Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/p/1CM1TsoB4v/
छावा रिव्ह्यू
रेकॉर्ड तोडणार वाटते..
छावा पाहिला काल..
छावा पाहिला काल..
नावातच review आहे.. आजपर्यंत पाहिलेला सर्वोत्तम चित्रपट..
फक्त 3 गोष्टी १. उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठी (ज्यांना मराठी इतिहास फारसा माहीत नाही )सर्व पात्रांची एक ओळख 5 मिनिटात दाखवायला हवी होती
२. संगीत: घरचा अभ्यास म्हणून रहमानला पावनखिंड दाखवायला हवा होता
३. रश्मीका: दिसण्यात येसूबाई शोभली पण बोलण्यात थोडी अजून सफाई पाहिजे होती.
विनीत आणि विकी अक्षरशः जगले आहेत भूमिका, त्यांचा अभ्यास अभिनयातून दिसून येतो. बाकी सारे कलाकार तोडीस तोड
छावा चित्रपट तिकीट मिळणे अवघड
छावा चित्रपट तिकीट मिळणे अवघड आहे इथे..
फुल हाऊसफुल चालू आहे.
काही सीन फेसबुकवर लीक झाले आहेत तर काही लोकं स्टेटसला क्लिप ठेवत आहेत त्या बघून अंगावर शहारा येतो..
ते अमुक तमुक कलाकार एखादी भूमिका जगला आहे म्हणतात तसे अगदी अगदी वाटते विकी कौशल बाबत..
ट्रेलरला लोकं नावे ठेवत होती तेव्हाच मी म्हटले होते की चित्रपट हा व्यवसाय आहे. तो आपल्या जागी असणारच... पण त्या पलीकडे विचार करता आपला इतिहास असा भव्य दिव्य स्वरूपात येतोय हे खूप छान वाटत आहे.
थिएटर मध्येच बघा लोक हो..
Vanilla sky
Vanilla sky
टॉम क्रूज, पेनलपी क्रूझ, कॅमरेन डियाझ
विचित्र चित्रपट आहे. मॅट्रिक्स सारखा नाही पण स्वप्न आणि वास्तव यातील त्रिशंकू अवस्थेत सगळेच धुसर झाल्याने काही कळू नये आणि नंतर स्वप्नातल्याच आयुष्याची सवय होऊन तेच आपलंसं वाटायला लागावं अशी काही तरी जाणिवा निद्रिस्त झालेल्या माणसाची गोष्ट आहे असे म्हणता येईल. चित्रपट समजत नाही, प्रत्येकाला वेगवेगळा वाटतो. वेगळाच काही तरी आहे.
टॉम एक उथळ, आत्मकेंद्री, स्वार्थी आणि बेफिकीर वाटावा असा श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा आहे. ज्याला ध्येय नाही. कॅमरेन ही सुद्धा कामानिमित्त ओळखीची होऊन ते एकमेकांसोबत रहायला लागतात, तिला त्याच्याबद्दल प्रेमही वाटायला लागते पण त्याला तिच्याबद्दल कसल्याही भावना नसतात. फक्त एक F$&@- buddy असा तो तिचा उल्लेख करतो. नंतर नव्या एक्झॉटिक दिसणाऱ्या पेनलपीकडे आकर्षित होऊन प्रेमातही पडतो.
ह्याने मत्सर वाटून त्याला सोबत घेऊन कॅमरेन मुद्दाम अपघात घडवून आणते. त्यात ती मरते व हा त्याचा चेहरा, एक पाय व मणक्याचा बराच भागाला मार लागल्याने अक्षरशः आयुष्यातून उठतो. चेहरा कुरूप झाल्याने त्याला नैराश्य येते, औषधांचे व्यसन लागते, एकटेपणा वाढीस लागतो. त्याचा परिणाम स्वभावावर, वागणूकीवर होतो. भांडणं व्हायला लागतात, माणसं दुरावतात. हवे तितके पैसे घ्या पण मला बरं आणि पूर्वीसारखे रूपवान करा असे तो डॉक्टरांच्या टीमला धमकावतो. सगळे हळूहळू सुरळीत होऊन पेनलपीसोबत रहायला लागतो. पण पुन्हा विचित्र भास आभास व्हायला लागतात व पेनलपीच्या जागी कॅमरेन दिसायला लागते. रागाच्या भरात तो तिचाच खून करतो.
