चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपरबॉईज ऑफ मालेगाव - अ‍ॅमेझॉन प्राइम. मस्त पिक्चर आहे. नुकताच छावा मधे बघितलेला विनीत कुमार सोडला तर बाकीचे चेहरे माहीत नसलेले पण कोठेतरी पाहिलेले कलाकार आहेत. याच्या कथेचा संदर्भ "सुपरमॅन ऑफ मालेगाव" या डॉक्युमेण्टरीशी आहे. ती मी पाहिलेली नाही पण माहिती वाचल्यावर लक्षात आले की त्यातल्या फिल्ममेकिंगचीच ही कथा दिसते.

मालेगावमधले काही हौशी कलाकार लोकप्रिय चित्रपटांचे स्थानिक स्पूफ व्हर्जन बनवतात यावर व त्यातल्या एका स्पेसिफिक कलाकाराबद्दल हा चित्रपट आहे. चांगला आहे. रेको माझ्याकडून.

ज्वेल थिफ पहायचा विचार नव्हताच, तरीही सांगितल्याबद्दल थँक्स प्राजक्ता.

‘मालेगाव’ मस्त आहे. थोडाच राहिलाय पहायचा.

मी थोडा वेळ पहात होते ज्वेल थीफ. भयानक बोअर आहे. सगळे क्लीशे. काहीही नविन नाही. बंद केला मग थोड्या वेळाने.

'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' चा रेको घेतला होताच फा. त्यातली मुस्कान जाफ्री 'फेम गेम' मधे माधुरी दीक्षितची मुलगी होती व शशांक अरोरा 'मेड इन हेवन' मधे होता. बाकीचे मलाही माहीत नाहीत. डॉक्युमेंटरी बद्दल काहीही कल्पना नाही.

'सिनर्स'वरच्या पोस्टी आवडल्या. धनिची पोस्ट इंटरेस्टींग वाटली. कॉटन प्लॅन्टेशन वगैरे आहे म्हणजे हॉरर असूनही कथा चांगली दिसतेय.

--------
'ज्युल थीफ' महाबंडल आहे. मलाही आवडला नाही. वरच्या सगळ्यांना मम. ती वाणी कपूरची डुप्लिकेट 'घरत गणपती' मधे होती. यात ती फारच नकली बाहुली वाटतेय. अहलावत विकृत चित्रकार आहे. छंद म्हणून चित्र काढतो, व्यवसाय म्हणून मुडदे पाडतो. त्याच मुडद्यांच्या रक्ताचे 'मॉडर्न आर्ट' प्रकाराचे पेंटिंग काढतो, जे एरव्हीही आपल्याला कळत नाही. त्यात रक्त असल्याने वेगळे काय कळणार आहे. त्यापेक्षा वेलकम मधे अनिल कपूर घोड्यावर गाढव बसलेलं चित्र काढतो त्यात वैचारिक स्पष्टता दिसते. Wink

चित्रपटाचे पूर्ण पॅकेजिंग बेगडी आहे. भडक सादरीकरण आहे. सैफ अली खान व जयदीप दोघेही वजन कमी केल्यासारखे वाटले. जयदीप is bringing back the sex appeal I guess..! तेवढं सोडून सगळं नकली आहे. सैफची हेअर लाईन कपाळावर वानरसेनेटाईप चिकटवल्यासारखी दिसत होती.‌

शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन बघून टडोपाच झाले का तो भारतीय होता काय माहीत. अर्धवट बघून सोडून दिला. जयदीप सैफला धमकी देऊन आफ्रिकन 'रेड सन' म्हणजे त्यांचा कोहिनूर की कायकी म्यूझियम मधून चोरायला भाग पाडतो. कुलभूषण बाबा डॉक्टर असून कुठेतरी वेड्यावाकड्या सह्या करून स्वतःला संकटात टाकतात. त्यांच्यासाठी सैफ ही चोरी करायला तरफडतो. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चोरीचे प्लॅनिंग सगळे जयदीपच्या घरी होते. तोवर सैफ त्याच्या घरी रहायला येतो व हॉट बायकोशी 'नैनमटक्का' सुरू. सगळ्या बॉडीगार्ड समोर लपत झाडामागे वगैरे. कोण गुंड एवढा भाबडा असेल बरं..! त्यामुळे जयदीपचे आधीचे खतरनाक किलर 'बिल्ड अप' लयाला गेले. एकही गोष्ट पटली नाही. चीप व्हिडिओगेम पेक्षाही फसलेला गेम पहातोय असं वाटत राहतं. झालं, अजून किती नावं ठेवू आता..! Happy

शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन बघून टडोपाच झाले का तो भारतीय होता काय माहीत >>>
Lol परंपरा आहे ती बॉलिवूडची! जर शेट्टी चिनी माणूस म्हणून आपण मान्य करू शकतो तर हा चिनी डॉन का नको? Proud
संदर्भ -
https://youtu.be/uv1rugzgDR4?si=Rymf04CoOKYSD2uF&t=5582

रिव्ह्यू खतरा आहे, अस्मिता! Lol

डॉनचा अड्डा म्हणून ग्रिफिथ ऑब्झरवेटरीचे शॉट्स घेतलेत....शेवटी स्पेशल इफेक्ट ने उडवल पण मेल्यानी!! याचा खुपच निषेध..
जयदिपने हातिरामन नतर हा व्हिलन साकारुन उगाच ग्राफ दाबुन खाली आणलाय ..शेवटच्या डान्स मधे जयदिपला अगदी काही सेकन्दच मिळालेत पण लोकानी सोमिवर तेच उचलुन धरलेत..

रमड, तुझ्याकडे काय जिनी वगैरे आहे की काय, संदर्भ फारच चपखल आहे. Lol

ग्रिफिथ ऑब्झरवेटरीचे >>> काय निरीक्षण आहे प्राजक्ता. मी ग्रिफिथ ऑब्झरवेटरी पाहिली आहे पण पिक्चर ती येईस्तोवर बंद केला. ब्रेन फॉग होऊ लागला. Happy

ग्रिफिथ ऑब्झरवेटरीचे शॉट्स घेतलेत....शेवटी स्पेशल इफेक्ट ने उडवल पण >>> णिषेध!! आमच्या ग्रिफिथला असं करतात Angry

जिनी वगैरे आहे की काय, संदर्भ फारच चपखल आहे >>> _/\_ Lol

तुझ्याकडे काय जिनी वगैरे आहे की काय, संदर्भ फारच चपखल आहे.>>> फा आणी रमडला बरोब्बर हे सदर्भ आठवतात तरी हा मुव्हि बराच जुना आहे त्यातल आठ्वल म्हणजे दन्डवतच घे तु आता!!
असा व्यासन्ग हवा!

त्याच मुडद्यांच्या रक्ताचे 'मॉडर्न आर्ट' प्रकाराचे पेंटिंग काढतो, जे एरव्हीही आपल्याला कळत नाही. त्यात रक्त असल्याने वेगळे काय कळणार आहे. त्यापेक्षा वेलकम मधे अनिल कपूर घोड्यावर गाढव बसलेलं चित्र काढतो त्यात वैचारिक स्पष्टता दिसते.
>>>> Lol

