अंगोला एक झलक- भाग १

Submitted by जाह्नवीके on 19 October, 2012 - 04:14

जून मध्ये अंगोला या नव्या आणि कधीही स्वप्नात सुद्धा न आलेल्या देशात माझं आगमन झालं. इतरांप्रमाणे "आफ्रिका" बघायला मिळणार म्हणून खरं तर खुशीत होते पण विमान तळावर पाउल टाकल्या टाकल्या काय झालंय आणि आपण कुठे आलोय ते समजलं....अजिबात आवडला नव्हता तो देश....मी अजूनही नवर्याला म्हणतेही की तुझ्यावर माझं इतकं प्रेम नसतं ना तर मी परत गेले असते.....
दोन दिवसांचा वीक एंड झाल्यावर नवरा गेला कामाला आणि मी??? घरात??? बाप रे ....नवरा येईपर्यंत चे ते सात तास म्हणजे मला सात वर्षान सारखा वाटत होते ....पण आलिया भोगासी च्या तालावर मी वेळ मोजायला सुरुवात केली...मनात म्हटलं, काय अगदी आपण पण अतीच करतोय जरा.....बायका काय रहात नाहीत की काय असं देशाबाहेर येउन घरात एकट्या??? आता एकदा आलोय न.....मग काहीतरी उद्योग करायलाच हवा.....

मग विचारांना सुरुवात....पहिली गोष्ट म्हणजे आमच्या लग्नाची सी डी बघितली...कार्यालयातून निघतानाचा सीन आल्यावर लग्नात रडले नव्हते; पण तेव्हा रडले....तेवढाच वेळ गेला हो......घड्याळ बघितलं, पण छे.... फक्त ११ च वाजले होते...म्हणजे अजून सकाळच होती....??? बरं.... मग आता पुढे काय? म्हणून मग स्वयंपाक घरात मोर्चा हलवला......म्हटलं बघावं तरी......त्या आधी कधी बघितलंच नव्हतं......लग्न होऊन सासरी आले तरीही आधीचा अनुभव नसल्यामुळे सगळं सासुबाईन्च्या हाताखालीच चाललं होतं ना......मग रात्रीच्या स्वयपाकाची तयारी, बेत वगैरे झाल्यावर म्हणलं बाहेरची गम्मत बघूया जरा.......म्हणून हॉल च्या खिडकीत येउन उभी राहिले......आणि आजूबाजूचा परिसर वगैरे निरखायला सुरुवात केली.....आणि मला आपले पुढचे सहा महिने कसे जाणार याची पूर्ण कल्पना आली.

असाच काहीबाही करतंच तो आठवडा गेला...आणि वीक एंड आला....पूर्ण आठवडा मी वीकेंड ला काहीतरी करूच की....या आशेवर काढला होता शेवटी....शनिवारी सकाळी जरा आरामातच उठलो....मग चहा नाश्ता वगैरे करेपर्यंत जेवायचीच वेळ झाली होती....आज काही मी स्वयंपाक करणार नाही असा सांगून टाकलंच होतं मी नवर्याला.....त्यामुळे भुकेनी हाका द्यायला सुरुवात केल्यावर नवरा म्हणाला, "चल आपण इथेच जवळ एक कॅफे आहे तिथे जाउया...." मनात आलं, वाहः......आहे वाटतं असं काही इथे......कारण खिडकीच्या कक्षेत तर असलं काहीच नव्हतं.....म्हणलं चला...बरं झालं.....असं म्हणून गेलो तिथे....आणि तिथलं स्पेशल म्हणून राइस आणि फेजाव म्हणजे आपला उसळ भात असतो न तसलं काहीतरी खाउन आलो......मी यापेक्षा छान केलं असतं असंही म्हणण्याची सोय नव्हती.....जेवण झाल्यावर आम्ही एक-एक कफे मारली......तेवढाच काय तो बरं भाग ........आणि चालत चालत परत घरी.........मनात अजूनही म्हणलं रविवार आहे अजून........पण घरी पोचता पोचताच नवरा म्हणाला.....इथे असंच आहे......मी तर तू यायच्या आधी सरळ झोपून टाकायचो.......माझा हात कपाळावर......पण एखाद्या गोष्टीत पडलोय ना.... मग जे आहे ते स्वीकारायचं असा स्वभाव असल्यामुळे जेव्हा जेव्हा बाहेर पडेन तेव्हा तेव्हा फोटो काढायला सुरुवात केली....फोटोग्राफी म्हणून चांगले नसतील पण आजूबाजूच्या परिसराची अन वातावरणाची एक झलक........