तुरुंगात थेरपी सुरू होते, तेथे हळूहळू लक्षात येते की हे सगळंच कदाचित स्वप्न आहे. अपघातानंतरचं का अगदी पहिल्यापासूनच. एक टेक कंपनी क्रायॉनिक झोप व 'ल्युसिड ड्रीम्स' विकत असते. त्याने माणसाच्या वेदना व वास्तवाचे भान जाऊन तो 'लिंबो' अवस्थेत राहील आणि योग्य वेळी परत येईल. ल्युसिड ड्रीम्स म्हणजे अशी स्वप्नं ज्यात तुम्हाला स्वप्नांवर नियंत्रण मिळवल्याचा भ्रम होतो, तुम्हाला माहिती असतं हे कुठेतरी स्वप्न आहे. ती स्वप्नं कधीही दुःस्वप्नांत रूपांतरित होतात. तेवढी नसलेली जाणिवही नेहमीच्या स्वप्नांपेक्षा ह्याला सुषुप्तीत नेते. I don't want to feel myself to numb the pain of just being myself...? बधीर स्वत्व हवं, त्यासाठी लागेल ती तयारी करायची .
सध्या आपण आपल्या जाणिवेपासून दूर जाण्यासाठी मीडिया व मनोरंजनाचा वापर करतो. त्याचंच वेगळं रूप , ज्यात आपण खरंच पूर्णपणे जातो. क्लेशकारक वास्तवापासून 'एस्केप'.... सुटका. बहुतेकांना सुटकाच हवी असते.. काही तासांची. ह्याचाच हव्यास वाढत गेलेल्या मनोरूग्णांना मनापासूनची ...सुटकाच. दीडशे वर्षे क्रायॉनिक झोपेत पडलेले हे स्वप्नच आहे, जे कदाचित अपघातानंतरच सुरू झालेय. किंवा पहिल्या स्वप्नापासून ज्यात गजबजलेल्या न्यूयॉर्क शहरात तो एकटाच आहे. एकही माणूस नाही, जणू पूर्ण पृथ्वीवर तो एकटाच आहे. सगळे रस्ते रिकामे. आतून बाहेरून रिक्त. शेवट 'ओपन टू इंटरप्रिटेशन' म्हणता येईल पण मला सुरवातीपासूनच तो 'ओपन टू इंटरप्रिटेशन' वाटला. इतका ओपन की प्रेक्षकांनाच दिशाहीन वाटायला लागावं आणि ती हरवलेली त्रिशंकू अवस्था जगता यावी. भ्रम...!
रोमॅन्टिक दृश्य अतिशय सुंदर आहेत. पेनलपी व टॉम फारच प्रेमात वाटतात. त्यामुळे वेडाच्या भरात तो तिचा खून करतो हे बघून आपलाच जीव तुटतो. तिच्याशिवाय दुसरा आनंदच नसतो, तिचीच चित्र काढत असतो, तिलाच बघत असतो, ती सगळीकडे व्यापून उरली असते फक्त त्याच्यासाठी. ती जिवंतही असेल कारण हे स्वप्नच आहे पण तो हे स्वप्न बघतोय म्हणजे ते एकत्र नाहीत आणि त्यामुळे तोही संपल्यासारखाच आहे. स्वप्न, जागृती, चेतना तिन्ही वेगवेगळ्या उरल्याच नाहीत व एक दैवी वाटावं असं 'व्हनिला स्काय' मागे दिसत आहे. त्यातच स्वप्नातून जागं होण्यासाठी तो उंच इमारती वरून खाली उडी मारतो व डोळे उघडतो.
इंटरेस्टिंग वाटतोय. हा बघायचा
इंटरेस्टिंग वाटतोय. हा बघायचा राहिलाय.
Btw, नेटफ्लिक्स वर धूमधाम नावाचा पिक्चर आलाय तो धमाल आहे. एकदम एन्टरटेनर ! फास्ट मूव्ही आहे. यामी आणि प्रतीक यांनी मस्त कामं केली आहेत. छान टाईमपास झाला.
खूप रेकोज दिसताहेत.
खूप रेकोज दिसताहेत. प्रवासात असल्याने वेळ झाला नाही.
जरा अर्जंट काम आहे. कुणी स्टोरीटेलर बघितला असेल तर कसा वाटला सांगा. मुकेश माचकर आणि आणखी दोन तीन रेकोज मुळे बघावासा वाटतोय पण हॉटस्टारचं सबस्क्रीप्शन नाही. इथे वाचून सबस्क्राईब करायचा विचार आहे.
