चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सुचवावंसं वाटतंय, नेमका इतिहास काय याबद्दल मला कुतूहल आहेच.
कुणी तरी त्या विषयावर वेगळा धागा काढावा.

नेमका इतिहास काय याबद्दल मला कुतूहल आहेच.>>>

थोडे दिवस थांबा, खरा इतिहास म्हणून सोशल मीडियावर ज्या पोस्ट पडत आहेत त्या इतक्या भयानक विनोदी आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत की खरोखरच यांच्या मेंदूला नारू झाला असावा का अशी शंका येते Happy

राजकुंवरबाईंनाही अवघड गेलं असणार ह्याला तोंड देणं
>>>
यांच्याच लग्नात पिलाजीराव शिर्के (गणोजी शिर्क्यांचे वडील, हे ही एक मातब्बर सरदार होते) यांनी वतनाची मागणी केली होती आणि महाराजांनी टोलवाटोलवी केली होती. संभाजी राजांनी तर स्पष्टच नकार दिला. तसं म्हटलं तर दोन्ही स्त्रियांचे नशीब इतके वाईट की एकीच्या भावाने नवऱ्याला मारले आणि दुसरीच्या नवऱ्याने भावाला मारले. आणि जिथे मन मोकळे करायला जावे ते माहेर तर कायमस्वरूपी संपले असेल दोघींचे.

सोशल मीडियावर ज्या पोस्ट पडत आहेत त्या इतक्या भयानक विनोदी आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत की
>>>>> विनोदी आणि दिशाभूल करणाऱ्या परवडतील. पण आत्ताच एक व्हिडिओ पाहून आले की औरंगजेब काय फार वाईट नव्हता. त्याने फक्त ४० दिवस तुरुंगात टाकले, आणि सोडून दिले. पुढचं सांगत नाही. नाहीतर मला हाणतील लोक. मेंदूला नारूचे उत्तम उदाहरण.

नारू Lol
दोन्हीही विनोदीच आहेत. हा चित्रपट पाहिला नाहीत तर तुम्ही सच्चे देशभक्त नाही हा मेसेज नाही आला का कुणाला ? युट्यूबर्स तर सेक्युलर लोकांबद्दल काय काय बोलताहेत. काही काही एक्स्ट्र्मिट्स छावा ने सेक्युलर लोकांपुढे नांगी टाकली असे ओरडताहेत. या सगळ्या गदारोळात सिनेमात काय मिसिंग आहे ते अचानक लक्षात आलं.

सिनेमाच्या ( छुप्या ?) मेकर्सना संभाजी महाराजांचे मावळे, सरदार यांचे कॅरेक्टर्स डिफाईन करण्यात इंटरेस्ट आणि वेळ अजिबातच नसावा. नाहीतर तीन भागाचा प्रोजेक्ट केला असता. त्यांना शेवटचा अर्धा तास महत्वाचा होता आणि त्याबद्दलच युट्यूबर्स भरभरून बोलत आहेत. हे सगळे एका विचाराचे आहेत तर दुसरीकडे दुसरे आहेत. हल्ली असा गदारोळ नेहमीचा झाला आहे. चित्रपटामधे दोन्ही बाजूंना रस असतो का याबद्दल शंकाच आहे.

म्हणजे छावाचे निर्माते यशस्वी झाले. असा प्रपोगंडा सुरू झाला, अचानक युट्यूबर्सची लाट आली कि तो सिनेमा पहायचा नाही हे ठरवून टाकलेलं होतं. पण गेले दोन दिवस ज्यांच्या सोबत एव्हढं फिरणं झालं त्यांचा आग्रह मोडवला नाही.

रानभुली, सेनापती व केदार जोशी यांनी काही लिखाण केले आहे त्यातुन थोडी माहिती मिळेल.

https://www.maayboli.com/user/26

https://www.maayboli.com/user/30279

यांचे इतरही बरेच लेखन आहे, त्यातले इतिहास विषयक शोधुन वाचावे लागेल.

कोणी बघा सांगितले म्हणून हजार रुपये खर्च करून कोणी पिक्चर बघायला जात नाही.

कोणी बघू नका सांगितले म्हणून कोणी आपल्या आवडीचे बघणे थांबवत नाही.

बघणारे आणि न बघणारे यांना जज न करता ज्याच्या त्याच्या मताचा आदर करा.

या पिक्चर ने बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड तोड ओपनिंग दिली नाहीये कारण हा इतिहास सर्वांनाच तितका जवळचा नाहीये.

पण पिक्चर जबरदस्त आहे त्यामुळे येत्या काळात माऊथ पब्लिसिटीवर तुफान गर्दीत चालत राहणार..

