Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
लेट नाइटचा रिव्यू आवडला
लेट नाइटचा रिव्यू आवडला अस्मिता.
हा चित्रपट स्त्रीप्रधान म्हणता येईल पण ते लक्षात न येण्याइतकी सफाई कथेत ओवली आहे. . >>> टोटली. त्यातील फेमिनिजम अँगल लिहायचा मी विसरलो होतो. त्या दिवशी पाहताना हेच जाणवले की महिला दिनाकरता हा एकदम चपखल चित्रपट आहे.
या लोकांचे ऑफसमधले बॅण्टर एकदम स्मार्ट लिहीलेले आहे. ज्या क्षेत्रात महिला जास्त नसतात तेथील पुरूष सहसा कसे वागतात, त्यांचे संवाद, अशा ठिकाणी वोक जनरेशन मधली एक मुलगी जर आली तर सुरूवातीला तिची होणारी प्रतिक्रिया, एखादे साधे वाक्य आपण ऑफेण्ड होऊ अशाच रीतीने इंटरप्रिट करणे (ती तिच्या टेबलाखाली बसून रडत असते तेव्हा तिचा सहकारी येउन तिच्याशी बोलतो तो सीन), प्रिविजेज्ड् क्लासमधल्या लोकांच्या चुकीच्या पण साहजिक कॉमेण्ट्स, आणि हळुहळू त्यांच्यातही होणारे बदल - सगळे चपखल आहे आणि धमालही. त्याबद्दल मात्र मिंडी केलिंगला सॉलिड क्रेडिट आहे. ती असे लिहीत असेल तर तिचे इतर शोज पाहायला हवेत.
निशा गणात्राचे नाव नंतर दिसल्याचे आठवते. तिच्याबद्दलही काही माहिती नाही.
झोपणेबल आणि झेपणेबल
झोपणेबल आणि झेपणेबल
दोन मस्त शब्द बनले.
वरच्या नादानियाच्या पोस्टस वाचल्या. धाकट्या बहीणीने पाहिलाय.
तिचा रिव्ह्यू एका वाक्याचा होता. "दोघांच्या नाकांची केमिस्ट्री जमलेली नाही"
अंदाज आला पण नाकासाठी थोडा तरी बघणं आलंच.
नाहीतर अजिबात विचार नव्हता पहायचा.
त्यामुळे माझं कुत्रंही अवाक
त्यामुळे माझं कुत्रंही अवाक होऊन टिव्हीकडे बघू लागलं.
>>>>
त्याचा चेहरा इस्र्री
त्याचा चेहरा इस्र्री केल्यासारखा कोरा करकरीत >>> मलाही तसाच वाटला जे काय ५-१० मिनिटे पाहिला त्यात. सैफची छाप मात्र आहे.
'बॉर्न विथ अ सिल्वर स्पून' मुळे कदाचित यांची देहबोली, संवादफेक त्यात वर कॉस्मेटिक ट्रीटमेंट यामुळे त्यांचे काहीही नैसर्गिक वाटत नाही. >>> हो. मला हे लोक बघायला जाम बोअर होते आजकाल.
अनोराबदलची पोस्ट इंटरेस्टिंग आहे, वावे. कथेततरी काही नावीन्य दिसत नाही. हॉलीवूडचे एक्स्प्लिसिट (दीर्घ खेचलेली र्हस्व वेलांटी आलेली दिसते) सीन्ससुद्धा भयानक बोअर असतात आजकाल, एका साच्यातून काढल्यासारखे. बाकी ऑस्करवाले पिक्चर न झेपणे हे कॉमन आहे
त्यांच्या आवडी सर्वसामान्य प्रेक्षकांपेक्षा वेगळ्या असणे हे ही. बर्याचदा तंत्रातील बदल चांगल्या रीतीने सादर करणे, तत्कालीन प्रचलित वोक्/डावे विषय, कधीकधी एखाद्या कल्चरचे पॅण्डरिंग अशा बर्याच गोष्टी त्या अॅकेडेमीवाल्यांच्या एकत्रित आवडीनिवडीत दिसतात. त्याचा आपल्यासारख्यांना तो पिक्चर अगदी ग्रिपिंगच काय पण इव्हन बघणेबल असण्याशी संबंध असतोच असे नाही
हे माझे वैयक्तिक मत लिहीतोय पण नाहीतरी इथली प्रत्येक पोस्ट व लेख हेमावैमच असतात 
त्यामुळे माझं कुत्रंही अवाक
त्यामुळे माझं कुत्रंही अवाक होऊन टिव्हीकडे बघू लागलं. >>>
पण त्यामुळे यांच्या पिक्चर्सना कुत्रंही विचारत नाही असे म्हणता येणार नाही
वावे, अनोरा बद्दल रविवार
वावे, अनोरा बद्दल रविवार महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेला लेख
https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/oscar-2025-anora-wins-bi...
