चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही "साईड इफेक्ट्स' बघितला.
ज्यूड लॉ, रूनी मारा, कॅथरीन झिटा जोन्स, चॅनिंग टेटम
सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट आहे. रूनी मारा व चॅनिंग टेटम नवरा बायको आहेत. तो ट्रेडिंग मधे मोठ्या चुका करून चार वर्षांसाठी तुरुंगात जाऊन आला आहे. रूनीला नैराश्याने घेरलेले असल्याने ती भीतींवर कार नेऊन धडकवते व आत्महत्येचा प्रयत्न करते. तेथून सायकॉलॉजीस्ट ज्यूड लॉकडे तिचे उपचार सुरू होतात. वेगवेगळ्या औषधांचे सगळे उपाय थकल्यावर ते क्लिनिकल ट्रायल मधे नुकतेच सुरू असलेले औषध तिच्या जुन्या थेरपिस्ट - कॅथरीन झिटा जोन्सच्या मदतीने सुरू करतात. त्याच्या साईड इफेक्ट्सने झोपेत चालायला लागून रूनी शिमला मिरची चिरताचिरता नवऱ्यालाच चिरून टाकते व सरळ झोपायला निघून जाते.

तेथून गुंतागुंतीची कथा सुरू होते व कथा वेगही धरते. ज्यूडचे मानमरातब जाऊन सगळीकडे वेगळाच रंग या केसला धरायला लागतो. कारण त्याने केलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या प्रयोगाला ही बळी पडली आहे अशा वदंता/ वावड्या मिडीयात सुरू होतात. तिला मनोरुग्ण असल्याने शिक्षेतून सूट मिळणार असते व सगळा दोष चुकीच्या औषधाचा व साईड इफेक्ट्स चा असल्याने तिला काही दिवस मेंटल हॉस्पिटलमध्ये राहून घरी सोडवण्याची तरतूद करण्यात येते. ज्यूड मात्र पूर्णपणे अडकून जातो, त्याची प्रॅक्टिस बुडण्याची वेळ येते. तेव्हा काही हिंट्स मिळत जातात व ही मनोरुग्ण नसून कॅथरीन व हिचे प्रेमप्रकरण असून दोघींनी मिळून ह्याला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो. हा खून त्या दोघींचा कट असतो. ते तो रूनीकडून सिद्ध करवून घेतो व दोघींनाही शिक्षा होते. "डबल जेपर्डी" मुळे रूनीला पुन्हा शिक्षा होऊ शकत नसते पण एक वेगळीच खेळी खेळून तिला मनोरुग्णालयात अडकवून टाकण्यात ज्यूड यशस्वी होता. अशा रितीने दोघींनाही आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा होते. शेवट अगदी आटपाट नगरातील गोष्टीसारखा सुखांत आहे.

चित्रपट इंट्रेस्टींग आहे पण मला खूप काही आवडला नाही. अस्पष्ट संवाद फेक वाटत होती. ज्यूडचे काम सर्वात जास्त आवडले, रूनीचेही चांगले आहे. मला थोडा कंटाळवाणा वाटला. काही भाग कळला नाही, सुरवातीला एंगेजिंग वाटला नाही. कथेला पकड घ्यायला पाऊण तास लागला आणि सिनेमा पावणेदोन तासांचा आहे. एकंदरीत बघणेबल कॅटॅगरी वाटला. सायकॉलॉजीकल थ्रिलर हा जॉन्रा आवडणाऱ्यांना कदाचित जास्त आवडेल.
-------------

यावरून 'पेन हसलर्स' आठवला. तो यापेक्षा जास्त चांगला होता. पेन मेडिकेशन, इन्शुरन्स, प्रिस्क्रिप्शनच्या काळ्या धंद्यावर आहे. तो रेको देईन. एमिली ब्लंट जबरदस्त काम करते. हा थ्रिलर नाही, नेटफ्लिक्सवर आहे. हल्लीच युनायटेड हेल्थ केअरच्या सीईओचा मॅनहॅटनमधे दिवसाढवळ्या खून झाला. त्याचाही ह्या इन्शुरन्सच्या गोरखधंद्यासोबत व पेन मेडिकेशनच्या आहारी जाण्यासोबत मोठा संबंध आहे व तो कसाकसा आहे ह्याची थोडीफार कल्पना येते. अमेरिकेत राहणाऱ्यांना जास्त चांगला समजेल.