( सत्यजित राय यांची कथा, परेश रावल मु भू, अनंतर महादेवन दिग्दर्शन, सत्यजित राय यांच्या मुलाची निर्मिती)
व्हनिला स्कायबद्दल कुठेतरी
व्हनिला स्कायबद्दल कुठेतरी वाचलं होतं. आता बघितला पाहिजे.
बाय द वे, छावाचे शो हाऊसफुल आहेत. काल नेमकं तिकीट मिळत होतं तेव्हा मुलगी बरोबर होती, १६+ A मुव्ही असल्याने काढली नाहीत. सोमवारची मिळाली आहेत.
१६+ A मुव्ही असल्याने >>>
१६+ A मुव्ही असल्याने >>> ओह.. वयोमर्यादा आहे का चित्रपटाला.. मुलाना सोडतात ना आत थिएटरमध्ये? मुलांनीच नाही पाहिला तर काय अर्थ..
म्हणून घरी कल्पना दिली आहे याची.
बरेच परीक्षणात वाचत आहे की शेवटी संभाजी महाराजांचा छळ झालेला सुद्धा पडद्यावर दाखवला आहे जो बघताना...
धुम धाम टाइमपास आहे, वन टाइम
धुम धाम टाइमपास आहे, वन टाइम वॉच! धर साहेबानी बायकोला हिरो केलय.
पाच सात वर्षांची आणि काही
पाच सात वर्षांची आणि काही मांडीवर खेळणारी मुले होती 14 फेब्रुवारी च्या 9.30 च्या छावा शोला.
विशेष म्हणजे इतकी लहान मुले सुद्धा अगदी समरसून आणि शांतपणे चित्रपट बघत होती. नेमका शेजारी बसलेला एक #$#$# जवळपास अर्धा पाऊण तास फोनवर बोलत होता. basic civic सेन्स नाही. कंटाळून जाऊन शेवटी काही न बोलता रागाने पाहिलं त्याच्याकडे तेव्हा ठेवला फोन.
रक्तपात फारसा नाही, म्हणजे अगदीच भीतीदायक नाही. पण तो टॉर्चर बघणं सहन होत नाही कुणालाच.
बाकी छावा सारख्या चित्रपटाला
बाकी छावा सारख्या चित्रपटाला मायबोलीवर इतका थंड प्रतिसाद बघून जरा आश्चर्य वाटतंय.
बाकी छावा सारख्या चित्रपटाला
बाकी छावा सारख्या चित्रपटाला मायबोलीवर इतका थंड प्रतिसाद बघून जरा आश्चर्य वाटतंय.
बाकी छावा सारख्या चित्रपटाला
बाकी छावा सारख्या चित्रपटाला मायबोलीवर इतका थंड प्रतिसाद बघून जरा आश्चर्य वाटतंय
+७८६
कदाचित दोनच दिवस झाले म्हणून असेल.
पण फेसबुक उघडले की दर दुसरी पोस्ट छावा बाबत येत आहे. इथे कोणी पाहिला असेल तर प्लीज नवीन धागा काढा. मलाच वाटत आहे की एवढी परीक्षणे वाचलीत कालपासून त्यातील निवडक वाक्ये उचलून इथे नवा धागा काढून शेअर करावीत.
बाकी छावा सारख्या चित्रपटाला
काल धूम धाम पाहिला.
छान आहे. वेगवान आहे. मनोरंजक आहे. नक्कीच van टाईम वाच आहे. यामी नेहमी आवडतेच.. तिच्या भूमिका नेहमी लीडला असतात हे देखील आवडते.
धूमधाम बद्दल चांगले reviews
धूमधाम बद्दल चांगले reviews ऐकतेय . बघते.
Vanilla Sky टॉमसाठी बघितलाय.
धूम धाम -> मस्त आहे. खुप
धूम धाम -> मस्त आहे. खुप दिवसानी मजा आली हिन्दी सिनेमा बघताना. धमाल आहे.
धूम धाम इथला रेको वाचून सुरू
धूम धाम इथला रेको वाचून सुरू केला. धमाल आहे.