चित्रपटाचं वेगळेपण हेच त्याच बलस्थान आहे असा सूर आहे त्या परीक्षणात .
चित्रपटात एक्सप्लिसिट दृश्ये वारंवार असल्याने माझ्याकडून तरी बघितला जाणे कठीण आहे
लिंकसाठी धन्यवाद जाई! अनेक
लिंकसाठी धन्यवाद जाई! अनेक बाबतीत मला त्यातलं म्हणणं पटलं!
प्रिटी वुमनची आठवण मलाही खूप वेळा झाली हा पिक्चर बघताना (अर्थातच). त्यात ज्युलिया रॉबर्ट्सचं पात्र convincing वाटतं. इथे हिचं वाटत नाही. अभिनयाचा प्रश्न नाही, तो उत्तम आहे.
माझ्या प्रतिसादातला शेवटचा
माझ्या प्रतिसादातला शेवटचा भाग पहा >>> मी Anora पाहिलेला नाही, पाहीन की नाही ते पण माहित नाही. पण तुलना करण्यात काहीच चूक नाही. अकॅडमीला वाटले म्हणून आपल्यालाही ते चित्रपट आवडलेच पाहिजेत असे मुळीच नाही. अकॅडमीवाले पण हुशार आहेत - मध्येमध्ये खरोखर चांगल्या चित्रपटांना बक्षीस देऊन आपली पत राखत असतात.
नादानीया १५ मिनीटांवर बघणे अशक्य झाले मला. सिनेमा कसाही असेल पण ३ इडियट्स मध्ये अमीरला पडलेला प्रश्न खरा होता असे त्या हिरो-हिरवणीला बघून समजले - नाक मध्ये येणारच !
लेट नाइट लिस्टीत होताच बघायचा
लेट नाइट लिस्टीत होताच बघायचा. बघेन आता लवकरच.
बाकी फा, मिंडी कॅलिंग ची एक सीरीज आहे नेफ्लि वर - मिंडी प्रोजेक्ट. मस्त आहे.
https://youtu.be/LcKf9DHwN5I?si=gVqRN4yDvlx3tYvK
(ऑफिस मीट्स सेक्स अँड द सिटी म्हणवे का ? )५ की ६ सीझन आहेत . मी अधून मधून लाइट बघायचा मूड असेल तर बघत असते.
मी काही दिवस पाहिली होती
मी काही दिवस पाहिली होती मिंडी प्रोजेक्ट, शिवाय 'सेक्स लाईफ ऑफ कॉलेज गर्ल्स' आणि 'नेव्हर आय हॅव एव्हर' याचीही तीच रायटर-प्रोड्युसर आहे बहुतेक.
या लेट नाईटच्या पोस्टला अगदी, अगदी - फा.

हॉलीवूडचे एक्स्प्लिसिट (दीर्घ खेचलेली र्हस्व वेलांटी आलेली दिसते) सीन्ससुद्धा भयानक बोअर असतात आजकाल, एका साच्यातून काढल्यासारखे. >>>>
+१ हो, रटाळ गाण्यांप्रमाणे फाफॉ करते मी तर. मला वाटू लागले वय झाले की काय.
माधव, माझ्याही मनात'नाक बिच में आ जाती है' आले होते.
