गणपती बाप्पा गेले तरी गणेशोत्सव ग्रूप अजून उघडा आहे, स्पर्धांचा निकाल लागला नाहीये, आणि लेकीच्या चित्रांचे कौतुक बघून लेकाला सुद्धा ते करून घ्यायची इच्छा झाल्याने आणि त्यासाठी त्याने मेहनत घेऊन काही, किंवा बरीच काही चित्रे रेखाटल्याने हा धागा काढत आहे. तसेही आपलीच मायबोली आहे. थोडे नियम इकडचे तिकडे झाल्यास चालतंय
सुरुवात गणपती बाप्पांपासून
चित्र काढल्यावर कागद कापाकापी आयडिया त्याचीच. कुठेतरी बघितले असेल म्हणा, युट्यूब वगैरे..
त्यांनतर आवडते कार्टून डोरेमॉन.
बघण्याचे नाही तर चित्र काढण्याचे आवडते.
बघायला आणि तसे वागायला आजही ऑगी नंबर वन!
पण चित्र काढायला हे डोरेमॉन सोपे वाटत असावे जे दोन दिवसात चार पाच काढून रंगवले.
तो ही चित्रे न बघता काढतो. वरची गणपतीची चित्रे देखील त्याने मूळ चित्राकडे न बघता काढली. ही गोष्ट चांगली की वाईट माहीत नाही. पण परीसारखी बघून काढ अजून चांगली येतील असे सांगितले तरी ऐकत नाही.
हे मात्र त्याचे परीसारखेच आहे. दोन्ही पोरे बापाचे ऐकत नाही पण प्रेमही तितकेच करतात म्हणून काही बोलूही शकत नाही
त्यानंतर हा एक भालू द बेअर काढला. काळया रंगाने रंगवायला जात होता, पण हात धरून थांबवला आणि आधी फोटो काढून घेतला.
त्याच्या बाजूला जे मॉडर्न आर्ट चिन्ह आहे ते काय काढलेस विचारल्यावर त्याचे इतके सारे अर्थ सांगितले की त्याचा स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
आणि ही थोडीशी कलरींग!
एक हसरे कासव, परीने ज्याचे चित्र काढले तेच आहे बहुधा.
आणि चौथा जो उंट आहे तो गणपतीच्या आधी रंगवलेला आहे. पण चार फोटोंचा कोलाज करायला म्हणून त्यालाही आत घेतले
धन्यवाद,
सि. अँड ज्यु. ऋ
मस्त! दोघांचही अभिनंदन!
मस्त! दोघांचही अभिनंदन!
धन्यवाद आर्च
धन्यवाद आर्च
तुमच्या मुलांचे हार्दिक
तुमच्या मुलांचे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद निलेश
धन्यवाद निलेश
आमचा मास्टर परफेक्शनिस्ट !
आधी डोळे काढतो.
चुकले तर फुल्ली मारतो..
त्याची फुल्ल्या मारलेली चित्रे बघितले तरी मला वाटते किती ती मस्ती, चांगले तर होते.. कारण मला तितके सुद्धा आयुष्यात कधी जमलेले नसते.
पण तो चिकाटीने पुन्हा काढतो.
आणि सुरुवात मनासारखी जमली की मग चित्र पूर्ण करून त्यात रंग भरतो
.
.
पहीला फुली मारलेला ब्लाँड
पहीला फुली मारलेला ब्लाँड (भुरा)
शंकर छान आहे की.
उगाच नाही पार्वतीने तप केले 

तडित्प्रभाताम्रजटाधराय - लखलख वीज तळपून जावी तसे तांब्याच्या रंगाचे स्ट्रिक्स जटांमध्ये आहेतच शंकराच्या
---------------
शेवटचा शंकर कसला गोड आहे. 'हां कॅमेरा रेडी आहे ना?' असे विचारत आहे
मला छोट्या ऋन्मेऽऽषचे भारीच
मला छोट्या ऋन्मेऽऽषचे भारीच कौतुक वाटते. शाब्बास!
फारच सुंदर चित्रे काढतो. एकदम क्युट
शंकर आवडता देव दिसतोय.
त्याच बरोबर आहे. फुली मारलेला शंकराचा तिसरा डोळा उघडा आहे त्यामुळे त्याने ते पूर्ण केलं नसावं.
अभिनंदन pari आणि jr ऋ हा
अभिनंदन pari आणि jr ऋ
हा बदाम द्या त्या दोघांना ❤️❤️
.
खूप सुंदर चित्रे काढली आहेत.
Details सहित.
रमा ला शिकवणार का ऋ ?
