क्ले

मुलाचा क्ले पासून वस्तू बनवण्याचा प्रयत्न

Submitted by नादिशा on 19 September, 2020 - 12:54
क्ले पासून वस्तू

माझा मुलगा स्वयम (वय वर्षे 9) सतत काही ना काही बनवत राहतो..कधी कार्डशीट पासून, कधी काडेपेटीपासून, कधी पुठ्यापासून, कधी क्ले पासून . क्ले पासून वस्तू बनवण्याचे त्याने केलेले काही प्रयत्न --

1) बर्गर -

IMG-20200919-WA0114.jpg

2) पिझ्झा - त्याला कमी तिखट, कमी सॉस , थोड्या भाज्या आणि जास्त चीझ घातलेला पिझ्झा आवडतो. मी बनवत असताना सतत instructions चालू असतात त्याच्या. तसाच बनवला आहे त्याने क्ले चा पिझ्झा.

विषय: 
शब्दखुणा: 

देई मातीला आकार - देविका वय वर्षे ५

Submitted by निल्सन on 18 September, 2015 - 07:15

क्लेपासुन बनविलेला हा गणपती लेकीने शाळेत नेण्यासाठी बनविलेला होता. मी एक गणपती बनवत होते आणि माझा बघुन ती तिचा गणपती बनवित होती.
हा तिचा

a.jpg

अशाप्रकारे दोन गणपती तयार झाले. शेवटी तिच्या बाप्पाला सजवुन एका पारदर्शक खोक्यात बसविले. सजविण्यासाठी एका ड्रेसचे गोल्डन, डायमंड वर्क निघाले होते ते लावले ही माझी मदत.

b.jpgc.jpg

घरगुती प्ले डो/ क्ले आणि रंगीत मोदक

Submitted by नलिनी on 4 August, 2014 - 05:13

लागणारे जिन्नसः

मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.

कृती:

पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग व्यवस्थित हलवून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण पातळ वाटू शकते. घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.

विषय: 

रंगीत मोदक

Submitted by नलिनी on 3 August, 2014 - 05:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
पाककृती प्रकार: 

पॉलिमर क्ले ची कला आणि इतरही काहीबाही

Submitted by मामी on 16 June, 2013 - 10:18

माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.

साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.

विषय: 
Subscribe to RSS - क्ले