गणपती बाप्पा गेले तरी गणेशोत्सव ग्रूप अजून उघडा आहे, स्पर्धांचा निकाल लागला नाहीये, आणि लेकीच्या चित्रांचे कौतुक बघून लेकाला सुद्धा ते करून घ्यायची इच्छा झाल्याने आणि त्यासाठी त्याने मेहनत घेऊन काही, किंवा बरीच काही चित्रे रेखाटल्याने हा धागा काढत आहे. तसेही आपलीच मायबोली आहे. थोडे नियम इकडचे तिकडे झाल्यास चालतंय
सुरुवात गणपती बाप्पांपासून
चित्र काढल्यावर कागद कापाकापी आयडिया त्याचीच. कुठेतरी बघितले असेल म्हणा, युट्यूब वगैरे..
त्यांनतर आवडते कार्टून डोरेमॉन.
बघण्याचे नाही तर चित्र काढण्याचे आवडते.
बघायला आणि तसे वागायला आजही ऑगी नंबर वन!
पण चित्र काढायला हे डोरेमॉन सोपे वाटत असावे जे दोन दिवसात चार पाच काढून रंगवले.
तो ही चित्रे न बघता काढतो. वरची गणपतीची चित्रे देखील त्याने मूळ चित्राकडे न बघता काढली. ही गोष्ट चांगली की वाईट माहीत नाही. पण परीसारखी बघून काढ अजून चांगली येतील असे सांगितले तरी ऐकत नाही.
हे मात्र त्याचे परीसारखेच आहे. दोन्ही पोरे बापाचे ऐकत नाही पण प्रेमही तितकेच करतात म्हणून काही बोलूही शकत नाही
त्यानंतर हा एक भालू द बेअर काढला. काळया रंगाने रंगवायला जात होता, पण हात धरून थांबवला आणि आधी फोटो काढून घेतला.
त्याच्या बाजूला जे मॉडर्न आर्ट चिन्ह आहे ते काय काढलेस विचारल्यावर त्याचे इतके सारे अर्थ सांगितले की त्याचा स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
आणि ही थोडीशी कलरींग!
एक हसरे कासव, परीने ज्याचे चित्र काढले तेच आहे बहुधा.
आणि चौथा जो उंट आहे तो गणपतीच्या आधी रंगवलेला आहे. पण चार फोटोंचा कोलाज करायला म्हणून त्यालाही आत घेतले
धन्यवाद,
सि. अँड ज्यु. ऋ
गणपती उपक्रमानंतर पोराला जी
गणपती उपक्रमानंतर पोराला जी आवड लागली ती लागलीच.. हल्ली जवळपास रोजच हात साफ करतो आणि माझ्याकडे फोटो काढायला घेऊन येतो
थोडीशी झलक..
हळूहळू कला बहरत आहे.
न बघता काढतो. पूर्ण एकाग्रतेने काढतो. आणि फार वेगात काढतो. मोठ्या बहिणीशी कसली स्पर्धा नाही. आपल्या आनंदासाठी काढतो. मी त्याच्या चित्रांचा फोटो काढावा इतकीच अपेक्षा ठेवून काढतो.
मायबोली उपक्रमात भाग घ्यावा म्हणून त्याला प्रोत्साहन दिले त्याचा असा फायदा झाला. त्यामुळे मायबोलीचे सुद्धा धन्यवाद
.
.
.
हे खालचे कृष्णाचे माझे फेवरेट.. अगदी प्रो काढले आहे
. .
.
(No subject)
Sketches..
ओवरऑल देवाचे चेहरे काढणे आवडता छंद
छान ऋ, शाब्बास
छान ऋ, शाब्बास
धन्यवाद किल्ली
धन्यवाद किल्ली
व्वा, फार सुंदर काढली आहेत
व्वा, फार सुंदर काढली आहेत चित्रे.
चेहऱ्यावरील भाव, डोळे मस्त रेखाटले आहेत.