आमच्या इथे सकाळी ७-७.१५ चे शो सुद्धा हाऊसफुल आहेत. तर रात्री ११.३० च्या शो ची सुद्धा मला मागची तिकीट मिळत नव्हती.

लोकं थिएटर मध्ये अक्षरशा भारावलेल्या वातावरणात घोषणा देत आहेत.

जे आज ना उद्या हा चित्रपट ओटीटी वर बघणार असतील त्यांनी थिएटर अनुभव घ्यायचे चुकवू नका.

येत्या शनिवार पर्यंत आमच्या घरच्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला असेल... तर काही जणांनी दोन वेळा Happy

कोणी प्यायला सांगितले म्हणून हजार रुपये खर्च करून कोणी दारू प्यायला जात नाही.
कोणी पिऊ नका सांगितले म्हणून कोणी आपल्या आवडीचे पिणे थांबवत नाही.
पिणारे आणि न पिणारे यांना जज न करता ज्याच्या त्याच्या मताचा आदर करा.

वडाची साल पिंपळाला लावणे कुणी तुमच्याकडून शिकावं
अकख्या पोस्टमध्ये हे फक्त छावा संदर्भात आहे असे कुठंतरी आहे का हो?
वय झालं असेल तर चष्मा का नाही लावत?
न लिहलेल्या गोष्टी दिसणार नाहीत, डोक्यात शिरणार नाहीत असं काहीतरी असेलच बघा शोधून, तुमच्याच भल्याचे सांगतोय

ओके

अजबराव सुंदर पोस्ट.

दुहीचा शाप कसा आहे ते बरोबर सांगितले. ताराराणी वर मराठी मध्ये पिक्चर आला होता ना? कोणी पहिला होता का तो?

"उपवासाने अंग पूर्ण खंगणे, मलमूत्राने बरबटणे, delusional तरीही विवेक शाबूत असणे आणि सरेंडर न करणे हे आम्ही इमॅजिन केले होते" - कुठल्या वयात तुम्ही कादंबरी वाचली आणि तेव्हा तुमचं इमॅजिनेशन काय होतं ह्यावर हे अवलंबून आहे. बहुतेक १२-१३ वर्षाचा असताना ह्यातलं बरचसं वाचन झालंय. तेव्हा तुम्ही म्हणताय ते इमॅजिन नव्हतं केलं. त्या वयात पुस्तकातले शब्द वाचून डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं होतं. त्याबाहेर काही विचार नव्हता केला.

जे वर्णन आहे ते उभे करणे कोणालाच शक्य नही आणि केलेच तर ते बघणे शक्य कोटीतली गोष्ट नाही

निव्वळ भयानक यापलीकडे दुसरा शब्द नाही
ते वर्णन आठवले तरी अंगावर काटा येतो
कसं सहन केले असेल राजांनी

Vanilla Sky बघितला आणि मग Roger Ebert चा हा रिव्यू वाचला.
https://www.rogerebert.com/reviews/vanilla-sky-2001
एकूण मी एकटाच असा नाही की ज्याला हा पिक्चर समजला नाही. Roger Ebert म्हणतो आहे की किमान दोनदा बघायला पाहिजे. आता जमले तर बघेन दुसऱ्यांदा.
https://www.looper.com/760449/the-ending-of-vanilla-sky-explained/
ही पोस्ट ही वाचनीय आहे.

एबर्टचा रीह्व्यू वाचला होता. ही तुम्ही लिंक दिलेली दुसरी पोस्ट नव्हती वाचली - तीही मस्त आहे.
मला जनरली कॅमेरन क्रोचे सिनेमे आवडतात.
एबर्टने उल्लेख केलेले 'मेमेन्टो' आणि 'मलहॉलन्ड ड्राइव्ह'ही मस्त मूव्हीज आहेत - ज्यांना सिनेमातून डोक्याला खाद्य हवं असतं त्यांच्यासाठी.
तसाच स्टॅनली क्यूब्रिकचा 'आइज वाइड शट'ही.

बोल भिडू चा व्हिडीओ मिळाला. त्या मधे औरंगजेबाच्या कैदेतच संभाजीराजेंवर function at() { [native code] }याचार झाले असे स्पष्ट म्हटले आहे. ते ही पुराव्यानिशी. त्यामुळे सध्या तरी हा विषय माझ्यासाठी संपला. आशुचँप यांचे म्हणणे योग्य आहे. (बोल भिडू हे नवं पोर्टल असलं तरी अनेक जुन्या / प्रसिद्ध टिव्ही चॅनेल्स पेक्षा यांची विश्वासार्हता बरी वाटते).