*डबल जेपर्डी - अमेरिकेतील संविधानातील कायद्याच्या पाचव्या अमेंडमेंट नुसार एकाच माणसाला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकत नाही.

परिचय आवडलाच पण हा तू दुसरीकडे लिहीला होतास का? वाचला आहे काही दिवसांपूर्वीच. की मी विकीवर प्लॉट वाचला माहीत नाही.

पेन हस्टलर्सही चांगला होता. तो आवडला असेल तर हुलू वर "डोपसिक" पाहा. त्यातली मेन लीड (केटलिन डेव्हर) आणि मायकेल कीटन - दोघांची कामे सुरेख आहेत.

बाय द वे, इव्हन डबल जेपर्डी नावाचाही एक पिक्चर आहे. आणि तो ही चांगला आहे Happy अ‍ॅशली जड आणि टॉमी ली जोन्स

डबल जेपर्डी - अमेरिकेतील संविधानातील कायद्याच्या पाचव्या अमेंडमेंट नुसार एकाच माणसाला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकत नाही.
>>>>

हे तर आपल्या अमिताभच्या अंधा कानून मध्ये सुद्धा आहे Happy

नाही, मी नव्हते लिहिले. मी तर आजच पाहिला व ही "पहिल्या धारेची" पोस्ट लिहिली. Happy

डोपसिक आणि डबल जेपर्डीचा रेको घेते आहे, थॅंक्स. Happy दोन्हींबद्लही ऐकलं आहे, अजून पाहिले मात्र नाहीत.

ऋ , अंधा कानून Lol

09516D98-8531-478E-91A2-2CB8D7606149.jpeg

'साइड इफेक्ट्स'मध्ये फार्मास्यूटिकल्स+डॉक्टर्सच्या बिझनेस टॅक्टिक्सची काळी बाजू हा विषय आहेच. तो आता पर्ड्यू फार्मासारख्या इतर उदाहरणांच्या निमित्तानेही इतक्यात अनेकदा टीव्ही/मूव्हीजमध्ये येऊन गेला. कोर्ट केसेसमध्ये शहाण्यासुरत्या व्यक्तीने इन्सॅनिटी प्लीड करणं हाही प्लॉट हॉलिवुडला नवीन नाही. 'प्रायमल फिअर'सारख्या सिनेमांत तो फार प्रभावी पद्धतीने आला आहे.

पण या सिनेमात मानसिक आजार हा किती ग्रे एरिया आहे हे ठळकपणे अधोरेखित झालं माझ्यासाठी. रूनी माराच्या कॅरेक्टरला मानसिक इश्यूज आहेत, पण ती त्याचा 'वापर' करून घेण्यातही तरबेज होत चालली आहे. एकदा अ‍ॅन्ग्झायटी किंवा डिप्रेशनचं लेबल (ही उदाहरणादाखल दोन कंडिशन्सची नावं झाली, यात अनेक प्रकार अर्थातच आहेत) लागलं म्हणजे माणूस २४ तास अ‍ॅन्क्शस किंवा डिप्रेस्ड असतो असं नाही, आणि २४ तास त्या अ‍ॅन्ग्झायटीची लेव्हल सारखीच असते असंही नाही. ती कंडिशन नसती तर ही व्यक्ती संत असती असंही नाही. त्यात त्याला ब्लड प्रेशर किंवा ग्लूकोज मॉनिटरसारखं काही तटस्थ मेजरिंग डिव्हाइस नाही. पेशन्ट सांगेल ती लक्षणं!
हे ऐकायला काहीसं दुष्ट वाटतं, पण अशा आपल्या डायग्नोसिसचा 'वापर' करून घेणार्‍या केसेस आणि त्यामुळे होणारी केअरगिव्हर्सची फरपट मी पाहिली आहे.
ही दुर्दैवी बाजू इतक्या नेमक्या प्रकारे मांडली गेल्याचं दुसरं उदाहरण माझ्या पाहण्यावाचण्यात आलेलं नाही, त्यासाठी हा रेको होता. Happy