आजच म्हणाली मला चित्रे कशी काढतात ते सांग. किंवा class लाव म्हणे
किल्ली हो, कधी मुंबई/नवी
किल्ली हो, कधी मुंबई/नवी मुंबई आलीस की घरी घेऊन ये त्यांना.. चित्रासोबत अजून बरेच काही शिकवतील जे वर्षभर तरी पुरेल
अश्या बरेच फुल्ल्या आहेत त्याच्या बुकमध्ये. आधी गणपती मग कृष्ण कधी देवी पार्वती वगैरे. सगळे देवच आवडीचे आहेत. पण शंकराने रेकॉर्ड तोडलेत सारे. वेगळे काही काढ म्हटले तरी या देवातच व्हेरीएशन करत राहतो
फारच छान. मोठा कलाकार होणार
फारच छान. मोठा कलाकार होणार हा.
थोडे experiment
थोडे experiment
थोडी improvement
.
(No subject)
साईड अँगल.. युट्यूब व्हिडिओ बघून
मस्त ऋ ज्यु.
मस्त ऋ ज्यु.
महादेवाची पाठ काय सोडत नाहीये
हो, त्याला काल शिवाजी महाराज
हो, त्याला काल शिवाजी महाराज दाखवले. म्हटले आता यांचे चित्र काढ. तर ते देव आहेत का विचारत होता
सध्या देवापलीकडे जायचा विचार नाहीये. पण याचा एक फायदा झाला, भूताला घाबरणे बरेपैकी कमी झाले आणि एकटे राहायची भीती वाटणे बंद झाले.
अरे, किती मस्त रंगवतोय ते ही
अरे, किती मस्त रंगवतोय ते ही एवढ्या वयात!
आणि काढतोयसुद्धा छान.
यूट्यूब व्हिडिओ पॉज करून
धन्यवाद मानवमामा,
यूट्यूब व्हिडिओ पॉज करून ड्रॉइंग.. हे असे का काढावेसे वाटले त्याचे त्याला माहीत
मस्तच काढतोय चित्रे...
मस्तच काढतोय चित्रे....शाब्बास
शंकर तर आहेच...
शंकर तर आहेच...
गदाधारी बजरंगबली सुद्धा आहे...
पण काही नवीन देवांनी एन्ट्री
पण काही नवीन देवांनी एन्ट्री केली आहे
जसे की,
जय श्री राम !
जय श्री कृष्ण !!
राम आणि कृष्ण कसले सही काढलेत
राम आणि कृष्ण कसले सही काढलेत , खासकरुन ङोळे.
दंडवत, देवांना पण आणि छोट्या ऋ ला पण.
खरच राम कृष्ण मोहक आहेत.
खरच राम कृष्ण मोहक आहेत.
छानच ! टॅलेंटेड आहे छोटा !
छानच ! टॅलेंटेड आहे छोटा !
धन्यवाद किट्टु, सामो, आरती..
धन्यवाद किट्टु, सामो, आरती..
रामकृष्ण आम्हालाही फ्रेम करून लावावे असे वाटले होते
त्याच्या बरेच मित्रांचे पालक आम्हाला विचारतात की तुम्ही त्याला कुठला ड्रॉईंग क्लास लावला आहे? आम्हाला सुद्धा आमच्या मुलांना पाठवायचे आहे
स्वतः युट्यूब बघून शिकतो आणि शाळेत जाऊन मित्रांना ते शिकवतो. आणि ती मुले त्यांच्या घरी जाऊन हे सांगतात..
(No subject)
बापरे! ऋन्मेऽऽष , तुमचा
बापरे! ऋन्मेऽऽष , तुमचा मुलगा खरच गिफ्टेड कलाकार आहे. फारच मस्त. शब्द नाहीत माझ्याकडे.
बापरे! ऋन्मेऽऽष , तुमचा मुलगा
बापरे! ऋन्मेऽऽष , तुमचा मुलगा खरच गिफ्टेड कलाकार आहे. फारच मस्त. शब्द नाहीत माझ्याकडे. +1
खरच टॅलेंटेड आहे छोटा ऋ ,खरंतर तुमची दोन्ही मुलं.चित्रकला अशीच बहरू दे.
धन्यवाद आर्च आणि सिमरन..
धन्यवाद आर्च आणि सिमरन..
युट्यूब बघून केले हे..
धोनी दुसरा प्रयत्न आणि रोहीत पहिलाच प्रयत्न आहे हा.
खालील प्रमाणे चेहऱ्याचा लंबगोल काढून सुरुवात करतात त्या पद्धतीने. मला तर याचेही कौतुक वाटते कारण स्वतःच्या हाताने आंघोळ वगैरे बरेच काही करता येत नाही अजून गधड्याला पण चित्रकलेत मात्र शंभर टक्के ब्रेन वापरतो.
गिफ्टेड कलाकार आहे छोटं ऋ.
गिफ्टेड कलाकार आहे छोटं ऋ.
Pages