Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
आणि एक राहिलंच -
आणि एक राहिलंच -
अरुण गोविल इंटरव्ह्यूत आपली शैक्षणिक पात्रता सांगतो - एमएससी, फर्स्ट क्लास फर्स्ट (इथपर्यंत ठीक आहे), और इंजिनिअरिंग में ९६ पर्सेंट
#आसं-कुटं-आसतंय-व्हय
>>"ललिता प्रीति धमाल परीक्षण"
>>"ललिता प्रीति धमाल परीक्षण">>
+१
>>"'तेरे नाम के हम दीवाने हैं...' (गाण्याची चाल 'ब्राऊन गर्ल इन द रिंग ट्रा ल ला ला ला' ... स्टिल आय लव्ह लक्ष्मीकांत-प्यारेलाल)">>
आय लव्ह 'बोनी एम' & 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' 😎
>>"शेवटची १० मिनटं अजून पाहून व्हायची आहेत. कदाचित बघणारही नाही. तेवढी जुदाई राहिली तर राहू देत">>
परीक्षण वाचल्यावर शेवटचीच काय पण एकुण मिळुन १० मिनिटेही हा चित्रपट मला पहावेल असे वाटत नाही 😀
BTW गेल्या रविवारी सनी पाजींचा 'जाट' पाहिला. ह्या वर्षातला सिकंदर नंतरचा अजुन एक 'साउथ मसाला' हिंदी चित्रपट! मध्यंतरी इथेच कोणीतरी लिहिले होते 'अशा अचाट आणि अतर्क्य मारामार्या सनी पाजींना शोभतात' हा चित्रपटही त्याला अपवाद नाही 😀
#आसं-कुटं-आसतंय-व्हय >>>
#आसं-कुटं-आसतंय-व्हय >>> दिग्दर्शक श्रीकांत जिचकरांना हिरो मानत असावा.
परिक्षण धमाल लिहिले आहेस.
कभी कभी चा क्लायमॅक्स
कभी कभी चा क्लायमॅक्स आवडलेला. पुढे अमिताभ शशी बोलताहेत आणि मागुन त्यांच्या बायका ऐकताहेत, शशीला बायकोचे प्रकरण समजल्यावर त्याने घेतलेला स्टँड व त्याच्या अभिमानाने उर भरुन आलेली राखी. खरेच सुंदर….. ऋषी नितुचा रोमांस पण पाहण्यासारखा आहे. खुप छान सदाबहार चित्रपट.
नोकर-चाकर उदास. स्वयंपाकघर
नोकर-चाकर उदास. स्वयंपाकघर उदास. हॉल उदास.
पाय मोकळे करायला जातात. पण पूर्ण वेळ एकाच ठिकाणी बसून राहतात
ऑक्सिजन मास्क लावायच्या ऐवजी त्याला सलाइन लावतात
कंपनीत जितेंद्र पार्टनर असतो. डॉक्टरकीचं काय झालं काय माहित
और इंजिनिअरिंग में ९६ पर्सेंट Uhoh #आसं-कुटं-आसतंय-व्हय
>>>
हे विशेष आवडलंय.
@लप्री ,
पूर्ण रिव्ह्यूच भन्नाट झाला आहे. खूप हसले
जुदाई पोस्ट कहर धमाल आहे
जुदाई पोस्ट कहर धमाल आहे लप्री
बॉलिवूडवाल्यांचं विजा प्रोसेसिंग एकदा मला तपासायचंय. >>>
अ.कु. आणि रेखा बागेत पाय मोकळे करायला जातात. पण पूर्ण वेळ एकाच ठिकाणी बसून राहतात >>>
ऑक्सिजन मास्क लावायच्या ऐवजी त्याला सलाइन लावतात >>>
गरीबीत (मेक-अपसकटच्या) >>>
दोघं एकाच कंपनीत कामाला लागतात. त्या कंपनीत जितेंद्र पार्टनर असतो. डॉक्टरकीचं काय झालं काय माहित!
