जून मध्ये अंगोला या नव्या आणि कधीही स्वप्नात सुद्धा न आलेल्या देशात माझं आगमन झालं. इतरांप्रमाणे "आफ्रिका" बघायला मिळणार म्हणून खरं तर खुशीत होते पण विमान तळावर पाउल टाकल्या टाकल्या काय झालंय आणि आपण कुठे आलोय ते समजलं....अजिबात आवडला नव्हता तो देश....मी अजूनही नवर्याला म्हणतेही की तुझ्यावर माझं इतकं प्रेम नसतं ना तर मी परत गेले असते.....
दोन दिवसांचा वीक एंड झाल्यावर नवरा गेला कामाला आणि मी??? घरात??? बाप रे ....नवरा येईपर्यंत चे ते सात तास म्हणजे मला सात वर्षान सारखा वाटत होते ....पण आलिया भोगासी च्या तालावर मी वेळ मोजायला सुरुवात केली...मनात म्हटलं, काय अगदी आपण पण अतीच करतोय जरा.....बायका काय रहात नाहीत की काय असं देशाबाहेर येउन घरात एकट्या??? आता एकदा आलोय न.....मग काहीतरी उद्योग करायलाच हवा.....
मग विचारांना सुरुवात....पहिली गोष्ट म्हणजे आमच्या लग्नाची सी डी बघितली...कार्यालयातून निघतानाचा सीन आल्यावर लग्नात रडले नव्हते; पण तेव्हा रडले....तेवढाच वेळ गेला हो......घड्याळ बघितलं, पण छे.... फक्त ११ च वाजले होते...म्हणजे अजून सकाळच होती....??? बरं.... मग आता पुढे काय? म्हणून मग स्वयंपाक घरात मोर्चा हलवला......म्हटलं बघावं तरी......त्या आधी कधी बघितलंच नव्हतं......लग्न होऊन सासरी आले तरीही आधीचा अनुभव नसल्यामुळे सगळं सासुबाईन्च्या हाताखालीच चाललं होतं ना......मग रात्रीच्या स्वयपाकाची तयारी, बेत वगैरे झाल्यावर म्हणलं बाहेरची गम्मत बघूया जरा.......म्हणून हॉल च्या खिडकीत येउन उभी राहिले......आणि आजूबाजूचा परिसर वगैरे निरखायला सुरुवात केली.....आणि मला आपले पुढचे सहा महिने कसे जाणार याची पूर्ण कल्पना आली.
असाच काहीबाही करतंच तो आठवडा गेला...आणि वीक एंड आला....पूर्ण आठवडा मी वीकेंड ला काहीतरी करूच की....या आशेवर काढला होता शेवटी....शनिवारी सकाळी जरा आरामातच उठलो....मग चहा नाश्ता वगैरे करेपर्यंत जेवायचीच वेळ झाली होती....आज काही मी स्वयंपाक करणार नाही असा सांगून टाकलंच होतं मी नवर्याला.....त्यामुळे भुकेनी हाका द्यायला सुरुवात केल्यावर नवरा म्हणाला, "चल आपण इथेच जवळ एक कॅफे आहे तिथे जाउया...." मनात आलं, वाहः......आहे वाटतं असं काही इथे......कारण खिडकीच्या कक्षेत तर असलं काहीच नव्हतं.....म्हणलं चला...बरं झालं.....असं म्हणून गेलो तिथे....आणि तिथलं स्पेशल म्हणून राइस आणि फेजाव म्हणजे आपला उसळ भात असतो न तसलं काहीतरी खाउन आलो......मी यापेक्षा छान केलं असतं असंही म्हणण्याची सोय नव्हती.....जेवण झाल्यावर आम्ही एक-एक कफे मारली......तेवढाच काय तो बरं भाग ........आणि चालत चालत परत घरी.........मनात अजूनही म्हणलं रविवार आहे अजून........पण घरी पोचता पोचताच नवरा म्हणाला.....इथे असंच आहे......मी तर तू यायच्या आधी सरळ झोपून टाकायचो.......माझा हात कपाळावर......पण एखाद्या गोष्टीत पडलोय ना.... मग जे आहे ते स्वीकारायचं असा स्वभाव असल्यामुळे जेव्हा जेव्हा बाहेर पडेन तेव्हा तेव्हा फोटो काढायला सुरुवात केली....फोटोग्राफी म्हणून चांगले नसतील पण आजूबाजूच्या परिसराची अन वातावरणाची एक झलक........
हे काही फोटोज......
अशी रस्त्यावरची दुकानं असतात इथे.....आणि तिथे ब्रेड पासून आय फोन (?) पर्यंत सगळं विकतात!
ही जनरल स्टोर्स
या बायका त्यांच्या केसांच्या वेण्या वेण्या कशा घालतात हे कोडं सुटलं....ते गंगावनासारखे लावलेले केस असतात आणि ते भारत, चीन, जपान या देशातून आयात करतात.
कान्डूनगेरो ...तिथला लोकल कन्व्हेयन्स....पुण्यात ६ सीटर असतात तसं....पण त्यापेक्षा जास्त कोम्बाकोम्बी
पूर्वीची पोर्तुगीज कॉलनी असल्यामुळे तेव्हाच्या काही इमारती अजूनही आहेत..आता बहुतांशी या इमारती शासकीय कार्यालयांसाठी वापरल्या जातात...
अगदीच दिनेशदा हा माझाच
अगदीच दिनेशदा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा माझाच प्रॉब्लेम आहे.........सतत ओळखीच्याच माणसांच्या आजूबाजूला राहिल्यामुळे
चांगले आहेत फोटो!
चांगले आहेत फोटो! पुण्यापेक्षा स्वच्छ दिसतंय!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जान्हवी. तुम्हाला शुभेच्छा..
जान्हवी. तुम्हाला शुभेच्छा.. मी २००३ मधे गेलो होतो तेव्हाच्या मानाने आता खूप बदल दिसतोय.
समुद्रकिनार्याजवळच्या सरकारी बँकेत २ आठवडे होतो..
लिहीत रहा...
Pages