चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीती मस्त ओळख झालिये जुदाईची Lol Lol

ती येते आणिक जाते, ए मेरे हमसफर, ऐसी दीवानगी, तुम अगर साथ देनेका वादा करो, जब हम जवा होगे

कर्कश्य गाणी आहेत ना?

"मै हर एक पल का शायर हूँ ही व्हर्जनही मस्त आहे” - वा!! फा, काय आठवण काढलीस! हे गाणं माझ्या फेव्हरिट लिस्ट (खूप मोठी आहे ही) मधलं आहे.

तुझको मुझको जीवन अमृत,
अब इन हाथोंसें पीना हैं|
इनकीं धड़कन में बसना हैं,
इनकीं सासोंमें जी़ना हैं|

तू अपनी अदाए बक्श इन्हें,
मैं अपनीं वफा़ए देता हूँ,|
जो अपनें लिए सोची थीं कभीं,
वह सारी दुवाँए देता हूँ|

ऋषी कपूर - गाण्यांदरम्यान पडद्यावरचा त्याचा सूक्ष्माभिनय, rhythm ची त्याची जाण, त्यानुसार सहज दिसणारी बॉडी लॅन्ग्वेज, वगैरे नोट करायला मला आवडतं.

'ये वादा रहा' गाणं (त्यात टाळ्या वाजवण्याचा पीस आहे तिथे त्याच्या डोक्याच्या, मानेच्या हालचाली बघा) किंवा 'पतझड सावन बसंत बहार' (सुरेश वाडकर व्हर्जन) (तिथे तो 'एक बरस के मौसम चार' ओळीनंतर वादकांना 'थांबा' असा हाताने इशारा करतो, ते बघा), it's a treat to watch him.
कर्ज, सरगम, परदा है परदा गाणं... ही लिस्ट मोठी होईल.

अमिताभ स्वत:चं पल दो पल का शायर असणंच त्यात बॉडी लॅन्ग्वेजमधून दाखवतो, ते सुद्धा फार भारी वाटतं. 'इदं न मम' टाइप काहीतरी.
बाकी कभी कभी सिनेमा मला ओके टाइप वाटतो.

कपूर घराण्याला संगीताचा कान आहे. राज कपूरचं गाणं ऐकलंय का ? ऐका नक्की.
मध्यंतरी रणधीर कपूर इंडीयन आयडॉल मधे गेस्ट बनून आला होता. त्याचं संगीतभान उच्च दर्जाचं आहे.
ऋषी कपूरच्या हातात वाद्यं दिलं कि ते गाणं तो जिवंत करतो (करायचा म्हणवत नाही).
दर्दे ए दिल गाण्यातला स्लो मोशन सिक्वेन्स आणि सोलो कसला भन्नाट आहे.
लैला मजनूची गाणी पाहिलेली आहेत. त्यातलं तेरे दर पे आया हूं गाणं नीट बघताना
:घायल परवाना हूं
वैशी दिवाना हूं
या दोन्ही हूं मधे त्याच्या ओठांची हालचाल वेगळी आहे. फक्त गायकच एव्हढे सूक्ष्म फरक दाखवू शकतो.
कदाचित म्हणूनच पडद्यावर ऋषी कपूर इतकं गाणं कुणी जिवंत करू शकत नसेल.
याच गाण्यातले त्याचे भाव कसले लाजवाब आहेत. चोट खाया हुआ आशिक !

ऋषी कपूरला जंपी आणि त्याच्या गाण्यांना रडकी म्हटल्याबद्दल जाहिर णिषेद…

ऋषी कपूर - गाण्यांदरम्यान पडद्यावरचा त्याचा सूक्ष्माभिनय, rhythm ची त्याची जाण, त्यानुसार सहज दिसणारी बॉडी लॅन्ग्वेज, वगैरे नोट करायला मला आवडतं.
>>>> हो. झरझर बदलतात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. ये गलियां ये चौबारा तसं लाऊड आहे पण एखाद दुसऱ्या लूक्समधून ऋषी त्याच्या भावना पोहोचवतो. ‘कहीं ना जा, आज कहीं मत जा’ हे ही त्याच्या मुद्राभिनयासाठी बघावं.

^^आय लव्ह गुलजार.
Submitted by rmd ^^
दे टाळी... मला पण, मला पण...
वरचे सगळे भारी भारी मेसेज वाचून मला फक्त हे च लक्षात राहिले हे नानू सरंजामे च्या नाटकातील हिरोईन या साडी प्रकरणासारखे वाटले...