मस्त रिव्ह्यूज. बघायला पाहिजे साइड इफेक्ट्स.
मानसिक आजारांचे हेच मला फार ट्रिकी वाटते. पेशंट सांगेल ती लक्षणं आणि त्यावरून डायग्नोसिस होतो. क्लिनिकल टेस्ट वगैरे नाही. कॉलेज किड्स परिक्षेच्या काळात फोकस साठी किंवा गंमत म्हणून सर्रास एडिएचडीचे सिंप्टम्स सांगून खोटे डाय्ग्नोसिस करून घेणे आणि अ‍ॅडेरल चे प्रिस्क्रिप्शन घेणे हे उद्योग सर्रास चालतात. सर्व प्रकारच्या अ‍ॅब्यूज ला भरपूर स्कोप.

....स्पॉयलर....
ह्या सिनेमात त्या मानसिक आजारांचे काळं-पांढरं डायग्लोसिस नसते याचा वापर करुन घेतला आहे. पण 'तो वापर करुन घेणे' हा फोकल पॉईंट आहे हे (मलातरी) अधोरेखित झालंच नाही. माबुदो. ती तो तसा वापर स्वार्थासाठी करुन घेते, तिची थेरपिस्ट तिचा स्वार्थ बघते. पैशांच्या पाऊलखुणा तपासा या प्रसिद्ध वचनानुसार त्या मिळतात + तिचं खोटं सप्रमाण सिद्ध होते आणि उलगडा होतो.

यात मनोविकार आणि त्याचं निदान आधी केल्याप्रमाणे चूक होतं हे तोच मनोविकारतज्ज्ञ नंतर सप्रमाण सिद्ध करतो. आणि ते सप्रमाण म्हणजे, रँडम आणि कंट्रोल ग्रुप ट्राउल्सचे बेसिक नियम पाळणे हेच दिसते. किमान माझा तरी तसा समज झाला. थोडक्यात मनोविकाराच्या (किमान ह्या सिनेमात दाखवलेला तरी) या परिप्रेक्षात काळेपांढरे करणे शक्य आहे. सध्याच्या चाचण्या पुरेशा नसतील/ निर्भेळ नसतील. पण त्यात बदल करणे शक्य आहे असं वाटलं. आणि त्यामुळे हा सिनेमा क्राईम थ्रिलर असाच वाटला. मनोविकार/ दुर्दैवी बाजू सापडण्यात मी कमी पडलो. उकल होता होता त्यांची गणना व्हिलन मध्ये होत गेली आणि उरलासुरला मनोविकार तोंडी लावयला राहिला.

अशा केसेस मध्ये शंभरात एकाला शिक्षेत अशी भरघोस सूट मिळू शकते, कारण हा साईड इफेक्ट सिद्ध ... रादर ज्युरी/ जजला पटवण्यात ते यशस्वी ठरतात. इथे थंड डोक्याने योजना आखताना, त्यातून वाचण्याची इतकी धूसर शक्यता असताना शारीरिक/ मानसिक/ आर्थिक गरजा पूर्ण करायला कोणी फर्स्ट डिग्री मर्डर का करेल? त्यापेक्षा अनेक प्रकारे त्या तीनही गरजा मला वाटतं सहज पूर्ण होऊ शकल्या असत्या.

