चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुमाल.
चित्रपट तर पाहिला नाही अजून कोणता Happy

थोडे विषयांतर….

मी टिवी मालिका अजिबात बघत नाही पण कोणाच्या घरी गेल्यावर त्यांचा टिवी सुरुच असतो, जे दिसते ते पाहावे लागते. हल्लीच लक्षात आले की सगळ्यांचा स्किन टोन खुप वेगळा, थोडा अनैसर्गिक वाटतो. काही मोबाईलमध्ये फोटो काढले की मोबाईल कसे ते फोटो चकाचक करतो, आपले चेहरे गुळगुळीत, गोरेपान दिसतात तसे काहीसे मालिकेत वाटले. आज शुभबिवाह नावाची मालिका २.३० ला सुरु होती. त्यात हिरो, हिरोईन, विलन, त्याची आई सगळे गोरेपान…गोरा रंगही वेगळा, थंड प्रदेशात राहणार्‍या लोकांच्या रंगा सारखा… काय करतात देव जाणे.

काय करतात देव जाणे..
>>>
फिल्टर वापरत असतील.. Insta किंवा snapchat वर असतात तसे..
बाकी मी मालिका गेले १०-१५ वर्षे कुठलीही एका सेकांदासाठीही पाहिली नाही.

फर्स्ट क्लास दाभाडे कोणी पाहिला का?
गर्दी खेचत नाहीये पण बघणारे भावनिक होत छान छान करत आहेत.

>>प्रियदर्शिनीची सुक्ष्मदर्शिनी व्हायची धडपड बघुन why can’t people mind their own business असे वाटले.

साधना, अगदी अगदी. कितीवेळा 'बाई गं तुझा भोचकपण जरा कमी कर' असे मनात येत होते. 'तुला काय करायचंय?' हे तर कितीतरी वेळा Happy

सूक्श्मदर्शिनी स्पॉयलर ---

>>तिला एअरपोर्ट पर्यंत नेतात आणि वाटेत उडवतात बहुतेक. मलाही ते नीट समजले नाही.
पण पोस्ट मर्डर साफसफाई तर घरच्या बाथरुमात केलेली दाखवलंय.

>>ती आली व परत गेली हे लोकांना कळायला हवे असे नम्तरच्या एका संबादात येते.
हो, हे बरोबर.

स्पॉईलर………..,

.

.

जे प्रत्यक्ष घडले ते कसे घडले याबद्दल अवाक्षर न काढता काहीतरी भलते, प्रेक्षकाना वेगळेच लिड देणारे डिटेलात दाखवले. ती सगळ्यांसमोर जाते पण परत तिथे कसे आणतात हे दाखवायला हवे होते. रात्री कधीतरी आणले असावे पण सुक्ष्मदर्शिनीचा पहारा नसल्यामुळे आपल्याला दिसले नाही Happy

सूक्ष्मदर्शिनी स्पॉयलर ---
यात काही प्रसंग मुद्दाम टाकले आहेत. त्यांचा घटनेशी काहीही संबंध नाही.
एवढी पाळत ठेवणारी, जेव्हा एवढ्या मोठ्या टाक्या, कॅन आणले तेव्हा कुठे होती?

Lol
असं कसं
एवढं सूक्ष्मदर्शिनी बिरूद लावायचय तर खडा पहारा नको ठेवायला?

रथम नावाच्या साऊथच्या मूवी मधे हिरो घोड्यावर बसून दगडी भिंतीच्या आरपार जातो हा सीन दाखवला आहे.
घोडा सुद्धा समोर दभिं असून ती फोडायचीच या इराद्याने धडक देतो.
https://youtu.be/vqgllRQANC4?t=7245

प्रूफ (2005)
(Anthony Hopkins, Gwyneth Paltro, Jake Gyllenhaal, Hope Davis)

एका अतिबुद्धिमान गणितज्ञ व त्याच्या मुलीची गोष्ट आहे. दोघेही रूढार्थाने विचित्र, विक्षिप्त व लहरी वाटावेत अशा व्यक्तिरेखा. ॲन्थनी व ग्वेनेथने अप्रतिम काम केले आहे. तो शिकागो विद्यापीठात शिकवत असतो, तीही तेथेच शिकत असते. पण मानसिक आजाराने तो हळूहळू पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होत जातो, ज्याची जाणीव त्याला नसते. घरी बसून वह्याच्या वह्या गणितीय सिद्धता व सूत्रांनी भरवून टाकत असतो. काळवेळ खाणंपिणं ह्याचेही भान त्याला उरत नाही.

