नमस्कार,
नवीनच लेखनाला सुरुवात केली की कदाचित असंच होत असावं.....रोज येऊन रिफ्रेश कर-करून काही नवीन कमेंट्स आहेत का बघणे...असेल तर खुश होणे.....आणि खुश होऊन आपण एकटच हसतोय असं लक्षात आलं की परत चेहरा होता तसा करणे.....आणि नसेल आलं काही तर परत रिफ्रेश करणे......
माझ्या अंगोलावर लिहिलेल्या २ लेखांना मी नवीन सभासद असूनही खूपच छान प्रतिसाद मिळाला......मिळेल का नाही असं वाटलं होतं कारण....गटबाजी वगैरे वाचलं होतं अगदी नवीन नवीन असताना.....पण तसं काही असेल असं मला तरी जाणवलं नाही....असो....
अजून लेख लिहावे अस मनात होतंच कारण देश तसा आहेच औत्सुक्य जागवणारा.......माझा नवरा अर्बन डिझायनर असल्याने तो मला दाखवतच असतो की हे बघ असे हे लोक राहतात..त्यांची घरं..राहणीमान वगैरे.....आधी देशच न आवडल्याने त्याच्या बोलण्याकडे खरं तर लक्षच द्यायचे नाही मी...पण मग जसजसं माझी उत्सुकता वाढत गेली..तशी त्याच्याकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली...काही पुस्तकं, व्हिडीओज, फोटोज या सगळ्यांच्या माध्यमातून "अंगोला एक झलक" चा तिसरा भाग लिहित आहे. अजून माहितीच्या शोधात आहे.....आता हाच देश वेगळा वाटतोय...न आवडलेल्या गोष्टी अजूनही आहेतच....तश्याच...पण आता त्याचा लिखाणात उपयोग कसा करता येईल याचा विचार केला जातोय......
सुंदर निसर्ग, समुद्रकिनारा पार करत करत पुढे यावं तसतसं त्या समुद्राची पोच लक्षात येऊ लागते.....इथेच बर्याच वर्षांपूर्वी पोर्तुगीज लोकांनी आपल्या वसाहती वसवल्या होत्या..एका बाजूला आताच्या नवीन इमारती...ऑफिसेस आणि घरं यांची लांबलचक भिंत असावी अशा थाटात पसरलेल्या......तर किनार्याच्या दुसर्या बाजूला पोर्तुगीज वसाहतींचे ठसे म्हणून राहिलेल्या पंधराव्या शतकातल्या सुरेख इमारती.....यातल्या काही इमारती बँका, इतर ऑफिसेस यासाठी वापरात असलेल्या दिसतात किंवा डागडुजी करून सरकारी वापरात आहेत....पण काही इमारतींची त्या काळातली शान मोडून पडलेली दिसते....१९७५ मध्ये या संपत्तीचा मालक तिला सोडून गेला तेव्हापासून नंतर या देशातल्या लोकांना ती संपत्ती जपता आली नाही हेच खरे.....इथला पोर्तुगीज मनातून नक्कीच हे बघून हळहळत असणार.....