>>> त्यातून वाचण्याची इतकी धूसर शक्यता असताना शारीरिक/ मानसिक/ आर्थिक गरजा पूर्ण करायला कोणी फर्स्ट डिग्री मर्डर का करेल?
सुरुवातीला गाडीतरी का ठोकते ती? वाचण्याच्या शक्यतेवर गॅम्बल तिथेच सुरू होतं. मर्डरसाठी तिला मेडिकल एक्स्पर्टच्या साक्षीची हमीच असते ना उलट!

>>> त्यातून वाचण्याची इतकी धूसर शक्यता असताना शारीरिक/ मानसिक/ आर्थिक गरजा पूर्ण करायला कोणी फर्स्ट डिग्री मर्डर का करेल?
सुरुवातीला गाडीतरी का ठोकते ती? वाचण्याच्या शक्यतेवर गॅम्बल तिथेच सुरू होतं. मर्डरसाठी तिला मेडिकल सपोर्टची हमीच असते ना उलट!

हो हो! ते राहिलं लिहायचं. गाडी ठोकणे मध्ये तर कॅलक्युलेटेड काही असूच शकत नाही. रादर तसं आहे याचा मागमूस मला तरी दिसलेला आठवत नाही. का? गँबल का? थंड डोक्याने प्लॅन करतात गॅंबल का करते ती?
साक्षीची हमी .... उम्म्म! कोर्टात हजारात एक शक्यता ही हमी? आय डोंट नो! आणि डाउनसाईड चं काय? पन्नास वर्षे विदाऊट परोल? आणि मिळणार काय तर पार्टनर/ पैसे. ते तसेच नसते मिळाले का?

अमित, ह्या मुळेच मला 'खूप काही आवडला नाही' असे मी माझ्या परिचयात लिहिले होते. स्वातीने जी बाजू लिहिली आहे, ती तितकी स्पष्ट दिसली नाही, शिवाय सायकॉलॉजी पेक्षा थ्रिलर वर भर दिसला. कॅथरीनचा निगेटिव्ह रोलही नीट एस्टॅब्लिश केलाय असं वाटलं नाही. दुर्दैवी बाजूची मांडणी व्हेग किंवा मोघम वाटली. अजून खणखणीत करता आली असती असं चित्रपट बघून झाल्यावर वाटलं. पण हा २०१३ चा आहे, तेव्हा कदाचित हा त्या प्रकारचा पहिलाच सिनेमा ठरला असेलही. आता प्रेक्षक म्हणून बारा वर्षे पुढे आलोय आपण.

स्वाती, समजलं पण ते तितकं बघताना पोचलं नाही. पण तू रेको देणं बंद करू नकोस. Happy

>>> शिवाय सायकॉलॉजी पेक्षा थ्रिलर वर भर दिसला.
होय, हे खरं आहे. Happy

>>> पण तू रेको देणं बंद करू नकोस
छे छे, तशी शक्यताच नाही! Proud

>>> साक्षीची हमी .... उम्म्म! कोर्टात हजारात एक शक्यता ही हमी? आय डोंट नो!
अरे असं काय करतोस - दोन डॉक्टरांनी निश्चित केलेलं तिचं डायग्नोसिस आणि औषधांचे कंपनीनेच मान्य केलेले पोटेन्शिअल साइड इफेक्ट्स याच्या अगेन्स्ट कुठला एक्स्पर्ट जाईल? तोच तर 'गेम' आहे ना!

म्हणजे तुम्हाला आवडायलाच हवा असा हट्ट नाही, पण हे म्हणजे काहीही हं श्री! Proud

तो भाग पण गुंडळल्यासारखा/ कनविनिअंट होता का?
त्या दोन डॉक्टरांपैकीच एक डॉक्टर एक्सपर्ट विटनेस कसा काय असू शकतो? त्यात सरळ सरळ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे ना?
आणि कंपनीचा काही लॉयर वगैरे न्हवता का?
असे साईड इफेक्टस टायनेनॉल पासून सगळीकडे असतात. साईड इफेक्ट आहे म्हणजे लगेच फर्स्ट डिग्री मर्डर मधुन सुटका? आणि जी हजारात एकाला होते असं त्यातच दोन तीन वेळा सांगितलं आहे ती बरोबर हिला झाली?
कायद्याचा अभ्यास वगैरे नाही पण पचलं नाही मला.

