रंगीत मोदक

Submitted by नलिनी on 3 August, 2014 - 05:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टेबलस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.

क्रमवार पाककृती: 

रंगीत क्ले बनवण्याची कृती इकडे हलवण्यात आली आहे.

माहितीचा स्रोत: 
लेकाची शिक्षिका
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
लिंबुसत्व (म्हणजे सायट्रिक अ‍ॅसिडच ना) मोदकात बघूनच घाबरले होते.
पण शेवटपर्यंत वाचल्यावर उलगडा झाला.
खूप म्हणजे खूपच भारी आयडिया आहे.
धन्यवाद!

शैलजा, अन्जू, रूनी, धन्यवाद!

गरम पाण्यात कालवल्यावर मैद्याला परत वाफवायचे नाही का?>> नाही.

ओह हे खाण्याकरता नाहीये? शीर्षकात प्लीज घरगुती पॉलिमर क्ले असं लिही गं.

बाकी, रंग एकदम झटॅक दिसताहेत. मुलं खुश होतीलच नक्कीच.

लिंबूसत्व का वापरायचं आहे यात? लिंबूसत्व म्हणजे लिंबूफूल का? मी ते घरी उगाचच आणून ठेवलंय नाव आवडलं म्हणून. त्याचं काय करायचं ते माहिते नाहीये.

हे कलाविभागात हलवा की हो.

<मी ते घरी उगाचच आणून ठेवलंय नाव आवडलं म्हणून> Happy
मीही आणलंय निंबू ना फूल. गुजराथी कुकरीशोजमध्ये अनेकदा पाहून. त्यांच्या चिवड्यातसुद्धा असतं. तिथूनच मीही श्रीगणेशा करणार आहे.

मीही आणलंय निंबू ना फूल. गुजराथी कुकरीशोजमध्ये अनेकदा पाहून. त्यांच्या चिवड्यातसुद्धा असतं. तिथूनच मीही श्रीगणेशा करणार आहे. >> जे कराल ते इथे टाका हो मयेकर. माझ्याकडचं लिंबूफूल सुद्धा वापरेन मग.

मामी, तूर्तास हे पहा.
दूध फाडायला, आंबटपणा आणायला, प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून, तसेच ढोकळा इ. पदार्थांत वापरलेले पाहिले आहे.

chhaan Happy

दीड वाट्या मीठ आणि तेही मोदकाच्या पीठात... हे वाचुनच चक्रावले.

आहारशास्त्र व पा. कृ. विभागात टाकल्यामुळे खरंच मोदकांची पा. कृ. समजुन वाचू लागले Biggrin

पण मस्त आयडिया आहे.

लिंबू सत्व म्हणजे सायट्रीक अ‍ॅसिड. आई पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये घालते नेहेमी. पनीर बनवायला वापरता येतं. डोकळ्यासाठी इनो ऐवजी लिंबूसत्व आणि सोडा घालायची पुर्वी.

नलिनी, कला विभागात हलव हे. लोक कन्फ्युज होतिल. Happy

परत एकदा.. कुकु ( सॉरी शांडील्य म्हणायचं ना आता) च्या कलाकृती सरस ठरल्यात !

'सायट्रीक अ‍ॅसिड / लिंबू सत्व / लिंबू फुलाचा वापर कशात करावा? '
असा एक नवा धागा सुरू करायचा का? म्हणजे मला मायबोली प्रशासनाला हा धागा काढून टाकण्याची विनंती करता येईल.

दीड वाट्या मीठ आणि तेही मोदकाच्या पीठात... हे वाचुनच चक्रावले.>>>>>>>..आधी वाट्लं माझं वाचताना चुकलं परत वाचल्यावर वाटलं, लिहीताना चुकल. Lol

रंगित मोदक मस्तच.! Happy

छान माहिती, पण हे पाककृती मधून हलवा कला विभागात लवकरात लवकर.. नाहीतर प्रचंड गोंधळ होऊ शकतो..

Wink

+१