पुणे ५२

वांगमय-ए-मोहेंजोदारो

Submitted by rmd on 15 August, 2016 - 14:02

काल मोहेंजोदारो पाहिला. सिनेमा पाहून झाल्यावर त्याची वेगवेगळी व्हर्जन्स इमॅजिन करण्याचा मोह आवरला नाही. 'बे एरिया' च्या वाहत्या पानावर अशी काही व्हर्जन्स पोस्ट करताच तिथल्या बाकी मेंबर्सनी त्यात अजून भर घातली. ही सगळी गंमत इतर मायबोलीकरांसोबत शेअर करण्यासाठी आणि अशी अजून व्हर्जन्स यावीत म्हणून हा धागा.
(हेडर सौजन्य - मॅक्स)

** स्पॉयलर अलर्ट : खालील व्हर्जन्स वाचून कोणाला जर मोहेंजोदारो सिनेमाची खरी स्टोरी समजली तर आम्ही जबाबदार नाही Proud **

भन्साळी व्हर्जन (rmd)
------------------

पुणे ५२ : रसग्रहण

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 28 January, 2013 - 13:32

चित्रपट हा माझ्या अतिप्रचंड आवडीचा विषय असुनही मला कधीही एखाद्या चित्रपटाविषयी लिहावेसे वाटले नाही कारण इतर बरेचसे लोक हे काम माझ्यापेक्षा चांगले करतात आणि कित्येक लोकांना (पक्षी : समीक्षक) या कामाचे पैसे मिळतात. तसेच एखादा चित्रपट कोणाला कधी आणि कशासाठी आवडावा किंवा आवडू नये हे बऱ्यापैकी व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्ही बदलत जाता तशी तुमची आवडही बदलत जाते. तसेच अगदी चित्रपट बघतानाचा मूड, तेंव्हाच्या अपेक्षा यानीपण फरक पडतो. त्यामुळे हाच चित्रपट बघा वगैरे सांगण्यात मला फारसा अर्थ वाटत नाही. पण...

शब्दखुणा: 

'पुणे ५२'च्या मुंबईतील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 January, 2013 - 12:17

'पुणे ५२' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. १७ जानेवरी २०१३ रोजी मुंबईत पीव्हीआर (फिनिक्स मॉल), लोअर परेल इथे संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'पुणे ५२'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी तुम्हांला मिळणार आहे.

या खेळांस उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.

शब्दखुणा: 

'काय बदललं?'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 December, 2012 - 23:29

१९९२ साली भारतात सुरु झालेल्या जागतिकीकरणानं बाजाराचं व्याकरण बदलून टाकलं. 'गोष्टी जपून वापरा, पिढ्यान् पिढ्या टिकवा' ही शिकवण मागे पडून 'अधिक खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या' या मूल्यानं भारतीयांच्या मानसिकतेत शिरकाव केला. परदेशी ब्रँडदेखील सुलभतेनं मिळू लागले तसं साहजिकच एकेका गाडीसाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षायादीचे किस्से जुनेपुराणे वाटू लागले.

डालड्याचा पिवळा डबा, चेतकची स्कूटर, बोटांनी गोलगोल फिरवत डायल करायचा टेलिफोन ते आजच्या स्टायलिश चारचाकी गाड्या, आयफोन या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. बाजारव्यवस्था बदलली, तसे नातेसंबंध बदलले, आपली परस्परांतली वागणूकही बदलली.

'संहिता', 'पुणे ५२' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात

Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 October, 2012 - 02:37

मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.

Subscribe to RSS - पुणे ५२