(१)
(२)
(३)
(४)
हे सगळं बघत बघत जेव्हा अजून पुढे यावं..तसं लक्षात येतं की रस्ता हळूहळू अरुंद होतो ....रस्त्यावरचं डांबर जाऊन वाळू दिसायला लागते .....रस्त्यावरच्या लोकांची संख्या वाढायला लागते आणि आधीच असलेली गाड्यांची गर्दी अधिकच जाणवू लागते.....एका मोठ्या इमारतीच्या भोवताली तात्पुरत्या बांधलेल्या छोट्या घरांची गर्दी दिसायला लागते तसं पोर्तुगीज काळातल्या इमारतीचं सौंदर्य डोक्यात असतानाच पायरी चुकून पडावं तशी नजर अडखळते....सगळीकडे लोकच लोक......कोणी नुसतंच उभं आहे....कुणी काही बाही विकतंय...अगदी १२-१३ वर्षांच्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गाड्यांच्या मागे धावतायत......हातातली जी असेल ती वस्तू विकण्यासाठी नाहीतर त्या वस्तूचे पैसे घेण्यासाठी.....कारण इथल्या गाड्यांच्या गर्दीत गाड्या आपल्या वेगाने आणि विक्रेते त्यांच्या मागे आपल्या वेगाने धावत असतात.......त्यात भर म्हणून की काय, प्रवाशांची स्थानिक ने-आण करणार्या केन्डुन्गेरो बेलगाम पणे धावत असतात....आणि त्यात ३०-३० प्रवाशांची चढ-उतार करत असतात. एक मार्केट इथेच जन्माला येत असतं.....आकार घेत असतं .......या मार्केट मध्ये तुम्हाला जे हवं ते मिळेल......जवळ पास ६०-६५००० हजार विक्रेते इथे दररोज येतात आणि आपल्याकडच्या वस्तू ग्राहकांना विकतात. हेच इथल्या सामान्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच साधन आहे. कुटुंबातला प्रत्येक जण ज्या वस्तू इतर घाऊक बाजारात मिळतील त्या घेउन येतो आणि विकतो किंवा घरातच ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून ते विकले जातात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतरही इथेच थांबण्याच धाडस मात्र अनुभवी आणि मुरलेले विक्रेतेच करू शकतात. बाकीचे सगळे आधीच घरी जातात किंवा न विकलेला माल घरच्या परतीच्या वाटेवर रस्त्यातल्या गाड्यांमध्ये विकतात.....
(५)
(६)
(७)
(८)
या सगळ्या गजबजलेल्या वातावरणातून पुढे येत येत दिसू लागतात छोटी छोटी झोपडी वजा घरं आणि काही घरांसमोर छोटी दुकानं जिथे बायकांचे अड्डे मासे, बिअर, भाज्या, फळं, सिगारेट्स वगैरे विकत असलेले दिसतात.....काही गोडाउन्स, जिथे बंदरातला माल उतरवला जातो. या गोडाऊन च्या बाहेर विक्रेत्या बायकांची रांग......रस्ता आता अजूनच अरुंद होऊ लागतो आणि छोटी छोटी वळणं घेत तो पोचतो एका अंगणापाशी....हे अंगण म्हणजे साधारण १०० फूट बाय ७५ फूट जागा...ज्यात सहा छोटी छोटी एक मजली घरं उभी आहेत......या अंगणाला भोवती माणूसभर उंचीची सिमेंट ची भिंत बांधलेली...हे घर आहे लुआंडा मधल्या टिपिकल कुटुंबाचं...इथे एकूण १४ प्रौढ व्यक्ती आणि २० मुलं राहतात....यामध्ये साधारणतः घरातलं मूळ जोडपं, त्यांची किमान ४-५ मुलं, १९ ते ३२ या वयोगटातली...त्यांनाही प्रत्येकी ३-४ मुलं....आणि त्यांचे नवरे असतील तर.......या एका कुटुंबाच्या राहणीमानावरून, कामाच्या स्वरूपावरून, इथल्या संस्कृतीचं आणि समाजव्यवस्थेच चित्रण करायचा माझा छोटासा प्रयत्न...आपली सुरुवात होईल ती या कुटुंबाच्या सगळ्यात मोठ्या मुलीपासून....पण पुढच्या लेखात.
(९)
(१०)
(११)
(१२)
क्रमशः
mastach! paN kramashaa kaa??
mastach! paN kramashaa kaa??![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्तच गं! छान शैली आहे तुझी
मस्तच गं!
छान शैली आहे तुझी लिखाणाची.
बिनधास्त लिही. माबोवर चांगल्या लेखनाला कोणतीही गटबाजी काहीच उपद्रव करत नाहि.
सगळे प्रोत्साहनच देतात.