लकीली दोघं वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडतात. लग्न करतात. एकत्र बागेत गाणं म्हणतात >>> याला विशेष लोल. बाकी सगळे एकत्र करत आहेत त्यामुळे "लकीली वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात" याला फुटलो
मी पिक्चर पाहिलेला नाही. मार गई गाण्यामधे रेखा हॉट दिसली होती इतके लक्षात आहे.
कभी कभी चा क्लायमॅक्स आवडलेला
कभी कभी चा क्लायमॅक्स आवडलेला. >>> हे वाचून मी घाबरलो. पण मग पुढची पोस्ट वाचली. तो सीन फार मस्त आहे. पण तो रूढ अर्थाने क्लायमॅक्स नव्हे - क्लायमॅक्स मधे त्या दोघा मुलींपैकी कोणीतरी कड्यावरून जीव द्यायला जाते व उर्वरित लोक विविध मार्गांनी तिला वाचवायला जातात असे काहीतरी लक्षात आहे.
सुरुवातीला कायच्या काय वाटला. (गाणी सोडून अर्थात. मैं पल दो पल का शायर, कभी कभी) >>> वावे, अमिताभचा "कवी" ट्रॅक मस्त आहे. आधी त्या झाडांमधून फिरताना मै पल दो पल का शायर हूँ हे गद्यात त्याच्या आवाजात फार मस्त आहे, आणि नंतरचे गाण्याचे सादरीकरणही. साहिरच्या रचना अमिताभ सादर करतोय हे फार भारी कॉम्बिनेशन आहे. पण त्याच्या (या लोकप्रियतेच्या फेज मधल्या) सुरूवातीच्या पिक्चर्स मधे त्याला फार गाणी नव्हती. त्यामुळे दीवार, त्रिशूल, काला पत्थर आणि कभी कभी - या चार पिक्चरमधे साहिर गीतकार असूनही अमिताभच्या वाट्याला फार आलेले नाही - हे चार पिक्चर मिळून टोटल एक गाणे (मै पल दो पल का शायर) आणि एक फक्त कडवे (त्रिशूल मधे). पण एखाद्या सुटेबल कथेत ते कॉम्बो काय मस्त असले असते हे यातला तो एक ट्रॅक पाहून जाणवते.
बाय द वे, मै पल दो पल का शायर ची "मै हर एक पल का शायर हूँ" ही व्हर्जनही मस्त आहे.
अमिताभचा "कवी" ट्रॅक मस्त आहे
अमिताभचा "कवी" ट्रॅक मस्त आहे. आधी त्या झाडांमधून फिरताना मै पल दो पल का शायर हूँ हे गद्यात त्याच्या आवाजात फार मस्त आहे, आणि नंतरचे गाण्याचे सादरीकरणही. >>> १००+
आणि एक फक्त कडवे (त्रिशूल मधे). >>> त्याचं येसूदासच्या आवाजातलं एकच कडवं त्या पूर्ण गाण्याला वेगळाच टच देतं.
कभी कभी'च गद्य व्हर्जन पण छान आहे. पिक्चर पहिला नाही पण कॅसेटमध्ये होतं. रज़िया सुल्तानाची रेकॉर्डेड गाणी जयाने अमिताभला ऐकवली. अमिताभ इंप्रेस झाला आणि जयाला सांगून खय्यामकडून त्या पिक्चरची कॅसेट मागवली व यश चोप्रांकडे कभी कभीसाठी खय्यामचा हट्ट धरला असं कुठे तरी ऐकलंय.
एकंदरीत अमिताभ + साहिर + खय्याम + यश चोप्रा चांगली टीम होती.