बाकी फा, मिंडी कॅलिंग ची एक
बाकी फा, मिंडी कॅलिंग ची एक सीरीज आहे नेफ्लि वर - मिंडी प्रोजेक्ट. मस्त आहे. >>> हो आठवली. ती रिलीज झाली तेव्हा मी उत्सुकतेने एक भाग थोडा पाहिला होता असे आठवते. तेव्हा आवडली नव्हती काही खास. पण २-३ भाग बघेपर्यंत चेक केली नव्हती. आता तिची ह्यूमर स्टाइल समजल्यावर पुन्हा बघेन.
त्या खुशी कपूर व सुहाना खान मधे साम्य आहे, की मला "मुझे तो सब नेपो किड्स की सूरते एक जैसी दिखती है" होत आहे माहीत नाही. काल मला आधी "आर्चीज" सुरू आहे असेच वाटले.
मला वाटू लागले वय झाले की काय
मला वाटू लागले वय झाले की काय >>>
इण्डोअर रोमान्सही तसाच. तोच पास्ता, तेच सॅलड, तीच वाइन (इव्हन बाटलीही नवी नसेल, त्यामुळे नव्या बाटलीत जुनी दारू असेही म्हणता येणार नाही). मग त्या मोठ्या सॅलड मधे काहीतरी ग्रेटेड चीज वगैरे टाकताना दाखवणे - वरवरचे काहीतरी. मग वाइन ग्लास उचलून एक रोमॅण्टिक किस वाला सीन. नंतर कॅण्डललाइट मील. पन्नासएक पिक्चर्स मधे हे येउन गेले आहे. ६०ज च्या मराठी कादंबर्यांत जसे सांद्र संगीत तसे हॉलीवूडचे रोमॅण्टिक डिनर म्हणजे इटालियन.
हे मी मागे लिहीले तेव्हा असाम्याने तु.क. टाकत काही लिहीले होते. आता आठवत नाही
पास्ता अगेन
पास्ता अगेन
लेट नाईटचा रेको घेतला आहे. पण
लेट नाईटचा रेको घेतला आहे. पण तूर्तास माझ्याकडे प्राईम नसल्याने माझा पास
गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर 'Under Suspicion' नावाचा पिक्चर पाहिला. जीन हॅकमन आणि मॉर्गन फ्रीमन यांचा अप्रतिम अभिनय ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. वास्तविक ड्रामा थ्रिलर पिक्चर्स पहायचा माझा पिंड नाही. तरीही मला हा पिक्चर आवडला. हॅकमन हा श्रीमंत टॅक्स अटर्नी आहे. शहरातली ती एक आदरणीय व्यक्ती आहे. त्याला चौकशीसाठी म्हणून कॅप्ट्न असलेला मॉर्गन पोलिस चौकीत बोलावून घेतो. हॅकमनला आदल्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडलेला असतो आणि त्याने पोलिसांना तसं रिपोर्ट केलेलं असतं. त्यासंदर्भात चौकशी सुरू होते आणि हॅकमनच्या जबानीतल्या फटी उघड्या होऊ लागतात. त्यातच अजून एका मुलीचा आठवड्यापूर्वी तश्याच पद्धतीने खून झालेला असतो. संशयाची सुई हॅकमनकडे भराभर सरकत जाते. या चौकशीतून वरवर सोन्याचं भासणारं हॅकमनचं आयुष्य बेगडी, तकलादू आहे हे उघड होऊ लागतं. खुनाचा तपास वाटणारी स्टोरी नात्यांमधली गुंतागुंत समोर आणते. पुढे काय होतं? हॅकमननेच खून केलेले असतात का? या सगळ्या तपासाचा शेवट नेमका कशात होतो? हे सांगणारा हा पिक्चर. शेवटी Under Suspicion हे शीर्षक नेमक्या कुठल्या Suspicion बद्दल दिलं असावं हा विचार करायला चित्रपट भाग पाडतो.
लौकीकार्थाने मर्डर मिस्ट्री नसला तरी पिक्चर उत्तम आहे. माझ्याकडून रेको.
इथल्या महिलांनी नादानियां
इथल्या महिलांनी नादानियां आजिबात बघू नका, एके काळचा क्रश जिम्मि शेर्गिल वधुपित्याच्या भूमिकेत पाहून डिप्रेशन येइल.
