Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
प्रीती मस्त ओळख झालिये
प्रीती मस्त ओळख झालिये जुदाईची

ती येते आणिक जाते, ए मेरे हमसफर, ऐसी दीवानगी, तुम अगर साथ देनेका वादा करो, जब हम जवा होगे
कर्कश्य गाणी आहेत ना?
"मै हर एक पल का शायर हूँ ही
"मै हर एक पल का शायर हूँ ही व्हर्जनही मस्त आहे” - वा!! फा, काय आठवण काढलीस! हे गाणं माझ्या फेव्हरिट लिस्ट (खूप मोठी आहे ही) मधलं आहे.
तुझको मुझको जीवन अमृत,
अब इन हाथोंसें पीना हैं|
इनकीं धड़कन में बसना हैं,
इनकीं सासोंमें जी़ना हैं|
तू अपनी अदाए बक्श इन्हें,
मैं अपनीं वफा़ए देता हूँ,|
जो अपनें लिए सोची थीं कभीं,
वह सारी दुवाँए देता हूँ|
ऋषी कपूर - गाण्यांदरम्यान
ऋषी कपूर - गाण्यांदरम्यान पडद्यावरचा त्याचा सूक्ष्माभिनय, rhythm ची त्याची जाण, त्यानुसार सहज दिसणारी बॉडी लॅन्ग्वेज, वगैरे नोट करायला मला आवडतं.
'ये वादा रहा' गाणं (त्यात टाळ्या वाजवण्याचा पीस आहे तिथे त्याच्या डोक्याच्या, मानेच्या हालचाली बघा) किंवा 'पतझड सावन बसंत बहार' (सुरेश वाडकर व्हर्जन) (तिथे तो 'एक बरस के मौसम चार' ओळीनंतर वादकांना 'थांबा' असा हाताने इशारा करतो, ते बघा), it's a treat to watch him.
कर्ज, सरगम, परदा है परदा गाणं... ही लिस्ट मोठी होईल.
अमिताभ स्वत:चं पल दो पल का शायर असणंच त्यात बॉडी लॅन्ग्वेजमधून दाखवतो, ते सुद्धा फार भारी वाटतं. 'इदं न मम' टाइप काहीतरी.
बाकी कभी कभी सिनेमा मला ओके टाइप वाटतो.
कपूर घराण्याला संगीताचा कान
कपूर घराण्याला संगीताचा कान आहे. राज कपूरचं गाणं ऐकलंय का ? ऐका नक्की.
मध्यंतरी रणधीर कपूर इंडीयन आयडॉल मधे गेस्ट बनून आला होता. त्याचं संगीतभान उच्च दर्जाचं आहे.
ऋषी कपूरच्या हातात वाद्यं दिलं कि ते गाणं तो जिवंत करतो (करायचा म्हणवत नाही).
दर्दे ए दिल गाण्यातला स्लो मोशन सिक्वेन्स आणि सोलो कसला भन्नाट आहे.
लैला मजनूची गाणी पाहिलेली आहेत. त्यातलं तेरे दर पे आया हूं गाणं नीट बघताना
:घायल परवाना हूं
वैशी दिवाना हूं
या दोन्ही हूं मधे त्याच्या ओठांची हालचाल वेगळी आहे. फक्त गायकच एव्हढे सूक्ष्म फरक दाखवू शकतो.
कदाचित म्हणूनच पडद्यावर ऋषी कपूर इतकं गाणं कुणी जिवंत करू शकत नसेल.
याच गाण्यातले त्याचे भाव कसले लाजवाब आहेत. चोट खाया हुआ आशिक !
ऋषी कपूरला जंपी आणि त्याच्या
ऋषी कपूरला जंपी आणि त्याच्या गाण्यांना रडकी म्हटल्याबद्दल जाहिर णिषेद…
ऋषी कपूर - गाण्यांदरम्यान पडद्यावरचा त्याचा सूक्ष्माभिनय, rhythm ची त्याची जाण, त्यानुसार सहज दिसणारी बॉडी लॅन्ग्वेज, वगैरे नोट करायला मला आवडतं.
