--स्मितहास्य--
मी जे शोधत आहे,
कदाचित ते माझे नाही..।
जे माझ्याकडून हरवले आहे,
निश्चित ते माझे नाही..।
म्हणुनच तर मी इतका,
शोधण्याचा त्रास घेत नाही..।
मला माहीत आहे ते,
कधीच मला मिळणार नाही..।
मी हात बांधले आहे,
ते स्वतःचेच आहे माझे..।
मी मनावर नियंत्रण ठेवले,
ते स्वतःचेच आहे माझे..।
मी हसत हसत आहे,
दुःखाश्रू लपवत आहे..।
मी सहजच हसून माझे,
*'स्मितहास्य'* दाखवत आहे..।
निलेश पाटील
पारोळा,जि-जळगाव
मो-9503374833
चेहऱ्यावरील स्मितहास्य - खरोखरीच, किती सुंदर अभिव्यक्ती आहे ही! तुम्ही अशी माणसे पाहिली आहेत? हो, हो! निश्चितच पाहिली असतील! अशी माणसं कि ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य असते! आजकालच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात चेहऱ्यावर एखादे वेळेस उमटणारे हसू हे सुद्धा फार दुर्मिळ झालाय! मग कायमच्या स्मित हास्याची काय बात? पण अशी माणसे समाजात काही वेळेस आढळतात! स्वतःशीच गुणगुणणारी, स्वतःच्याच नादात असणारी, चेहऱ्यावर लोभसवाण हसू बाळगणारी! जणू विधात्याने समाजात पेरलेले देवदूतच!