वरच्या गाण्यात जितेंद्र
वरच्या गाण्यात जितेंद्र पांढरा विग लावून काय धमाल नाचलाय ! गाण्यात एक दोन सेकंद महागुरू ही आहेत ( ओव्हर अॅक्टिंग मौके पे चौका ). 'मी जितेंद्र ला सिनियर, त्या गाण्यात स्टेप्स ही मीच शिकवल्या' असे ते नक्कीच एखाद्या मुलाखतीत म्हणाले असतील. बाकी पायघोळ बेल बॉटम ची फॅशन ही होती त्या वेळी.
हो, 'कवी' ट्रॅक चांगलाच आहे.
हो, 'कवी' ट्रॅक चांगलाच आहे. मला ह्या ओळी फार आवडतात. हा कथेचा भाग नंतरचा आहे अर्थात. आधीचाही आवडतो.
पण अमिताभ-राखी सहजासहजी एकमेकांना सोडून देतात. कुठेच अमिताभ काही प्रयत्न करताना दिसत नाही. बरं, तोही खानदानी वगैरे असतो. म्हणजे तोही प्रश्न नसतो. मग असं का?
साधना, बरोबर, शशी कपूरचं सुरुवातीला संशयातून आलेलं बोलणं आणि मग प्रगल्भतेतून आलेले संवाद मस्त उतरले आहेत.
ऋषी कपूर अमिताभच्या मुलीबरोबर फ्लर्ट का करतो ते कळलं नाही. आणि जरा जास्तच करतो
मला ह्या ओळी फार आवडतात. >>>
मला ह्या ओळी फार आवडतात. >>> वावे मी हेच गद्य म्हणत होते.
ते प्रेमात असतानाच दुर झाले
ते प्रेमात असतानाच दुर झाले हे दाखवणे महत्वाचे होते म्हणुन तसे. दोघेही इतरत्र लग्न करतात, राखी तनमनाने मुव ऑन होते पण अमिताभ मनाने तिथेच राहतो. पण तरी तनामनाने मुव ऑन झालेल्या बायकोचा कळल्यावर तिरस्कार करतो. ती मुव ऑन झाली म्हणुन करतो की तिचे प्रकरण असते म्हणुन करतो आठवत नाही, बहुतेक प्रकरण असते म्हणुन.
नितुला जळवायला ऋषी तसे करतो. ती सगळे संबंध तोडुन जाते ना.
हो, पण का दूर होतात मुळात?
हो, पण का दूर होतात मुळात? जाऊन तो तिच्या आईवडिलांशी बोलतानाही दाखवलेला नाही!
मला पण खूप आवडतात या ओळी.
ऋषी कपूर नीतूला जळवायला फ्लर्ट करतो ते कळतं, पण फारच जास्त करतो. म्हणजे तिच्याशी लग्न ठरवण्याची वेळ येईपर्यंत.
माझेमन
धमाल पोस्ट ललिता प्रीती.
धमाल पोस्ट ललिता प्रीती.
दोन्ही जुदाई पाहिलेले आहेत, कामच काय होतं म्हणा. असं कुणी लिहिलं की आपण बंडल पिक्चर आधीच पाहिलेला असल्याचा अभिमान वाटतो. 
पल दो पल का आणि मैं हर एक पल का शायर हुं -
कवी अमिताभ तर माझा क्रशोत्तम होता. आधीही तीनचार वेळा खरडून झाले आहे पण क्रशसाठी अजून एकदा. साहिरची रचना, ते गाणं, त्याचा भावार्थ, उभं राहून म्हणताना सुद्धा तन्मयतेने गायलेलं वाटावं असं सादरीकरण सगळंच खूप आवडतं. खूप शांत आणि रिलॅक्सिंग आहे. अगदी सोपी गोष्ट सुंदर रितीने उलगडून दाखवली की पाहणाऱ्यांना आनंद होतो तसं हे गाणं वाटतं. कवी अमिताभला ॲन्ग्री यंग मॅन अमिताभने मागे टाकले. लोकांनी जे उचलून धरले त्याच वाटेवरून कलाकारांना जावं लागतं. त्यामुळे तो त्या काळातल्या प्रेक्षकांचा दोष असेल. पण मध्यमवर्गीय असंतोषाला वाट करून देणारा नायक त्यांना स्वतःच्या भावनांचा निचरा करण्यासाठी हवा असल्याने कवी अमिताभ मागे पाडावा लागला. शेवटी 'मशरूफ जमाना मेरे लिये क्यूँ वक्त अपना बरबाद करें' या ओळीसारखे दोन्ही प्रतिमाच होत्या, पुढे जाऊन विरणारच होत्या. पण त्याने करताना/ देताना स्वतःचे १००% दिले काम कुठलेही असोत. ह्याचंही एका कलाकारापेक्षा एक माणूस म्हणून जास्त कौतुक आहे.