त्यात मानसिक आजार कुठला हे नक्की सांगितले नाही पण लक्षणं स्किझोफ्रेनिया सारखी वाटली. ती त्याचीच काळजी घेत बसते व तिच्याही स्वास्थ्यावर, अभ्यासावर व हळूहळू आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो. काही वर्षं दोघांनाही एकमेकांशिवाय कुणी उरत नाही.‌ कारण वेडसर बाबांची काळजी घेणारी तिरसट, अब्सेंट माईन्डेड मुलगी असे इक्वेशन होऊन जाते. बाबांच्या फ्युनरलला गर्दी बघून ती सर्वांना म्हणते, "मला तर माहितीही नव्हते की त्यांना एवढी मित्रमंडळी आहे कारण गेली पाच वर्षे ते आजारी असताना तुमच्यापैकी कुणालाही त्यांना भेटायला आलेले बघितले सुद्धा नाही, म्हणजे ते गेले हे एकाअर्थी बरेच झाले."

मोठी बहिण न्यूयॉर्क मधे राहून यांना थोडीफार आर्थिक मदत करत असते पण दोघी बहिणींमधे प्रचंड बेबनाव असतो. वडील गेल्यावर तर तो अधिकच कुरूप होऊन बाहेर पडतो. जेक हा तिच्या बाबांचा गणिताचा विद्यार्थी जो सध्या PhD करत आहे. तो येऊन सगळ्या वह्या "प्रूफ" ( सिद्धता व सिद्धांत) साठी तपासत जातो, त्यात त्याला एक मोठ्या सूत्राचा शोध लागतो. जो ग्वेनेथने लिहिला आहे. पण तिच्या बहिणीच्या मते तिच्यातही बाबांच्या कौशल्याचीच नाही तर वेडेपणाची लक्षणंही दिसण्याची सुरुवात झाली आहे व ती आता एकटी राहण्यासाठी सक्षम नाही. पण या प्रूफ च्या निमित्ताने ग्वेनेथला पुन्हा मोटिव्हेशन मिळते व तीही तिच्या बाबांच्याच मार्गाने जाण्याचे ठरवते.

मागे एकदा 'प्रतिभावंतांच्या तऱ्हा' धाग्यावर मीच "Intelligence and creativity (together) can cause psychosis" लिहिले होते. त्याची येथे तीव्रतेने आठवण झाली. वडील आणि मुलगी पुष्कळ सारखे आहेत, बुद्धिमान आहेत व समाजात "fit in" होणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना कुणी समजून घेऊ शकत नाही, त्यांचाही काही आग्रह नाही. ते जरा "आपल्याच नादात" गणितावरच्या प्रेमात बुडून गेले आहेत. पण मानसिक आजारात स्वत्व गमावत जाण्याने सगळीकडून गोंधळ निर्माण होतो आहे. त्या गोंधळातच आता तिला वाटा शोधायच्या आहेत. छान आहे सिनेमा, स्वातीने रेको दिला होता. Happy

