गणपती बाप्पा गेले तरी गणेशोत्सव ग्रूप अजून उघडा आहे, स्पर्धांचा निकाल लागला नाहीये, आणि लेकीच्या चित्रांचे कौतुक बघून लेकाला सुद्धा ते करून घ्यायची इच्छा झाल्याने आणि त्यासाठी त्याने मेहनत घेऊन काही, किंवा बरीच काही चित्रे रेखाटल्याने हा धागा काढत आहे. तसेही आपलीच मायबोली आहे. थोडे नियम इकडचे तिकडे झाल्यास चालतंय
सुरुवात गणपती बाप्पांपासून
चित्र काढल्यावर कागद कापाकापी आयडिया त्याचीच. कुठेतरी बघितले असेल म्हणा, युट्यूब वगैरे..
त्यांनतर आवडते कार्टून डोरेमॉन.
बघण्याचे नाही तर चित्र काढण्याचे आवडते.
बघायला आणि तसे वागायला आजही ऑगी नंबर वन!
पण चित्र काढायला हे डोरेमॉन सोपे वाटत असावे जे दोन दिवसात चार पाच काढून रंगवले.
तो ही चित्रे न बघता काढतो. वरची गणपतीची चित्रे देखील त्याने मूळ चित्राकडे न बघता काढली. ही गोष्ट चांगली की वाईट माहीत नाही. पण परीसारखी बघून काढ अजून चांगली येतील असे सांगितले तरी ऐकत नाही.
हे मात्र त्याचे परीसारखेच आहे. दोन्ही पोरे बापाचे ऐकत नाही पण प्रेमही तितकेच करतात म्हणून काही बोलूही शकत नाही
त्यानंतर हा एक भालू द बेअर काढला. काळया रंगाने रंगवायला जात होता, पण हात धरून थांबवला आणि आधी फोटो काढून घेतला.
त्याच्या बाजूला जे मॉडर्न आर्ट चिन्ह आहे ते काय काढलेस विचारल्यावर त्याचे इतके सारे अर्थ सांगितले की त्याचा स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
आणि ही थोडीशी कलरींग!
एक हसरे कासव, परीने ज्याचे चित्र काढले तेच आहे बहुधा.
आणि चौथा जो उंट आहे तो गणपतीच्या आधी रंगवलेला आहे. पण चार फोटोंचा कोलाज करायला म्हणून त्यालाही आत घेतले
धन्यवाद,
सि. अँड ज्यु. ऋ
मस्तच काढलंय
मस्तच काढलंय
धन्यवाद रीया
धन्यवाद रीया
सुंदर...
सुंदर...
चांगला चित्रकार होऊ शकतो... शुभेच्छा
अरे ह्याची पण चित्रकला भारी
अरे ह्याची पण चित्रकला भारी आहे. तुमच्या घरी कोणी मोठे चित्रकार आहे का?
छान काढतोय की मस्त एकदम
छान काढतोय की
मस्त एकदम
भारी चित्रं..रंगवली पण किती
भारी चित्रं..रंगवली पण किती मस्त..
नाही हो, काल परवापर्यंत हा
@ हपा,
नाही हो, काल परवापर्यंत हा येडा होता. (हे मी त्याला दिलेले घरचे नाव) त्याला नकला सोडून इतर काही जमायचे नाही. या पोराचे पुढे कसे होणार याची चिंता वाटावे टाईप होता. पण मग हळूहळू एकेक गुण दाखवू लागला आहे. चित्र काढणे हा गुण अगदी लेटेस्ट आहे. अन्यथा महिनाभर आधी या क्षेत्रात त्याचे काही नव्हते जे कौतुकाने कधी व्हाट्सअप स्टेटसला शेअर करावे.
गेले काही काळात जाणवू लागते आहे की मी त्याला बरेच बाबतीत अंडरएस्टिमेट केले होते. म्हणजे प्रोत्साहन नेहमीच दिले होते. फक्त अपेक्षा नसायच्या. (येडा बोलायचो त्यावर जाऊ नका, आमच्या घराचे कल्चर जरा वेगळेच आहे)
आणि घरी तसे माझ्यापेक्षा चांगले चित्र काढणारे सगळेच आहेत. पण विषेश म्हणावे तर माझे वडील आणि काका जे जे स्कूल आर्ट्सला होते. काका होते भारी चित्रकार. त्यांच्या पेंटिंग जुन्या घरात फ्रेम करून लावल्या होत्या. वडील तसे चित्रकार नसले तरी अक्षर आर्टिस्टिक होते. कापडी बॅनर आणि बोर्ड रंगवायचे. व्यवसाय म्हणून नाही पण हौस म्हणून.
अरे व्वा! वडील आणि काकांबद्दल
अरे व्वा! वडील आणि काकांबद्दल ऐकून छान वाटलं. दोन्ही नातवंडांमध्ये ते गुण आले आहेत.