आधी सिलसिला पाहिला आणि नंतर
आधी सिलसिला पाहिला आणि नंतर कभी कभी.
सिलसिला मधे रेमिताभ क्रांतीवीरच वाटतात.
जितेंद्रची लफडीच फार असायची.
*जितेंद्रच्या आयुष्याचे सार - 'आधी लफडे मग कपडे, साबणावरून पाय पडतात वाकडे' ----
जितेंद्रची लफडीच फार असायची. तिथल्या तिथे साबणावरून घसरून पडून लगे लेकरूच व्हायचं. नंतर कपडे कोण धुतले हेही कळायचे नाही. मोठ्या काठाची साडी नेसलेली सतत स्वयंपाकघरात व हसतमुख पण याच्या समोर आले की रुसणारी किंवा ह्यालाच शिस्त लावणारी वर्षातून एकदा तेही फ्लाईंग किस देणारी 'मदरली' बायको मिळायची. वर पांढरी पॅन्ट-पिवळे जॅकेट असा वरणभात 'लूक' वागवत हिंडून चारित्र्य सांभाळत रहायचे. मदनाचा पुतळ्याने तरी कुठे जावे शेवटी... ! त्यात संयुक्त कुटुंबातले वाद . वडिलांचे एकतर घरात लक्ष नाही किंवा दुसरा सिक्रेट घरोबा असायचा. मग वडिलांची लेकरं आपली मानायची. आईपण कधी प्रेमळ मिळाली नाही बिचाऱ्याला. त्यामुळे सगळी लफडी ऑब्हियस वाटायला लागून प्रेक्षकच साबण घेऊन वाट बघायचे. मग ते लेकरू इकडे कॉपी पेस्ट करून 'मॅन्युअल' जुदाई- आधी बायकोपासून नंतर विबासंमैत्रिणीपासून. किती तो त्याग, एकावेळी एकच बाई प्रसन्न करायला गेले तर पिक्चरच संपायचा.
अस्मिता
अस्मिता
तो साबणवाला सीन अ अ कॅटेगरीत पाहिला आहे.
अस्मिता आता साबण सीन पाहाणं
अस्मिता
आता साबण सीन पाहाणं आलं!
एक ही भूल मधला आहे ना साबण
एक ही भूल मधला आहे ना साबण सीन? महाविनोदी. लिटरली आणि रुढार्थाने पाय घसरण्याचे कारण एकच- साबण
जुदाई बघितल्याचे आठवत नाही पण गाणी गाजली होती , "मार गयी मुझे तेरी जुदाई" बिनाका मधे बरेच दिवस टॉप ला होतं हे आठवतंय!!
मग ते लेकरू इकडे कॉपी पेस्ट
मग ते लेकरू इकडे कॉपी पेस्ट करून 'मॅन्युअल' जुदाई- आधी बायकोपासून नंतर विबासंमैत्रिणीपासून. किती तो त्याग, एकावेळी एकच बाई प्रसन्न करायला गेले तर पिक्चरच संपायचा >>> अस्मिता
या सगळ्यत्त त्याच्यावर प्रेम करणार्या दोन हिरॉइनी हा ही एक अँगल असे.
