नमस्कार, मी काल घरी परत येताना माझ्याकडे खूप जास्त सामान होते म्हणून जेवण झाल्यावर एक टॅक्सी केली. त्यावेळी २० टक्के बॅटरी शिल्लक होती. मी टॅक्सीमधे बसल्यावर ती कधी संपली मला कळले नाही. मला वाटले की आता आपण घरीच पोचतो आहे तर सगळी बॅटरी संपली तरी चालेल. पण मी खाली घरापाशी उतरलो आणि सामन घेऊन १४ व्या माळ्यावर पोचलो. चार्जर बाहेर काढला आणि खिसे चाचपून बघतो तर मोबाईल खिशात नाही. मग काय धडधड खाली उतरलो आणि तेवढ्या टॅक्सी गेलेली होती. मी नंतर त्रकार नोंदवली. ड्रायवर सापडला पण तो म्ह्णत आहे की त्याला फोन सापडला नाही.
पूर्वी मोठ्या आकाराचे सेल फोन होते. किंमत सोळा हजाराच्या पुढे होती. खूप श्रीमंत लोकांकडेच ते होते.
इनकमिंग आठ रुपये आणि आउटगोईंग सोळा रुपये असे काहीसे चार्जेस होते असं अंधूकसं आठवतंय. त्या काळी तो फोन स्टेटस सिंबॉल म्हणून काही लोक जवळ बाळगत. तर इतरांना त्यांचा हेवा वाटत असे. मोबाईल क्रांती वगैरे काही तरी बोललं जायचं. चार चौघात हा फोन वाजला की लोकांना तो फोन दिसेल अशा पद्धतीने बाहेर काढून त्यावर बोलण्यात त्या सेलधारी व्यक्तीला कोण गुदगुल्या होत असतील ना ? इतरांकडे हा फोन नाही आपल्याकडेच आहे ही भावना त्याला इतरांपेक्षा वेगळं समजायला लावत असेल.
मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? ( http://www.maayboli.com/node/33327 ) या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन करीत आहे. प्रतिक्रिया तिथेच देता आली असती परंतु दोन कारणांमुळे स्वतंत्र ले़ख लिहीत आहे.
१. अदिती यांच्या मूळ ले़खापेक्षा माझा प्रतिसाद लांबलचक होण्याची शक्यता आहे.
२. मूळ ले़खात मांडलेल्या मुद्यांव्यतिरिक्त इतरही काही मुद्यांचा विचार करायचा असल्याने तिथे प्रतिसाद दिल्यास त्यावर "भरकटलेला" असा शेरा येऊ शकतो.
हॅलो मला एक मदत हवी आहे. माझ्या मैत्रिणी च्या भावाने, जो सन्गणक शिकत आहे,नवीन हार्ड डिस्क बसवण्याकरता जुन्या हार्ड डिस्क मधुन बॅक अप घ्यायला सुरुवात केली. पण काही कारणामुळे जुन्या डिस्क मधल्या बर्याचश्या फाईल्स/ डॉक्युमेन्ट्स उडुन गेले. जे होत असते.
दुर्दैवाने त्यातली गाणी आणी काही नवीन गोष्टी तो सिडी वर कॉपी करायचा विसरला. त्याने नेटवरुन सर्च केला, पण काही समजत नाहीये.
याला काही उपाय आहे का? की जेणे करुन त्याला त्या फाईल्स परत बघता येतील?
बी.एस.एन.एल चे ब्रॉड बॅड मी गेले ३-४ वर्षे वापरत होतो. सर्व्हीस चांगली होती. पण गेले तीन महिने सर्व्हीस चा प्रॉब्लेम आहे. महिन्यात १५ दिवस सर्व्हीस तुटक असते. किंवा नसते.
तक्रार करुन काही उपयोग नाही. ( खाली लगेच मी लिहले म्हणुन प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत " अच्छे दिन आने वाले है "
पर्याय म्हणुन आयडीया मोबाईल वर नेट पॅक लोड केला ज्याचा अनुभव चांगला आहे.
हॉटस्पॉटवर सुध्दा नेट/ लॅपटॉप चालत आहे. किंचित स्लो आहे पण ठिक आहे.
कायम चालवायला काय हरकत आहे ?
आपल्याकडे मोबाईल आले आणि गजराची घड्याळे ,रेडिओ ,सीडी /टेप रेकॉर्डर प्लेअर कैसेटसह ,फिल्म कैमेरे ,एनसायक्लोपिडिआ पुस्तकांचा संच हे सर्वच बाद झाले . नवीन पिढीकडे या गोष्टी नसणारच परंतू ज्यांच्याकडे आहेत त्यांना प्रश्न पडतो यांचे काय करायचे ?विकायला गेलो तर कोणी घेत नाही .
माझ्याकडे टेप होता त्याच्या स्पिकरला थेट वायर जोडून बाहेर काढली आणि ३.५एमेम इअरफोन ची पिन जोडली.टिव्हीच्या आतली स्पिकरची वायर तोडून त्यामध्ये हेडफोन सॉकेट लावले .या सॉकेटमध्ये टेप जोडला की त्यात आवाज येतो आणि समोरच्या सोफ्यावर बसून टिव्हीचा आवाज कमी ठेवून कार्यक्रम ऐकता येतात .वायर काढली की टिव्हीचा स्पिकर चालू होतो .
मागिल महिन्यात माझा भाऊ गेला. तो एकटाच राहत असे. तो खूप संशयास्पद स्थितीत गेला. मी इथे वर्णन करत नाही. खूप खूप अवस्थजनक घटना झाली ती. तो बी. एस. ऐन. ल. चा मोबाईल फोन वापरत होता. मला त्याचे शेवटच्या तीन दिवसातील फोनची यादी आणि ऑडीयो हवे आहेत. कुणी ह्यासबंधी मला मार्गदर्शन करु शकेल का? कुणाचे मित्र वा नातेवाईक बी. एस. ऐन. ल. मधे असतील तर विचारुन बघाल का?
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
आम्हाला एअर कूलर घ्यायचा आहे. एसीचं बजेट नाहीये आणी पंखा कुचकामी ठरतोय.
मी कूलर बेडरूम मध्ये ठेवणार आहे (१५० चौफु).
१) सध्या कूलरमध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत? कुठल्या कंपनीचा कूलर घ्यावा?
२) ८ तासासाठी कूलर वापरायचा असेल तर वॉटरटँकची क्षमता किती असावी?
३) यातही 'स्टार' रेटिंग असतं का?
४) मूवेबल कूलर पाहिजे.
धन्यवाद.