नाही, कुठलाही एक्सपर्ट आला तरीही दोन निरनिराळ्या डॉक्टर्सनी दोन निरनिराळ्या वेळी केलेलं निदान असतं ना?
टायलेनॉलवर सुइसायडल थॉट्स साइड इफेक्ट म्हणून असतात का!

>>> साईड इफेक्ट आहे म्हणजे लगेच फर्स्ट डिग्री मर्डर मधुन सुटका?
गूगल 'रीझनेबल डाऊट'. Happy

टायनेनॉलवर नाही पण अ‍ॅंटी डिप्रेसंट सगळ्यावरच नसतं का? चटकन शोधलं तर लेस कॉमन साईड इफेक्ट मध्ये दिसले

दुसरा डॉक्टर पहिल्या डॉक्टरला असं हॉलवे संभाषणात गाठून विचारतो, त्याची पण गम्मत वाटली. नंतर तो तिच्या ऑफिस मध्ये जातो पण हिस्ट्रीची देवाणघेवाण करायची स्टॅडर्ड प्रोसेस नसते का? अमेरिकेचे माहित नाही, पण इथे फार्मसीला सुद्धा कुठलं औषध प्रिस्क्राईब झालं आहे आणि ते डिस्पेन्स झालं आहे का नाही इथपर्यंत माहिती असते. डॉक्टरांना तुम्ही रेकॉर्ड शेअर करायची मान्यता दिली की नक्कीच होत असेल.
आता हे कीस पाडणे होऊ लागलंय... पण असे सगळे विचार मनात आल्याने मनोविकार दूर जाऊन, पहिल्या प्रतिक्रियेत लिहिलाय तसा क्राईम थ्रिलर वाटला. तसा तो आवडला.

साईड इफेक्ट आहे म्हणजे लगेच फर्स्ट डिग्री मर्डर मधुन सुटका?
>>>>>

तिने प्रोलॉंग्ड ट्रिटमेंट अपयशी झाल्याचे पुरावे तयार केले होते, इतरांसमोर रडारड, बाथरूममधे जाऊन उलट्या काढणे, बाथरूमच्या प्लॅटफॉर्मवर मुद्दाम दिसेल अशा ठिकाणी औषधं ठेवणं, त्या विषयी बोलत राहणं. पॉईझनस फॉग वगैरे भाषेत डॉक्टरला सांगणं, सेक्स ड्राईव्ह कमी आणि नॉर्मल झाला आहे हे सुद्धा तिने बोलून अधोरेखित केले होते. आणि करूनही Wink

हा असा बिलिव्हेबल ऑरा तयार केल्याने ते 'पॉईझनस फॉग' चे वर्णन पुस्तकात नेमके ह्याच शब्दात आहे हे लक्षात येईपर्यंत ज्यूडला सुद्धा संशय येत नाही तिचा. स्टेजड पर्फॉर्मन्सचा पाठपुरावा घ्यावा लागला तो त्यामुळेच. औषधही क्लिनिकल ट्रायल मधले म्हणजे पुरेसा विदा नसलेले, पेशंटही नीट निदान न झालेला, त्यात तिची गर्लफ्रेंड स्वतः एक थेरपिस्ट म्हणजे तिला यातल्या सगळे लूप होल्स माहिती असणार. त्यामुळे हे एकुण पॅकेज बघता ते कन्विक्शन पोचतेय व्यवस्थित. त्यामुळे थ्रिलर जास्त, कारण प्लॅनिंग व एक्झिक्यूशनवर भर. मनोविकारापेक्षा त्यातल्या ग्रे एरियाचा फायदा घेऊन खून कसा केला आहे यावर फोकस जास्त.

