Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
त्यांना इतकी सफाईदार इन्ग्रजी
त्यांना इतकी सफाईदार इन्ग्रजी येत होती ? >> हो .१३ भाषा येत होत्या. संस्कृत मधे दोन पुस्तकं लिहीलेली आहेत.
छावा डिस्कशन जोरात चालू आहे
छावा डिस्कशन जोरात चालू आहे सगळीकडे...
मी अजूनही हा चित्रपट पाहिलेला नाही. पण थोरातांची कमळा हा चित्रपट पदवी मिळाल्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. अजूनही तो क्षण आठवतो.
मैत्रेयी ते ‘ऐ नरसिंघे’
मैत्रेयी ते ‘ऐ नरसिंघे’ विसरलेच होते मी….
काल छावा सिनेमा बघितला. मराठी
काल छावा सिनेमा बघितला. मराठी माणसासाठी साठी अतिशय वंदनीय असलेल्या व्यक्तीवर इतका भव्य चित्रपट आलेला पाहून बरं वाटलं. आधीच्या बाजीराव मस्तानी किंवा पानिपत पेक्षा नक्कीच हा चित्रपट खूप उजवा आहे. पण तरीही उत्तम सिनेमा पाहिल्याचं समाधान मात्र मिळत नाही.
आधी आवडलेल्या गोष्टी. सर्व पात्रांची निवड अतिशय चपखल आहे. कपडेपट अगदी जमून आला आहे. नऊवारी साड्या अगदी सुरेख नेसवल्या आहेत. साड्या, अंगरखे वगैरे अजिबात कृत्रिम धाग्यांचे वाटत नाहीत. रश्मिका सरप्राइज पॅकेज आहे. येसूबाईंच्या वेशात ती अगदी शोभून दिसली आहे. डायलॉग डिलिव्हरी जरा गडबड आहे. पण तरीही खटकत नाही. बाकी सर्व मराठी सरदारही अगदी शोभून दिसतात. रात्रीचे प्रसंग अगदी नॅचरल समईचा प्रकाश वाटावा असे घेतले आहेत. लढाईचे मॉब सीनही जमून आले आहेत. नाहीतर लांजेकरच्या सिनेमामधे अगदीच लुटूपुटीच्या लढाया वाटतात. संभाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग अगदी जमून आला आहे. मराठेशाहीचं वैभव दाखवणारा तरीही बेगडी चकचकीत न वाटणारा असा सेट उभारला आहे.
विकी कौशल आणि अक्षय खन्ना बद्दल तर काय बोलावे. ते दोघेही आपापल्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. विकी कौशलने मराठी उच्चारांवर घेतलेली मेहनत जाणवते. त्याचं चालणं, बोलणं, एकूणच पडद्यावरचा वावर अत्यंत आदबशीर मराठी राजा म्हणून शोभणारा आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाची भूमिका तर अक्षयची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरावी. डोळे, देहबोली सर्वांतून तो औरंगजेबच वाटतो. मस्तवाल मुघल सम्राट ते मराठेशाहीपुढे हतबल झालेला औरंगजेब त्याने अत्यंत उत्क्रृष्टपणे साकारला आहे.
सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व कौटुंबिक सीनसुद्धा अतिशय संयतपणे आणि ग्रेसफुली घेतले आहेत. कुठेही महाराजांची डिग्निटी सोडलेली नाही. (आठवा बाजीराव मस्तानी मधली फालतूगिरी) शेवटची वीस मिनीटं संभाजीराजांचे किती हाल केलेत हे दाखवलं आहे. ते अर्थातच काळजाला घरं पाडतं आणि रडू आल्याशिवाय राहवत नाही.