धूमधाम मस्तं आहे ... प्रतिक
धूमधाम मस्तं आहे ... प्रतिक गांधी एकदम ग्रेट... एकदा बघण्यासारखा , हल्का फुलका आहे
छावा सारख्या चित्रपटाला
छावा सारख्या चित्रपटाला मायबोलीवर इतका थंड प्रतिसाद बघून जरा आश्चर्य वाटतंय>>> ट्रेलर कसा वाटला बाफ वर माबोकरांनी निकाल आधीच ठरवून टाकला आहे

मी लोकसत्ता मधे "जबरदस्त" वगैरे रीव्ह्यू वाचला पण त्यात रहमान ची गाणीही उत्कृष्ट असे वाचल्यावर मग बाकीचा सर्व रीव्ह्यू माझ्यासाठी बाद झाला . आता वैचारिक कंपू पैकी कुणी काय म्हणतंय वाट पहाते आहे
अरे व्वा, सर्वांचाच 'धुमधाम
'छावा' वरच्या ट्रेलर धाग्यावरच्या पोस्टी वाचून,
ट्रेलर व गाणी बघून उत्सुकतेचा सर्वनाश झाला आहे. नंतर वाटले तर बघेन. ऐतिहासिक चित्रपटांचा धसका घेतला आहे असाही.
रमड,
तो 'कंज्युरिंग कन्नपम' सबटायटल्ससहित बघितला. छान टाईमपास आहे. काही ठिकाणी फिसकन हसू आले आणि काही भीतीदायक प्रसंगही आवडले.
'टू वीक्स नोटीस' हा ह्यू ग्रंट आणि सॅन्ड्रा बुलकचा सिनेमा पाहिला. रोमॅन्टिक कॉमेडी आहे. ह्यू ग्रंट हा ब्रिटिश सलमान वाटतो, फार काही टॅलेन्टेड नाही. कामही आव्हानात्मक घेत नाही कधी. सॅन्ड्रा बुलकचा अभिनय आवडतो, मन लावून काम करते. हलकाफुलका टाईमपास आहे. अतिश्रीमंत माणूस आणि त्याची वकील यांच्या नात्यावर. वन टाईम वॉच. नेटफ्लिक्सवर आहे.
धन्यवाद माझेमन आणि रमड.
>>काल धूम धाम पाहिला. छान आहे
>>काल धूम धाम पाहिला. छान आहे. वेगवान आहे. <<
सिनेमाचं नांव "भागम भाग" हवं. बाकि, बर्याच दिवसांनंतर केनाइनला मध्यवर्ति भूमिका मिळाली आहे...
आता वैचारिक कंपू पैकी कुणी
आता वैचारिक कंपू पैकी कुणी काय म्हणतंय वाट पहाते आहे >>>
याची खास नोंद 
अस्मिता - व्हॅनिला स्काय चा रिव्यू आवडला. जेव्हा रिलीज झाला तेव्हा, किंवा नंतर कधी कोठे स्ट्रीमिंगवर दिसला असेल तर काही माइण्ड कंट्रोल स्काय फाय आहे म्हणून कंटाळा केला असेल बघायचा. आता हे डिटेलिंग वाचून बघण्यात इंटरेस्ट आहे. सध्या कोठे मिळेल बघायला?
छावा तुफान चालेल असे दिसते. मी त्याचा ट्रेलर व इतर दोन-तीन क्लिप्स पाहिल्याने माझे फेबु पान व यू ट्यूब दुथडी भरून वाहात आहे त्याबद्दलच्या पोस्ट्स व क्लिप्सने.
मी काल धूम धाम ऑल्मोस्ट लावला होता. पण नेफिवर भारत-पाक सिरीज वर वेब सिरीज आल्याने पहिला प्रेफरन्स त्याला. त्याबद्दल तिकडे लिहीतो.
फा, नक्की पहा धूमधाम. मस्त
फा, नक्की पहा धूमधाम. मस्त टाईमपास आहे.
अस्मिता, पोच मिळाली
पाहिला एकदाचा धूम धाम.
पाहिला एकदाचा धूम धाम.
सलग पाहता आला असता तर अजून मजा आली असती. डोंगररांगांमुळे रेंज अधून मधून जात असल्याने खंड पडत होता.
अजिबातच कल्पना येत नाही कथानकाची. एकदम फ्रेश आहे.
छावा पाहिला.
छावा पाहिला.
फारशा अपेक्षा नव्हत्या त्यामुळे निराशा अजिबात झाली नाही.
लक्ष्मण उतेकर नावाच्या मूर्ख माणसावर फुली मारण्यात आली आहे.
नेहमीप्रमाणे पात्रे छान इस्त्री केलेले कपडे, आधुनिक पद्धतीच्या एकदम नव्या कोर फॅक्टरी मधून काढलेल्या पगड्या, गळ्यात अतिशय उंची दागदागिने घालून मस्त नटून थटून आलेले. संगीत तर अतिशय बेकार. तलवारबाज्या, action सीन तर काय विचारू नका. अजिबात ऑथेन्टिसिटी नाही, का नावीन्य नाही. संभाजी तर चक्क उडताना दाखवला आहे. गदायुद्ध? आवरा आवरा.