थँक यू, अस्मिता. कारण आणखी वाद घालायला मला सिनेमा परत बघावा लागणार होता. Proud
बराच काळ झाला आहे बघून आणि सगळे डीटेल्स लक्षात नाहीत. हा वापर कसा होऊ शकतो हे मात्र ठसलं होतं. Happy

एनी केस आता परत बघेनच. Happy

कारण आणखी वाद घालायला मला सिनेमा परत बघावा लागणार होता.
>>>> Lol थॅंक्स. अमितला गप्पा मारायला आवडतात दुसरं काही नाही. Wink

Lol

पुरावे, अलाबाय सगळं ठीक आहे पण गाडी ठोकणे आणि खून ही इतकी मोठी रिस्क. का घेतली तर पैसे आणि पार्टनर बदलून मिळवा म्हणून. बरं शेवटी दुसरा डॉक्टर लीलया सगळं उधळून लावतो. इतक्या भुसभुशीत आणि स्वतःचा इतका जास्त सहभाग ठेवून केलेला गुन्हा. बरं सिनेमात शेवट ग्रिम करायचा तर दे लिव्हड हॅपली एव्हर आफ्टर केला. त्यामुळे इत्रिगिंग होणं ही शक्य नाही.
क्लोजर तरी द्यायचं नाही ना!
गप्पा मारायला आवडतात हे तर आहेच! Lol

क्लोजर नसलं की म्हणायचं क्लिफहॅन्गरवर सोडून दिले, दिलं तर असा कसा सुखांत झाला काही विचारप्रवर्तक- "इत्रिगिंग" Lol नाही.

माझं लिहून झाल्याने मी टिवल्याबावल्या करण्याच्या हेतूने टायपोवर हसतेय. 'इत्रिगिंग' क्यूट आहे. 'डेस्पिकेबल मी' मधल्या ग्रू च्या ॲक्सेंट सारखा वाटला.

ता क, टायपो सुधारून माझा जोक 'अनाथ' करू नकोस प्लीज. Happy

थांब आता मी परत बघते सिनेमा आणि मग इंत्रिगिंग काय ते लिहिते. Proud

>>> इतकी मोठी रिस्क. का घेतली तर पैसे आणि पार्टनर बदलून मिळवा म्हणून
याच कारणांसाठी रिस्क घेत आलेत ना लोक बिगिनिंग ऑफ टाइमपासून? Proud
लीलया काय आणि? रुइन होतो की तो ऑल्मोस्ट!

पण तरी थांब. बघते पुन्हा. Proud

संयोजक, घोषणा आवडली. पण मायबोलीवर मायदेशाबरोबर अनेक परदेशस्थ शिळा पण आहेत. त्यांना जागवायचा बेत नाहीये का या मभागौदिला?

हो, तेच तर. आपण पेपरमधे 'अनैतिक संबंधातून खून' अशा बातम्या वाचतच असतो की कायम. सेक्स आणि पैसा हे बऱ्याचदा गुन्ह्यांमागचे मोठे 'ड्राईव्ह' असते. तेथे माणूस एकदम प्राण्यांसारखा हिंस्र होऊन जातो.

पण तरी थांब. बघते पुन्हा. >>> Lol हो, थांबते. मला तरी कुठे बस पकडायची आहे.

मी हा पाहिला आहे असा माझा समज आहे (कदाचित मी सेल्फलखूरिसबुडिंग करतोय). पण तुम्ही नक्की बघितलेले लोक सुद्धा पुन्हा बघणार म्हणताय तर मीही पाहतो.

याच कारणांसाठी रिस्क घेत आलेत ना लोक बिगिनिंग ऑफ टाइमपासून? >>> Lol हो सगळ्या थ्रिलर्स मधे पैसे आणि/किंवा पार्टनर हाच अँगल असेल.

जोक अनाथ करणे ही टर्म फार प्रचंड आवडली आहे Lol

हो! रच्याकने: प्रोग्रॅमिंगच्या पुस्तकांत डँगलिंग पॉईंटर/ रेफरंसला 'अनाथ' एकदम मस्त शब्द आहे. Happy

Pages