पण... पटकथेची मांडणी अगदीच ढिसाळ आहे. संभाजीराजाचा संपूर्ण जीवनपट तीन तासात मांडणं कठीण आहेच. पण तरीही पटकथा नीट बांधीव ठेवून बऱ्याच गोष्टी कव्हर करणं शक्य होतं. हा इतिहास आपल्याला माहीत आहे म्हणून ठीक आहे. पण एकही पात्र नीट एस्टाब्लिश केलेलं नाही. नुसत्या सरदारांच्या नावावरून काहीही संदर्भ लागणार नाही. एकामागून एक लढायांचे सीन येत रहातात. ही कदाचित अधलेमधले सीन शेवटच्या क्षणी कापल्याने झालेली गडबड असेल. पण त्यामुळे ते बघणं वैतागवाणं होतं काही वेळाने. लढाईच्या सीनमधे अत्यंत अचाट प्रकार दाखवले आहेत. ते बघतना साऊथचे सिनेमा असतात तसं वाटत रहातं. मराठ्यांच्या लढाईचा मुख्य आधार म्हणजे गनिमीकावा. तो कुठेही नीट दिसत नाही. शिवाय अगदी प्रत्येक लढाईत महाराज आहेतच. बाकी सरदार अगदीच दुय्यम. आणि सगळे सतत ओरडत रहातात. डायलॉग्सज पेक्षा ओरडणंच जास्त आहे विकी कौशलला. लढायांचे प्रसंग कमी करून संभाजीराजांची पार्श्वभूमी, जडणघडण, हंबीररावांसारख्या मुख्य सरदारांची थोडी ओळख असं दाखवून सिनेमा अधिक नेटका आणि अर्थपूर्ण करता आला असता. शिवाय संभाजीराजे कैदेत अडकल्यावर त्यांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते ते ही दाखवायला हवे होते. ते नसल्याने राजा कैदेत आहे आणि बाकी येसूबाईंसह सर्व सरदार हातावर हात धरून संभाजीराजांच्या मृत्यूची वाट बघत बसले आहेत असं वाटत़ं. संभाजीराजांच्या मृत्यूनंतरही मराठेशाहीने औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि शेवटी त्याचा दख्खनमधेच अंत झाला हे चार ओळीत तरी सांगायला हवं होतं. डायना पेंटी का आहे सिनेमात हे कळलेलंच नाही. औरंगजेबाची मुलगी असली तरी सगळ्या पुरुष मानकऱ्यांमधे एकटी स्त्री ती देखील पडदा आणि गोषाशिवाय हे अजिबात पटत नाही. औरंगजेब अत्यंत पाताळयंत्री माणूस होता. मनातल्या भावना कधीही चेहऱ्यावर न दिसू देणं ही त्याची खासियत होती. इथे मात्र तो सतत ओव्हर रिॲक्ट करत राहतो हे खटकतं.
सर्वात निराश करणारी गोष्ट काय असेल तर ते म्हणजे संगीत आणि पार्श्वसंगीत. रेहमानने पाट्या सुद्धा नीट टाकलेल्या नाहीत. प्रसंगांना अजिबात न शोभणारं, पूर्ण अरेबिक बाजाचं संगीत आहे. मराठी पणाचा पुसटसा स्पर्श सुद्धा नाही त्याला.
एकूण काय भरजरी पैठणी बघण्याच्या आशेने जावं आणि ती दोन हजारवाली कृत्रिम चकचकीत जरीची डुप्लिकेट पैठणी निघावी असं झालं.
जाता जाता : सिनेमा १६+ असून अनेक लोक लहान लहान मुलांना घेऊन आले होते आणि थिएटर वाले पण आत सोडत होते पोरांना. सिनेमात इतकी प्रचंड हिंसा आहे की इतक्या लहान मुलांना ती दाखवल्याबद्दल पालकांना शिक्षा करायला हवी. लढाई झाली हे सांगणं आणि पडद्यावर तलवार, भाले भोसकून मारणं, रक्तपात बघणं यात फरक आहे ही अक्कल नाही का पालकांना? आपण साध्या साध्या गोष्टीतही सुजाण बनू शकत नाही का?
वा संयत लिहिलस अपर्णा
वा संयत लिहिलस अपर्णा.
शेवटचा मुद्दा फार महत्वाचा
Submitted by aparnas on 23
Submitted by aparnas on 23 February, 2025 - 10:08
सहमत. अगदी अशीच प्रतिक्रिया याच धाग्यावर मी दिली होती. चला, कुणीतरी सहमत आहे या विचाराने बरं वाटलं.
बरंच काही सोडून दिलं. कारण सध्या जे चालू आहे ते चालू द्यावं असं वाटतं.
शेवटचा १६+ मुद्दाही महत्वाचा. लहान मुलं रडतानाचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, स्वतः विकी कौशलने शेअर केला म्हणून कौतुक होतंय, पण त्या वयातल्या मुलांना पडद्यावर असे function at() { [native code] }याचार बघताना रडू येणार नाही का ? या वयात पडद्यावर जे चालू आहेते सगळं समजतंच असं नाही.