डिअर डॅड - प्राइम. हिंदी पाहिला. तमिळही असावा.
अरविंद स्वामी - नितीन स्वामीनाथन आणि त्याचा टीन एज मध्ये पाउल टाकणारा मुलगा शिवम यांची गोष्ट.
सुरुवात नितीनच्या केजी किंवा पहिली दुसरीत असलेल्या मुलीच्या गोड गोड बोलण्याने आणि करामतींनी.
शिवमच्या शाळेची सुटी संपली आहे आणि तो पुन्हा बोर्डिंग स्कूल मध्ये जायचाय. बाप म्हणतो मी तुला सोडतो. मुलाला मित्रांसोबत मजा करत जायचं असतं. वाटेत नितीनच्या आईवडिलांचं घर. तिथे जेवायला थांबतात. नितीनचे वडील व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत. नितीन त्यांना काही सांगत असताना शिवम ते ऐकतो आणि त्याच्या मनात बापाबद्दल चीड, फसवणूक अशा अनेक भावना उफाळून येतात. नितीनला ही गोष्ट शिवमलाही सांगायचीच असते. त्यासाठीच त्याने रोड ट्रिपचा बेत आखलेला असतो. हे काय, कसं आहे , पुढे काय, ते नितीन शिवमला सांगतो. तो धुमसत असतोच.
वाटेत लँडस्लाइडमुळे रस्ता बंद. रात्री एका कॉटेज होममध्ये राहावं लागतं. शिवमचे शाळकरी मित्रही तिथे असतात.
आपल्याला कळलेली गोष्ट शिवम एका मित्राला सांगतो. तो त्याला बंगाली बाबांचा सल्ला घेऊया असे सुचवतो. बंगाली बाबाही कॉटजेमध्येच असतो. त्याच्या स्टाफच्या हातावर पॉटर वर्ल्ड मधल्या डार्क विझार्डच्या हातावर असतात तसा टॅटू ही ओळखीची खूण.
बंगाली बाबा, आयुर्वेद संस्कृती टाइप काहीतरी बोलतो. पावडरचं पॅकेट. रोज एक चमचा ग्लासभर पाण्यातून. पण शिवम रोज एक चमचाभर पूड द्यायला कुठून येणार? म्हणून सगळी पूड पाण्याच्या बाटलीत एकदमच रिती करतो. ते पाणी प्याल्यावर नितीनचं पोट दुखू लागतं, तर तोच स्टाफ आयुर्वेदिक औषद देतो.
दुसर्‍या दिवशी शिवम बापाला न भेटता - फक्त पाहून - मित्रांसोबत बोर्डिंग स्कूलला निघून जातो.

मग सरळ सहा महिन्यांनी शिवमच्या शाळेत प्राइज डिस्ट्रिब्युशन . तो गणितात पहिला आला त्याची ट्रॉफी. चीअर करायला बाप हजर. मध्ये काहीच झालं नाही, असं दोघे बोलू वागतात. आधीपेक्षा आणखी जवळ येतात. मित्र बनतात. आईही आपल्या होणार्‍या नव्या जोडीदारासोबत आलेली असते.

काय खटकलं
धाकटी टिपिकल गोड आगाऊ मुलगी.
बायकोचा मुलांशीही तुटकपणा.
रोड ट्रिप सुरू होईतो पोरं बापाला अप्पा म्हणतात. मग डॅड की पापा असं काहीतरी. तमिळमधून हिंदीत डब करताना किंवा रिशूट करताना विसरले. डब केलाय असं वाटत नाही.
नितीनने त्याच्या बापाला जे सांगितलं ते आईला सांगितलंय की नाही , कळत नाही.
फोनवर क्रिकेट मॅच बघणारी पोरं डेबोनेरचा स्टॉक घेऊन येतात.
शाळेत शिवम खेरीज सगळ्यां मुलांना बंगाली बाबा हा प्रकार माहीत असतो.
बापाच्या समस्येबद्दल गुगल करून माहिती घेणारा मुलगा बंगाली बाबाचा उपाय करायला तयार होतो.
सहा महिन्यांत त्याचं मन बापाबद्दल का, कसं निवळलं हे दाखवतच नाहीत.
वाटेत भेटलेला रियलिटी शो स्टार वयाने बराच मोठा वाटतो. आजकालचे स्टार्स पाहता. तो त्या वयाचा आणि असे स्टार्स वाटतात, त्यापेक्षा मॅच्युअर असणं ही कथेची गरज. शेवटी त्याला पण त्याच्या डिअर डॅडची आठवण येते.
हेड मिस्ट्रेस नितीनवर लाइन मारते.
शेवटी शिवमला I am proud of my dad असं म्हणता यावं म्हणून एक प्रसंग ओढून ताणून रचलाय.