बोल न हल्के हल्के हे फक्त ऐकायलाच चांगलं आहे, पडद्यावर त्याची वाट लावलेली आहे हेमावैम Happy

बाकी ऋषी कपूरबद्दल सर्व पोस्टींना मम. गाणं जिवंत करणारे जे काही मोजके अभिनेते होते त्यात त्याचा खूप वरचा क्रमांक लागेल Happy

चीकू सहमत

जे अभिनेते ( अभिनेत्र्याही) कमालीचे सुंदर, देखणे होते ते कधीही क्रमा़ंक एकवर राहीले नाहीत. (माधुरी दीक्षित अपवाद). त्यांचं आपलं स्थान होतं पण राजेश खन्ना प्रमाणे त्यांना अढळपद मिळालं नाही.

या यादीत शशी कपूर, ऋषी कपूर, ऋत्विक रोशन, नवीन निश्चल, रविंद्र महाजनी, रमेश देव, विनोद खन्ना असे अनेक जण येतात.
हेमा मालिनी, वहिदा रेहमान , बीना, विम्मी, मनिषा, आदिती राव, साधना, शर्मिला, मधुबाला, सोनाली, ऐश्वर्या , सुश्मिता इ.
रेखा, श्रीदेवी, करिश्मा, मीनाक्षी, जुही, मीनाकुमारी, नर्गिस या कधी न कधी टॉपला होत्या . पण त्या अगदी आखीव रेखीव सौंदर्याच्या पुतळ्या नव्हत्या. चुभूदेघे.

ऋषी कपूर म्हणजे सळसळता उत्साह, चैतन्य. ऋषी कपूर गाणंच नाही तर सीन्सना सुद्धा एक वेगळी एनर्जी द्यायचा. तो त्याचा शेवटचा सिनेमा - ज्यात काही प्रसंगात त्याचा रोल परेश रावलने केलाय- त्यात परेश रावलने चांगलं काम केलंय पण ऋषी कपूरच्या सीन्स ना एक वेगळीच एनर्जी आहे. परेश रावलने म्हातार्याचा रोल केलाय, ऋषी कपूरने म्हातार्या ऋषी कपूरचा (सळसळत्या उत्साहाचा, चैतन्याचा).

मला ऋषी कपूर आवडतो. त्याची गाणी, नृत्य अभिनय सगळे आवडते. ते फक्त त्याचे एकही गाणे 'मैं पल दो पल का शायर' सारखे वाटत नाही, (कविता मांडली आहे नृत्य, गिटार, आनंद, दुःख नाही.) मला आठवत नाही असे लिहिले आहे. उलट त्याचे ओम शांती ओम शाहरुखच्या 'ओम शांती ओम' पेक्षा आणि 'बचना ऐ हसिनो' रणबीरच्या बचना ऐ पेक्षा लाखोपटीने सरस आहे. त्याची एनर्जी, र्हिदम कुणीच (र ला ह जोडले की हे होतेय) कुणीच मॅच करू शकत नाही. रणबीर सुद्धा त्याच्या इतका देखणा नाही. परवाच आठवण येऊन मी तु तु तु तु तारा पाहिले. एका ओळीने फॅन क्लब जरी ट्रिगर झाला तरी मी तुमच्याकडूनच आहे हो...... Happy

बचना ऐ हसिनो' रणबीरच्या बचना ऐ पेक्षा लाखोपटीने सरस आहे >>> +१००
ऋषी बद्दलच्या वरच्या सगळ्या पोस्टींना +१
केवढा एक्स्प्रेसिक्ह असतो तो कायम. हम किसी से कम नहीं, कर्ज वगैरेची त्याच्यासाठी पारायणं केलीयेत मी. चांद मेरा दिल आणि बचना ऐ हसिनो गाण्यात जबरदस्त एक्स्प्रेशन्स दिली आहेत त्याने.

@धनवंती
दे टाळी >>> लगेच घे! Happy

२००३ मधे BSF च्या नरेंद्र नाथ धर दुबे नी केलेल्या ऑपरेशन गाझी बाबा वर बेस्ड ग्राउंड झीरो पाहिला
मला आवडला

इम्रान हाश्मी नी चांगलं काम केलं आहे
ललित प्रभाकर, मनोज तिवारी, झोया हुसेन अन् सई ताम्हणकर ची कामं पण बरी झाली आहेत

ऋषी कपूर आणि जितेंद्र दोघेही पांढर्‍या कपड्यात कसले तेजस्वी दिसतात.
दोघांत जितेंद्र जरा जास्त फेवरिट आहे (पण अभिनय सोडून Happy )

अमिताभला रोमँटीक सीन्स जमत नाहीत असं जया भादुरीचं म्हणणं एकदा ऐकलं होतं.
पण रेखाबरोबर त्याच्या इतका रोमँटीक कुणी दिसला नाही.
कट म्हणल्यावर पण जोपर्यंत ते दोघे कट करत नाहीत तोपर्यंत युनिट वाट बघत असेल. (सिलसिला)

वरच्या ऋषी कपूर स्पेशल गाण्यांसह मला त्याचे 'तय्यब अली प्यार का दुष्मन' मधले एक्स्प्रेशन्स आणि खट्याळपणा आवडतो. कव्वाली त्याला फारच शोभते. इतर कव्वाली गाण्यातले हिरोज बरेचदा ठिगळ जोडल्यासारखे दिसतात, हा कव्वालच वाटायचा.