सिनेमॅटिक लिबर्टीचं तुणतुणं
सिनेमॅटिक लिबर्टीचं तुणतुणं वाजवणार्यांचं कौतुक वाटतं.
चारशे पाचशे वर्षांपूर्वीच्या पिक्चरमधे हमर , जीप, मर्सिडीज गाड्या दाखवल्या तर सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून चालेल ना ? बाहुबली तरी काल्पनिक आहे. पण त्यातही हेलिकॉप्टर मधून सैन्य उतरतं, विमानातून हल्ले होतात असे दाखवले तर चालले असते कि.
आमच्या सारख्यांना काही कळतंच नाही.
माझ्या मुलीचे (under 10)
माझ्या मुलीचे (under 10) क्लासमेटस्/बीएफएफ गेले होते छावाला. वीकेण्डलाही जाणार आहेत काही. बहुतेक म्हणून तिनेही थोडी उत्सुकता दाखवली. मग मी म्हटलं की त्यात तलवारीने फायटिंग आहे. रक्त आहे म्हटल्यावर तिची उत्सुकता संपली. तिच्या वयात मी ते पुस्तक वाचले होते त्यामुळे तिने अती आग्रह केला असता तर मी नेणार होते.
तिच्या वयात मी ते पुस्तक
तिच्या वयात मी ते पुस्तक वाचले होते >>> मुलांसाठी शाळेतच कॉमिक्स बुक असावीत इतिहासाची.
उत्तम पोस्ट, अपर्णा.
उत्तम पोस्ट, अपर्णा.
छान पोस्ट, अपर्णा.
छान पोस्ट, अपर्णा.
संभाजीराजे कैदेत अडकल्यावर
संभाजीराजे कैदेत अडकल्यावर त्यांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते ते ही दाखवायला हवे होते. ते नसल्याने राजा कैदेत आहे आणि बाकी येसूबाईंसह सर्व सरदार हातावर हात धरून संभाजीराजांच्या मृत्यूची वाट बघत बसले आहेत असं वाटत़ं. >>> अगदी बरोबर. राजाराम छत्रपती झाल्याची बातमी येते आणि औरंगजेब एकदम खाली कोसळतो ते रँडम वाटते, कारण राजारामाला काही अस्तित्व च नाहीये तोवर.
एकूणच कॅरेक्टर्सची काही बॅकस्टोरी समोर येतच नाही. ते कवी कलश आणि संभाजीराजांची मैत्रीही आधी काहीच एस्टॅब्लिश होत नाही. त्यामुळे शेवटी मरणाच्या दारात त्यांचे ते एकमेकाशी डायलॉग मला तरी इफेक्टिव वाटले नाहीत.
शिर्के बन्धूंचा ट्रॅकही अचानक संपवला असे वाटले. संगमेश्वर ला ते समोरासमोर येतात तेव्हा दाखवायचे की निदान जरा ड्रॅमॅटिक डाय्लॉग, जरा क्लोजर मिळाले असते. सिनेमा चे एन्डिंगही अॅब्रप्ट वाटते. औरंगजेब अचानक आयडिया सुचल्याप्रमाणे म्हणतो हमसे जुड जाओ लेकिन तुम्हे अपना धर्म बदलना पडेगा. ( इस्लाम कबूल करना होगा असे स्पष्ट म्हणत नाही फॉर सम रीझन)
त्यांची जीभ कापल्यानंतर डायना पेन्टी अचानकच म्हणते "संभा अपनी मौत का जश्न मना कर चला गया " मग तो आइसाहेब वाला सीन आहे. मग सिनेमा संपतोच एकदम. तिथे नक्कीच संभाजीराजाच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवले इ. निवेदन हवे होते.
औरंगजेब अचानक आयडिया
औरंगजेब अचानक आयडिया सुचल्याप्रमाणे म्हणतो हमसे जुड जाओ लेकिन तुम्हे अपना धर्म बदलना पडेगा. ( इस्लाम कबूल करना होगा असे स्पष्ट म्हणत नाही फॉर सम रीझन)
<<<
सम रिझन ? ऑबव्हियस रिझन
मुळात इस्लाम कुबुल करण्यासाठी टॉर्चर केला ही रिअॅलिटी दाखवण्याची हिंमत नसावी कोणात, सिनेमा सेन्सॉरने पास नसता केला कदाचित !