अमिताभबद्दलही मस्त लिहीले आहेस. पण प्रेक्षकांचा दोष म्हणता येणार नाही. त्याला कभी कभी सारख्या दमदार रोल मधे कवी म्हणून इतर कोणी आणले असते तर तो ही चालला असता. अँग्री यंग मॅन चालला कारण ती व्यक्तिरेखा व सादरीकरण दोन्ही उच्च होते. ट्रेन्डसेटर होते. त्यामुळे सध्याच्या भाषेत त्या रोल्सनी टीआरपी खेचणे साहजिक होते.
मलाही मै पल दो पल का चे सादरीकरण आवडते. आपल्या स्क्रीन प्रेझेन्स बद्दल आत्मविश्वास असला की कृत्रिक हावभाव, अॅनिमेटेड अॅक्शन्स न करताही वावरता येते याचे उदाहरण आहे ते. आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी असलेला, धीरगंभीर नायक हा साहिरच्या अनेक गाण्यांत असतो. तसा अमिताभ इथे चपखल आहे.
याउलट ऋषी, त्याच्या व्यक्तिरेखेचे वय सुरूवातीला अमिताभच्या व्यक्तिरेखेच्या वयाइतकेच असावे. पण १८० डिग्री फरक आहे आणि तरीही तो ही मस्त आहे. शैलेन्द्र सिंगचा प्लेबॅक असला की ऋषी बॉयिश वाटतो, रफीचा असला की मवाळ वाटतो, तर किशोरचा असला की माचो वाटतो. तसा यात आहे. ऋषीला "चाहे चले छुरियाँ" पुल ऑफ करायला किशोरच हवा.
नंतरचा मिशीवाला अमिताभ मात्र खत्रुट वाटतो
असं कुणी लिहिलं की आपण बंडल
असं कुणी लिहिलं की आपण बंडल पिक्चर आधीच पाहिलेला असल्याचा अभिमान वाटतो >>>
मस्त निरीक्षण आहे फा..! साहिर
मस्त निरीक्षण आहे फा..! साहिर फार आवडतो ना, त्याच्याविषयी लिहीताना वेगळेच भाव जाणवतात.
टेन्डसेटर- अनुमोदन. कदाचित त्यामुळेच असं घडलं असावं.
ऋषी जरा जंपीच वाटतो, त्याची उभी राहून म्हटलेली सिरियस गाणी रडकीच होतात नाहीतर सोचेंगे तुम्हे प्यार करेके नहीं म्हणजे नृत्य अपरिहार्य. काव्य मांडले आहे, तेही अलिप्त आणि अकृत्रिम असं आता तरी मला आठवत नाहीये. मिशीवाला अमिताभ कभी कभीत तरी खत्रुडच हवा आहे, प्रेमभंगामुळे हर्ट आणि जगावर नाराज. हो, मिशी जशी अभिषेकला सूट होते तशी अमिताभला होत नाही. 'बोल ना हलकेहलके' गाणं, मिशीसहित फार आवडतं. बिनमिशीचंही आवडलंच असतं, तरीही.
'बोल ना हलकेहलके' गाणं असंच
'बोल ना हलकेहलके' गाणं असंच आवडतं. ऐकायला. सुंदर लिहिलंय.
एक ख्वाब तो आँखोंमें है
एक चाँद की तकिये तले
कितने दिनोंसें ये आसमाँ भी सोया नहीं है, इसको सुला दे
आय लव्ह गुलजार.
वरच्या सगळ्या पोस्ट्स मस्त.
वरच्या सगळ्या पोस्ट्स मस्त.
फा अमिताभबद्दल भरभरून लिहितो. आणि तो तसं लिहितो तेव्हा वाचायला छान वाटतं.
अमिताभ आणि ऋषी - दोघेही आवडतात. त्यातल्या त्यात ऋषी कुठल्याही रूपात आवडलाय. अगदी १०२ नॉट आऊट मधे सुद्धा. अमिताभ मात्र सगळीकडे नाही आवडलाय (मला उगाच तूफान, जादूगर, लाल बादशाह किंवा गंजस असली नावं घ्यायला लावू नका
)
भयंकर आहे तो साबणाचा सीन !