मी पण हा सध्याच बघितला, आणि आवडला.
ते प्रूफ नक्की कोणाचे यावरचा जो भाग दाखवला आहे तो फार सुंदर आहे. एका हिवाळ्याच्या रात्री अंगात काही लेयर्स न घालता बाप गझिबो मध्ये युरेका मोमेंट अनुभवत त्या गणिताचा, ते सुटण्याचे नवे दार सापडल्याच्या आनंदातिरेकात आहे. ते दोघे ते गणित नंतर सोडवत आहेत, बापाला पाहिलं सुटलं वाटतं आहे. आणि ती सिद्धता मुलीला वाचायला सांगतो न्हवे आग्रहच करतो, आणि मग मुलगी जो सिद्धांत वाचते तो एकूणच प्रसंग, दोघांच्या चेहेऱ्यावरचे झरझरते भाव आणि ते प्रूफ ऐकून आपल्याला त्यात काय आहे याची पूर्ण कल्पना असली तरी हलायला होते.
ग्वेनेथने फार सुंदर काम केलंय. विद्यापीठ परिसर, प्राध्यापक, पोरांचे गीकी जोक्स, फ्युनेरल युलोजी मध्ये केलेले टिपिकल जोक्स. एकदम हुबेहूब परिसर उभा केला आहे.
बाप मुलीचे नाते, उमेदीच्या वयात तीक्ष्ण बुद्धीमान आणि आता मेंदूच्या आजाराने ग्रासलेले पण तो सुवर्णकाळ कदाचित परत येईल, एखादी झुळूक तरी कदाचित येईल अशा दोलायमान अवस्थेत पात्र आणि आपण हेलकावत रहातो. कॅथरीन आणि हेरॉल्ड यांच्यातील अनुबंध फार सुंदर दाखवले आहेत. काळजी, प्रेम, आपुलकी, आदर, हक्क, स्पेस चा आदर, अपेक्षा, त्या पूर्ण न झाल्याने आलेला राग तरीही व्यक्ती म्हणून असलेला ओलावा सगळं मस्त दाखवलं आहे.

How many days have I lost? How can I get back to the place where I started? I'm outside a house, trying to find my way in. But it is locked and the blinds are down, and I've lost the key, and I can't remember what the rooms look like or where I put anything. And if I dare go in inside, I wonder... will I ever be able to find my way out?

बहिण केसांना हेल्दी करायला काही लावायला हिला देते, पण केस हेल्दी व्हायला जिवंत थोडी असतात... हा प्रसंग ही फार मस्त घेतला आहे. लॉजिकल, फिजिकल, मेटा फिजिकल... लेयर्सवर. साँग ऑफ आय (i) .. पण मजेदार आहे. Lol

मला या सिनेमाची स्टोरी कुठेतरी वाचल्या/ऐकल्यासारखी वाटतेय. इथे आधी कुणीतरी लिहिलं असेल किंवा इतरत्र कुठे ऐकली असेल. इंटरेस्टिंग आहे.

ते इंग्रजीत लिहिलेलं आहे त्या भागाचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे तर भिडलेच मला. केअरगिव्हर व पेशंटच्या नात्यावर प्रचंड तणाव येत असतो तोही चांगला दाखवला आहे. त्यात ही दोघंही सारखीच. दोघंही जिनियस दोघंही विक्षिप्त.

'युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो'चा परिसर छान दाखवलाय पण ते मॅथचे डिपार्टमेंट नाहीच म्हणे वेगळा divinity hall नावाचा भाग आहे.

होहोबा कंडिशनर आणि organic chemistry . अगदी अगदी. अशीच वाद घालणारी मंडळी आहेत घरात. Lol

अमित, तू जर The theory of everything पाहिलेला नसशील तर बघ. आवडेल कदाचित. स्टीफन हॉकिंग व त्यांच्या आयुष्यातील प्रसंगावर आहे. त्यांच्या ग्राफवर पूर्णपणे बेतलेला आहे असे म्हणता येणार नाही कारण ते अशक्य आहे पण 'बिट्स ॲन्ड पिसेस' मधे भिडतो हाही सिनेमा.

अस्मिता आणि अमित, तुम्हाला दोघांना हा सिनेमा आवडेल याची जवळपास खात्री होती, तसा तो आवडला हे वाचून मस्त वाटलं. Happy

थिअरी ऑफ एव्हरीथिंग बघतो.
हा सिनेमा बघून झाल्यावर ग्वेनेथचा सर्च केलेला, त्या भांडवलावर गेला आठवडाभर गूगल तिचं घर तिने वणाव्यानंतर कसं २० मिलियन ला विकलं हे परत परत मला सांगतय. आणि म्हणे एआय जग जिंकणार आहे!

Pages