हे काही फोटोज......
अशी रस्त्यावरची दुकानं असतात इथे.....आणि तिथे ब्रेड पासून आय फोन (?) पर्यंत सगळं विकतात!
DSC03431.JPGDSC03533.JPGDSC03953.JPGDSC03960.JPGDSC03968.JPG
ही जनरल स्टोर्स
DSC03501.JPG
या बायका त्यांच्या केसांच्या वेण्या वेण्या कशा घालतात हे कोडं सुटलं....ते गंगावनासारखे लावलेले केस असतात आणि ते भारत, चीन, जपान या देशातून आयात करतात.
DSC03435.JPG
कान्डूनगेरो ...तिथला लोकल कन्व्हेयन्स....पुण्यात ६ सीटर असतात तसं....पण त्यापेक्षा जास्त कोम्बाकोम्बी
DSC03949.JPG
पूर्वीची पोर्तुगीज कॉलनी असल्यामुळे तेव्हाच्या काही इमारती अजूनही आहेत..आता बहुतांशी या इमारती शासकीय कार्यालयांसाठी वापरल्या जातात...
DSC03619.JPGDSC03620.JPGDSC03621.JPGDSC03617.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कीच......मी या देशातली लग्न, मृत्यू, थोडक्यात इथली संस्कृती याबद्दल सुद्धा लिहित्ये. पुढचा लेखही लवकरच टाकते Happy
पण एकदम उदास वाटतोय .. सगळा रखरखाट +१
आहेच तस इथे. कारण अजुनही देश प्रगती पथावर आहे पण भारताच्या साधारण १० वर्षे तरी मागे आहे.

सस्नेह आमंत्रण, जगातील सर्वात जास्त वेगाने प्रगती करणार्‍या देशात / जगातील सर्वात महाग शहरात आणि हिर्‍यांच्या प्रदेशांत !

दिनेशदा
तुम्ही खूपच चांगल्या भागात रहाता त्यामुळे इथे रहाणं सहय असेल कदाचित...पण नाहीतर बाकीचे भाग बकाल आहेत अतिशय..वीज आणि पाणी यांचा खूप प्रॉब्लेम आहे....

हो तसे शांत गावे आहे, आमचे ग्राफानील.
आता बरीच वर्षे या खंडात काढल्याने, या लोकांचे मन जाणता येते.
आमच्या गावात बहुतेक जण एकमेकांना बोम दिया केल्याशिवाय रहात नाहीत. लहान मूले मूली, अमिगो ( मित्रा ) अशी हाक मारत, शेक हँड करायला येतात. ( तरुण मूली, होला बोनितो, केल्या शिवाय रहात नाहीत Wink )

वाह ........ तसा एरिया असता तर बहुधा मी ही नवर्याच्या मागे भुण्भुण केली नसती इथून जायची Proud

म्हणजे हेलो ब्युटिफुल......
राईट दिनेशदा???

........आणि चालत चालत परत घरी>>> तुम्ही तिथे चालत फिरता रस्त्यावर??? बापरे .. मी इथे जोहनसबर्ग मधे असुन सुद्धा तशी डेरींग करत नाही कधी.. सेफ नाहिये ते... इथे संध्याकाळी सहा नंतर तर सगळे मॉल्स पण बंद होतात.

ब्यूटीफूल आणि हॅंडसम, दोन्हीला एकच शब्द वापरतात.

शा. गं, लुआंडाबाहेर तेवढा धोका नाही. आम्हीही रात्री रस्त्यावर बिंधास्त फिरतो.

लेगॉसमधे ते धाडस नसते केले मी, नैरोबीतही काही ठिकाणी, केले नसते.

अंगोल्यात माबोकरांची संख्या वाढत आहे.. गटग होईल आता. >>> लोला +१

अचानक अंगोलाबद्दल लिहिणारी मंडळी निर्माण झाली की! दिनेशदा, तुमच्या जाहिरातींमुळे लवकरच अजून मायबोलीकर अंगोलात येणार बघा.

दोन मायबोलीकर एकत्र आले आणि हजर नसलेल्या मायबोलीकरांचा विषय, निघाला नाही, असे होईल का ?

( त्यालागॉसिपम्हणुने...)

