांना चांगले "वळण" लावले आहे!
मग मात्र बराच वेळ तिथे बसुन राहिलो. शांत! शांततेचा आवाज फार मधुर असतो! बाहेरची शांतता आपोआपच मनात झिरपत जाते. मन निर्विकार! एकही तरंग मनाच्या पटलावर उमटत नव्हता! मनाचे शुद्धीकरण सुरु होते! कित्ती वेळ तसा बसुन होतो काय माहीत. ऊन सावलीचा खेळ चालुच होता.
कसला तरी आवाज आला म्हणुन वळुन बघितलं तर पोस्ट ऑटो आली होती न्यायला,
जायची ईच्छा नव्हती! युफने लळा लावला, कुणाला तरी पुन्हा येतो असं सांगायची ईच्छा होती. कुणाकुणाला सांगु. शेवटी या मिसेस बकरेंनाच निरोपाचे चार शब्द सांगितले!
जाता युफची कुरणं पुन्हा नजरेत भरुन घेतली
घरी पोहोचायला वेळ झाला. रात्री मार्थाने रोष्टी करुनच ठेवली होती. खाल्ली आणि युफ ची स्वप्ने डोळ्यात साठवत झोपी गेलो!
नेहमीप्रमाणेच अप्रतीम फोटो!
नेहमीप्रमाणेच अप्रतीम फोटो!
काय सुंदर लँडस्केप आहे. मला
काय सुंदर लँडस्केप आहे. मला तर तुमचाच हेवा वाटला अश्या ठिकाणी तुम्हांला जायला मिळालं म्हणून.
फोटोही मस्तच.
युफ बघून अगदी "उफ" झालं
युफ बघून अगदी "उफ" झालं ...........अप्रतीम फोटो! लिहिण्याची शैलीही मस्तच.
छपरावरच्या चुन्याच्या फरश्या पाहून हिमाचलमधल्या घरांची आठवण झाले. तिथेही अश्याच फरश्या होत्या छपरांवर. पण तिथे बघताना वाटलं की या आपल्या पाटीचा (लिहिण्याची) दगड असतो ...स्लेट....त्याच्या फरश्या वाटल्या.
खूपच सुंदर फोटो आणि माहिती.
खूपच सुंदर फोटो आणि माहिती.
ग्रेट, अप्रतिम आणि जी काय
ग्रेट, अप्रतिम आणि जी काय विशेषणे असतील ती सारीच ...
शब्दांकन केवळ सुंदर ....
आभारी आहे............
आभारी आहे............
ये नजारे युफ युम्मा! वेड
ये नजारे युफ युम्मा! वेड लावणारे विलक्षण सौन्दर्य!
<<<<युफ बघून अगदी "उफ" झालं
<<<<युफ बघून अगदी "उफ" झालं .....>>>+ ११११
खूप सुंदर फोटो आहेत...
कुलु , तुझे हे फोटोज पाहाताना
कुलु , तुझे हे फोटोज पाहाताना चांगदेव पाटलांसारखी ''स्थिती झाली '' :)( म्हणजे ही नेमाडेंची समाधी लागली म्हणायची पद्धत ) , तुझ्या comments ही भन्नाट !
खुप सुंदर.. मी काय परत आलो
खुप सुंदर.. मी काय परत आलो नसतो इथून
कुलु, तुम्ही फार सुंदर
कुलु, तुम्ही फार सुंदर लिहिता. ते फोटो आणि तुमचं त्यावरचं भाष्य हे दोन्ही माणसाला त्या जागची सफर घडवून आणतं अगदी!
बाकी, फोटो बघून मनाला इतकं छान वाटलं, की आज ऑफिस मधे दिवसभर दळण ऐकून (new employee orientation ) आणि मग १७.५ कि.मी. चा प्रवास करुन आलेला कमालीचा वैताग दूर झाला. धन्यवाद!
कुलु....तुझ्या संगीत
कुलु....तुझ्या संगीत विषयाच्या आवडीमुळे इतके सारे सुंदर तू लिहितो आहेस की इतके सारे सुंदर पाहून तू संगीताच्या सुंदरतेकडे खेचला गेला आहेस....असाच प्रश्न माझ्यासारख्याला पडला आहे. तुझी भाषा जितकी विलक्षण तितकेच ही प्रकाशचित्रेही....आणि काय लिहावे त्या स्वप्नातील देशाबद्दल आणि तेथील सौंदर्याबद्दल....डोळे तृप्त झाले किमयाच पाहून....