मुलं अशी अनपेक्षित सुखद धक्का देतात तेव्हा भारी वाटत असेल.
छान चित्रे काढली आहेत ऋन्मेष
छान चित्रे काढली आहेत ऋन्मेष ने. रंगवलीत पण मस्त.
मुलं कलाकार आहेत. दोन्ही आजोबांचे गुण उतरले आहेत
सर्वांचे धन्यवाद
सर्वांचे धन्यवाद
मुलं अशी अनपेक्षित सुखद धक्का देतात तेव्हा भारी वाटत असेल. >>>>>> हो अगदीच. आपण मुलांवर अपेक्षा लादणारे नसलो तरी आपल्या मनात त्या स्वाभाविकपणे असतातच.
काल कोलाज बनवायच्या नादात हा
काल कोलाज बनवायच्या नादात हा फोटो राहिला.
थोडे वेगळे आणि क्रिएटिव्ह चित्र.
कुठेतरी बघितलेलेच असेल. पण त्याचे त्यानेच केले. काहीतरी लपून छपून करणे आणि सरप्राईज देणे ही सवय दोन्ही मुलांना आहे.
Swan काढताना कल्पकता अफलातून
Swan काढताना कल्पकता अफलातून आहे हे जाणवते. इतर चित्रेही खूप सुरेख.
फारच छान.
सुंदर चित्रे !!
सुंदर चित्रे !!
दोन्ही मुलं भारी कलाकार आहेत.
खूपच गोड आहे की हे. शाब्बास
खूपच गोड आहे की हे. शाब्बास ओरिजनल ऋ
ताईच्या पावलावर पाऊल टाकणार असल्याचे दिसतेय.
खूप गोड चित्रे काढलीत ऋन्मेष
खूप गोड चित्रे काढलीत ऋन्मेष ने.
धन्यवाद अni आणि समाधानी,
धन्यवाद अni आणि समाधानी, अस्मिता आणि शर्मिला
गोड काढलीत कार्टून्स.तो
गोड काढलीत कार्टून्स.तो गुलाबी हंस पण गोंडस आहे.
अग्निपंख मस्तच काढलाय.
अग्निपंख मस्तच काढलाय. शिंपल्याची आयडिया पण भारी.
swan कसला भारी गोड काढलाय
swan कसला भारी गोड काढलाय
Swan फारच गोड.
Swan फारच गोड.
माझी चित्रकला इतकी वाईट होती की मी श्वान काढायला गेलो की त्याचा swan व्हायचा.
स्वान फारच गोड आहे... बाकी
स्वान फारच गोड आहे... बाकी चित्रे देखील छानच
कलाकार आहे तुमचा बाळ.
कलाकार आहे तुमचा बाळ.
किती गोड स्वान आहे.
किती गोड स्वान आहे. पिंक फ्लेमिंगो आहे तो.
सर्व चित्रे आवडली.
Wow ऋन्मेष, Keep it up!
Wow ऋन्मेष, Keep it up!
सर्व चित्रे मस्त आहेत!
Flamingo पण cute!
धन्यवाद अनु, ऋतुराज, केया,
धन्यवाद अनु, ऋतुराज, केया, मनिम्याऊ, किट्टू, सामो आणि संजना
हर्पा, माझ्या वाईट चित्रकलेचा, आणि त्याहून वाईट हस्ताक्षराचा कौतुकाने मी धागा सुद्धा काढला होता मागे.
बाकी श्वान तर मी कधी काढायचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि कधी करणार देखील नाही. त्यामुळे काढला असता तर कसा दिसला असता हे गुपित ठेऊनच मी हे जग सोडणार बहुधा
पिंक फ्लेमिंगो आहे तो.>>> अरे
पिंक फ्लेमिंगो आहे तो.>>> अरे हो, फ्लेमिंगो.. कसा विसरलो त्याला.. ते सुद्धा आम्ही स्वतःच फ्लेमिंगो सिटी मध्ये राहत असून
(No subject)
धन्यवाद संयोजक.. हे विसरूनच
धन्यवाद संयोजक.. हे विसरूनच गेलो होतो. छान आहे प्रशस्तीपत्रक.. पोरगा खुश झाला
मायबोली म्हणजे वविला गेलेलो त्यांनी हे दिले असे सांगितले तेव्हा त्याच्या त्याच्या चौकश्या थांबल्या. वविचा फायदा.
Swan काढताना कल्पकता अफलातून
Swan काढताना कल्पकता अफलातून आहे हे जाणवते. इतर चित्रेही खूप सुरेख.....+१.
धन्यवाद देवकी ..
धन्यवाद देवकी ..
आणि मायबोलीचे सुद्धा आभार. या निमित्ताने मुलाला जो जोश चढला आहे ते थांबायचे नावच घेत नाहीये. हल्ली रोजच्या रोज आणि फार आवडीने काढू लागला आहे आता चित्रे
Pages