त्या खुशी कपूर व सुहाना खान
त्या खुशी कपूर व सुहाना खान मधे साम्य आहे, की मला "मुझे तो सब नेपो किड्स की सूरते एक जैसी दिखती है" होत आहे माहीत नाही. >>> सुरत मधे काही साम्य नाही पण सिरत मधे असेल...दोघिही भन्गार अॅक्तिन्ग करतात..दोघिही दिसायला अॅव्हरेज आहेत...
खुशी पेक्षा जान्हवी अॅक्तिन्ग आणी दिसण्यात उजवी आहे.
त्याचं कारण फेक अनरिअलिस्टिक
६०ज च्या मराठी कादंबर्यांत जसे सांद्र संगीत तसे हॉलीवूडचे रोमॅण्टिक डिनर म्हणजे इटालियन.
जेवत पण नाहीत ते, थोडं खाल्ल्यासारखं करून डायरेक्ट 'कामाला' लागतात. असं पानात टाकून देऊ नये, पोटभर जेवून मग काय करायचे ते करावे. ममव अलर्ट.
>>>>
सुरत मधे काही साम्य नाही पण सिरत मधे असेल...दोघिही भन्गार अॅक्तिन्ग करतात.. >>>> ते तर आहेच शिवाय -
सारखं दिसण्याचं कारण फेक अनरिअलिस्टिक ब्यूटी स्टँडर्ड आणि सगळ्यांचा कॉस्मेटिक सर्जन एकच असणं असू शकतं. जबडा- हनुवटी (चिझेल्ड, तासलेली), जिवणी रूंद-जाड, ऱ्हायनोप्लास्टी(नाक बारीक शेंडा उंच) वगैरे केल्याने सगळे खरोखरच एकसारखे दिसतात. फक्त अनैसर्गिक नसून सॅड आहे जरा. अभिनयासाठी एवढी मेहनत घेत नाहीत.
----------
विकु, हा तर स्पॉयलर झाला.
रमड, इंटरेस्टींग वाटतोय.
दोघांपैकी मॉर्गन फ्रीमनचे काम आवडतेच नेहमी. 'देवमाणूस' म्हटले की तो मेटॉफॉरिकली डोळ्यासमोर येतो.
त्याचे इंग्रजीही जुन्या वळणाचे (?) असल्याने ऐकायला आवडते.
सगळ्यांचा कॉस्मेटिक सर्जन एकच
सगळ्यांचा कॉस्मेटिक सर्जन एकच असणं असू शकतं. हो ना ! आजकाल अनेक ट्रम्प समर्थक महिलांनी ( व मॅत गेट्झ यांनी) एकाच डॉक्टर कडून प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आहे तिला 'मार अ लागो लूक' म्हणतात तसेच भारतात डॉक्टर कडे जाऊन 'आम्हाला नेपो किड लूक हवा' असे म्हणत असतील.
थोडं खाल्ल्यासारखं करून
थोडं खाल्ल्यासारखं करून डायरेक्ट 'कामाला' लागतात. असं पानात टाकून देऊ नये, पोटभर जेवून मग काय करायचे ते करावे
>>> तेच की.
फेक अनरिअलिस्टिक ब्यूटी स्टँडर्ड
>>>>
मुळात खुशी सुंदर नाहीये, (रुढार्थाने, नाहीतर आजकाल खरंखुरं लिहिलं की बॉडी शेमिंगचा आरोप होतो.) पण ती लाईम लाईटमध्ये आहे (किंवा आणली आहे) तर तिला घासून पुसून, ठाकून ठोकून सौंदर्याच्या निकषात बसवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
जेवत पण नाहीत ते, थोडं
जेवत पण नाहीत ते, थोडं खाल्ल्यासारखं करून डायरेक्ट 'कामाला' लागतात >>>
हो
फेक अनरिअलिस्टिक ब्यूटी स्टँडर्ड आणि सगळ्यांचा कॉस्मेटिक सर्जन एकच असणं असू शकतं >>> हे नोटिस होईल आता बघताना. नॉर्मल "दिसायला चांगले" असताना काही फीचर्स सर्जरी करून भीषण करतात हे लोक. त्यांना ज्यांना इम्प्रेस करायचे आहे ते लोक वेगळे आहेत हे उघड आहे.