छानच ओळख.. ती समुद्रात
छानच ओळख..
ती समुद्रात घुसलेली चिंचोळी जमीन, तिथे उतरणारा नागमोडी रस्ता, त्यापुढे असणारे उंच कडे.. वगैरे बघितले का ? माझे एकदोनदाच झाणे झालेय तिथे, पण कॅमेरा नव्हता.
ह्यांना म्हणावं, एखादं छानसं नगर वसवून टाका इथे !
बाकी, अस्ले विक्रेते हे आफ्रिकन जगाचे वास्तव आहे. इथे पुरुष कुटूंबाची जबाबदारी घेतच नसल्याने, बायकांना काहीतरी करुन कमवावेच लागते.
छानच लिहले
छानच लिहले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे संयुक्तामध्ये का आहे ?
हे संयुक्तामध्ये का आहे ?
एकापेक्षा अधिक भाग लिहिताय तर लेखमालिका करा म्हणजे नेव्हिगेट करायला सोपं.
सिन्डरेला, मला लेखमालिका कशी
सिन्डरेला,
मला लेखमालिका कशी करायची ते सान्गता का? किन्वा कुठे असेल ते सान्गता का?
मस्तच ... सगळे भाग वाचतेय...
मस्तच ... सगळे भाग वाचतेय... लिहीत राहा.
कौतुक वाटतं तुझं नवीन ठिकाणी, नवीन भाषेशी, नवीन प्रदेशाशी छान जुळवून घेते आहेस.
आजकाल इंग्लंड, अमेरिकेचे एवढे कौतुक वाटत नाही कारण पायलीला पन्नास भारतीय, सगळे सणवार, रितीरिवाज, देवळं असं सगळं काही आहे इथे. पण तू राहतेयस तिथे संध्याकाळीही बाहेर पडायची मारामार दिसतेय.
त्यामानाने आम्ही (जर्सी सिटीवासीय) खूपच सुखी म्हणायचे.
(रच्याकने एक पीजे खूपच जुना घासून गुळगुळीत झालेला... इथे रस्त्यावरून जाताना आम्ही म्हणतो 'ए तो बघ गोरा चाल्लाय :फिदी:'
लेखमालिकेबद्दल अॅडमिन किंवा
लेखमालिकेबद्दल अॅडमिन किंवा मदत समितीला विचारा.
सध्या तुम्ही संपादन टॅब वापरुन 'संयुक्ता', इ ग्रूप काढून टाका.
छान लिहिताय. अंजली म्हणतात
छान लिहिताय.
अंजली म्हणतात ते पटलं.
छान लिहिलयं. पण लिहिण्यासाठी
छान लिहिलयं.
पण लिहिण्यासाठी मटेरियल गोळा करताना अति धाडसं करु नका !
(No subject)
सिन्डरेला.. काढल
सिन्डरेला..
काढल काढल.....सॉरी सॉरी.....माझ्या लक्षात आल नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जान्हवी मस्त चाललय..... खुपच
जान्हवी
मस्त चाललय..... खुपच चांगली ओळख करुन देताय. इथे गट बाजी वगैरे काही नाही हो. चांगल्या लिहिणार्याला वाचक मिळतातच. इकडचं साहित्य वाचा. मी पण गेले वर्ष भर सदस्य आहे. अनेक सुंदर अनुभव मायबोलीवर मिळतात.
छान लिहिताय. वाचतेय.
छान लिहिताय. वाचतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान!
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त , येऊ दे अजून , वाचतोय
मस्त , येऊ दे अजून , वाचतोय
वा, सुरेखच, पण अजून जरा
वा, सुरेखच, पण अजून जरा सुसंगत पाहिजे (वैयक्तिक मत).
वा छानच लिखाण. श्री म्हणालेत
वा छानच लिखाण.
श्री म्हणालेत तेही लक्षात घ्या.
वा! मस्तच लिहिलंय!!
वा! मस्तच लिहिलंय!!