>>>> हो. झरझर बदलतात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. ये गलियां ये चौबारा तसं लाऊड आहे पण एखाद दुसऱ्या लूक्समधून ऋषी त्याच्या भावना पोहोचवतो. ‘कहीं ना जा, आज कहीं मत जा’ हे ही त्याच्या मुद्राभिनयासाठी बघावं.
^^आय लव्ह गुलजार.
^^आय लव्ह गुलजार.
Submitted by rmd ^^
दे टाळी... मला पण, मला पण...
वरचे सगळे भारी भारी मेसेज वाचून मला फक्त हे च लक्षात राहिले हे नानू सरंजामे च्या नाटकातील हिरोईन या साडी प्रकरणासारखे वाटले...
बोल न हल्के हल्के हे फक्त
बोल न हल्के हल्के हे फक्त ऐकायलाच चांगलं आहे, पडद्यावर त्याची वाट लावलेली आहे हेमावैम
बाकी ऋषी कपूरबद्दल सर्व पोस्टींना मम. गाणं जिवंत करणारे जे काही मोजके अभिनेते होते त्यात त्याचा खूप वरचा क्रमांक लागेल
चीकू सहमत
चीकू सहमत
जे अभिनेते ( अभिनेत्र्याही) कमालीचे सुंदर, देखणे होते ते कधीही क्रमा़ंक एकवर राहीले नाहीत. (माधुरी दीक्षित अपवाद). त्यांचं आपलं स्थान होतं पण राजेश खन्ना प्रमाणे त्यांना अढळपद मिळालं नाही.
या यादीत शशी कपूर, ऋषी कपूर, ऋत्विक रोशन, नवीन निश्चल, रविंद्र महाजनी, रमेश देव, विनोद खन्ना असे अनेक जण येतात.
हेमा मालिनी, वहिदा रेहमान , बीना, विम्मी, मनिषा, आदिती राव, साधना, शर्मिला, मधुबाला, सोनाली, ऐश्वर्या , सुश्मिता इ.
रेखा, श्रीदेवी, करिश्मा, मीनाक्षी, जुही, मीनाकुमारी, नर्गिस या कधी न कधी टॉपला होत्या . पण त्या अगदी आखीव रेखीव सौंदर्याच्या पुतळ्या नव्हत्या. चुभूदेघे.
ऋषी कपूर म्हणजे सळसळता उत्साह
ऋषी कपूर म्हणजे सळसळता उत्साह, चैतन्य. ऋषी कपूर गाणंच नाही तर सीन्सना सुद्धा एक वेगळी एनर्जी द्यायचा. तो त्याचा शेवटचा सिनेमा - ज्यात काही प्रसंगात त्याचा रोल परेश रावलने केलाय- त्यात परेश रावलने चांगलं काम केलंय पण ऋषी कपूरच्या सीन्स ना एक वेगळीच एनर्जी आहे. परेश रावलने म्हातार्याचा रोल केलाय, ऋषी कपूरने म्हातार्या ऋषी कपूरचा (सळसळत्या उत्साहाचा, चैतन्याचा).
मला ऋषी कपूर आवडतो, त्याची
मला ऋषी कपूर आवडतो. त्याची गाणी, नृत्य अभिनय सगळे आवडते. ते फक्त त्याचे एकही गाणे 'मैं पल दो पल का शायर' सारखे वाटत नाही, (कविता मांडली आहे नृत्य, गिटार, आनंद, दुःख नाही.) मला आठवत नाही असे लिहिले आहे. उलट त्याचे ओम शांती ओम शाहरुखच्या 'ओम शांती ओम' पेक्षा आणि 'बचना ऐ हसिनो' रणबीरच्या बचना ऐ पेक्षा लाखोपटीने सरस आहे. त्याची एनर्जी, र्हिदम कुणीच (र ला ह जोडले की हे होतेय) कुणीच मॅच करू शकत नाही. रणबीर सुद्धा त्याच्या इतका देखणा नाही. परवाच आठवण येऊन मी तु तु तु तु तारा पाहिले. एका ओळीने फॅन क्लब जरी ट्रिगर झाला तरी मी तुमच्याकडूनच आहे हो......
Pages