....मी तिथे असतो तर वेडाच झालो असतो हे नक्की.....बस्स असेच गाव असावे....नीरव शांततेचे आणि निसर्गाच्या आशीर्वादाचे....हिरव्या रंगाने माखून गेलेल्या माळावर....तसल्याच झाडाखाली टाकावी एक खुर्ची आणि ठेवावे हाती आवडीचे एक पुस्तक आणि कॉफीचा एक मग शेजारी..! बस्स...माणसाला शांत आणि कृतार्थ जीवन म्हणजे दुसरे तरी काय हवे असते.
फोटोज आणि लेखन... दोन्ही
फोटोज आणि लेखन... दोन्ही मस्त!
लवली कुलु, फोटो आणि लेखन as
लवली कुलु, फोटो आणि लेखन as usual.
मीना प्रभुन्शी तुझी ओळख आहे, वा. मी fan आहे त्यांच्या लेखनाची.
अशोकमामांचा प्रतिसाद पण
अशोकमामांचा प्रतिसाद पण नेहेमीप्रमाणे सुंदर.
सर्वांचे खुप खुप धन्यवाद!
सर्वांचे खुप खुप धन्यवाद! तुमचे प्रतिसाद वाचले आणि फोटो इथे टाकणे सार्थ झाल्यासारखे वाटले!
मामा, कित्ती सुंदर प्रतिसाद!
दिनेश परत स्वित्झर्लंड्ला जाशील तेव्हा युफ ला नक्की जाच!
अंजु मी पण मीना प्रभुंचा पंखा!
कुलू किती किती सुंदर शब्दात
कुलू किती किती सुंदर शब्दात बांधू शकलायस हा अप्रतिम नजारा..
अप्रतिम
अप्रतिम
शब्दांकन केवळ सुंदर ..>>
शब्दांकन केवळ सुंदर ..>> +१
ये नजारे युफ युम्मा! >> +१
अप्रतिम आहे सगळं.
मस्त
मस्त
.अप्रतीम फोटो कुलु . लिहिले
.अप्रतीम फोटो कुलु .
लिहिले पण खुप सुंदर आहेस.
आहाहा किती सुरेख वर्णन आहे.
आहाहा किती सुरेख वर्णन आहे. काहीही अजेंडा न घेता एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ शांत बसलात. अतिशय नशिबवान आहात.
युफगंगा नाव भारीये!
वर्णन आणि फोटो अप्रतिम.
वर्णन आणि फोटो अप्रतिम. माझ्याकडे तर कौतुक करायला शब्दच नाहीत कुलू.
भाग्यवान आहेस इतक्या सुंदर ठिकाणी जाऊन आलास.
काय सुंदर लिहीलयं रे
काय सुंदर लिहीलयं रे कुलुबेटा! मस्त सफर घडवलीस...
कुलु, सगळी प्रकाशचित्रे आणि
कुलु,
सगळी प्रकाशचित्रे आणि त्यावरचे मजकुर दोन्ही खूप छान.
फिरत रहा.. आणि लिहित रहा!
सुन्दर वर्णन्,अप्रतिम प्रचि
सुन्दर वर्णन्,अप्रतिम प्रचि पु भा प्र
Sarvanche manapasun aabhar!
Sarvanche manapasun aabhar!
कसलं मस्त !!! आजच पहिलं !
कसलं मस्त !!! आजच पहिलं !
अशोकराव, तुम्हाला या ठिकाणी
अशोकराव,
तुम्हाला या ठिकाणी पुस्तक , कॉफीचा मग घेऊन बसावेसे वाटते , मला तर चक्क गाढवासारखे लोळत रहावेसे वाटते आणि डोळ्यांवर आडवा हात ठेवून एक झोप काढावीशी वाटते. अशी मळ्यात पहुडून झोप बालपणीच काढली आता नाही शक्य होत. किती साध्या गोष्टी ? त्यासुद्धा अप्राप्य झाल्यात.... मुलाला सप्तर्षी आणि धृवतारा दाखवायला गेलो तर एलेक्ट्रिसिटीच्या प्रभेमुळे आकाशातले काहीच दिसत नाही आता.... अगदी खेड्यातही. वीज गेली तरच तारकापुंज दिसतो आता.....
अप्रतिम. डोळ्याना आणि मनाला
अप्रतिम. डोळ्याना आणि मनाला केवळ फोटो बघुन एवढा थन्डावा मिळतो तर प्रत्यक्षात काय होत असेल.
Pages