एक माहिती अशीही आहे कि औरंगजेब त्याच्या अटी संभाजीराजेंकडे एका सरदाराकरवी पाठवत असे. संभाजीराजेंनी दिलेली काही उत्तरे जशीच्या तशी सांगण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. त्यांनी फक्त सूचक निरोप दिले. त्यानंतर मग क्रूर शिक्षा सांगितल्या. बादशहा समोर खुर्ची टाकून बसला हा कल्पनाविलास आहे.

बादशहा समोर खुर्ची टाकून बसला हा कल्पनाविलास आहे >>>
हो. ती सिनेमॅटिक लिबर्टी असू शकते.
जिथे बादशहाचे फर्मान स्वीकारायला फर्मानबाडी उभारून हात बांधून जावे लागत असे तिथे तो समोरासमोर थोडेच येणार आहे. शिवाय जी हुजुरी करणारे इतर अनेक सरदार त्याच्या दरबारात असताना त्याची गरज काय?

चर्चा वाचतोय. असामींच्या पोस्टने एकदम से हालात बदल दिए, जजबात बदल दिए. असामी आणि अजबराव यांच्या पोस्ट्स विशेष आवडल्या.

बादशहा समोर खुर्ची टाकून बसला हा कल्पनाविलास आहे >>>
हो. ती सिनेमॅटिक लिबर्टी असू शकते.
>>>

हो, आणि याने काही फरक पडत नाही. जे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ते पोहोचते.. सगळे तपशील जसेच्या तसे आजच्या काळातील लोकांवर जे बायोपिक बनतात त्यात सुद्धा नसतात.

हो. ती सिनेमॅटिक लिबर्टी असू शकते. >> @ माझे मन, अगदी अगदी. मान्य आहे.

मात्र अशा विषयावर कलाकृती बनवताना टीमने किती मेहनत घेतली आहे, रिसर्च केला आहे ते दिसतं अशा डिटेलिंग मधून. कदाचित फेस ऑफ साठी समोरा समोर आणणे गरजेचे वाटले असेल. जिथे डिटेल्स उपलब्ध नाहीत तिथे ऐतिहासिक कलाकृतीत घेतलेली लिबर्टी अनेकदा दिसते. औरंगजेबाच्याच चरित्रावरची आलमगीर कि शहेनशहा ही कादंबरी वाचली आहे. त्यात त्याने भावांच्या हत्या करतानाच्या आधी त्याच्या मनात काय चालले होते ही लेखकाची लिबर्टीच आहे.

एव्हढ्या क्रूरकर्माच्या त्या कृत्याला सुद्धा समर्थनीय ठरवलं गेलं होतं. अशा कादंबर्‍या लहान वयात वाचूच नयेत. त्या कॅरेक्टरची प्रतिमा ठसते तशीच.

मी तर राणी तारारणी बद्दल वाचून एकेकाळी थक्क झाले होते.
ह्या अश्या राण्यांबद्दल खरेच मूवी व्हावेत.
झाशीची राणी वरचा मूवी उगाच त्या कंगनाने करून फुकट घालवला.
महाराज्ञी येसुबाई हे पुस्तक जरा वेगळी कथा सांगते. इथे औरंगजेबाचे बरेच उल्लेख आहेत जे छावा पुस्तकात वेगळे वाटतात.

झाशीची राणी वरचा मूवी उगाच त्या कंगनाने करून फुकट घालवला.
>>>
तो पुन्हा दुसरे कोणी चांगली टीम मिळून करू शकतेच.

संभाजीराजांवर सुद्धा यापूर्वी मराठीत चित्रपट आला आहे. थोरातांची कमळा. बघून बरीच वर्षे झाली. त्यामुळे आता कथा काही आठवत नाही.

झाशीच्या राणीवर सुद्धा एक चित्रपट आलाय. सोहराब मोदींनी १९५३ साली बनवला. आणि तो भारतातला पहिला टेक्निकलर चित्रपट होता. हाही लहानपणी पाहिला आहे. मोदींनी राणीच्या भूमिकेसाठी आपल्या पत्नीची निवड केली होती.

Nightmare Alley (1947)
Nightmare Alley (२०२१)
माणूस पैशाच्या मागे लागला की त्याचा अधःपात कसा होतो . film noir.

आज एक रील पाहिलं. तो एडिट झालेला विकी कौशल चा लेझिम चा सीन आणि बॅकग्राउंड ला " राजे, इतक्या हालअपेष्टा तुम्ही हसत सोसल्यात, पण ३० सेकंद लेझिम खेळण्याचा छोटासा आनंद होता तुमच्या अयुष्यात , तो पण लोकांना बघवला गेला नाही. माफी असावी राजे!! " ते बघितल्यावर तशीच अजून २ आली ! Uhoh
लोक म्हणजे कशाची साल कुठल्या पिंपळाला नेऊन जोडतील काही सांगता येत नाही Lol

Pages