गणपती बाप्पा गेले तरी गणेशोत्सव ग्रूप अजून उघडा आहे, स्पर्धांचा निकाल लागला नाहीये, आणि लेकीच्या चित्रांचे कौतुक बघून लेकाला सुद्धा ते करून घ्यायची इच्छा झाल्याने आणि त्यासाठी त्याने मेहनत घेऊन काही, किंवा बरीच काही चित्रे रेखाटल्याने हा धागा काढत आहे. तसेही आपलीच मायबोली आहे. थोडे नियम इकडचे तिकडे झाल्यास चालतंय
सुरुवात गणपती बाप्पांपासून
चित्र काढल्यावर कागद कापाकापी आयडिया त्याचीच. कुठेतरी बघितले असेल म्हणा, युट्यूब वगैरे..
त्यांनतर आवडते कार्टून डोरेमॉन.
बघण्याचे नाही तर चित्र काढण्याचे आवडते.
बघायला आणि तसे वागायला आजही ऑगी नंबर वन!
पण चित्र काढायला हे डोरेमॉन सोपे वाटत असावे जे दोन दिवसात चार पाच काढून रंगवले.
तो ही चित्रे न बघता काढतो. वरची गणपतीची चित्रे देखील त्याने मूळ चित्राकडे न बघता काढली. ही गोष्ट चांगली की वाईट माहीत नाही. पण परीसारखी बघून काढ अजून चांगली येतील असे सांगितले तरी ऐकत नाही.
हे मात्र त्याचे परीसारखेच आहे. दोन्ही पोरे बापाचे ऐकत नाही पण प्रेमही तितकेच करतात म्हणून काही बोलूही शकत नाही
त्यानंतर हा एक भालू द बेअर काढला. काळया रंगाने रंगवायला जात होता, पण हात धरून थांबवला आणि आधी फोटो काढून घेतला.
त्याच्या बाजूला जे मॉडर्न आर्ट चिन्ह आहे ते काय काढलेस विचारल्यावर त्याचे इतके सारे अर्थ सांगितले की त्याचा स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
आणि ही थोडीशी कलरींग!
एक हसरे कासव, परीने ज्याचे चित्र काढले तेच आहे बहुधा.
आणि चौथा जो उंट आहे तो गणपतीच्या आधी रंगवलेला आहे. पण चार फोटोंचा कोलाज करायला म्हणून त्यालाही आत घेतले
धन्यवाद,
सि. अँड ज्यु. ऋ
ऋतुराज हो,
ऋतुराज हो,
चौकशी चालू आहे जवळच्या ठिकाणी. त्यांच्याच शाळेतील एक ड्रॉइंग टीचर क्लास घेतात. दर शनिवारी दिड तासाचे 22 सेशन आणि फिज 14 हजार.. अर्थात हे पैश्याच्या हिशोबाने योग्य की कसे याची कल्पना नाही. पण त्या क्लास तिसरी पासूनच्या मुलांचे घेतात आणि हा आता दुसरीत जाणार आहे. अर्थात याची चित्रे त्यांना दाखवून याच्या डेडिकेशन बद्दल सांगितले तर घेतील कदाचित या वर्षीही. शाळेतल्याच बाई क्लास मध्ये काही वेगळे शिकवतात का हा देखील प्रश्न पडला आहे. पण एकूणच क्लासचा विचार चालू आहेच..
Pages