Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
माझं ही असंच मत आहे. लोक
माझं ही असंच मत आहे. लोक सिनेमाला किंवा ऐतिहासिक कादंबरीला इतिहास समजतात. सिनेमा - ऐतिहासिक कादंबरी - इतिहास यापैकी ९०% लोक सिनेमाच बघत असतील, सात आठ टक्के लोक कादंबर्या वाचत असतील आणि उरलेले लोक खरा इतिहास जाणून घेत असतील.
छावा पाहताना पुढे बसलेले तरूणांचे एक टोळके आपसात हास्यविनोद करत होते, त्यांचे तसे वागणे क्लायमॅक्स पण चालूच राहिल्याने त्यांना चोप देऊन माफी मागायला लावली आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल केले गेले. हे लोक इतिहास वाचतील असे वाटते का ?
फा पोस्ट आवडली.
फा पोस्ट आवडली.
पण उत्तरेत औरंगजेब अन्यायकारी धर्मांध म्हणून माहित नसेल असं वाटत नाही. कारण ते प्रदेश त्याच्या डायरेक्ट अंमलाखाली होते व तिथे जिझीया वगैरे प्रचलित होते (जे महाराष्ट्रातल्या देवळांसाठी होते का नाही माहित नाही) . महाराज आग्र्याहून सुटल्यावर साधारण एका दशकात काशीच्या विश्वनाथाचा विध्वंस केला गेला.
मला वाटतं उत्तरेत संभाजी राजे फारसे माहित नव्हते. त्यामुळे त्यांचे शौर्य किंवा त्यांचा मृत्यू याबद्दल माहित असण्याचे कारणच नाही. जसे आपल्याला लछित बोरफुकनबद्दल किंवा कित्तुरच्या चेन्नमाबद्दल माहित नाही. लोकांची जनरीक रिॲक्शन अशी की तुम्ही बाबरपासून मुघलांच्या वंशावळी सांगता पण एतद्देशीय राजांबद्दल आम्हांला काही माहितीच नाही.
बाकी अस्मिता म्हणते तसे आपल्या राजकिय विचारसरणीला सोयीस्कर इतिहास उचलून धरणे वगैरे पॉईंट आहेतच.
माधव, काइट रनर रिव्ह्यू आवडला
माधव, काइट रनर रिव्ह्यू आवडला.
मी याचा अनुवाद वाचलाय.
हो, 'तो' प्रसंग पुस्तकात फारच वेगळा आणि भयंकर आहे.
Submitted by माधव on 7 March,
Submitted by माधव on 7 March, 2025 - 18:54
आवडला रिव्ह्यू.
भारतात कुठे पाहता येईल ?
छावा चित्रपट बघून लोकांची
छावा चित्रपट बघून लोकांची क्युरिऑसिटी जागी झाली आणि त्यांनी उत्खनन सुरू केलं.
@ लिंक- आपल्याकडे मूर्खांची
माझेमन, वाचलं.
@ उत्खनन लिंक- आपल्याकडे मूर्खांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुद्धा जरा जास्तच आहे. वरवर वाचलं.
माधव यांनी सुचवलेला 'काईट रनर' अमेरिकेत प्राईमवर सापडला नाही पण पॅरामाऊंटवर दिसतोय. माझ्याकडे पॅरामाऊंट नाही.
राभु, स्टोरीटेलर नोट केला आहे. धन्यवाद. पोच द्यायची राहून गेली होती.
नादानियांचे रिव्ह्युज वाचून
नादानियांचे रिव्ह्युज वाचून मस्त करमणूक होते आहे.
Thanks @ Asmita
Thanks @ Asmita
काईट रनर मला सापडला प्राईम वर. पण सबस्क्रीप्शन रिन्यू करताना त्यांनी काही तरी गडबड केली. महिन्याचं न घेता अॅन्युअल घ्या म्हणून आग्रह करताना जे दिलं त्यात लॅपटॉपवर बघता येत नाही. आता फक्त टिव्ही किंवा मोबाईल. टिव्हीच्या पुढे दोन तास बसून सिनेमा पाहणे आता जमणे शक्य नाही.