अभिनयासाठी एवढी मेहनत घेत नाहीत. >>>
त्यांना रोलही त्यांच्याच सोशल सर्कल मधले असतात. फॅशन डिझायनर, श्रीमंत कुटुंबातील मुलगा ई. त्यामुळे अभिनय वेगळा करावाच लागत नसेल.
एके काळचा क्रश जिम्मि शेर्गिल
एके काळचा क्रश जिम्मि शेर्गिल वधुपित्याच्या भूमिकेत पाहून डिप्रेशन
नेपो किड लूक हवा
>>>
फेक अनरिअलिस्टिक ब्यूटी स्टँडर्ड आणि सगळ्यांचा कॉस्मेटिक सर्जन एकच असणं असू शकतं >>> हो हो, सगळे एकाच मुशीतले वाटतात.
थोडं खाल्ल्यासारखं करून डायरेक्ट 'कामाला' लागतात >>>
आधीच हा पिक्चर पाहावा की नाही याबद्दल संभ्रम होता. आता पाहू नये कडे जास्त झुकले आहे. त्यातून जीवावर उदार होऊन नादानियां पहिला तर माझा हा नादानपणा माफ करून टाका
>>>मॉर्गन फ्रीमनचे काम आवडतेच
>>>मॉर्गन फ्रीमनचे काम आवडतेच नेहमी. 'देवमाणूस' म्हटले की तो मेटॉफॉरिकली डोळ्यासमोर येतो. <<<

यु सेड इट. मी तर "गॉड" म्हणूनच संबोधते त्याला
लैच आवडतो तो. तसा गॉड असेल तर आपुन आस्तिक व्हायला तैयार है
^^माझं कुत्रंही अवाक होऊन
^^माझं कुत्रंही अवाक होऊन टिव्हीकडे बघू लागलं^^
कोकोनटला कुत्र म्हटल्याचा जाहीर निषेध.....
बाकी त्या नेपो किड्स ना काहीही म्हणा.....
मजा सुरुय इथे
मजा सुरुय इथे
यातले कुठले कुठले मूव्हीज इथे
यातले कुठले कुठले मूव्हीज इथे दिसतात तेव्हढे रेकोज पोहोचले
अजून GOT पाहिलेले नाही. त्यामुळे नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार रिन्यू न करता HBO घ्यायचा प्लान होता. पण स्टोरी टेलर मुळे विसरले.
कोकोनटला कुत्र म्हटल्याचा
कोकोनटला कुत्र म्हटल्याचा जाहीर निषेध.....

बाकी त्या नेपो किड्स ना काहीही म्हणा.....>>>
Eye for an eye बघितला.
Eye for an eye बघितला.
त्यावरूनच घेतलेले दुश्मन आणि मॉम बघितले (ते पहिल्या पाच मिनिटातच कळतं )असले तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.
धनवन्ती किती दिवसांनी गाठ
धनवन्ती
किती दिवसांनी गाठ 

जिमी शेरगील नाही सिनेमात, विकुंनी रॉन्ग नंबर दिला. जुगल हंसराज आणि दिया मिर्झा ( घ्या आता) इब्राहिमच्या आईबाबाच्या रोलमधे आहेत. सुनील शेट्टी आणि महिमा चौधरी खुशीच्या आईबाबाच्या. दियाला मॉं वतारात बघून मलाच क्लेश झाले. खुशी समोर तर अप्सराच वाटत होती. खुशीचा अभिनय इतका वाईट आहे की अनन्या पांडे सुद्धा मेरिल स्ट्रिप वाटावी. इब्राहिम संवाद नवीन वाचायला शिकलेला पहिलीतला मुलगा कसं अक्षरं फोडून वाचेल तसे म्हणतो. खु शी मु झे डि बे ट कं पि टि श न का टॉ प र ब न ना है... हे असे.
राभु, मीही गॉट एक एपिसोड बघून थांबवले होते. पुन्हा प्रयत्न करेन आता.