भयंकर आहे तो साबणाचा सीन !
थँक्स
थँक्स
अस्मिता - साहिरबद्दलही - टोटली.
मिशीवाला अमिताभ कभी कभीत तरी खत्रुडच हवा आहे, प्रेमभंगामुळे हर्ट आणि जगावर नाराज. हो, मिशी जशी अभिषेकला सूट होते तशी अमिताभला होत नाही. >>> दोन्ही मान्य.
अमिताभ मात्र सगळीकडे नाही आवडलाय >>> नक्कीच. त्याचे भिकार पिक्चर आणि रोलही बरेच आहेत. मला ऋषी सुद्धा सगळीकडे आवडत नाही. "सागर" पर्यंत तो मस्त होता. किशोरचा आवाज आणि श्रीमंत वाटणार्या व्यक्तिरेखा. किशोर गेला आणि अमिताभप्रमाणेच त्याचा भाव उतरल्यासारखे झाले. मला ते विनोद राठोड ई चे प्लेबॅक असलेली गाणी आवडत नाहीत त्याची. इव्हन चाँदनीची सुद्धा. ९०ज मधला तर अजिबात आवडत नाही.. नंतरचा दुसर्या इनिंगमधला मूळचा ऋषी नसला तरी एक अभिनेता म्हणून जबरी होता. लक बाय चान्स वगैरे.
हा अर्ली ८०ज मधला. क्लासी, श्रीमंत , दिल्ली बॉय वाटतो. हा ऋषी पुण्यात "नटराज" मधे दिसे.
https://www.youtube.com/watch?v=E_qgsgrC9YY
हा ९०ज मधला. इथे अगदीच मध्यमवर्गीय वाटतो
हा पुण्यात "वसंत" मधे दिसे.
https://www.youtube.com/watch?v=oljAoKBH9Hc
मलाही अमिताभ आणि ऋषी दोघेही
मलाही अमिताभ आणि ऋषी दोघेही आवडतात पण गप बसायचे नव्हते, खरडायचे होते.

अभिनंदन विकु, कसा वाटला ?
विनोद राठोड लाऊड आहे, शब्बीर कुमार, महेंद्र कपूर ही एकच कॅटॅगरी. मधाळ नसून कर्कश. किशोर कधीही लाऊड वाटायचा नाही , गाणी लाऊड असली तरी. उदा. दे दे प्यार दे, थोडीसी जो पिली है
लक बाय चान्स सोबत नवा अग्निपथ पण घे.
हा अर्ली ८०ज मधला. क्लासी,
हा अर्ली ८०ज मधला. क्लासी, श्रीमंत , दिल्ली बॉय वाटतो. हा ऋषी पुण्यात "नटराज" मधे दिसे. >>>
अगदी अगदी
नटराज आणि वसंत >>> हे भारी
नटराज आणि वसंत >>> हे भारी आहे
आत्ता जाणवले की त्या ९०ज
आत्ता जाणवले की त्या ९०ज मधल्या गाण्यात तो जेन्युइन मध्यम्वर्गीयही आहे - "क्योंकि लेहेंगा, हुवा बडा महंगा, मै चुनरी ले आया"
किशोर कधीही लाऊड वाटायचा नाही , गाणी लाऊड असली तरी. उदा. दे दे प्यार दे, थोडीसी जो पिली है >>> हो अगदी शेवटी त्याचा आवाज थोडा बसकट झाला होता पण तरीही हे नंतरचे आवाज ऐकले तर बराच होता त्यापेक्षा
यात अगदी तरूण राजीव कपूरला सूट तर होतोच, पण त्याचेच व्यक्तिमत्त्व इलेव्हेट करतो किशोरचा आवाज.
Pages