शक्यं तितके खोटे सेक्युलर जग दाखवायचा प्रयत्नं केला आहे अशी टिका वाचली काही ठिकाणी.
तिच्या वयात मी ते पुस्तक
तिच्या वयात मी ते पुस्तक वाचले होते >>> बुल्स आय.
आपल्यापैकी अनेकांनी संभाजीराजांच्या मृत्यूबद्दल शाळकरी वयातच वाचलेले आहे. आणि ते वाचून कुणाच्या मनावर वाईट परीणाम झाला असेल असे वाटत नाही. त्यामुळे १६ वर्षांखालील मुलांना सिनेमाला सोडण्यावर घेतलेला आक्षेप कळू शकला नाही. जे सिनेमा बघून जाणवू शकते त्याच्याहून कैकपटीने जास्त पुस्तक वाचून जाणवते. कारण पुस्तक एक तात्पुरता अनुभव देत नाही - बर्याचदा ते एक किडा सोडून देते मेंदूत. त्या किड्याचे फुलपाखरू तो मेंदू आपल्या कुवतीनुसार करतोच. ते फुलपाखरू फक्त त्या मेंदूचं असतं, इतर कुणालाच ते दिसत नाही, समजत नाही.
सिनेमात जे दाखवले असते त्या दृष्यांबद्दल आपण मुलांशी काही बोलू शकतो पण पुस्तक वाचून त्यांच्या मनात जे तरंग उमटतात ते आपल्याला कळतच नाहीत तर आपण त्याबद्दल त्यांना काय सांगणार? त्यामुळे सिनेमा बघणे चूक पण पुस्तक वाचल्यास चालते - हे काही बरोबर नाही.
(वरचा विचार हा फक्त संभाजीराजांवरच्या सिनेमापुरताच मर्यादित आहे, कारण तो इतिहास आहे. त्या वेदनेतून आपण शिकतो. पुष्पासारख्या सिनेमांना तो विचार लागू करायचा विचारही करू नये)
द स्टोरी टेलर कुणीच नाही
द स्टोरी टेलर कुणीच नाही पाहिला का?
माबोकरांचे रेको पाहून मगच हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घ्यावं असा विचार होता. युट्यूबवर full movie असःं लिहून रिव्ह्यूज देतात तो प्रकार बिल्कुल आवडत नाही.
एखाद्याच्या चेंगटपणाचा असा गैरफायदा उचलला तर कुफेहेपा?
(सिनेमाचं नाव इतकं टेंप्टिंग आहे कि एक गूढ कथा तयार होतेय डोक्यात)
<थोरातांची कमळा हा चित्रपट
<थोरातांची कमळा हा चित्रपट पदवी मिळाल्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. अजूनही तो क्षण आठवतो. ?
हा चित्रपट १९६० सालचा आहे.
अन्वेशिपिन कम्देथुम (शोधा
अन्वेशिपिन कम्देथुम (शोधा म्हणजे सापडेल) हा मल्याळी चित्रपट नेफ्लिवर पाहिला. एका पिक्चर मध्ये दोन मर्डर मिस्ट्रिज. दोन्ही व्यवस्थित कळतात.
अन्वेशिपिन वाचुन मला सुक्श्मदर्शिनी आठवला म्हणुन हा पाहिला. सु द पेक्षा बरा वाटला.
दोन मल्याळी चित्रपट पाहिले. दोन्हीचे कथानक गावात किंवा निमशहरी भागात घडते. आणि दोन्हीत मुख्यत्वे ख्रिस्ती - रिअल लाईफ व रील लाइफमध्ये. केरळात ख्रिस्ती मेजॉरिटी असावी बहुतेक. गोव्याचे चित्रपट फारसे पाहिले नाहीत. तिथेही असेच असावे.
थोरातांची कमळा पदवीनंतर
थोरातांची कमळा पदवीनंतर फडेफशो पाहिला असेल तर च्रप्स आज किमान ८५ चे असावेत. पण तसे नसणार. संभाजीबद्दल लोक उर भरवुन घेताहेत हे बघुन त्याची दुसरी बाजु लोकांना दाखवण्यासाठी त्यानी असे लिहिले असणार असा समज करुन घेऊन मी त्यांची कमेंट वाचल्यावर काही लिहायचे टाळले.