मजबुरी का नाम मोबाईल गांधी म्हणून प्रवासात मोबाईलवर बघावे लागतात सिनेमे. घरी असताना ऐसपैस लॅपटॉपला माऊस जोडून, दहा बारा विंडोज ओपन करून मल्टीटास्किंग करत सिनेमा बघायची जी सवय जडलीये ना ती या जन्मात जाणार नाही. हल्ली थेटरमधे पण हाताला चाळा नसेल तर चुळबुळ होते खूप 
छावा चित्रपट बघून लोकांची
छावा चित्रपट बघून लोकांची क्युरिऑसिटी जागी झाली आणि त्यांनी उत्खनन सुरू केलं. >>>
मागे लिहायचे राहून गेले ते
मागे पाहिलेल्या सिनेमांचे माझे दोन पैसे
१. अग्नी
हा चित्रपट प्राइमवर बघितला . मुंबई अग्निशमन दल , त्यांचं जीवन , अडचणी , संघर्ष यावर आधारित आहे. त्याला एक कॉन्सपिरन्सी ची जोड दिली आहे. सिनेमाचा विषय वेगळा आणि आवाका मोठा होता . पण संघर्ष दाखवू की कट दाखवू यात दिग्दर्शकांचा गोंधळ उडल्याने कुठलीच बाजू नीट दिसत नाही. एक चांगला सिनेमा होता होता राहिला
१. सिक्स ट्रिपल ऐट
हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहिला . दुसरे महायुद्ध सुरू असताना महिला सैनिकही आपले योगदान देत असतात . पण या महिला सैनिकामध्येही कलर्ड आणि नॉन कलर्ड असा भेदभाव केला जातो. कलर्ड महिलांची दाखलही घेतली जात नाही . असून नसल्यासारखी ट्रिटमेंट मिळते . शेवटी कलर्ड तुकडीचा कॅप्टनने रूझवेल्टपर्यत पाठपुरावा केल्यानंतरच त्यांना काम मिळते . काम कुठले तर युद्धावर लढत असलेल्या सैनिकांना त्यांच्या घरच्याची पत्रे पोचवायचे. त्याचाही बॅकलॉग असतो . तो भरून काढायचा तीन महिन्यात . वरवर सोपे वाटणारे हे काम प्रत्यक्षात किती कठीण असते , ते काम करताना व्यावसायीक अडचणी , गोऱ्या वरिष्ठांचा असहकार, काम कसे फेल जाईल याची वाट पाहणारे हितशत्रू य सगळ्यातून वाट काढत कलर्ड महिला तुकडी आपले मिशन एकंप्लिश्ड करते . मात्र हा पर्वत उचलल्यानंतरही या तुकडीला ड्यू क्रेडिट मिळत नाही . चित्रपटाच्या शेवटी मिशेल ओबामांनी दखल घेतली असा उल्लेख आहे . एकदा नक्कीच बघावा असा सिनेम आहे.
3. carry on
हा ही नेटफ्लिक्सवर बघितला . एका विमानतळ तपासणी अधिकाऱ्याला धमकावून केमिकल अस्त्रे वाहतूक करण्याचा प्लान असतो . नेहमीप्रमाणे अमेरिकेला धोका असतो. तो अधिकारी यातून. कसा मार्ग काढतो त्याची कथा म्हणजे हा सिनेमा . टिपिकल हॉलिवूड मूव्ही .
4. सिकंदर का मुक्कदर
नीरज वोराचा फसलेला सिनेमा ह्याच शब्दात वर्णन करता येईल . एकेकाळचा आय कँडी जिमी शेरगिल आता वयस्कर दिसू लागला आहे हे एडिशनल दुःख
नादानियांचे रिव्ह्युज वाचून
नादानियांचे रिव्ह्युज वाचून मस्त करमणूक होते आहे >>>
अगदी अगदी. त्यात कुणीतरी ट्विटरवर एक सीन टाकलाय. तो पाहून तर या नेपो किडस् साठी मुक चित्रपट असावे का काय विचार येतोय मनात.
