चित्रकला उपक्रम : आवडते कार्टून - ऋन्मेऽऽष - ऋन्मेष नाईक

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 September, 2024 - 15:48

गणपती बाप्पा गेले तरी गणेशोत्सव ग्रूप अजून उघडा आहे, स्पर्धांचा निकाल लागला नाहीये, आणि लेकीच्या चित्रांचे कौतुक बघून लेकाला सुद्धा ते करून घ्यायची इच्छा झाल्याने आणि त्यासाठी त्याने मेहनत घेऊन काही, किंवा बरीच काही चित्रे रेखाटल्याने हा धागा काढत आहे. तसेही आपलीच मायबोली आहे. थोडे नियम इकडचे तिकडे झाल्यास चालतंय Happy

सुरुवात गणपती बाप्पांपासून Happy
चित्र काढल्यावर कागद कापाकापी आयडिया त्याचीच. कुठेतरी बघितले असेल म्हणा, युट्यूब वगैरे..

IMG-20240925-WA0003.jpg

त्यांनतर आवडते कार्टून डोरेमॉन.
बघण्याचे नाही तर चित्र काढण्याचे आवडते.
बघायला आणि तसे वागायला आजही ऑगी नंबर वन!
पण चित्र काढायला हे डोरेमॉन सोपे वाटत असावे जे दोन दिवसात चार पाच काढून रंगवले.

IMG-20240925-WA0002.jpg

तो ही चित्रे न बघता काढतो. वरची गणपतीची चित्रे देखील त्याने मूळ चित्राकडे न बघता काढली. ही गोष्ट चांगली की वाईट माहीत नाही. पण परीसारखी बघून काढ अजून चांगली येतील असे सांगितले तरी ऐकत नाही.
हे मात्र त्याचे परीसारखेच आहे. दोन्ही पोरे बापाचे ऐकत नाही Happy पण प्रेमही तितकेच करतात म्हणून काही बोलूही शकत नाही Happy

त्यानंतर हा एक भालू द बेअर काढला. काळया रंगाने रंगवायला जात होता, पण हात धरून थांबवला आणि आधी फोटो काढून घेतला.
त्याच्या बाजूला जे मॉडर्न आर्ट चिन्ह आहे ते काय काढलेस विचारल्यावर त्याचे इतके सारे अर्थ सांगितले की त्याचा स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

IMG-20240925-WA0004.jpg

आणि ही थोडीशी कलरींग!
एक हसरे कासव, परीने ज्याचे चित्र काढले तेच आहे बहुधा.
आणि चौथा जो उंट आहे तो गणपतीच्या आधी रंगवलेला आहे. पण चार फोटोंचा कोलाज करायला म्हणून त्यालाही आत घेतले Happy

IMG-20240925-WA0001.jpg

धन्यवाद,
सि. अँड ज्यु. ऋ Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद निलेश Happy

आमचा मास्टर परफेक्शनिस्ट !
आधी डोळे काढतो.
चुकले तर फुल्ली मारतो..
त्याची फुल्ल्या मारलेली चित्रे बघितले तरी मला वाटते किती ती मस्ती, चांगले तर होते.. कारण मला तितके सुद्धा आयुष्यात कधी जमलेले नसते.
पण तो चिकाटीने पुन्हा काढतो.
आणि सुरुवात मनासारखी जमली की मग चित्र पूर्ण करून त्यात रंग भरतो Happy

IMG-20250112-WA0040.jpg
.
IMG-20250111-WA0012.jpg
.
IMG-20250111-WA0013.jpg

पहीला फुली मारलेला ब्लाँड (भुरा) Wink शंकर छान आहे की.
तडित्प्रभाताम्रजटाधराय - लखलख वीज तळपून जावी तसे तांब्याच्या रंगाचे स्ट्रिक्स जटांमध्ये आहेतच शंकराच्या Happy उगाच नाही पार्वतीने तप केले Wink
---------------
शेवटचा शंकर कसला गोड आहे. 'हां कॅमेरा रेडी आहे ना?' असे विचारत आहे Happy

मला छोट्या ऋन्मेऽऽषचे भारीच कौतुक वाटते. शाब्बास!
फारच सुंदर चित्रे काढतो. एकदम क्युट
शंकर आवडता देव दिसतोय.
त्याच बरोबर आहे. फुली मारलेला शंकराचा तिसरा डोळा उघडा आहे त्यामुळे त्याने ते पूर्ण केलं नसावं.

अभिनंदन pari आणि jr ऋ Happy हा बदाम द्या त्या दोघांना ❤️❤️
.
खूप सुंदर चित्रे काढली आहेत.
Details सहित.
रमा ला शिकवणार का ऋ ?
आजच म्हणाली मला चित्रे कशी काढतात ते सांग. किंवा class लाव म्हणे Lol

किल्ली हो, कधी मुंबई/नवी मुंबई आलीस की घरी घेऊन ये त्यांना.. चित्रासोबत अजून बरेच काही शिकवतील जे वर्षभर तरी पुरेल Wink

अश्या बरेच फुल्ल्या आहेत त्याच्या बुकमध्ये. आधी गणपती मग कृष्ण कधी देवी पार्वती वगैरे. सगळे देवच आवडीचे आहेत. पण शंकराने रेकॉर्ड तोडलेत सारे. वेगळे काही काढ म्हटले तरी या देवातच व्हेरीएशन करत राहतो Happy

Pages