या छोट्याश्या घराचे मालक आणि त्यांची पत्नी ओरासिओ आणि इलियाना (वय वर्षे ५६ आणि ४७)...त्यांना सहा मुलं......सगळ्यात मोठी मुलगी इसाबेल (३२ वर्षे) तिच्या नवर्याबरोबर राहते. तिला तीन मुलं आहेत. मनुवेल, मारिया आणि सादी...वय वर्षे अनुक्रमे ७, ४ आणि १...इसाबेल घरात तयार केलेला ब्रेड रस्त्यावरच्या बाजारात विकते आणि तिचा नवरा अगुस्त हा घरातल्याच शेतात कॉफी आणि कसावा चे पीक घेतो. जेव्हा इसाबेल आणि अगुस्त पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी बरोबर राहायचा निर्णय घेतला तेव्हा अगुस्त फोटोग्राफर म्हणून काम करत असे.
नमस्कार,
नवीनच लेखनाला सुरुवात केली की कदाचित असंच होत असावं.....रोज येऊन रिफ्रेश कर-करून काही नवीन कमेंट्स आहेत का बघणे...असेल तर खुश होणे.....आणि खुश होऊन आपण एकटच हसतोय असं लक्षात आलं की परत चेहरा होता तसा करणे.....आणि नसेल आलं काही तर परत रिफ्रेश करणे......
माझ्या अंगोलावर लिहिलेल्या २ लेखांना मी नवीन सभासद असूनही खूपच छान प्रतिसाद मिळाला......मिळेल का नाही असं वाटलं होतं कारण....गटबाजी वगैरे वाचलं होतं अगदी नवीन नवीन असताना.....पण तसं काही असेल असं मला तरी जाणवलं नाही....असो....
प्रत्येक देशाची आपली अशी एक संस्कृती असते. रितीरिवाज असतात, खाद्यप्रकार असतात. अंगोलात येउन आता ५ महिने झालेत त्यामुळे इथल्याही अशा काही गोष्टी तुमच्या बरोबर शेयर कराव्याशा वाटल्या. मी काही सगळंच बघितलेलं नाही अजून पण मला सगळ्यात जास्त विशेष वाटलं ते म्हणजे इथलं जेवण, इथली लग्न पद्धती, घरात मृत्यू झाल्यावर करण्यात येणार्या गोष्टी आणि इथल्या बायकांचे पारंपारिक ड्रेस!
जून मध्ये अंगोला या नव्या आणि कधीही स्वप्नात सुद्धा न आलेल्या देशात माझं आगमन झालं. इतरांप्रमाणे "आफ्रिका" बघायला मिळणार म्हणून खरं तर खुशीत होते पण विमान तळावर पाउल टाकल्या टाकल्या काय झालंय आणि आपण कुठे आलोय ते समजलं....अजिबात आवडला नव्हता तो देश....मी अजूनही नवर्याला म्हणतेही की तुझ्यावर माझं इतकं प्रेम नसतं ना तर मी परत गेले असते.....