अस्मिता पोच दिल्याबद्दल आभार. ही सवय लावून घेतली पाहिजे.
एकेकाळचा आय कँडी जिमी शेरगिल आता वयस्कर दिसू लागला आहे >>> अरेरे. जाऊ दे. आपण त्याचे जुने पिक्चर बघू.
मला काईटरनर खुपच आवडलेला.
मला काईटरनर खुपच आवडलेला. इर्षा, मत्सर, वगैरे कशी जीवनाची दिशा बदलतात.. असे पैलु छान दाखवलेत.
तसाच तो आणखी एक सुंदर मूवी आहे, चिल्ड्रेन ऑफ हेवन. रडयलाच येते. खुप जुने आहेत. बहुतेक ऑस्कर मिळालं का नॉमिनेटेड होते. लक्षात नाही.
पर्सियन मूवी मध्ये आणखी एक छान मूवी आहे, सेल्समन.
बरेचसे इराणी मूवी मस्त वाटतात.
सिनेमा कसा बघायला आवडतो ही
सिनेमा कसा बघायला आवडतो ही प्रतिक्रिया योग्य धाग्यावर हलवावी म्हणून आले तर चार तास कधीच उलटून गेलेत.
पण अशा गंमतखेळाचा धागा नाही याचं आश्चर्य वाटलं.
बघुया तरी नविन नेपो किड्स कसे
बघुया तरी नविन नेपो किड्स कसे आहेत म्हणून नादानिया लावला....अर्र!! दोन्ही पोराचा आणी अभिनयाचा मैलो न मैल काहिही सबध नाही...१० मिनिटच...बस्स!एवढाच बघितला तेवढ्यात सुद्धा जे काय चालु होत ते अचाट अन अतर्क्यच होत.
दोन्ही पोराचा आणी अभिनयाचा
दोन्ही पोराचा आणी अभिनयाचा
>>> अभिनय आणि डायलॉग डिलीव्हरीचा.
पिक्चरचा व कथेचा, संवादलेखक व सेन्सचा आणि या सगळ्यांचा डायरेक्शनशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. मी ही पिसं काढायला म्हणून सुरू केला होता. आणि झोपले
लेट नाइट - प्राइम.
लेट नाइट - प्राइम.
इतके दिवस ब्राउज करताना दिसत होता. एमा टॉम्सन खूप नावाजलेली आहे हे माहीत आहे पण मी तिचे फारसे पिक्चर्स पाहिलेले नाहीत. मिंडी केलिंग माहीत आहे पण आत्तापर्यंत जितकी पाहिली आहे त्यात मला काही खास आवडले नव्हते तिचे काम. इव्हन "द ऑफिस"चे ही काही भाग फक्त तुकड्यांत पाहिले आहेत. . त्यामुळे काही खास इंटरेस्ट वाटला नव्हता आवर्जून बघायला.
पण काल अस्मिताने रेको दिले आणि काल वेळही होता. त्यामुळे सहज लावला आणि लगेच एंगेज झालो. खूप आवडला. लाइट प्रोफेशनल कॉमेडी असे काहीतरी स्वरूप म्हणता येईल. या दोघींची कामे मस्त आहेतच पण बरेच सहकलाकारही चांगले आहेत - जॉन लिथगो आहे. एमी रायन (हिचे विकीवरचे आडनाव उच्चारायचा प्रयत्न केला व सोडून दिला) ही "द वायर" सिरीज मधे बराच रोल असलेली कलाकार इथे छोट्या भूमिकेत आहे. आणि त्यांच्या "रायटर्स टीम" मधले तीन चार जण कोठेतरी पाहिल्यासारखे वाटतात - त्यातल्या दोघातिघांची कामेही मस्त आहेत आणि त्यांचे रोलही सुंदर लिहीले आहेत.