धनवन्तीला मम. Happy

दोघांत जितेंद्र जरा जास्त फेवरिट आहे (पण अभिनय सोडून >>> Lol

मी इतक्यात बघितलेले पिक्चर,
द शॅक- डायलॉग्स, ॲक्टिंग
द लाईफ लिस्ट, द चिल्ड्रेन्स ट्रेन -ॲक्टिंग
ज्यूएल थीफ नवा हा नाही बघितला तरी चालेल.

ऋषी कपूर च्या सगळ्या पोस्टस अनेक अनुमोदन, त्याची आणी नितुची जोडी पण गोड दिसायची पडद्यावर..रणबिर त्याच्या जवळपास पण नाही...ना दिसण्यात ना अ‍ॅक्टिन्ग मधे.

ज्यूएल थीफ नवा हा नाही बघितला तरी चालेल.>>> हो ना ! अगदीच घिसिपिटी १००० वेळा दाखवुन झालेली स्टोरी लाइन..ती हिरॉइन वाणी कपुरची सेकन्ड -थर्ड कॉपी वाटते, अ‍ॅक्टिन्ग हिलाही जमत नाही.
८० % वेळा पडद्यावर फक्त सैफु दिसतो पण त्याचही वय जाणवत राहत..
एकच बघणेबल गोष्ट म्हणजे जयदिप अहलावत...तरी स्टोरीच बन्डल असल्याने त्याच अ‍ॅक्टिन्ग टॅलेन्ट दाखवायला कणभरही स्कोप नाही तरी जितक्या वेळ तो आणी सैफ समोरासमोर येतात तेवढ्यात सुद्धा जयदिपच भाव खावुन जातो.
त्यापेक्षा मामीने रेकमन्ड केलेला डायमन्ड हाइस्ट चान्गलाय...निदान त्यात खरा हिरा तरी दिसतो..
ज्वेलथिफ मधला हिरा म्हणजे अ‍ॅमेझॉन वरुन किट मागवुन "मेक युवर ओन डायमन्ड" सारखा मोल्ड मधे घालुन बनवल्यासारखा दिसतो.

रणबीर सुद्धा छान करतो ॲक्टिंग.
ऋषी कपूरने त्याच्या सेकंड इनिंगमध्ये काही दमदार रोल केले आहेत ते पाहता कुठे लपवून ठेवलेले हे टॅलेंट असे वाटले होते.
ऋषी आणि रणबीर दोघांचा स्क्रीन प्रेझेन्स सुखावणारा आहे. अर्थात ऋषी नक्कीच वरचढ ठरतो याबाबतीत कारण फारच गोड वाटायचा.
पण रणबीर सुद्धा त्याच्या असण्याने कुठलाही पिक्चर सुसह्य करतो. आणि तितकाच उत्स्फूर्त नाचतो.
ऋषी कपूर सोबत आपले इमोशन जातात अन्यथा तोडीस तोड आहेत बापलेक. कपूर खानदानाचा वारसा जपला आहे रणबीरने.

ऋषी कपूर दिवाना, बोराबो मधला (सुटलेला ) नव्हता आवडत. सागर वगैरे पर्यंत मेन्टेन केलं होतं. पण बॉबीचा पोरगेलासा ऋषी कमालीचा क्युट आहे.
जितेंद्रचं उलटं आहे. म्हणजे कारवा मधला गोबर्‍या गालांचा एका बाजूने भांग पाडलेला, झुल्फिकार जितेंद्र वेगळाच वाटतो. त्याचे त्या वेळचे डान्स पण लटके, झटके पण शम्मी सारखे आळोखे पिळोखे नाहीत. एकदम सफाईदार!
गाल आत गेलेला, मधून भांग पाडणारा, जास्त चिकणा आणि मॉडर्न जितेंद्र वेगळ्याच प्लॅनेटवरचा वाटतो. साऊथचा टोपवाला जितू आणखीन वेगळा. या तिन्ही रूपात त्याचे डान्स सुद्धा वेगवेगळे आहेत. टोप लावला कि कवायती !

जितेंद्र, ऋषी कपूर, शम्मी,किशोर कुमार या सर्वांच्या अंगातच र्‍हिदम होता. मेहमूद कॉमेडिअन म्हणून यात घेतला नाही.
( कुणी राहिलं असेल तर क्षमस्व. झोप आलीय , उद्या लवकर जायचंय Happy )

प्राजक्ता, वाणी कपूर हेच नाव आठवत होते. खूपच सेम दिसतात ह्या दोघी. मला तर ती बाई वा.क.च
वाटली.
आणि फ़िल्टर लावले आहेत नेटफ्लिक्सवर की काय माहिती, सगळे कोल्जअप्स AI जनरेटेड वाटत होते. अनरियल!