खटकलं नाही, पण तमिळमध्ये हे लोक तमिळनाडूत राहत असावेत. हिंदी करताना दिल्ली मसुरी अशी नावं टाकलीत. तो निसर्ग, रस्ते घरं काही उत्तर भारतातले वाटत नाहीत. नितीन स्वामीनाथन म्हटलंय तर गावांची नावंही तीच ठेवायची.

काय आवडलं किंवा पाहिला तर कशासाठी पहावा? अरविंद स्वामी. अरविंद स्वामी आणि अरविंद स्वामी. अभिनय, संवादफेक, व्यक्तिमत्त्व , बॉडी लँग्वेज. त्याची मिशी खुरटलेली ठेवली आहे आणि त्यावर संवादही आहे.
शिवमचा अभिनय. त्याला नुकतंच फुटत असलेलं मिसरूड.
नितीनचं जे काही आहे, त्याबद्दलचे प्रसंग आणि संवाद फार सहज आणि पटण्याजोगे आलेत.

मी कुठेतरी अर्धवट review ऐकून जयदीपसाठी jewel thief लावला. चांगला आहे म्हणून घरच्यां ही बघायला बसवलं. मलाच कंटाळा आला.कैच्याकै वैताग आहे. किती ते योगायोग.
माझा लेक मात्र, मातेचा शब्द कसा काय टाळायचा , म्हणून अगदी मन लावून बघत होता. आणि मी काही शंका विचारल्या की तू नीट लक्ष देत नाहीस म्हणायचा.
"समजा passwod type करताना मी मध्ये एक दोन चुकीचे letters टाकले आणि backspace केलं असतं तर त्याने कसा शोधला असता password ? "
बाकी अस्मिता ला अनुमोदन.

शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन बघून टडोपाच झाले
>>
मै खिलाडी तू अनाडी मधला जपानी सैफ आठवला

यापेक्षा पुष्पा 2 बरा
त्यातले जपानी लोक जपानीच बोलतात
कहर म्हणजे पुष्पा पण 30 दिवसात कंटेनर च्या अंधारात पुस्तक वाचून अस्खलित जपानी बोलायला शिकतो... पण तो पुष्पा असल्याने त्याला सगळेच गुन्हे माफ असल्यामुळे हे ही माफ...

शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन >> नेपाळी आहे तो Lol Lol

मी पूर्ण केला ज्वेल थीफ. एकदा बघायला ठीक वाटला. आजकाल असेच फॉर्म्युला पिक्चर जास्ती येत आहेत. म्हणजे कमी पैश्यात कमी कामात पटकन प्रॉडक्ट बनवायचे. जसे बाकीचे प्रॉडक्ट सब स्टँडर्ड झालेत तसे आता पिक्चर पण

मला आज हे 'ज्यूल थीफ' वरचे मीम आले. -
They found an Abbas-Mustan script under a pile of VHS tapes and gave it a 2025 remix no one asked for..!

नेपाळी आहे का?? पण मग स्टिरिओटिपिकल गुरखा ॲक्सेंट पण नव्हते. Happy फॉर्म्युला बद्द्ल सहमत, चक्क टेम्प्लेट केले आहे.

नेटफ्लिक्सचे स्वतःचे चित्रपट सहसा चांगले नसतात, घाईघाईने उरकल्यासारखे मशीन मधून काढल्यासारखे वेगवेगळ्या जॉन्राचे अल्गोरिदम बनवून ठेवलेले वाटतात. डाव्या कोपऱ्यात N दिसले की कितीही चांगले कलाकार असो, मन साशंक होते. थोडे वेगळ्या प्रकारचे 'बालाजी टेलिफिल्म्स' वाटते. ढुढूक ढुढूक ढुढूक ढुढूक..! Happy

बाकीचे मलाही माहीत नाहीत >>> आदर्श गौरव (पिक्चर बनवणारा - दिग्दर्शक ई) सारखा कोठेतरी पाहिला आहे असे वाटत होते. तो "द व्हाइट टायगर" मधे होता असे सापडले. राजकुमार राव आणि प्रियांका चोप्राबरोबर. त्यांच्या ग्रूपमधला अजून एक जण इतरत्र पाहिला आहे. पण वेबवर "कास्ट" मधे तो दिसत नाही आणि कलाकाराचे नावही माहीत नाही. गाणे ओळखावाल्यांना विचारले पाहिजे Happy

Happy मधेच ज्वेल थीफ आल्याने आधीचे लिंक करायला काहीतरी उचलले. ते फारच जेनेरिक होते हे आता लक्षात येत आहे. आता ज्वेल थीफ चर्चा वाचतो.