कॅथरीन न्यूबेरी (एमा) ही यातील चॅनेलवर डेली टॉक शो चालवत असते. वर्षानुवर्षे चांगले रेप्युटेशन असलेला शो असतो पण "जेडेड" झाल्यामुळे रेटिंग घसरत चाललेले असते. त्यात ही कॅथरीन सोशल मिडियापासून ते सर्व नवीन मीडिया ट्रेण्ड्सशी फटकून असते. सहकार्यांशी वागण्याच्या बाबतीत तिचे एकूण कॅरेक्टर "डेव्हिल वेअर्स प्राडा" मधल्या मेरील स्ट्रीपसारखे थोडेफार आहे. तिला आपल्या शो मधे सांगायच्या गोष्टी लिहीणीर्या लेखकांची नावेही माहीत नसतात. मग तिच्याजागी नवीन टॉक शो होस्ट घेणार हा निर्णय चॅनेलचे लोक घेतात व आपला शो वाचवायचे हिचे प्रयत्न, तिच्या टीम मधे एक तरी स्त्री असावी म्हणून त्याच वेळेस इंटरव्यू करता आलेल्या मॉलीला (मिंडी) घाईघाईने निवडणे, त्यातून इतर टीमचा रोष - हे सगळे दाखवले आहे.
पण हे सगळे दाखवताना खूप रंजक पद्धतीने दाखवले आहे. खरी मजा त्यात आहे. मला सर्वात आवडले ते त्या रायटर्स टीममधले संवाद.
तेव्हा माझा फुल रेको. अस्मिता धन्यवाद - तू ही लिही.
लिहितेय.
काल दुपारी प्राईमवर 'लेट नाईट' पाहिला. फारच धमाल आहे. आधुनिक पद्धतीने मांडलेला रॉ विनोद आहे. विनोदाबाबत 'हे विश्वची माझे घर' असणाऱ्यांनी जरूर पाहावा, संकुचित दृष्टिकोन असणाऱ्यांना मात्र झेपणार नाही. 'टू मच' वाटेल.
खूप एंगेजिंग आहे, छोट्या छोट्या गोष्टींतूनही विनोदनिर्मिती केली आहे. एकुण भट्टी जमली आहे. एमा थॉम्सन प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आहे पण तिला ब्रूटल किंवा क्रूर वाटावा असा विनोद फार मस्त जमतो. या आधीही क्रूएलात सावत्र वाटावी अशी सख्खी आई तिने जबरदस्त साकारली होती. येथे मला पुष्कळ ठिकाणी क्रुएलाची आणि फा म्हणतोय तशी 'डेव्हिल वेअर्स प्राडा'ची आठवण आली.
पूर्ण आयुष्य करिअरला वाहून घेतलेल्या मुलंबाळं नको असलेल्या छप्पन वर्षांच्या स्टँड अप कॉमेडियनची तिच्याच शो वरून हकालपट्टी होणार असते. त्या शो शिवाय तिला दुसरी फारशी ओळख नसते, मित्रमैत्रिणी नसतात. स्वभाव प्रचंड उद्धट व तुसडा असतो. सगळे पुरुष हाताखाली ठेवून 'उठता लाथ बसता बुक्की' या धाकात ठेवलेले असते आणि फक्त वुमन ऑफ कलर -डायव्हर्सिटी हायर म्हणून मिंडीला लेखक म्हणून घेते. त्या आधी तिच्याशिवाय एकही स्त्री तेथे नसते. मिंडीलाही विनोदी लेखनाचा काडीमात्र अनुभव नसतो. त्यामुळे तिलाही सिद्ध करायचे असते, नुसते अमेरिकन भारतीय स्त्री म्हणून नाही तर लेखिका म्हणूनही.
अत्यंत तुसडी बॉस आणि सगळेच पुरुष सहकारी यात तिला जुळवून घ्यावे लागते ते फारच धमाल आहे. चित्रपट अगदी धारदार फेमिनिझम दाखवतो, इतका धारदार की कापलेलेही कळू नये. *स्लट शेमिंग, एज शेमिंग, जेंडर स्टिरिओटाईप, रेशियल स्टिरिओटाईप सगळं सगळं आहे पण ते एकदम स्वाभाविकरित्या येणाऱ्या विनोदांतून दाखवले आहे.