शुभेच्छा!
ऋन्मेष
ऋन्मेष
कसली भारी चित्रे काढली आहेत.
छान चित्रे.
छान चित्रे.
खूप छान.
खूप छान.
सहीच!
सहीच!
छान
छान
एकदम झकास! प्रोफेशनल वाटत
एकदम झकास! प्रोफेशनल वाटत आहेत.
खऱ्या ऋन्मेषला शाबासकी
धन्यवाद सर्व काका मामा ताई
धन्यवाद सर्व काका मामा ताई माई अक्कांचे
मस्त आहेत चित्र..!
मस्त आहेत चित्र..!
चित्रकलेची आवड लागली मुलाला.. खूप छान.!
वा छान आहे.
वा छान आहे.
धन्यवाद रुपाली, निलेश..
धन्यवाद रुपाली, निलेश..
रुपाली हो.. आवड लागली आणि ते एक छान झाले.
कारण आमच्या घरात दोन्ही पिढ्या मिळून मी सोडून प्रत्येकाचे अक्षर नाही तर चित्रे काहीतरी छान होतेच.. हा सुद्धा त्या गटात गेल्याने आता मी पुन्हा युनिक पीस झालो
Form continue... . .
Form continue...
.
.
किती गोड. शंकर फार मजेशीर
किती गोड. शंकर फार मजेशीर आहेत
व्वा मस्तच काढली आहेत चित्रे.
व्वा मस्तच काढली आहेत चित्रे.
पेन्सिल स्केच खूपच सुंदर आहे.
रंगीत चित्रातली साप एकदम क्यूट वाटतायत.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
चित्रातले डोळे आवडले.
धन्यवाद सामो, समाधानी, ऋतुराज
धन्यवाद सामो, समाधानी, ऋतुराज..
सापांवर आता नजर गेली.. खरेच क्यूट आहेत
साप नाही, नागराज आहेत ते.
साप नाही, नागराज आहेत ते.
केशवकूल, त्याचे शंकराचे चित्र
केशवकूल, त्याचे शंकराचे चित्र वारंवार काढायचे इन्सपिरेशन मी आहे आय मीन माझ्या वाढलेल्या जटा आहेत असे आमच्या घरचे गंमतीने म्हणतात
अजून काही ताजी ताजी चित्रे..
अजून काही ताजी ताजी चित्रे..
पहिले कालचे
आणि दुसरे आजचे..
रोज किमान एक काढतो. सुटलाय नुसता ..
चित्र या कलेशी माझा दूर दूर पर्यंत संबंध नसल्याने मला त्याची गेल्या दोनेक महिन्यातील प्रगती बघून थक्क व्हायला होते
.
एकूण छोट्या ऋन्मेऽऽषच्या
एकूण छोट्या ऋन्मेऽऽषच्या मस्तकावर शंकर महादेवाचा वरदहस्त आहे असे दिसते आहे!
छान काढलीयेत सगळी चित्रं .
छान काढलीयेत सगळी चित्रं . डिटेलिंग खूपच छान . शाब्बास छोटा ऋ !
धन्यवाद जयू आणि केशव कूल
धन्यवाद जयू आणि केशव कूल
रविवारी सोसायटीमध्ये चित्रकला
रविवारी सोसायटीमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. ऑर्गनाईजर बाहेरचे होते.
स्पर्धेला पंधरा वर्षापर्यंतची मुले होती. त्यांचे दोन वयोगट पाडले होते.
मोठ्या वयोगटात मुलगी पहिली आली. तिला गोल्ड मेडल मिळाले.
मुलाच्या म्हणजे रुनुच्या वयोगटात कलरींग होते. तरी त्याने चित्रच काढत मोठ्या वयोगटात भाग घेतला आणि परीच्याच वयोगटात तो तिसरा आला. त्याला ब्राँझ मेडल मिळाले.
Pages