वाणी कपूरची डुप्लिकेट ओळखली.

जे एरव्हीही आपल्याला कळत नाही. त्यात रक्त असल्याने वेगळे काय कळणार आहे. त्यापेक्षा वेलकम मधे अनिल कपूर घोड्यावर गाढव बसलेलं चित्र काढतो त्यात वैचारिक स्पष्टता दिसते >>> Lol

डॉनचा अड्डा म्हणून ग्रिफिथ ऑब्झरवेटरीचे शॉट्स घेतलेत >>> लॉस एंजेलिसच्या? कथा तिकडे आहे का?

पण तमिळमध्ये हे लोक तमिळनाडूत राहत असावेत. हिंदी करताना दिल्ली मसुरी अशी नावं टाकलीत >>> Happy Happy

अरविंद स्वामी. अरविंद स्वामी आणि अरविंद स्वामी >>> Happy भरत तुम्ही तो मैय्याळगन पाहिला का?

भरत, 'डिअर डॅड' मधलाच कुठलातरी अर्धा तास टिव्हीवर पाहिला आहे बहुतेक. तेवढ्यात सुद्धा अरविंदन् चे काम आवडले होते. त्यात हॉस्टेलमधे मुलींच्या खोलीसमोर शिडी लावून चढतात. मग प्रिन्सिपॉल पकडते. तेव्हा अरविंदन गे आहे हे उघड होते. मुलगा व मुलाचे मित्र तुझ्या बाबांना आपण बरे करूया असं आपसात बोलतात. तोच चित्रपट आहे ना हा ?

लॉस एंजेलिसच्या? कथा तिकडे आहे का?>>> हो तेच तेच!! अरे नाही एल एचा अन ग्रिफिथचा ढुसुकभरही सबध नाही...मराठी सिरियल मधे दोन प्रसन्ग जोडायला मधेच ट्रॅफिकचा, रस्त्याचा शॉट लावतात तस ते अधुन मधुन एरियल शॉट मधुन दाखवलय..कथा कुठे चालते ते निट काय बघितल नाही..मी आपल येता जात काम करत बघत होते..मधेच ग्रिफिथ दिसल्यावर जरा निट बघितल तेवढच!

अस्मिता, तो शेवटचा अर्धा तास आहे. प्रिन्सिपॉलसमोर मुलाने माझे वडील गे आहेत आणि I am proud of him सांगावं म्हणून रचलेला हाच तो प्रसंग. आणि त्याने गर्ल्स होस्टेल मध्ये जावं म्हणून त्याला दारू पाजली ( स्टोरीनेच). शाळेच्या पार्टीत दारू सर्व्ह करतात. आणि पालक मुलांसमोर घेतात.

आता लक्षात येतंय की मुलगा तो प्राउड वाला डायलॉग मारतो , तेव्हा बापाची काही रिअ‍ॅक्शन आठवत नाही. त्याची पुरती उतरली नसावी. पुन्हा पाहायला हवं.

मुलाचा मित्र आपण तुझ्या बाबांना बरं करू म्हणतो तेव्हा ते कॉटेज हाउसमध्ये थांबलेले असतात. हा सीन खूप आधी आहे.

ढुढूक ढुढूक ढुढूक ढुढूक.. <<<<< Lol

हे तुम्ही लोक असं लिहिता.. मीही पाहायला सुरुवात केली 'जेवेल थीफ'..

एल एचा अन ग्रिफिथचा ढुसुकभरही सबध नाही..
<<<<< 'ढुढूकभरही' जास्त बरोबर वाटले असते... Proud

Pages