अवलताई,
----------
नादानियां पूर्ण बघितला. हो, बंडलच आहे पण खात्री झाली.
सुशे खूप श्रीमंत पण पुरुषसत्ताक विचारांचा बाबा आहे. 'मला वाटलं मुलगा होईल आणि मी त्याला आयव्ही लीग मधे घालून मोठा वकील करेन पण झाली ही गॉर्जिअस मुलगी आता ती पेस्ट्री शेफ किंवा ड्रेस डिझायनर होणार तेथेही' असं बोलत असतो. बायकोला मुलासाठी वारंवार आयव्हीएफ करायला लावतो, ज्या फेल झाल्याने लफडे करून त्या बाईला प्रेग्नंट करून लग्नही करणार असतो. कशासाठी तर 'सिंघानिया ॲन्ड सन्स' नावं रहावे. तेही ठीक आहे पण त्याला त्याची चूक उमगत नाही, तो नंतर दाखवलाच नाही. हीच मुव्ह ऑन होते आईसोबत. जुगल हंसराज तर प्रेमळ पिता म्हणजे हेलिकॉप्टर बाबाच आहे अगदी. तरूण मुलाच्या रूममधे नॉक न करता येणारे आईबाबा आहेत. इब्राहिम जरा गरीब आहे खुशीपेक्षा, म्हणजे काय ते कळत नाही पण त्याला 'नोएडाका प्रिन्स' म्हणून बुली करत असतात. तो डिबेट स्पर्धा शर्ट काढून सिक्स पॅक दाखवून जिंकतो.
दिल्लीचे एलिट कॉलेज म्हणून सगळे युरोप असल्यागत दिवसरात्र स्वेटर, जॅकेट, शाल पांघरून हिंडतात. शोलेचा ठाकूर आठवावा विनाकारण. गाणी लक्षात राहत नाहीत. बंदिश बॅन्डिट मधली अनन्या येथे मैत्रीण आहे, जी खुशीपेक्षा गोड दिसते. ही खरेतर दोन तासांची रील आहे, ज्यात छान- छान कपडे घातलेले लोक आहेत. तुमच्या पैकी कुणाचा पाहून झाल्यावर उरलेली नावं मिळून ठेवूयात.
मीही गॉट एक एपिसोड बघून
मीही गॉट एक एपिसोड बघून थांबवले होते. >> चला ,कुणी तरी आहे आपल्यासारखं

नादानियां बद्दल यापेक्षा काही चांगलं लिहीण्यासारखं असेल असं वाटत नाही.
लांबच रहावं.
जर कुणी Outback (2019) ( Australian survival Thriller) पाहिला असेल तर प्लीज इथे कसा आहे ते कळवा.
याच नावाचा २०२० चा मूव्ही वेगळा आहे का ? दोन्हीतला कुठला चांगला आहे ?
मी आणखी १५-२० मिनिटं पाहिला.
मी आणखी १५-२० मिनिटं पाहिला. खुशीची स्टोरी सोशल मीडियासाठी जगणार्या पिढीची आहे.
एकीकडे अठराव्या वाढदिवसाला मुलगी आईबापांना आपला बॉयफ्रेंड भेटवते. दुसरीकडे मुलाचा बाप मुलगा फोन उचलत नाही म्हणून पॅनिक होतो.
शाळेच्या कँपसमध्ये दोघांना एकटंच बागडता येईल अशा असंख्य जागा आहेत. शाळेत क्लासरूम्स नाहीत. पण स्विमिंग पूल आहे. सगळी मुलं बघावं तेव्हा बागेत बसलेली असतात.
इब्राहिममध्ये सुधारणेला वाव आहे. प्रेमात पडतानाचे भाव दिसतात चेहर्यावर. बाकी कसले नाही. त्याचा बापही सुरुवातीला असाच होता. खुशीने पुन्हा फिल्म करू नये. खुशीची मैत्रीण तिच्यापेक्षा गोड दिसते +१.
पॅट्रिआर्की प्रकरण पहिल्याच शॉटमध्ये दाखवलं होतं.
दोघा लीडचे संवाद डब केलेत अशी मला दाट शंका आहे.
Pages