थो क मीही पाहिलाय दुरदर्शनवर. संभाजी कमळेला पळवुन नेतो आणि शिवाजी राजे त्याला टकमक टोकावरुन कडेलोटाची शिक्षा फर्मावतात असे काहीतरी कथानक आहे. सुर्यकांत चंद्रकांत दोघेही आहेत.
>> सर्वांचा कपडेपट आणि
>> सर्वांचा कपडेपट आणि सिनेमॅटोग्राफी ही फार सुरेख आहे <<
शाळेच्या गॅदरिंग मध्ये ठीक आहे, सिनेमात नाही. सुरेख ?
संभाजीला जेव्हा विटंबना करून
संभाजीला जेव्हा विटंबना करून औरंगजेबापुढे आणले जात होते तेव्हा प्रत्यक्ष प्रसंग अतिशय ड्रॅमॅटिक आहे इतिहासात. सूर्योदय होत असतो आणि संभाजीच्या समोरच औरंगजेब नमाज पडतो. संभाजीच्या हातामुंडक्यात लाकडी जू असतो. त्याला काय म्हणतात माहित नाही, संभाजीला बहुतेक गाढवावर बसवलेले असते (?!) असे वाचल्याचे स्मरते. खूप आधी वाचल्याने संदर्भ पटकन देता येणार नाहीत.
म्हणजे प्रत्यक्षात जास्त नाट्य होते. इतका नाट्यपूर्ण प्रसंग जर इतिहासात नमूद असेल तर उतेकर मंडळींच्या कल्पनादारिद्र्याची कीव येते.
कपडेपटाचे कौतुक कसे काय करताहेत लोक देव जाणे. अरे हा फॅशन चित्रपट नाही. कपडे ऐतिहासिक तथ्याला धरून असते तर अधिक चांगले झाले असते. सॉरी , पण साड्यांच्या पटके गुंडाळत नव्हते लोक आणि जरीचा काठ बरोबर कपाळावरून न्यायची फॅशन देखील नव्हती तेव्हा.
लहान मुलांना थिएटर मध्ये नेऊन इतकी भयंकर हिंसा दाखवून त्यांच्यात द्वेष फुलवणाऱ्या सर्व पालकांना शिक्षा व्हायला हवी आहे. अशा चित्रपटांनी मुलांसाठी एडिट करून नवी आवृत्ती बनवावी.
थो क मीही पाहिलाय दुरदर्शनवर.
थो क मीही पाहिलाय दुरदर्शनवर. संभाजी कमळेला पळवुन नेतो आणि शिवाजी राजे त्याला टकमक टोकावरुन कडेलोटाची शिक्षा फर्मावतात असे काहीतरी कथानक आहे
>>>>>
हे काल्पनिक कथानक होते की इतिहास?
>> हे काल्पनिक कथानक होते की
>> हे काल्पनिक कथानक होते की इतिहास? <<
काल्पनिक. चित्रपट अशाच एका काल्पनिक कादंबरीवरून आधारित आहे असे कुठल्यातरी मुलाखतीत ऐकले.
कलशाची मैत्री, दिलेरखानाला जाऊन मिळण, कोल्हापूरफ्रॅक्शन प्रायोजित चिटणीसाची बखर यामुळे संभाजीची बदनामी खूप वर्षांपासून होत आहे त्यात थोरातांची कमळा हा अग्रगण्य चित्रपट आहे.
हे काल्पनिक कथानक होते की
हे काल्पनिक कथानक होते की इतिहास?>>>
असा प्रश्न फक्त सरांनाच पडू शकतो
कलशाची मैत्री, दिलेरखानाला
कलशाची मैत्री, दिलेरखानाला जाऊन मिळण, कोल्हापूरफ्रॅक्शन प्रायोजित चिटणीसाची बखर यामुळे संभाजीची बदनामी खूप वर्षांपासून होत आहे त्यात थोरातांची कमळा हा अग्रगण्य चित्रपट आहे>>>>>
मीही बरीच वर्षे संभाजीबद्दल हेच ऐकले आहे. त्याची दुसरी चांगली बाजु कधी वाचायला मिळाली नाही.