त्यातही दोघींचा बॉन्डही डेव्हलप होताना छान दाखवलं आहे. एरवी स्त्रिया सोशल कंडिशनिंग मुळे पुरुषांना प्रोत्साहन देतील पण दुसऱ्या स्त्रीला खास करून खरोखरच काही तरी चुणूक दाखवणाऱ्या व वेगळे काही तरी करण्याची धडपड करणाऱ्या स्त्री 'हंबल डाऊन' करण्याची जबाबदारी मानून कमी लेखतील अशी परिस्थिती असते. त्यामुळे मला पर्सनली एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला साथ देते आहे हे पाहायला आवडले. यात कसलाही आव आणलेला नाही हे विशेष.
त्यातील एक स्त्री जवळजवळ नीच वाटावी इतकी स्वार्थी व बेदरकार आहे, त्यामुळे तीही एक गंमत आहे. सर्व सहकलाकार अगदी चपखल. ऑफिसमधला विनोदही भन्नाट जमला आहे. सगळ्यांचेच काम सफाईदार झाले आहे, शिवाय टायमिंग जुळून आले आहे. नक्की बघा.
*स्लट शेमिंग - पुरुषांनी एखादे विवाहबाह्य प्रेमप्रकरण केले की त्याला समाजाने समजून घेणे, तेच एका स्त्रीने केले की तिला व्यभिचारी ठरवून आयुष्यातून उठवण्यासाठी हातभार लावणे.
----------------------
फा, मिंडी केलिंग बाबत हेच मत आहे माझेही पण जे काही थोडेफार पाहिलेय त्यावरून ती एक अभिनेत्रीपेक्षा लेखिका म्हणून जास्त चांगली आहे असे वाटते. ह्या चित्रपटाचे लेखन तिचेच आहे. दिग्दर्शन कुणी तरी निशा गनात्रा हिने केले आहे. हा चित्रपट स्त्रीप्रधान म्हणता येईल पण ते लक्षात न येण्याइतकी सफाई कथेत ओवली आहे. .
छान लिहिले आहेस अस्मिता
छान लिहिले आहेस अस्मिता ,पिच्चर बघायला हवा.तुझ्या या धाग्यावरच्या अश्या चित्रपटांच्या पोस्टीं हुडकून हुडकून सेव्ह करायला हव्या.
लेट नाईट नोट केला आहे.
लेट नाईट नोट केला आहे.
मागची लिस्ट पेंडिंग आहे. ती संपली कि नवीन.
तरीपण प्राईम आणि हॉटस्टार साठी रेको द्या.
फा आणि अस्मिता, दोघांचे
फा आणि अस्मिता, दोघांचे रिव्ह्यू आवडले. नोट केला आहे सिनेमा.
ज्याला बेस्ट पिक्चर,
ज्याला बेस्ट पिक्चर, अभिनेत्री, दिग्दर्शक, स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर अवॉर्डस मिळाली आहेत तो Anora बघितला प्राईमवर (रेंट करून).
मला तरी खूप भारी नाही वाटला. कदाचित माझ्या अपेक्षा खूप जास्त असतील. सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ट आहे. वेगवान चित्रपट आहे. पण सिनेमा संपल्यावर हाती काही लागलं नाही असं वाटलं.