काल कभी कभीची गाणी ऐकून उन्हाळ्यात मनात गारवा आला.

या आठवड्यात Sinners पाहिला. प्रोमो पाहून निव्वळ हॉरर पिक्चर असेल असं वाटलं होतं. पण पिक्चरला अनेक कंगोरे आहेत. सिनेमा Sinners बद्दलचा आहे. हे कोण आहेत आणि ते sinners का आहेत हे हळुहळू उलगडत जातं. सिनेमा १९३२ मधे मिसिसिपी मध्ये घडतो. तेव्हा तिथली सामाजिक परिस्थिती, black माणसांना कशाकशाला सामोरं जायला लागत होतं या सगळ्या गोष्टी दिसत राहतात. कथा घडते ती एका पहाटेपासून ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत फक्त. पण हे २४ तास त्या कम्युनिटीसाठी सगळं काही बदलवून टाकणारे ठरतात.
ट्रेलर मध्ये आपल्याला vampires दिसतात पण त्यांचा उद्देश केवळ रक्त पिणे किंवा त्यासाठी माणसांना मारणे हा दाखवला नाहीये. त्यांचं पिक्चरमध्ये असणं वेगळ्याच गोष्टीसाठी आहे आणि ते मात्र पिक्चरमध्येच पाहायला हवं.
चित्रपटात अनेक रूपके वापरली आहेत त्यामुळे समोर घडणाऱ्या घटनांचे वेगवेगळे अर्थ लागत राहतात आणि त्यामुळे जास्त गुंतायला होतं.
सिनेमा सुरुवातीला थोडा संथ वाटला तरी नंतर काहीसा वेगवान होतो. ऍक्शन सीन्स छान आहेत.
सिनेमातल्या प्रमुख व्यक्तिरेखा तीन - एक अगदी तरुण मुलगा जो musician आहे आणि blues music त्याची passion आहे. बाकी दोघे जुळे भाऊ आहेत जे एकाच कलाकाराने सादर केले आहेत (ब्लॅक पँथर चा व्हिलन ). या माणसाने मात्र कमाल केली आहे. दोन्ही भाऊ स्वभावाने अतिशय वेगवेगळे आहेत आणि ते याने उत्तम सादर केले आहेत. या सिनेमाचं म्युझिक श्रवणीय आहे.
हा सिनेमा मोठ्या पडद्यावरच पाहायच्या लायकीचा आहे. IMAX असेल तर बेटर.

सिनर्स बद्दल कुतूहल होतेच >> अरे नक्की बघ आणि IMAX मध्येच बघ. एक तर पूर्ण पिक्चर त्यांनी फिल्म वर शूट केलाय digital नाही. त्यामुळे एक प्रकारचा भव्य फील येतो. आणि त्यात २५ मिनिटांचे स्पेशल सीन्स IMAX मध्ये शूट केलेत. त्यामुळे आपल्याला मध्येच स्क्रीन मोठा झाल्यासारखे वाटते. फारच भारी अनुभव होता.

Nolan नंतर फिल्म वापरणारा डायरेक्टर हाच आहे बहुतेक. आजकालचे पिक्चर खूप खोटे वाटतात त्याचे कारण aspect ratio आणि frame rate आहे असे मला वाटते. यात एकदम भन्नाट वाटते.

त्या Jim Crow काळातील साऊथ. तिथले cotton plantation. भेदभाव. आणि बरेच काही ऐतिहासिक संदर्भ दाखवतो पिक्चर. पण असे उगीच त्यात रेंगाळत बसत नाही. तेच रूपकांबद्दल म्हणते आहे rmd.

अंगात ऱ्हिदम म्हटल्यावर गोविंदाचं नांव आलंच पाहिजे.. >>> +१००

दिल बहलता है मेरा आप के आ जाने से - हे गाणं केवळ गोविंदासाठी अनेकदा पाहिलंय.
पण यूट्यूबवर हे फक्त गाणं व्यवस्थित बघता येत नाही.

'पतझड सावन बसंत बहार' (महम्मद अझीझ व्हर्जन) - या गाण्यात गोविंदा स्टील्स द शो.

त्याच्या समोर नीलम अगदीच प्लॅस्टिकची बाहुली.

मस्त चर्चा.. बच्चन, ऋषी, गोविंदा, तिघेही फार आवडते.
कभीकभी खूपवेळा पाहिलाय. त्यातली बच्चनची यडपट मुलगी सोडुन सगळं आवडतं.

Pages