आजच्या प्रेक्षकांसाठी बनवलेल्या मसाला चित्रपटात चांगला कपडेपट म्हणजे संजय लिला भंसाली जे करतो ते न केलेला कपडेपट. वेल्वेट साड्या न दाखवता सिल्क दाखवले तरी प्रेक्षकांना ते बरे वाटते. त्यातल्या त्यात.
रायगडाला जेव्हा जाग येते या खुप गाजलेल्या नाटकातही संभाजी ग्रे शेडमध्ये आहे सोबत दिलेरखान, कलश वगैरे आहेत.
लहान मुलांना थिएटर मध्ये नेऊन
लहान मुलांना थिएटर मध्ये नेऊन इतकी भयंकर हिंसा दाखवून त्यांच्यात द्वेष फुलवणाऱ्या सर्व पालकांना शिक्षा व्हायला हवी आहे.>>>>
सहमत आहे पण द्वेष फुलवणे याबाबत सहमत नाही. तुम्हाला कोणाविरुद्ध द्वेष फुलवला जातोय असे वाटतेय?
औरंगजेबाचा द्वेष वाटला तर त्यात काहीही चुक नाही. तो असेल उत्तरेचा सार्वभौम राजा पण महाराष्ट्राचा तो शत्रुच होता. त्याचे इथले राज्य मोडुन शिवरायांनी स्वराज्य उभारले आणि त्याने जवळपास ५० वर्षे ते ध्वस्त करायचे प्रयत्न केले.
जे सिनेमा बघून जाणवू शकते
जे सिनेमा बघून जाणवू शकते त्याच्याहून कैकपटीने जास्त पुस्तक वाचून जाणवते. कारण पुस्तक एक तात्पुरता अनुभव देत नाही - बर्याचदा ते एक किडा सोडून देते मेंदूत. त्या किड्याचे फुलपाखरू तो मेंदू आपल्या कुवतीनुसार करतोच. ते फुलपाखरू फक्त त्या मेंदूचं असतं, इतर कुणालाच ते दिसत नाही, समजत नाही.
>>>>>
एक्झॅक्ट्ली. म्हणून बरेचदा पुस्तकावरून निघालेले चित्रपट (पुस्तकांपेक्षा) फिका अनुभव देतात. काही जणांच्या बाबतीत हे उलट होत असेल का? ( हे मुक्त चिंतन आहे. चित्रपट दाखवण्याचे समर्थन नाही हे लक्षात घ्यावे प्लीज.)
माधव यांची वरची पोस्ट उत्तम
माधव यांची वरची पोस्ट उत्तम आहे हे लिहायचे राहिले.
म्हणून बरेचदा पुस्तकावरून
म्हणून बरेचदा पुस्तकावरून निघालेले चित्रपट (पुस्तकांपेक्षा) फिका अनुभव देतात. काही जणांच्या बाबतीत हे उलट होत असेल का? >> पुस्तकांशी जानी दुष्मनी असणार्र्या कमनशिबी लोकांबाबतीमधे चित्रपट हे एकमेव माध्यम राहते.
छावा चित्रपटाला १६+
छावा चित्रपटाला १६+ सर्टिफिकेट दिलंय. गूगल वर लिहिलंय की movie is suitable for all audiences, but with parental guidance for children under 16.
मग पालकांनी आपल्या मुलांना दाखवला तर काय प्रॉब्लेम आहे?
'छावा' पाहिला. नुसती
'छावा' पाहिला. नुसती त्वेषपूर्ण डायलॉगबाजी, अमानवी लढाया आणि शेवटी गोअरपोर्नपलीकडे काहीही हाती लागलं नाही. पटकथा, कॅरेक्टर बिल्डिंग वगैरे काही नाहीच. नुसता घटनाक्रम आहे आणि त्यालाही काही संगती नाही. सोयराबाई काय आणि झीनतुन्निसा काय - त्या जिथे, ज्या वेषात आणि जे करताना/बोलताना दिसतात ते अतर्क्य आहे. औरंगझेब वाती वळत प्रवचन ऐकणार्या म्हातार्या बायकांसारखा भर दरबारात क्रोशाच्या टोप्या विणत सरदारांची डायलॉगबाजी ऐकतो. डायलॉग्ज अॅट बेस्ट शाळकरी वाटतात.
Pages