Anora ही न्यूयॉर्कमधे स्ट्रिपर आहे. तिथे वान्या हा २१ वर्षांचा रशियन अतिश्रीमंत मुलगा येतो. ॲनोराला रशियन भाषा येते म्हणून त्याच्यासाठी तिला निवडलं जातं. त्याला ती आवडते. इथे 'आवडते'चा अर्थ स्ट्रिपर म्हणून आवडते. तो तिला घरीही बोलवायला लागतो वेगळे पैसे देऊन. मग एका आठवड्यासाठी तो तिला आपल्यासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर राहण्याची ऑफर देतो. तीही येते. त्या आठवड्यात ते सगळे लास वेगासला जातात आणि तिथे त्याला कल्पना सुचते की त्याने जर अमेरिकन मुलीशी लग्न केलं तर त्याला अमेरिकेतच राहता येईल. म्हणून तो तिला लग्नासाठी विचारतो, ती हो म्हणते आणि ते लग्न करतात. न्यूयॉर्कला परत येतात. त्याच्या रशियन वडिलांना कुठून तरी ही बातमी कळते आणि ते त्यांच्या माणसांना, ज्यांच्यावर याची तथाकथित जबाबदारी असते, त्यांना हे प्रकरण निस्तरायला सांगतात. हे 'प्रकरण निस्तरणे' विनोदी आहे. म्हणजे विनोदी प्रकारे दाखवलेलं आहे.
शेवट मला तरी कळला/झेपला नाही. मला एकंदरीत तिचं पात्र झेपलं नाही.
सुरुवातीला बराच वेळ अत्यंत explicitly दाखवलेली दृश्यं आहेत. आम्ही मुलं झोपलेली असताना पाहिला
मी फारसे इंग्रजी चित्रपट बघत नाही. पण बेस्ट पिक्चरचं बक्षीस मिळालेले जे काही हॉलीवूडचे सिनेमे मी बघितले आहेत (उदा. फॉरेस्ट गम्प, सेव्हिंग प्रायव्हेट रायन, डिपार्टेड, लाईफ इज ब्युटिफुल इत्यादी) त्या मानाने हा मला भारी वाटला नाही. पण अशी तुलना करणं बरोबर नसावं.
ज्याला बेस्ट पिक्चर,
ज्याला बेस्ट पिक्चर, अभिनेत्री, दिग्दर्शक, स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर अवॉर्डस मिळाली आहेत >>> असे सिनेमे बहुतेक वेळा झेपणेबल नसतात. झेपले तर त्यात अवॉर्ड मिळण्यासारखे काय होते ते कळत नाही. त्यांची तुलना आपल्याकडल्या 'सूरज का सातवा घोडा', 'त्रिकोन का चौथा कोन' (याचे नावही झेपले नाहीये मला अजून) , 'खंडहर' अशा सिनेमांशी होऊ शकेल.
अर्थात अपवाद असतातच.
सूकासाघो बघताना झोप लागली
सूकासाघो बघताना झोप लागली होती.
माधव, राभु आणि सिमरन...
माधव, राभु आणि सिमरन... थॅंक्यू.
मला 'इंटरनॅशनल वुमेन्स डे' दिवशी चोहोबाजूंनी झालेल्या शुभेच्छांच्या भडिमारातून काहीतरी सुस्पष्टता देणाऱ्या मॉडर्न फेमिनिझमबद्दल लिहावे वाटले. ते योगायोगाने त्या सिनेमात होतेच.
सिमरन, थॅंक्यू-थॅंक्यू. माझ्या ब्लॉगवर इथले जवळजवळ सगळे लेखन आहे. इथल्या लिंक्सही तेथे दिल्या आहेत. त्यामुळे इथली चर्चा/ गप्पा वाचता येईल/ येतील.
सूकासाघो बघताना झोप लागली
सूकासाघो बघताना झोप लागली होती. >>>>
झोपणेबल..!
त्रिकोन का चौथा कोन' (याचे नावही झेपले नाहीये मला अजून) >>>>
Anora बद्दल ऐकलं/ वाचलं आहे बहुतेक. नक्की आठवत नाही.
माधव, माझ्या प्रतिसादातला
माधव, माझ्या प्रतिसादातला शेवटचा भाग पहा
एका मित्राने प्रहसन बनवलं
एका मित्राने प्रहसन बनवलं होतं आर्ट फिल्म्स वर.