........सेफ नाहिये ते... इथे संध्याकाळी सहा नंतर तर सगळे मॉल्स पण बंद होतात. >>>>>> +१

हे हे हे आमचही तसच आहे. संध्याकाळचे पाचाचे साडे पाच झाले आणि आम्ही बाहेरच असू तर मी घरी पोचे पर्यंत नवर्याचा हात घट्ट धरून चालते लहान मुलीसारखा......मला इथल्या लोकांची भीतीच वाटते
समहाउ.....माझा नवरा म्हणतो की तू रेसिस्ट आहेस. तुला इथल्या पोर्तुगीज लोकांची भीती वाटत नाही मग अंगोलन लोकांची का वाटते?
आमचा ड्रायवर आहे अगुस्त म्हणून....केवढा आहे तो.....धिप्पाड..... टॉम हॅन्क्स चा एक मुव्ही आहे ग्रीन माईल म्हणून. त्यात एक कैदी आहे....तसा आहे तो......

जान्हवीके, मस्त वाटले वाचून ! (अर्थात तू मनात म्हणशील, "ह्या लोकांना काय होतंय, असं म्हणायला? स्वतः सुरक्षित राहून ? हो ना? Wink )

नाही Happy
कदाचित आधी अस वाटल असत.....पण नवर्याच्या मागे लागून लागून सिन्गापुर ला जाणार आहोत आता....
त्यामुळे आता अन्गोला फक्त नोव्हेम्बर पर्यन्तच आहे......
मग नवीन विषय......सिन्गापूर मधे नोकरी शोधणे..... Happy

तुम्ही तिथे चालत फिरता रस्त्यावर??? बापरे .. मी इथे जोहनसबर्ग मधे असुन सुद्धा तशी डेरींग करत नाही कधी.. सेफ नाहिये ते... इथे संध्याकाळी सहा नंतर तर सगळे मॉल्स पण बंद होतात.>>>>>

हायला... म्हणजे... द. आफ्रिकेतही हीच परिस्थीती.....!!! येवढं सुंदर शहर, काय ही अवस्था.... मला वाटलं होतं तिकडे सेफ असेल. एकंदर अफ्रिका कठीण दिसते आहे.... तसं देखिल कसं म्हणु... अमेरिकेची पण तिच अवस्था आहे.

माझा नवरा फेडेक्स मधे असताना यु.एस. ला मेम्फिस ला गेला होता महिना भर. त्याच्या रहाण्याच्या ठीकाणा हुन एक मोठ्ठासा मॉल अगदी चालत ५-७ मिनिटावर होता. एकदा गाडी नाही म्हणुन तो रात्री चालत आला. हॉटेल वाल्यांनी आणि इतर देशातल्या कलीग्ज नी त्याला वेड्यात काढले. नंतर मात्र घाबरुन तो परत कधी चालत आला नाही.

रस्त्यातुन चालत फिरता येणे. ही आपण साधी गोष्ट समजतो. पण ती ही एखाद्या शहरात धाडसाची ठरु शकते.

गड्या आपुला गाव बरा......

मोहन कि मीरा ....
हो ना खरं आहे.....पुण्यात तर रात्री कितीही वाजले तरी आई-वडील काळजी करतात म्हणून....नाहीतर इथे आहे तशी भीती अजिबातच नाही...

झम्पी....
आहेच उदास......आजूबाजूला बघून सुद्धा केविलवाणं वाटतं....कदाचित आपल्याला सवय नसते असा बघायची म्हणून असेल....
कारण माझ्याच बाबतीत बोलायचं झालं तर जन्माला आल्यापासून पुण्यात राहिली....आणि अचानक इथेच आले.....

जान्हवी. आफ्रिकेत ८ वर्षे काढलीत म्हणून अधिकाराने सांगतोय. काळ्या लोकांना, ते काळे आहेत म्हणून घाबरायचे कारण नाही. जोहान्सबर्ग सारखी कुप्रसिद्ध शहरे सोडली, तर ते लोक सहसा आपल्या वाटेला येत नाहीत. आणि आपण गेलो, तर प्रत्येकवेळी वाईट अनुभव येईलच असे नाही. गुन्हेगारीचे अनुभव तर आता, इतालीमधे देखील येतील. ( पुण्या मुंबईत देखील येतील)

आमच्याकडे मोठी सुपरमार्केट्स रात्री नऊ पर्यंत उघडी असतात, गावातली छोटी दुकाने तर रात्री १०/११ पर्यंत उघडी असतात.

Pages