शेवटचे वीस मिनिट शेवटचे वीस मिनिट वगैरे फारच कौतुक चालले होते पण चक्क शोले चित्रपटासारखे संभाजीला अगदी मैदानावर बांधून ठेवतात. आमच्या ६ वर्षांच्या भाच्याला सुद्धा ते हास्यास्पद वाटेल. आपले ९ ९ टक्के पब्लिकशी कधीही जुळू शकत नाही हे जाणवून मला वाईट मात्र वाटत आहे.
व्हॅनिला स्काय >>> वेगळाच
व्हॅनिला स्काय >>> वेगळाच काही तरी आहे

म्हणजे आवडला की नाही पण?
हा एका स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक आहे - मूळ सिनेमाच्या नावाचा अर्थ 'ओपन युअर आइज' असा आहे. मला जर बरोबर आठवत असेल तर तो त्या 'ल्यूसिड ड्रीम्स'चा लोगो आहे.

सिनेमा तू म्हणतेस तसा वास्तव आणि कल्पिताच्या मधल्या धूसर सीमारेषेवर चालत राहातो - अतीशय परिणामकारकरीत्या. मला तो बारमधला प्रसंग - जिथे ल्यूसिड ड्रीम्सचा माणूस टॉमला you create your own world हे समजावून सांगतो तो प्रसंग फार आवडतो. गोष्टीतला तो मेमरी स्प्लिंट वगैरे कल्पित भाग वगळला तर हे खरंच अंतिम सत्य आहे. आजूबाजूला जे अस्तित्चात आहे/ घडत आहे त्यातून 'आपलं जग' आपणच कार्व्ह आऊट करत असतो. असं म्हणू की त्यापैकी कशाकशाला आपण आपल्या हेडस्पेसमध्ये जागा करून देतो तसंतसं 'आपलं जग' आकार घेतं.
टॉम क्रूझच्या एरवीच्या चॉकलेट इमेजला मोठा वळसा घालून जातो हा रोल आणि त्याने खरंच सुंदर केला आहे! सगळ्यांचीच कामं मस्त आहेत. हा सिनेमा ओपन टु इन्टरप्रिटेशन्स तर आहेच, पण एकूणच ज्या कलाकृतींमध्ये प्रत्येकवेळी काहीतरी नवीन सापडतं असं वाटतं - त्यातलं आणि आपल्यातलंही, त्या आवडतात!
मला पेनेलोपी म्हणते ते 'आय विल टेल यू इन द नेक्स्ट लाइफ, व्हेन वी आर बोथ कॅट्स'ही भयंकर आवडलं होतं!
>>> आता हे डिटेलिंग वाचून बघण्यात इंटरेस्ट आहे. सध्या कोठे मिळेल बघायला?
घ्या! आता मी सगळे रेकोज व्हाया अस्मिताच देणार आहे. तिचे दोन रुपये तिलाच कमिशन म्हणून द्यावे लागणार.
Open your eyes. पहिला आहे ...
Open your eyes. पहिला आहे ...
वाणीला स्काय माहित नव्हता...
आपले ९ ९ टक्के पब्लिकशी कधीही
आपले ९ ९ टक्के पब्लिकशी कधीही जुळू शकत नाही हे जाणवून मला वाईट मात्र वाटत आहे.
>>> फील सॉरी फॉर यू ...
घ्या! आता मी सगळे रेकोज
घ्या! आता मी सगळे रेकोज व्हाया अस्मिताच देणार आहे. तिचे दोन रुपये तिलाच कमिशन म्हणून द्यावे लागणार >>>
तू ही लिहीले आहेस व्हॅनिला स्काय बद्दल? मला जाम आठवत नाही. कोठेतरी चर्चेत उल्लेख होता इतकेच आठवत आहे. इतके लक्षात होते की परवा बिगेलो या कंपनीचा "व्हॅनिला चाय" म्हणून चहाचा फ्लेवर दिसला तेव्हाही तीच चर्चा आठवली होती 
अरे पण आहे कोठे हा पिक्चर? आयपीटीव्ही सोडून काहीही सांगा
>>> तू ही लिहीले आहेस
>>> तू ही लिहीले आहेस व्हॅनिला स्काय बद्दल? मला जाम आठवत नाही. कोठेतरी चर्चेत उल्लेख होता इतकेच आठवत आहे
टीपापात लिहिलं होतं.
प्राइमवर रेन्ट किंवा बाय करता येईल.
Pages