"गधा जा रहा है, ना राईट ना लेफ्ट "
तसा नाहीये Anora. माझं
तसा नाहीये Anora. माझं लिहिताना कदाचित काही तरी चुकलंय. तिचं पात्र मला consistent आणि पटण्यासारखं वाटलं नाही असं मला म्हणायचं आहे.
नादानियां बघायला सुरुवात केली
नादानियां बघायला सुरुवात केली. सुरुवातीला खुषी कपूरच्या आवाजात जे नॅरेशन आहे, त्यात या सिनेमाच्या पात्रांबद्दल आणि वातावरणाबद्दल , तिरकस कमेंट्स आहेत. १७ वर्षांची हायफाय शाळेतली मुलं. अशा शाळा ऐकूनच माहीत आहेत. धीरु भाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल एक असावी. स्टुडंट ऑफ द इयर मध्येही अशीच शाळा होती ना? आता ऋषी कपूर नाही म्हणून कुछ कुछ होता है मधली अर्चना पूरण सिंग तिथल्या नावासकट आणली आहे. आणि तिला डंबलडोर करायला लावला आहे. ते बघितल्यावर हॉगवर्ट्झ इथली पात्र ड्रॅको मॉल्फॉय इ.वरून बेतलेली दिसली. निर्माता, लेखक , दिग्दर्शकावर Petrificus Totalus स्पेल सोडावासा वाटला.
खुशी श्रीदेवीची जान्ह्वीपेक्षाही पुसट कॉपी आहे. इब्राहम अली खानचा आवाज नक्की त्याचाच आहे का, असं वाटत राहिलं. त्याचा चेहरा इस्र्री केल्यासारखा कोरा करकरीत. त्याचं पात्र साध्या शाळेतून हायफाय शाळेत आल्यावर पहिल्याच दिवशी तिथल्या मुलाशी पंगा घेतं. डिबेटिंग टीमचा कॅप्टन म्हणून स्पर्धेत सगळ्यांना चुटकीसरशी आपल्या बाजूला केल्यावर शर्ट वर करून आपले सिक्स पॅक अॅब्ज दाखवतं. सतराव्या वर्षी अॅब्ज! का ? तर खुशीला फेक बॉयफ्रेड म्हणून तो पसंत पडावा.
कुछ कुछ होता है मधली अर्चना
कुछ कुछ होता है मधली अर्चना पूरण सिंग तिथल्या नावासकट आणली आहे. आणि तिला डंबलडोर करायला लावला आहे. ते बघितल्यावर हॉगवर्ट्झ इथली पात्र ड्रॅको मॉल्फॉय इ.वरून बेतलेली दिसली. निर्माता, लेखक , दिग्दर्शकावर Petrificus Totalus स्पेल सोडावासा वाटला.
>>>>>
मिस ब्रिगँझा-मिस्टर मलहोत्रा का काय?? मला वरच्या 'नादानियां'च्या कंमेट दुसऱ्या दिवशी कळाल्या. नेटफ्लिक्सने मला गाठलेच शेवटी. अशी शाळा त्या 'आर्चीज्' सिनेमातही होती. खुशी विचित्र दिसते-बोलते, इब्राहीम अली खान सैफचे क्लोन आहे तेही डाऊनग्रेडेड. ही नेपो मंडळी खऱ्या जगापासून दूर एका बबलमधे राहिल्यासारखी वाटतात. त्यांचे आईबाबा तसे वाटायचे नाहीत. 'बॉर्न विथ अ सिल्वर स्पून' मुळे कदाचित यांची देहबोली, संवादफेक त्यात वर कॉस्मेटिक ट्रीटमेंट यामुळे त्यांचे काहीही नैसर्गिक वाटत नाही. आर्चीज मधे तर शाखा कन्या सुहानाही होती. त्यात सुहाना व खुशी एकमेकींना खूप वर्षांनी भेटून अत्यानंदाने किंचळतात असा सीन होता तर ती किंकाळी चक्क हॉरर सिनेमाची होती. त्यामुळे माझं कुत्रंही अवाक होऊन टिव्हीकडे बघू लागलं. 
Pages